काय या पुणेकरांचे कौतुक !
पुण्याबाहेरच्या लोकांना नेहमी वाटते की पुणेकरांचे एवढे काय कौतुक.
यांच्या उकडण्याचेही कौतुक, यांच्या थंडीचेही कौतुक.
म्हणजे पुणेरी पेपरमधल्या बातम्या वाचल्या की कळेल.
कधी सकाळी पावसाचे अजिबात चिन्ह नसते. पुणेकर छत्री न्यायचा कंटाळा करतात.
पण संध्याकाळी ऑफीसमधून घरी यायला निघावे तर बेसावध क्षणी पाउस पुणेकरांना गाठतो आणि भिजवतो.
दुसर्या दिवशीच्या पेपरमधे भिजलेल्या पुणेकरांचे, झाडाखाली थांबलेल्या, स्कार्फ बांधलेल्या तरुणींचे फोटो
आणि बातमीचे हेडींग
अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ
कधी हा पाऊस प्रचंड कोसळतो. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागतात. झाडे पडतात. रस्त्यातील वाहतूक अडते.
दुसर्या दिवशी फोटो आणि बातमी.
पुणेकरांना पावसाने झोडपले.
कधी हलक्याशा सरी पडत असतात. अशावेळी हिरवागार झालेल्या सिंहगडाचे फोटो, त्यावर पर्यटकांची गर्दी.
बातमी असते - पावसाळी वातावरणात पुणेकरांनी केले सिंहगडाचे पर्यटन, पुणेकरांनी सिंहगडावर गरम गरम भजी खाणेच पसंत केले.
थंडीचे दिवस सुरू होतात. सकाळी फिरायला पुणेकर बाहेर पडतात.
अशावेळी कमला नेहरु पार्कमधला वॉकींग जॉगिंग करणार्या पुणेकरांचे फोटो.
यातल्या काही जणांच्या अंगावर शाल. पुण्यातल्या पेपरात बातमी. बातमीत वर्णन असते.
पुणेकरांनी स्वतःला शालीत लपेटून घेतले.
फोटोवर हेडींग पुण्यात गुलाबी थंडी !
थंडी संपून थोड्याशा उकाड्याला सुरुवात होते,
बातमी - पुण्यातील थंडी गायब
कधी जूनमधे पाउस पडतो पण जुलैमधे पाऊस अजिबात पडत नाही.
बातमी - पावसाचे दोन महीने उलटले पण पुणेकर कोरडेच
अशा जरा उकडणार्या दिवसात हलकी पावसाची सर येते.
तापलेले रस्ते जरा थंड होतात. उकाडा जरा कमी होतो.
बातमी - पावसाच्या हलक्या सरीने पुणेकर सुखावले किंवा
पुणेकरांवर पावसाचा प्रसन्न शिडकावा !
उन्हाळ्याच्या दिवसात उकाडा वाढतो. अशावेळी बातमी
पुणेकर उकाड्याने हैराण
कधी जरा हीच बातमी बदलून -
रसाच्या गुर्हाळाचा फोटो, पुणेकर रस पिताहेत.
बातमीचे शीर्षक - चहापेक्षा रस बरा !
कधी कधी पुण्यातल्या रस्त्यांवर बरेच खड्डे पडतात.
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतो.
अशावेळी बातमी 'पुणेकर खड्याने त्रस्त.'
हेच रस्ते जर कोथरूडमधील असतील तर कौतुक आणखी वाढते.
रस्त्यातील खड्ड्यांनी कोथरुडकर हैराण अशीही ओळ पहायला मिळते.
पाणीटंचाईची बातमी असेल तर
ऐन पावसाळ्यात कोथरुडकरांच्या टँकरसमोर रांगा
सवाई गंधर्वचे दिवस असतात. कौशिकीसारखे कलाकार छान गाऊन जातात.
मग त्या महोत्सवाचा फोटो.
हेडींग-कौशिकीच्या गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध !
असा सारा पुणेकरांच्या कौतुकाचा मामला
जो पुणेकर झाल्याशिवाय इतरांना नाही उमगायचा !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आता पेप्राच्या पुणे
कौतुक
पुण्याला गारांच्या पावसाने
मिपावर ऐन मध्यरात्री
हॅ !
@तमी लैच साधं सुधं लिवलय बगा>
हो क्का
कवतीकाचे बोल हायती लोकास्नी
पुणेकराचे खास
पुणेकरांचा जागतिक विक्रम!
चला भाउ पॉप्कॉर्न घेउन तयार
पान/ चॅनल बदला.
झालास रे पुणेकर. खास सदाशिव
अगदी अगदी!!!
पुणेकरांचा नाद करायचा नाय!
पुणेकरांचा नाद करायचा नाय!
पुण्याबाहेरच्या लोकांना नेहमी
तेच परत छापलं तुम्ही
माज आहे पुणेकर असल्याचा..
सहमत आहे.
अरे ह्या 'लेखा'चा संदर्भ
आणि शिकरणाचा उल्लेखही र्
+१
+१ शिकरण,
मध्यंतरी मी बेंगरुळुला गेलो
धागा मस्तच
पुणे तिथे काय उणे असे
पुणे तर मस्तच..
शुभेच्छा
पुणे तिथे काय उणे ??
मुंबईतले चाकरमाने
+१
संपूर्ण पेपरामधले एकतृतीआंश
खरच... @मन उधाण वार्याचे माज
धागाकर्त्याच्या नावा प्रमाणेच
मोठ्या अपेक्षेने हा धागा
थाम्बा जरा.
shift m अनुस्वारासाठी. विसंगत
धन्यवाद..
पुणेकर असल्याचा माज असा आहे
अहो पुणेकर ,पुणेकरच आहेत
क्रुपया पुणेकरांचा मत्सर करु
थंडी तापाचा का?सरकारी डॉक्टर
विशिष्ट जमातीने विशिष्ट
बाँब
हिहिहि .. अगदिमनापासुन हसले
पुणेकर आहेतच कौतुक करण्या सारख़े...
खरय .
पूर्ण सहमत!!!!
तुम्ही पुणीकर आहात का?