Skip to main content

जीवनाचे कोडे

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 28/04/2013 23:45 या दिवशी प्रकाशित केले.

रविवार च्या सुंदर सकाळी,आठी पडली माझ्या भाळी ,
घराचा केला धोबी घाट ,लावली तिने रविवार ची वाट,
अहो,कालचे उरलेले गिळा ,चादरी धुवून नीट पिळा ,
आलेला राग गिळोनी ठेवल्या चादरी पीळोनि,
आता उभे राहिलात का असे?,साक्षात मला ती जगदंबा भासे,
लवकर तुम्ही स्टुलावर चढा ,कोपऱ्यातली कोळ्याची जाळी काढा,
करुनी सुंदर रविवार चा राडा,वाचला तिने कामांचा पाढा,
उलगडले मज जीवनाचे कोडे,सोडून संसार पळती जन का हिमालया कडे

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2832
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आणि रविवारच्या रात्री,
लावला बाम कपाळी । अन चोळली पाठ मोकळी।।
म्हणे राजा, या बसा । करा कामाच्या लीला।।
दमला फार करुनी कामे । माझ्या तोंड माऱ्याला
दावा आता तोऱ्याला। हळुच सोडवुन नाडीला ।।
पाहतो रोज वाट आता रविवारची।
करीत कामे हाताने पटापट । स्वप्नात रंगतो रातिच्या झटापटीची।।


नमस्कार,
रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये

ही सुविधा वापरावी


In reply to by संजय क्षीरसागर

बघा ना राव,
बर्‍याच जणांना कळतच नाही.

@मोदक,
ह्या ह्या ह्या.
(तुझ्या प्रश्नानंतरचे हे माझे उत्तर आहे.) ;)