पुण्याबाहेरच्या लोकांना नेहमी वाटते की पुणेकरांचे एवढे काय कौतुक.
यांच्या उकडण्याचेही कौतुक, यांच्या थंडीचेही कौतुक.
म्हणजे पुणेरी पेपरमधल्या बातम्या वाचल्या की कळेल.
कधी सकाळी पावसाचे अजिबात चिन्ह नसते. पुणेकर छत्री न्यायचा कंटाळा करतात.
पण संध्याकाळी ऑफीसमधून घरी यायला निघावे तर बेसावध क्षणी पाउस पुणेकरांना गाठतो आणि भिजवतो.
दुसर्या दिवशीच्या पेपरमधे भिजलेल्या पुणेकरांचे, झाडाखाली थांबलेल्या, स्कार्फ बांधलेल्या तरुणींचे फोटो
आणि बातमीचे हेडींग
अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ
कधी हा पाऊस प्रचंड कोसळतो. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागतात. झाडे पडतात. रस्त्यातील वाहतूक अडते.
दुसर्या दिवशी फोटो आणि बातमी.
पुणेकरांना पावसाने झोडपले.
कधी हलक्याशा सरी पडत असतात. अशावेळी हिरवागार झालेल्या सिंहगडाचे फोटो, त्यावर पर्यटकांची गर्दी.
बातमी असते - पावसाळी वातावरणात पुणेकरांनी केले सिंहगडाचे पर्यटन, पुणेकरांनी सिंहगडावर गरम गरम भजी खाणेच पसंत केले.
थंडीचे दिवस सुरू होतात. सकाळी फिरायला पुणेकर बाहेर पडतात.
अशावेळी कमला नेहरु पार्कमधला वॉकींग जॉगिंग करणार्या पुणेकरांचे फोटो.
यातल्या काही जणांच्या अंगावर शाल. पुण्यातल्या पेपरात बातमी. बातमीत वर्णन असते.
पुणेकरांनी स्वतःला शालीत लपेटून घेतले.
फोटोवर हेडींग पुण्यात गुलाबी थंडी !
थंडी संपून थोड्याशा उकाड्याला सुरुवात होते,
बातमी - पुण्यातील थंडी गायब
कधी जूनमधे पाउस पडतो पण जुलैमधे पाऊस अजिबात पडत नाही.
बातमी - पावसाचे दोन महीने उलटले पण पुणेकर कोरडेच
अशा जरा उकडणार्या दिवसात हलकी पावसाची सर येते.
तापलेले रस्ते जरा थंड होतात. उकाडा जरा कमी होतो.
बातमी - पावसाच्या हलक्या सरीने पुणेकर सुखावले किंवा
पुणेकरांवर पावसाचा प्रसन्न शिडकावा !
उन्हाळ्याच्या दिवसात उकाडा वाढतो. अशावेळी बातमी
पुणेकर उकाड्याने हैराण
कधी जरा हीच बातमी बदलून -
रसाच्या गुर्हाळाचा फोटो, पुणेकर रस पिताहेत.
बातमीचे शीर्षक - चहापेक्षा रस बरा !
कधी कधी पुण्यातल्या रस्त्यांवर बरेच खड्डे पडतात.
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतो.
अशावेळी बातमी 'पुणेकर खड्याने त्रस्त.'
हेच रस्ते जर कोथरूडमधील असतील तर कौतुक आणखी वाढते.
रस्त्यातील खड्ड्यांनी कोथरुडकर हैराण अशीही ओळ पहायला मिळते.
पाणीटंचाईची बातमी असेल तर
ऐन पावसाळ्यात कोथरुडकरांच्या टँकरसमोर रांगा
सवाई गंधर्वचे दिवस असतात. कौशिकीसारखे कलाकार छान गाऊन जातात.
मग त्या महोत्सवाचा फोटो.
हेडींग-कौशिकीच्या गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध !
असा सारा पुणेकरांच्या कौतुकाचा मामला
जो पुणेकर झाल्याशिवाय इतरांना नाही उमगायचा !
वाचने
48656
प्रतिक्रिया
192
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता पेप्राच्या पुणे
कौतुक
पुण्याला गारांच्या पावसाने
In reply to कौतुक by अभ्या..
मिपावर ऐन मध्यरात्री
हॅ !
@तमी लैच साधं सुधं लिवलय बगा>
In reply to हॅ ! by जेनी...
हो क्का
In reply to हॅ ! by जेनी...
कवतीकाचे बोल हायती लोकास्नी
पुणेकराचे खास
पुणेकरांचा जागतिक विक्रम!
In reply to पुणेकराचे खास by चौकटराजा
चला भाउ पॉप्कॉर्न घेउन तयार
पान/ चॅनल बदला.
झालास रे पुणेकर. खास सदाशिव
In reply to पान/ चॅनल बदला. by सूड
अगदी अगदी!!!
In reply to झालास रे पुणेकर. खास सदाशिव by विश्वनाथ मेहेंदळे
पुणेकरांचा नाद करायचा नाय!
पुणेकरांचा नाद करायचा नाय!
पुण्याबाहेरच्या लोकांना नेहमी
तेच परत छापलं तुम्ही
In reply to पुण्याबाहेरच्या लोकांना नेहमी by सुहास..
माज आहे पुणेकर असल्याचा..
सहमत आहे.
In reply to माज आहे पुणेकर असल्याचा.. by कॅप्टन जॅक स्पॅरो
अरे ह्या 'लेखा'चा संदर्भ
In reply to सहमत आहे. by परिकथेतील राजकुमार
आणि शिकरणाचा उल्लेखही र्
In reply to माज आहे पुणेकर असल्याचा.. by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
In reply to आणि शिकरणाचा उल्लेखही र् by रेवती
+१ शिकरण,
In reply to +१ by कॅप्टन जॅक स्पॅरो
मध्यंतरी मी बेंगरुळुला गेलो
धागा मस्तच
पुणे तिथे काय उणे असे
पुणे तर मस्तच..
शुभेच्छा
पुणे तिथे काय उणे ??
मुंबईतले चाकरमाने
+१
In reply to मुंबईतले चाकरमाने by टिलू
संपूर्ण पेपरामधले एकतृतीआंश
In reply to +१ by दादा कोंडके
खरच... @मन उधाण वार्याचे माज
धागाकर्त्याच्या नावा प्रमाणेच
मोठ्या अपेक्षेने हा धागा
थाम्बा जरा.
In reply to मोठ्या अपेक्षेने हा धागा by निनाद मुक्काम …
shift m अनुस्वारासाठी. विसंगत
In reply to थाम्बा जरा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
धन्यवाद..
In reply to shift m अनुस्वारासाठी. विसंगत by रेवती
पुणेकर असल्याचा माज असा आहे
अहो पुणेकर ,पुणेकरच आहेत
क्रुपया पुणेकरांचा मत्सर करु
थंडी तापाचा का?सरकारी डॉक्टर
In reply to क्रुपया पुणेकरांचा मत्सर करु by रसायन
विशिष्ट जमातीने विशिष्ट
बाँब
हिहिहि .. अगदिमनापासुन हसले
In reply to बाँब by तिमा
पुणेकर आहेतच कौतुक करण्या सारख़े...
खरय .
In reply to पुणेकर आहेतच कौतुक करण्या सारख़े... by आनन्दिता
पूर्ण सहमत!!!!
In reply to खरय . by जेनी...
तुम्ही पुणीकर आहात का?
पैसातै यू टू???????
In reply to तुम्ही पुणीकर आहात का? by पैसा
मग!
In reply to पैसातै यू टू??????? by बॅटमॅन
कथिन आहे, लोकं कायकाय लक्षात
In reply to मग! by पैसा
कोणची नदी व्हातेवो तुमच्या
In reply to मग! by पैसा
आहे एक नाला, त्यालाच नदी
In reply to कोणची नदी व्हातेवो तुमच्या by जेनी...
अय्या विशु
In reply to आहे एक नाला, त्यालाच नदी by विश्वनाथ मेहेंदळे
पहिल्यापासूनच...
In reply to अय्या विशु by जेनी...
राम नदी
In reply to कोणची नदी व्हातेवो तुमच्या by जेनी...
काय या पुणेकरांचे कौतुक !
In reply to राम नदी by चौकटराजा
अओ सासुबै ... रविवारा बद्दल
In reply to मग! by पैसा
कोठरूडमधील पुणेकरही हेच
In reply to तुम्ही पुणीकर आहात का? by पैसा
पुणे आणि पुणेकर दोन्ही ही
आपली आपण करी स्तुती | तो एक
In reply to पुणे आणि पुणेकर दोन्ही ही by आनन्दिता
पैसाताई शी सहमत. नदीपलीकडे
सवाई गंधर्व भीमसेन जोशी महोत्सव
हो ना!
In reply to सवाई गंधर्व भीमसेन जोशी महोत्सव by ह भ प
-१
In reply to सवाई गंधर्व भीमसेन जोशी महोत्सव by ह भ प
"९९% पुणेकर 'आम्ही सवाई
In reply to -१ by दादा कोंडके
स्माइली कसे टन्कायचे.....
असे
In reply to स्माइली कसे टन्कायचे..... by रुस्तम