पुण्याबाहेरच्या लोकांना नेहमी वाटते की पुणेकरांचे एवढे काय कौतुक.
यांच्या उकडण्याचेही कौतुक, यांच्या थंडीचेही कौतुक.
म्हणजे पुणेरी पेपरमधल्या बातम्या वाचल्या की कळेल.
कधी सकाळी पावसाचे अजिबात चिन्ह नसते. पुणेकर छत्री न्यायचा कंटाळा करतात.
पण संध्याकाळी ऑफीसमधून घरी यायला निघावे तर बेसावध क्षणी पाउस पुणेकरांना गाठतो आणि भिजवतो.
दुसर्या दिवशीच्या पेपरमधे भिजलेल्या पुणेकरांचे, झाडाखाली थांबलेल्या, स्कार्फ बांधलेल्या तरुणींचे फोटो
आणि बातमीचे हेडींग
अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ
कधी हा पाऊस प्रचंड कोसळतो. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागतात. झाडे पडतात. रस्त्यातील वाहतूक अडते.
दुसर्या दिवशी फोटो आणि बातमी.
पुणेकरांना पावसाने झोडपले.
कधी हलक्याशा सरी पडत असतात. अशावेळी हिरवागार झालेल्या सिंहगडाचे फोटो, त्यावर पर्यटकांची गर्दी.
बातमी असते - पावसाळी वातावरणात पुणेकरांनी केले सिंहगडाचे पर्यटन, पुणेकरांनी सिंहगडावर गरम गरम भजी खाणेच पसंत केले.
थंडीचे दिवस सुरू होतात. सकाळी फिरायला पुणेकर बाहेर पडतात.
अशावेळी कमला नेहरु पार्कमधला वॉकींग जॉगिंग करणार्या पुणेकरांचे फोटो.
यातल्या काही जणांच्या अंगावर शाल. पुण्यातल्या पेपरात बातमी. बातमीत वर्णन असते.
पुणेकरांनी स्वतःला शालीत लपेटून घेतले.
फोटोवर हेडींग पुण्यात गुलाबी थंडी !
थंडी संपून थोड्याशा उकाड्याला सुरुवात होते,
बातमी - पुण्यातील थंडी गायब
कधी जूनमधे पाउस पडतो पण जुलैमधे पाऊस अजिबात पडत नाही.
बातमी - पावसाचे दोन महीने उलटले पण पुणेकर कोरडेच
अशा जरा उकडणार्या दिवसात हलकी पावसाची सर येते.
तापलेले रस्ते जरा थंड होतात. उकाडा जरा कमी होतो.
बातमी - पावसाच्या हलक्या सरीने पुणेकर सुखावले किंवा
पुणेकरांवर पावसाचा प्रसन्न शिडकावा !
उन्हाळ्याच्या दिवसात उकाडा वाढतो. अशावेळी बातमी
पुणेकर उकाड्याने हैराण
कधी जरा हीच बातमी बदलून -
रसाच्या गुर्हाळाचा फोटो, पुणेकर रस पिताहेत.
बातमीचे शीर्षक - चहापेक्षा रस बरा !
कधी कधी पुण्यातल्या रस्त्यांवर बरेच खड्डे पडतात.
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतो.
अशावेळी बातमी 'पुणेकर खड्याने त्रस्त.'
हेच रस्ते जर कोथरूडमधील असतील तर कौतुक आणखी वाढते.
रस्त्यातील खड्ड्यांनी कोथरुडकर हैराण अशीही ओळ पहायला मिळते.
पाणीटंचाईची बातमी असेल तर
ऐन पावसाळ्यात कोथरुडकरांच्या टँकरसमोर रांगा
सवाई गंधर्वचे दिवस असतात. कौशिकीसारखे कलाकार छान गाऊन जातात.
मग त्या महोत्सवाचा फोटो.
हेडींग-कौशिकीच्या गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध !
असा सारा पुणेकरांच्या कौतुकाचा मामला
जो पुणेकर झाल्याशिवाय इतरांना नाही उमगायचा !
वाचने
48656
प्रतिक्रिया
192
मिसळपाव
प्रतिक्रिया
नको हो.. काही मंडळींनी
In reply to स्माइली कसे टन्कायचे..... by रुस्तम
:)
In reply to नको हो.. काही मंडळींनी by गणपा
गणपा आणि सोत्रिंशी बाडीस.
In reply to नको हो.. काही मंडळींनी by गणपा
अगदी अगदी
In reply to गणपा आणि सोत्रिंशी बाडीस. by सूड
मी असे प्रतिसाद वाचतच नाही.
In reply to अगदी अगदी by इरसाल
अगदि सहमत .
In reply to मी असे प्रतिसाद वाचतच नाही. by विश्वनाथ मेहेंदळे
+१ / -१
In reply to मी असे प्रतिसाद वाचतच नाही. by विश्वनाथ मेहेंदळे
थांबा, एखादे क्रोम किंवा
In reply to +१ / -१ by गणपा
अगदी अगदी !!
In reply to +१ / -१ by गणपा
वा रे वा
In reply to +१ / -१ by गणपा
हॅ हॅ हॅ.... ती काळजी घेत
In reply to वा रे वा by अभ्या..
अन्याव :(
In reply to हॅ हॅ हॅ.... ती काळजी घेत by गणपा
पुण्याचे शुद्ध नामकरण
चांगला प्रयत्न
बाकी महाराष्ट्रात आता उरलंयच
In reply to चांगला प्रयत्न by श्रीरंग_जोशी
१००% सहमत
एक किस्सा पुणेरी .
किस्सा मस्तच!
In reply to एक किस्सा पुणेरी . by सस्नेह
मटणाला..!!
In reply to किस्सा मस्तच! by दादा कोंडके
परिभाषा
In reply to किस्सा मस्तच! by दादा कोंडके
ओ हो..
In reply to परिभाषा by तिमा
हम्म्म
In reply to एक किस्सा पुणेरी . by सस्नेह
पुण्यातील काही ब्राह्मण घरात
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
हार प्रकार ऐकला होता पांढर्
In reply to पुण्यातील काही ब्राह्मण घरात by विश्वनाथ मेहेंदळे
वरील प्रतिसाद
In reply to पुण्यातील काही ब्राह्मण घरात by विश्वनाथ मेहेंदळे
हा किस्सा नक्की पुणेरी म्हणून
In reply to वरील प्रतिसाद by परिकथेतील राजकुमार
या प्रतिसादामधून
In reply to एक किस्सा पुणेरी . by सस्नेह
'भटे' हा सहकार्यांचाच शब्द.
In reply to एक किस्सा पुणेरी . by सस्नेह
काय सांगता ?
In reply to 'भटे' हा सहकार्यांचाच शब्द. by सस्नेह
'असे काही' म्हणजे ?
In reply to काय सांगता ? by परिकथेतील राजकुमार
सलाम.
In reply to 'असे काही' म्हणजे ? by सस्नेह
पर्याला पहिल्यांदा निरागसते
In reply to सलाम. by परिकथेतील राजकुमार
सलाम स्वीकारला गेला आहे...
तर तर.
पुणे तीस
-- पुणे आले की भटांचा उल्लेख
कोजागिरीच्या दुसर्या दिवशी
ढकलपत्रातून आलेले आहे.....
भारी...!!!!!!
In reply to ढकलपत्रातून आलेले आहे..... by नावातकायआहे
पूण्यात पाणिपताची लढाई कुठे
In reply to ढकलपत्रातून आलेले आहे..... by नावातकायआहे
लईच भारी ढकलपत्र ..!!
In reply to ढकलपत्रातून आलेले आहे..... by नावातकायआहे
इथे पुणे हा शब्द कितीवेळा
In reply to ढकलपत्रातून आलेले आहे..... by नावातकायआहे
उणे बत्तेचाळीस वेळा.
In reply to इथे पुणे हा शब्द कितीवेळा by कवितानागेश
एकदम कल्ला आहे हे ढकलपत्र.
In reply to ढकलपत्रातून आलेले आहे..... by नावातकायआहे
पर्वती वर practise करून
In reply to एकदम कल्ला आहे हे ढकलपत्र. by किसन शिंदे
@ नावात काय आहे
हा घ्या
वा वा आमच्या भविष्याप्रमाणे
??
विनोदी
हे ढकलपत्र विनोदी आहे हे
In reply to विनोदी by राही
हे पुण्याचे वर्णन परिणीता
सवाई गंधर्व महोत्सवापूर्वी
मग यंदाचा १२ डिसेंबर फ़ारच
चेपुवर हे पेज बघितले आणि
पुणे आणि पुणेकरांचं होणार
उगीच?
In reply to पुणे आणि पुणेकरांचं होणार by आनन्दिता
गेट इनो सून.
In reply to पुणे आणि पुणेकरांचं होणार by आनन्दिता
काय राव अभिजीत राव आम्ही
ठीक आहे मग.
अहो अभिजीत नसलेले दादा...
In reply to ठीक आहे मग. by अभ्या..
कॉलेजलाच कशाला, सकाळच्या
In reply to अहो अभिजीत नसलेले दादा... by आनन्दिता
अस्सल पुणेकर सकाळच्या
In reply to कॉलेजलाच कशाला, सकाळच्या by सूड
>>तुम्ही खरे पुणेकर दिसत नाही
In reply to अस्सल पुणेकर सकाळच्या by विश्वनाथ मेहेंदळे
म्हणजे तुम्ही पुणेकर नाही हे
In reply to >>तुम्ही खरे पुणेकर दिसत नाही by सूड
>>म्हणजे तुम्ही पुणेकर नाही
In reply to म्हणजे तुम्ही पुणेकर नाही हे by विश्वनाथ मेहेंदळे
गाडी फक्त मुम्बै पुणे मुम्बै
In reply to कॉलेजलाच कशाला, सकाळच्या by सूड
आवांतर : बाकी तुम्ही सोलापुर
In reply to अहो अभिजीत नसलेले दादा... by आनन्दिता
नाही हो विमे. प्रत्येकाला
In reply to आवांतर : बाकी तुम्ही सोलापुर by विश्वनाथ मेहेंदळे
पश्चिम महाराष्ट्रातल्यांना
In reply to नाही हो विमे. प्रत्येकाला by मृत्युन्जय