✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुतपीठसाठी लेख : कृपया मदत करा

ख
खटासि खट यांनी
Sat, 02/02/2013 - 17:01  ·  लेख
लेख
लिखाणाचे निमित्त : खुमखुमी उद्देश : मनोरंजन, विरंगुळा फायदे : मिसळपाववर (कु)प्रसिद्ध होणे टार्गेट ऑडियन्स : मुक्तपीठचे नियमित वाचक प्रस्तावना : नमस्कार सदस्यहो. मला पुण्यनगरी देशी प्रसिद्ध व्हावेसे वाटत असल्याने एक लेख लिहून वर्तमानपत्रास पाठवावयाचे ठरवले. मी तसा चांदोबा. चंपक, ठकठक आणि सकाळ नियमित वाचतो. सकाळ मधे इमारतीच्या शेजारच्या मुतारीचा वास हे पत्र लिहीले होते. ते छापूनही आले होते. पण प्रसिद्धी मिळाली नाही. लोक म्हणतात लेख लिही. मी आवडीने मुक्तपीठ वाचतो. त्यासाठी लेख लिहावा असे मनी आले. एक कच्चा मसुदा आपल्याला दाखवत आहे. मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. कळावे आपला नम्र खट -------------------------------------------------------------------------------------------------------- साधारण पंधरा वर्षापूवीची गोष्ट. माझे लग्न होऊन नुकतीच सौ. घरी आली होती. सौ शीच लग्न झालं होतं त्यामुळे कृपया गोंधळ वाढवू नये. ( सौ माझ्याच घरी आली होती). तिची हौसमौज पुरवण्यात दिवस चांगले चालले होते. तिचा पहिलाच नोव्हेंबर असल्याने तो साजरा करण्यासाठी आम्ही दापोलीला पिकनिकला जाण्याचे ठरवले. आम्ही नुकतेच एक विमान खरेदी केले होते. सर्वांनी ठरवले कि विमानानेच जाऊ. माझी सौ, एम ए, पीएचडी, मातोश्री, एम (ऑनर्स), पिताश्री (बालिष्टर) आणि मी स्वतः (बारावी नंतरची प्रमाणपत्रे सापडत नाहीत) असे चौघे दापोलीस विमानातून कूच करते झालो. जाताना आम्ही वरंधा घाटातून जायचे ठरवले. त्या वेळी टोल नाका असल्याने या संधीचा फायदा घ्यावा असे ठरले. रस्त्याने मीच विमान चालवत होतो. साठच्या पुढे वेग नको असे पिताश्रींनी बजावल्याने त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले. हास्यविनोद करीत आणि गाण्याच्या भेंड्या खेळत आम्ही दापोलीस पोहोचलो. जेवण वगैरे करून विमानाने कर्दे या गावी पोहोचलो. दिवसभर समुद्र्वर मजा केल्यावर अंधार पडायच्या आधी निघावे असे ठरले. कारण या आधी विमानाने कुठेच गेलेलो नसल्याने हेडलाईट आणि डीपर ( डिप्पर) चालतात किंवा नाही याबद्दल काहो कल्पना नव्हती. जाताना ताम्हणी घाटातून जायचे ठरवले होते. ताम्हणी घाटातून जात असताना ब्रेक दाबलाच जाईना. बाका प्रसंग होता. आम्ही सगळे खूपच घाबरलो होतो. तरीही एका हाताने विमानाचे स्टियरींग सौ ला पकडायला सांगून मी खाली वाकून पाहीले तर काय, ब्रेकच्या खाली फूटबॉल आलेला ! आम्ही बीच वर व्हॉलीबॉल, फूटबॉल, बॅडमिंटन हे सगळे खेळ खेळल्यानंतर ते सगळं साहीत्य मागच्या सीट्खाली टाकलेलं. हा बॉल घरंगळ येऊन कधी ब्रेकखाली आला कळलंच नाही. जेव्हां बॉल काढला तेव्हां ब्रेक लागायला सुरूवात झाली. सगळ्यांच्या जिवात जीव आला. आम्ही आता वर चढून जंगलात आलो होतो. आजूबाजूला चिटपा़खरूही नव्हते. आमचे विमान आणि आम्ही इतकेच काय ते हलत होतो. अंधार मी म्हणत होता. आणि इतक्यात रस्त्यावर काहीतरी चमकलं. पुन्हापुन्हा पाहील्यावर खात्रीच पटली. शंकाच नको. दोन डोळे होते ते. सर्वांची भीतीने गाळणच उडाली. अचानक कुठलं जनावर पुढ्यात येऊन ठाकलंय याची कल्पना नव्हती. मागच्या मागे जाणं धोक्याचं होतं. वळणं वेडीवाकडी होती आणि विमान रिर्व्हर्समधे चालवायची माहिती नव्हती. घरी गेल्यावर काशीहून तज्ञांना बोलावून शिकून घ्यायचा मनोमन निश्चय केला. पण सध्या वेळ मारून न्यावी लागणार होती. पिताश्री मनाचा हिय्या करून खाली उतरले. ( आमच्यापुढे भविष्यकाळ होता तर पिताश्रींकडे भूतकाळ ). हेडलाईटच्या प्रकाशात चमकणा-या डोळ्यांकडे ते सावकाश जाऊ लागले. मला हेडलाईट बंद करायला लावला. जवळ गेल्यावर ते डोळे इकडे तिकडे पळू लागले. पिताश्रींनी देखील त्यांचा पाठलाग केला आणि जवळचा टॉर्च काढून त्यांच्यावर प्रकाशझोत सोडला. त्याबरोबर डोळे गायब झाले. पिताश्री विजयी मुद्रेने परत आल्यावर विमानातील दोन्ही महिलांनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहीले. पिताश्रींनी सांगितले आता घाबरायचं कारण नाही. पण कुठले जनावर होते हे विचारल्यावर पिताश्रींनी हसतच उत्तर दिले, तो एक मोठ्या आकाराचा उंदीर होता. हे ऐकताच मातोश्री आणि सौ किंचाळल्या. त्याबरोबर आम्ही हसत सुटलो. आजही तो प्रसंग आठवल्यावर आम्ही खूप हसतो. पण त्याच वेळी जर खरंच एखादं मोठं जनावर असतं तर ? या विचाराने अंगावर शहारा येतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
18154 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

आदराची शेती करता का काय तुमी

जेनी...
Sun, 02/03/2013 - 22:41 नवीन
आदराची शेती करता का काय तुमी ??? वाढ व्यवस्थित होत असेल तर वाढवा नै त काय कामाची :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

आमच्या मनात निखळ आदरभाव !

खटासि खट
Sun, 02/03/2013 - 23:27 नवीन
आमच्या मनात निखळ आदरभाव ! बाकि शेती म्हटलं कि नाही नाही ते आठवतं , नकोच ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

पुजाबाई

टवाळ कार्टा
Sun, 02/03/2013 - 23:37 नवीन
पुजाबाई Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

फोटो ?

धन्या
Sun, 02/03/2013 - 23:57 नवीन
"टनाटन आभास" वरुन उचललात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हे ते काय?

अभ्या..
Mon, 02/04/2013 - 00:05 नवीन
"टनाटन आभास" ? धना हे काय असते रे? फुकाट फोटो आन इमेजा वाटायची साईट है का? मग माझे कामच वाचले की ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अजून एक विडंबन.

चिंतामणी
Mon, 02/04/2013 - 09:20 नवीन
पण मुळ लेख आणि लेखकाला थोडे क्रेडीट द्यायला हरकत नव्हती. (अवांतर- मुळ लेखावरील प्रतिक्रीया जास्त वाचनीय आहेत)
  • Log in or register to post comments

ह्या न्यायाने

इरसाल
Mon, 02/04/2013 - 09:48 नवीन
मिपावरील बरेच लेख मुक्तपीठात सहज चालावेत. सकाळवाल्यांना मिपाकडे "उकडा" लावायला हरकत नाय. आणी प्रतिसाद म्हणाल तर एकाहुन एक जबरी असतीलच.
  • Log in or register to post comments

अमेरीका

कपिलमुनी
Mon, 02/04/2013 - 11:23 नवीन
किंवा तत्सम परदेशांतून परतल्याची फोडणी लावल्यास व आपली मुलगी, मुलगा तिकडे स्थायिक असतात याची फोडणी दिल्यास लेख चटकदार होतो व नक्की छापून येतो
  • Log in or register to post comments

मु(क्)तपिठीय प्रतिसाद

विसुनाना
Mon, 02/04/2013 - 13:13 नवीन
१.ही पुण्यातल्या उच्च्भ्रू लोकांना नावे ठेवण्याची लोकांची पद्धत आहे, हे कळते हो आम्हाला. २.पंधरा वर्षांपूर्वी ताम्हिणी घाटात विमान चालवण्याजोगा रस्ता नव्हता इतकेही लेखकाला माहित नसावे? ३.मुक्तपीठच्या लोकप्रियतेची पोटदुखी! दुसरे काय? ४.शंभर वर्षांपूर्वी मी घोड्यावर बसून माऊंट टिट्लिस वरून (होय, मी स्विट्झर्लंडमध्ये रहात होतो त्यावेळी) उतरत असता घोड्याचा लगाम तुटला त्याची आठवण झाली. अवांतरः लेख वाचून हहपुवा झाली.
  • Log in or register to post comments

माऊंट आणि टिटिलस द्विरुक्ती

शुचि
Tue, 02/05/2013 - 06:17 नवीन
माऊंट आणि टिटिलस द्विरुक्ती होतेय काय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

_/\_

ऋषिकेश
Mon, 02/04/2013 - 13:57 नवीन
_/\_ =))
  • Log in or register to post comments

_/\_

प्रसाद गोडबोले
Mon, 02/04/2013 - 16:32 नवीन
=)) महान आहे हे !!
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा खपलोय....

मन१
Fri, 02/08/2013 - 17:28 नवीन
बादवे, सकाळ च्या सायटीवरील सर्वात भयंकर वाटलेल्या तीन कमेंटा इथे पेष्टवतोयः- On 7/19/2010 2:49 PM शुमाकर said: आम्ही दिवेआगार वरून येताना तर ब्रेक खाली बॅट आली होती .......... पण मी कधी ब्रेक दाबत नाही म्हणून कळलेच नाही ......... दुसऱ्या दिवशी क्रिकेट खेळताना लक्षात आलं आपली बॅट नाहीये ते !!! On 7/19/2010 2:43 PM ghaberlela said: माझ्या गाडीच्या खाली एकदा असाच मांजर अडकला होता , मी पडता पडता वाचलो , माझी two wheeler आहे ना On 7/19/2010 1:48 PM baap re.. said: खरच भीतीदायक प्रसंग आहे.. मी दिवेआगरला जाताना आमचा गाडीच्या ब्रेकखाली फुटबाल अडकला होता.. पण आमची ट्रक होती.. त्यामुळे वाचलो
  • Log in or register to post comments

मजा आली....

जव्हेरगंज
Tue, 08/18/2015 - 21:58 नवीन
मजा आली....
  • Log in or register to post comments

तुमचे सदस्यनाम पाहूनही क्षणभर

बॅटमॅन
Wed, 08/19/2015 - 15:19 नवीन
तुमचे सदस्यनाम पाहूनही क्षणभर हसूच फुटले. =)) ('पानिपत' मधील सुजाउद्दौल्याच्या राजधानीतील टपर्‍यांवरच्या खाद्यपदार्थवर्णनाचा आणि जव्हेरगंजचा फ्यान) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

आमच्या सदस्य नामाचे जानकार

जव्हेरगंज
Wed, 08/19/2015 - 18:43 नवीन
आमच्या सदस्य नामाचे जानकार मुळातच कमी आहेत. आपणास पाहून आनंद झाला . :-) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

एक सामान्य प्रयत्न!!!

चलत मुसाफिर
Tue, 08/18/2015 - 23:39 नवीन
मुक्तपीठबद्दल बोलताना सप्तर्षीबाईंच्या मांजराचा उल्लेख वगळणे म्हणजे पु. लं. वर लिहिताना बटाट्याची चाळ गाळून टाकणे होय. णिशेद!!
  • Log in or register to post comments

प्रकाशन तारखा

श्रीरंग_जोशी
Tue, 08/18/2015 - 23:50 नवीन
कृपया प्रकाशन तारखा बघाव्या. सदर लेख २ फेब्रुवारी २०१३ रोजी मिपावर प्रकाशित झाला आहे. तेव्हाची शेवटची प्रतिक्रिया ८ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रकाशित झाली होती. त्यानंतर आज काही तासांपूर्वी नवी प्रतिक्रिया आल्याने हा लेख वर आलाय. प्राची सप्तर्षी यांचा प्रसिद्ध लेख करमणूक मांजराची (मुक्तपीठ) सकाळमध्ये ११ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रकाशित झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

हो चुकलं

चलत मुसाफिर
Wed, 08/19/2015 - 07:29 नवीन
मुक्तपीठीय परंपरेनुसार चुकीकडे दुर्लक्ष करण्यात यावे ही विनंती. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हे काय पाहतोय आम्ही ? आम्ही आम्ही आम्ही …(एको इफेक्ट)

पगला गजोधर
Wed, 08/19/2015 - 09:28 नवीन
Image removed. उभ्या मुपीचे हृदयसम्राट … अनेक पटकथाकार लेखक वाचक अबला चे अखंड स्फूर्तीस्थान असलेल्या अवताराचा इथे असा एकेरी उल्लेख …केल्याबद्दल तीव्र णीषेध (अखिल भारतीय पुणे विद्यापीठ लुनाब्रिगेड आणि सुंदरअबलालिफ्ट सेवासंघा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

भयानक सुंदर

बोका-ए-आझम
Wed, 08/19/2015 - 07:17 नवीन
भयानक सुंदर, तेजस्वी हलकट, निष्कलंक खडूस लेख!
  • Log in or register to post comments

हो चुकलं

चलत मुसाफिर
Wed, 08/19/2015 - 07:27 नवीन
मुक्तपीठीय परंपरेनुसार चुकीकडे दुर्लक्ष करण्यात यावे ही विनंती. :-)
  • Log in or register to post comments

तसं नाही हो

श्रीरंग_जोशी
Wed, 08/19/2015 - 08:49 नवीन
मुक्तपीठीय लेख वाचताना मलाही काळवेळाचे भान राहत नाही. एक्याण्णव साली लुनावरून फिरणारा माणुस रोख ₹ चार हजार सोबत बाळगतो ही एक आश्चर्याची बाब आहे हे मला आता कुठे लक्षात आले. ब्रह्मेंच्या कथेत मी इतका रमून जातो की काय सांगू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

आम्ही एकदा यानाने गेलो होतो .

तुडतुडी
Wed, 08/19/2015 - 13:28 नवीन
आम्ही एकदा यानाने गेलो होतो . तेव्हा आमच्या यानाच्या ब्रेकखाली चंद्र आला होता
  • Log in or register to post comments

एक नंबर

राघवेंद्र
Mon, 08/24/2015 - 03:18 नवीन
प्रतिक्रिया आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

अहो मग दिवसा जायचे ,दिवसा

वाल्मिक
Wed, 08/17/2016 - 19:25 नवीन
अहो मग दिवसा जायचे ,दिवसा चंद्र नसतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

हि प्रतिक्रीया मला फार आवडलि.

संजय पाटिल
Wed, 08/19/2015 - 16:50 नवीन
हि प्रतिक्रीया मला फार आवडलि.. मी पण परवाच पृथ्वीवरून प्लूटो वर फिरायला निघालो होतो. ज्यूपीटर च्या घाटात बघतो तर काय ... यानाच्या ब्रेक खाली चंद्र ... मी लगेच यान कडेला घेतला आणि मंगळावर गाडीत चढलेल्या अलीएन फमिली ला विचारला कोणी आणला चंद्र .. कोणी सांगायला तर नाही.. असो,तर मग चंद्र यानातून काढला आणि परत त्याच्या कक्षेत ठेवला..
  • Log in or register to post comments

अति उत्तम .

अरवीन्द नरहर जोशि.
Mon, 08/24/2015 - 04:22 नवीन
अति उत्तम .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा