मुतपीठसाठी लेख : कृपया मदत करा
लिखाणाचे निमित्त : खुमखुमी
उद्देश : मनोरंजन, विरंगुळा
फायदे : मिसळपाववर (कु)प्रसिद्ध होणे
टार्गेट ऑडियन्स : मुक्तपीठचे नियमित वाचक
प्रस्तावना : नमस्कार सदस्यहो. मला पुण्यनगरी देशी प्रसिद्ध व्हावेसे वाटत असल्याने एक लेख लिहून वर्तमानपत्रास पाठवावयाचे ठरवले. मी तसा चांदोबा. चंपक, ठकठक आणि सकाळ नियमित वाचतो. सकाळ मधे इमारतीच्या शेजारच्या मुतारीचा वास हे पत्र लिहीले होते. ते छापूनही आले होते. पण प्रसिद्धी मिळाली नाही. लोक म्हणतात लेख लिही. मी आवडीने मुक्तपीठ वाचतो. त्यासाठी लेख लिहावा असे मनी आले. एक कच्चा मसुदा आपल्याला दाखवत आहे. मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.
कळावे
आपला नम्र
खट
--------------------------------------------------------------------------------------------------------
साधारण पंधरा वर्षापूवीची गोष्ट. माझे लग्न होऊन नुकतीच सौ. घरी आली होती. सौ शीच लग्न झालं होतं त्यामुळे कृपया गोंधळ वाढवू नये. ( सौ माझ्याच घरी आली होती). तिची हौसमौज पुरवण्यात दिवस चांगले चालले होते. तिचा पहिलाच नोव्हेंबर असल्याने तो साजरा करण्यासाठी आम्ही दापोलीला पिकनिकला जाण्याचे ठरवले. आम्ही नुकतेच एक विमान खरेदी केले होते. सर्वांनी ठरवले कि विमानानेच जाऊ. माझी सौ, एम ए, पीएचडी, मातोश्री, एम (ऑनर्स), पिताश्री (बालिष्टर) आणि मी स्वतः (बारावी नंतरची प्रमाणपत्रे सापडत नाहीत) असे चौघे दापोलीस विमानातून कूच करते झालो. जाताना आम्ही वरंधा घाटातून जायचे ठरवले. त्या वेळी टोल नाका असल्याने या संधीचा फायदा घ्यावा असे ठरले. रस्त्याने मीच विमान चालवत होतो. साठच्या पुढे वेग नको असे पिताश्रींनी बजावल्याने त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले. हास्यविनोद करीत आणि गाण्याच्या भेंड्या खेळत आम्ही दापोलीस पोहोचलो. जेवण वगैरे करून विमानाने कर्दे या गावी पोहोचलो. दिवसभर समुद्र्वर मजा केल्यावर अंधार पडायच्या आधी निघावे असे ठरले. कारण या आधी विमानाने कुठेच गेलेलो नसल्याने हेडलाईट आणि डीपर ( डिप्पर) चालतात किंवा नाही याबद्दल काहो कल्पना नव्हती.
जाताना ताम्हणी घाटातून जायचे ठरवले होते. ताम्हणी घाटातून जात असताना ब्रेक दाबलाच जाईना. बाका प्रसंग होता. आम्ही सगळे खूपच घाबरलो होतो. तरीही एका हाताने विमानाचे स्टियरींग सौ ला पकडायला सांगून मी खाली वाकून पाहीले तर काय, ब्रेकच्या खाली फूटबॉल आलेला ! आम्ही बीच वर व्हॉलीबॉल, फूटबॉल, बॅडमिंटन हे सगळे खेळ खेळल्यानंतर ते सगळं साहीत्य मागच्या सीट्खाली टाकलेलं. हा बॉल घरंगळ येऊन कधी ब्रेकखाली आला कळलंच नाही. जेव्हां बॉल काढला तेव्हां ब्रेक लागायला सुरूवात झाली. सगळ्यांच्या जिवात जीव आला.
आम्ही आता वर चढून जंगलात आलो होतो. आजूबाजूला चिटपा़खरूही नव्हते. आमचे विमान आणि आम्ही इतकेच काय ते हलत होतो. अंधार मी म्हणत होता. आणि इतक्यात रस्त्यावर काहीतरी चमकलं. पुन्हापुन्हा पाहील्यावर खात्रीच पटली. शंकाच नको. दोन डोळे होते ते. सर्वांची भीतीने गाळणच उडाली. अचानक कुठलं जनावर पुढ्यात येऊन ठाकलंय याची कल्पना नव्हती. मागच्या मागे जाणं धोक्याचं होतं. वळणं वेडीवाकडी होती आणि विमान रिर्व्हर्समधे चालवायची माहिती नव्हती. घरी गेल्यावर काशीहून तज्ञांना बोलावून शिकून घ्यायचा मनोमन निश्चय केला. पण सध्या वेळ मारून न्यावी लागणार होती.
पिताश्री मनाचा हिय्या करून खाली उतरले. ( आमच्यापुढे भविष्यकाळ होता तर पिताश्रींकडे भूतकाळ ). हेडलाईटच्या प्रकाशात चमकणा-या डोळ्यांकडे ते सावकाश जाऊ लागले. मला हेडलाईट बंद करायला लावला. जवळ गेल्यावर ते डोळे इकडे तिकडे पळू लागले. पिताश्रींनी देखील त्यांचा पाठलाग केला आणि जवळचा टॉर्च काढून त्यांच्यावर प्रकाशझोत सोडला. त्याबरोबर डोळे गायब झाले.
पिताश्री विजयी मुद्रेने परत आल्यावर विमानातील दोन्ही महिलांनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहीले. पिताश्रींनी सांगितले आता घाबरायचं कारण नाही. पण कुठले जनावर होते हे विचारल्यावर पिताश्रींनी हसतच उत्तर दिले, तो एक मोठ्या आकाराचा उंदीर होता. हे ऐकताच मातोश्री आणि सौ किंचाळल्या. त्याबरोबर आम्ही हसत सुटलो.
आजही तो प्रसंग आठवल्यावर आम्ही खूप हसतो. पण त्याच वेळी जर खरंच एखादं मोठं जनावर असतं तर ? या विचाराने अंगावर शहारा येतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आदराची शेती करता का काय तुमी
आमच्या मनात निखळ आदरभाव !
पुजाबाई
फोटो ?
हे ते काय?
अजून एक विडंबन.
ह्या न्यायाने
अमेरीका
मु(क्)तपिठीय प्रतिसाद
माऊंट आणि टिटिलस द्विरुक्ती
_/\_
_/\_
पुन्हा एकदा खपलोय....
मजा आली....
तुमचे सदस्यनाम पाहूनही क्षणभर
आमच्या सदस्य नामाचे जानकार
एक सामान्य प्रयत्न!!!
प्रकाशन तारखा
हो चुकलं
हे काय पाहतोय आम्ही ? आम्ही आम्ही आम्ही …(एको इफेक्ट)
भयानक सुंदर
हो चुकलं
तसं नाही हो
आम्ही एकदा यानाने गेलो होतो .
एक नंबर
अहो मग दिवसा जायचे ,दिवसा
हि प्रतिक्रीया मला फार आवडलि.
अति उत्तम .