Skip to main content

काय या पुणेकरांचे कौतुक !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 10/12/2012 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याबाहेरच्या लोकांना नेहमी वाटते की पुणेकरांचे एवढे काय कौतुक. यांच्या उकडण्याचेही कौतुक, यांच्या थंडीचेही कौतुक. म्हणजे पुणेरी पेपरमधल्या बातम्या वाचल्या की कळेल. कधी सकाळी पावसाचे अजिबात चिन्ह नसते. पुणेकर छत्री न्यायचा कंटाळा करतात. पण संध्याकाळी ऑफीसमधून घरी यायला निघावे तर बेसावध क्षणी पाउस पुणेकरांना गाठतो आणि भिजवतो. दुसर्‍या दिवशीच्या पेपरमधे भिजलेल्या पुणेकरांचे, झाडाखाली थांबलेल्या, स्कार्फ बांधलेल्या तरुणींचे फोटो आणि बातमीचे हेडींग अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ कधी हा पाऊस प्रचंड कोसळतो. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागतात. झाडे पडतात. रस्त्यातील वाहतूक अडते. दुसर्‍या दिवशी फोटो आणि बातमी. पुणेकरांना पावसाने झोडपले. कधी हलक्याशा सरी पडत असतात. अशावेळी हिरवागार झालेल्या सिंहगडाचे फोटो, त्यावर पर्यटकांची गर्दी. बातमी असते - पावसाळी वातावरणात पुणेकरांनी केले सिंहगडाचे पर्यटन, पुणेकरांनी सिंहगडावर गरम गरम भजी खाणेच पसंत केले. थंडीचे दिवस सुरू होतात. सकाळी फिरायला पुणेकर बाहेर पडतात. अशावेळी कमला नेहरु पार्कमधला वॉकींग जॉगिंग करणार्‍या पुणेकरांचे फोटो. यातल्या काही जणांच्या अंगावर शाल. पुण्यातल्या पेपरात बातमी. बातमीत वर्णन असते. पुणेकरांनी स्वतःला शालीत लपेटून घेतले. फोटोवर हेडींग पुण्यात गुलाबी थंडी ! थंडी संपून थोड्याशा उकाड्याला सुरुवात होते, बातमी - पुण्यातील थंडी गायब कधी जूनमधे पाउस पडतो पण जुलैमधे पाऊस अजिबात पडत नाही. बातमी - पावसाचे दोन महीने उलटले पण पुणेकर कोरडेच अशा जरा उकडणार्‍या दिवसात हलकी पावसाची सर येते. तापलेले रस्ते जरा थंड होतात. उकाडा जरा कमी होतो. बातमी - पावसाच्या हलक्या सरीने पुणेकर सुखावले किंवा पुणेकरांवर पावसाचा प्रसन्न शिडकावा ! उन्हाळ्याच्या दिवसात उकाडा वाढतो. अशावेळी बातमी पुणेकर उकाड्याने हैराण कधी जरा हीच बातमी बदलून - रसाच्या गुर्‍हाळाचा फोटो, पुणेकर रस पिताहेत. बातमीचे शीर्षक - चहापेक्षा रस बरा ! कधी कधी पुण्यातल्या रस्त्यांवर बरेच खड्डे पडतात. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतो. अशावेळी बातमी 'पुणेकर खड्याने त्रस्त.' हेच रस्ते जर कोथरूडमधील असतील तर कौतुक आणखी वाढते. रस्त्यातील खड्ड्यांनी कोथरुडकर हैराण अशीही ओळ पहायला मिळते. पाणीटंचाईची बातमी असेल तर ऐन पावसाळ्यात कोथरुडकरांच्या टँकरसमोर रांगा सवाई गंधर्वचे दिवस असतात. कौशिकीसारखे कलाकार छान गाऊन जातात. मग त्या महोत्सवाचा फोटो. हेडींग-कौशिकीच्या गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध ! असा सारा पुणेकरांच्या कौतुकाचा मामला जो पुणेकर झाल्याशिवाय इतरांना नाही उमगायचा !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 48719
प्रतिक्रिया 192

प्रतिक्रिया

आता पेप्राच्या पुणे एडिशनमध्ये पुणेकरांबद्दल बातम्या असणार की मुंबैकरांबद्दल? पण एनीवेज, चांगले धावांचे पोटेन्शिअल आहे या धाग्यात ;)

हॅ ! गोटुनाना लेख कै जमला नै बॉ :-/ पूणेकरांसाठी लिवायचं म्हणजे कसं पूणेरी टोल्यात हाणल्यागत लिवाय पायजे ;) तमी लैच साधं सुधं लिवलय बगा :-/

In reply to by जेनी...

@तमी लैच साधं सुधं लिवलय बगा>>> अगं बालिके, आंम्ही आमच्या बद्दल लिहीताना अस्सच ग्गोगोड लिहीतो. ;-) आमच्या कडुनही 1 बातमी>>> बरेच वर्षानी कमाल,नर्मदेच्या गोट्याची मि पा वर धमाल =)) :-b

1 कवतीकाचे बोल हायती लोकास्नी येड करुन स्वताच कवतीक करताहेत 1 सुचना=धाग्यावर कामापेक्षा जास्त वेळ टाइम पास करु नये

गेल्या पन्नास वर्षातील पुणेकरांचे काही खास विषय १ पेशवे पार्कातल्या सुमित्रा हतीणीची तब्येत २. बाबु टांगेवाला यानी हिराबागेच्या मैदानावर आज कुणाला हार घातला बरे ? ३.नव्यापुलावरील सगुणाचे काय म्हणणे आहे. ४.पालख्या आल्या का ? ६ पालख्यांच्या दुसरे दिवशी दिवेघाटातला फोटो आला का ? ७ ग्लोब्ब डबड्यासमोर ( श्रीनाथ सिनेमा) डोल्याची डावी उजवी झाली झाली का ८ ईदचा चांद दिसला की नाही दिसला ? ९ गणेशोत्सवात पावसाने उघडीप दिल्याने देखावे पाह्यला गर्दी होती. १० पुरात पाणी नक्की किती आले साठी लकडी पुलावर गर्दी ११ सवाई गंधर्व महोत्सव दुसरे दिवशी किती वाजेपर्यंत लांबला याच चालीवर गणपती मिरवणुकीला किती तास लागले. १२ नाना साहेब गोरे यानी अमुक वर प्रतिक्रिया काय व्यक्त केली ?

In reply to by चौकटराजा

शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी 1987 च्या विकास आराखड्यात सुमारे 34 किलोमीटर अंतराचा "एचसीएमटीआर'चा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.त्यासाठी सध्या फक्त 23 टक्के भूसंपादन झाले आहे. हे भूसंपादन वेगाने करण्यासाठीही पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लिम्का बुक /ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स ला कळवा हो कोणीतरी! वर्तुळाकार मार्गाची कोंडी सुटली

असल्या बातम्या वाचण्यासाठी किंवा बघण्यासाठी कोणी आवतंण देत नाही. सहन होत नसतील तर दुसरं पान वाचायला घ्या/ टी व्ही वर पाहत असाल तर चॅनल बदला.

In reply to by सूड

झालास रे पुणेकर. खास सदाशिव पेठेतून शिकवणी चालू आहे वाटते !!

पुण्याबाहेरच्या लोकांना नेहमी वाटते की पुणेकरांचे एवढे काय कौतुक. यांच्या उकडण्याचेही कौतुक, यांच्या थंडीचेही कौतुक. म्हणजे पुणेरी पेपरमधल्या बातम्या वाचल्या की कळेल. कधी सकाळी पावसाचे अजिबात चिन्ह नसते. पुणेकर छत्री न्यायचा कंटाळा करतात. पण संध्याकाळी ऑफीसमधून घरी यायला निघावे तर बेसावध क्षणी पाउस पुणेकरांना गाठतो आणि भिजवतो. दुसर्‍या दिवशीच्या पेपरमधे भिजलेल्या पुणेकरांचे, झाडाखाली थांबलेल्या, स्कार्फ बांधलेल्या तरुणींचे फोटो आणि बातमीचे हेडींग अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ कधी हा पाऊस प्रचंड कोसळतो. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागतात. झाडे पडतात. रस्त्यातील वाहतूक अडते. दुसर्‍या दिवशी फोटो आणि बातमी. पुणेकरांना पावसाने झोडपले. कधी हलक्याशा सरी पडत असतात. अशावेळी हिरवागार झालेल्या सिंहगडाचे फोटो, त्यावर पर्यटकांची गर्दी. बातमी असते - पावसाळी वातावरणात पुणेकरांनी केले सिंहगडाचे पर्यटन, पुणेकरांनी सिंहगडावर गरम गरम भजी खाणेच पसंत केले. थंडीचे दिवस सुरू होतात. सकाळी फिरायला पुणेकर बाहेर पडतात. अशावेळी कमला नेहरु पार्कमधला वॉकींग जॉगिंग करणार्‍या पुणेकरांचे फोटो. यातल्या काही जणांच्या अंगावर शाल. पुण्यातल्या पेपरात बातमी. बातमीत वर्णन असते. पुणेकरांनी स्वतःला शालीत लपेटून घेतले. फोटोवर हेडींग पुण्यात गुलाबी थंडी ! थंडी संपून थोड्याशा उकाड्याला सुरुवात होते, बातमी - पुण्यातील थंडी गायब कधी जूनमधे पाउस पडतो पण जुलैमधे पाऊस अजिबात पडत नाही. बातमी - पावसाचे दोन महीने उलटले पण पुणेकर कोरडेच अशा जरा उकडणार्‍या दिवसात हलकी पावसाची सर येते. तापलेले रस्ते जरा थंड होतात. उकाडा जरा कमी होतो. बातमी - पावसाच्या हलक्या सरीने पुणेकर सुखावले किंवा पुणेकरांवर पावसाचा प्रसन्न शिडकावा ! उन्हाळ्याच्या दिवसात उकाडा वाढतो. अशावेळी बातमी पुणेकर उकाड्याने हैराण कधी जरा हीच बातमी बदलून - रसाच्या गुर्‍हाळाचा फोटो, पुणेकर रस पिताहेत. बातमीचे शीर्षक - चहापेक्षा रस बरा ! कधी कधी पुण्यातल्या रस्त्यांवर बरेच खड्डे पडतात. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतो. अशावेळी बातमी 'पुणेकर खड्याने त्रस्त.' हेच रस्ते जर कोथरूडमधील असतील तर कौतुक आणखी वाढते. रस्त्यातील खड्ड्यांनी कोथरुडकर हैराण अशीही ओळ पहायला मिळते. पाणीटंचाईची बातमी असेल तर ऐन पावसाळ्यात कोथरुडकरांच्या टँकरसमोर रांगा सवाई गंधर्वचे दिवस असतात. कौशिकीसारखे कलाकार छान गाऊन जातात. मग त्या महोत्सवाचा फोटो. हेडींग-कौशिकीच्या गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध ! असा सारा पुणेकरांच्या कौतुकाचा मामला जो पुणेकर झाल्याशिवाय इतरांना नाही उमगायचा ! >>>>> आभारी आहे ! ;)

माज आहे पुणेकर असल्याचा. -मातोश्रीन्च्या बाजुने सदाशिव पेठेचा वारसा लाभलेला अस्सल माजुरडा पुणेकर- (टिप:- सदर लेखामधे 'मटाराचे भाव उतरल्याने पुणेकरान्ची मटार उसळीची चैन चालु असल्याचा उल्लेख नाही, सदरहु लेखकाचा अस्सल पुणेरी पद्धतीनी निषेध आणि मटार उसळ खायचे आमन्त्रण') :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पुण्याचा विषय आणि 'दिवाळी पहाट', 'बि आर टी', 'बचत गटाचे कौतुक', 'चितळे' इ. चा साधा उल्लेख देखील नाही ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

अरे ह्या 'लेखा'चा संदर्भ'ग्रंथ' सकाळ नाही ना.... हे सगळं कसं असेल त्यात?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

+१ शिकरण, लयीत गाउन पहा काय यमक जुळलंय आणि जी काही छंदोत्पत्ती झाली आहे ती वैश्विक परदेहाच्या आत्मिक प्रोजेक्शन अवस्थेपर्यंत घेउन जाईल तुम्हाला.

मध्यंतरी मी बेंगरुळुला गेलो होतो (आम्ची मजल तिथवरच हो.) तर काय गंमत म्हणुन सांगु, कित्येक वर्तमानपत्रे तिथे कन्नड मध्ये होती. सहज म्हणुन एका रिक्षावाल्याला विचारले काय बातम्या आहेत हो आज म्हणून (मी मोडक्यातोडक्या इंग्रजीमध्ये विचारले. तिथे मराठी रिक्षाचालका कुठे भेटला म्हणुन विचारु नका) मी विचारले तर चक्क त्याने बेंगलोरात कोणी कुठे आत्महत्या केल्या, कोणाचा खून झाला, कुठे खडे खोदले आहेत वगैरे वगैरे अश्या बातम्या दिल्या. इंग्रजी वर्तमानपत्रातही तेच अर्ध्याहुन अधिक बेंगलोरच्या बातम्य. मला वाटते या चोर पुणेकरांनी बेंगलोरची स्टाइल ढापली असावी अथवा बेंगलोरकरांनी पुण्याची कास धरली असावी. एकुणात काय पुणेक्रांची खोडच वाईट.

मुंबईच्या मोठ्या पत्रांत स्थानिक बातम्यांसाठी मुंबई वृत्तांतसारखे एक वेगळे पान/पुरवणी असते. रस्त्यात खड्डे असल्याची बातमी 'मुंबईकर खड्डेग्रस्त' अशी दिली जात नसून ती 'रस्ते खड्डेग्रस्त' अशी असते.रस्त्यासारख्या निर्जीव वस्तूलाही मान देण्याची मुंबईकरांची वृत्तीच यातून दिसते.पाणीकपातीच्या सूचनाही 'पूर्व उपनगरे',किंवा 'के पश्चिम,एल पूर्व'या भागातल्या लोकांसाठी असतात.कुरलेकर,गोरेगांवकरांसाठी नसतात. अर्थात कौतुककहाणी आवडलीच.

पुणे तिथे काय उणे असे म्हणतात ना? मग कौतुकात देखिल उणेपण कशाला ? :) स्वगत : एकाने दूसर्‍याचे कौतुक केले तर तिसर्‍याला का जळजळ होते कोण जाणे ? कृपया ह. घे. (आज्ञेवरून ) (पुणेरी) मनीषा

हि actually वृत्तपत्रांची खोड आहे. यामध्ये 'सकाळ' आघाडीवर आहे. मुंबई सकाळमध्ये सुद्धा अशा बऱ्याच वेळा बातम्या असतात. जरा काही आपत्ती आली कि लगेच 'मुंबईत चाकरमान्यांचे हाल' अशी बातमी असते. जणू काही मुंबईतले चाकरमाने हाल करून घेण्यासाठीच जन्माला आले आहेत.

In reply to by टिलू

विषय गुळगुळीत झाला असला तरीही... १०-११ वर्षांपुर्वी प्रथमच पुण्याला आल्यावर सकाळ वाचल्या नंतर अगदी असच वाटलं होतं. पेपरभर पुणे-पुणे--पुणे-पुणे-पुणे! संपूर्ण पेपरामधले एकतृतीआंश शब्द 'पुणे' असतील.

In reply to by दादा कोंडके

संपूर्ण पेपरामधले एकतृतीआंश शब्द 'पुणे' असतील. टाईपसेटचे तेवढेच खिळे उरले किंवा छापखान्यातील जुळार्‍याला तेवढेच शब्द जुळवता येत असतील असे म्हणायला हल्ली ऑफसेट प्रिंटिंग टेक्नॉलोजी मुळे वाय उरलेला नाही. आपण म्हणूया फॉन्ट मधे तेवढीच अक्षरे मिळाली असतील.

खरच... @मन उधाण वार्याचे माज आहे पुणेकर असल्याचा.... पुणे तिथे काय उणे... आणि @ह भ प मला तर वाटते पुण्यासारखे शहर जगात कुठेही नाही.

मोठ्या अपेक्षेने हा धागा वाचायला आलो . आणि निराशा झाली. कट्टरता लोप पावून सगळ्या गांधीवादी प्रतिसाद पाहून अपेक्षाभंग झाला. शतक गाठणे दूरच येथे अर्ध शतकाची मारामार दिसत आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

जरा मटार उसळ, शिकरण आणि दुपारची वामकुक्शी होउ दे. अस्सल पुणेकराला कट्टर पणा ह्या तीन गोष्टीनन्तरच येतो. विषय विसन्गत : आनुस्वार कसा द्याय्चा?

पुणेकर असल्याचा माज असा आहे की जसे काही पुणे महाराष्ट्रापासुन तोडन्यासाठी प्रयत्न झाले आणी त्यात माज असलेल्यांपैकी कोणीतरी विरांसारखे लढुन शहीद झाले पुणे बेळगाव बर्हाणपुर सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे

In reply to by रसायन

थंडी तापाचा का?सरकारी डॉक्टर का तुम्ही नाही कायदेशीर उपचार तिथेच होतात वाटते

विशिष्ट जमातीने विशिष्ट जमातीच्या कौतुकाकरिता काहाडलेला धागा. (स्वगतः दिलाव् रे बाँब टाकूण ;) )

टाकायचाच असला तर असा टाकावा. पूर्वी पुण्यामधे टाईम्स ऑफ इंडिया छापला जात नसे, मुंबईहून डाक एडिशन सकाळी दहा साडेदहाला पोचत असे. असाच एकदा सकाळी पुण्याच्या नातेवाईकांकडे गेलो. त्यांनी टाईम्स पुढे केला. त्यावर अस्सल मुंबईकराप्रमाणे मी म्हणालो," शी! हा शिळा पेपर आम्ही वाचत नाही. यातल्या बातम्या आम्ही मुंबईला कालच वाचल्यात." नातेवाईकही पुणेकर, सदाशिवपेठेतलेच होते. ते म्हणाले," वाचायला दिला नाहीच मुळी! एवढा प्रवासाहून आला आहेस तर परसदारी जायचे असेल, म्हणून दिलाय! पाणीटंचाई मुळे तुला संवयच असेल ना!

एकंदरीतच पुणेकर अन त्यांच्या सवयी (खोडी) कौतुकाचा विषय असणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाहीए ...

In reply to by आनन्दिता

खरय . आश्चर्य वाटण्यासारखं नक्कीच नाहि .... विचित्र वाटण्यासारख आहे मात्र .

असलात तर नदीपलीकडचे असाल. आणि पुण्यात रहात नसाल तर कृपया इनो घ्या. पुणेकरांच्या दृष्टीने नदीपलिकडे जग संपते.

In reply to by बॅटमॅन

रविवारात महिनोन्महिने राहिले आहे. आणि पुण्याचा अभिमान असणारे कित्येक पुणेकर नातेवाईक आहेत, एवढं माहिती असायलाच पाहिजे ना!

In reply to by जेनी...

आहे एक नाला, त्यालाच नदी म्हणतात. (मुंबईमध्ये नदीला नाला म्हणतात ती गोष्ट वेगळी)

In reply to by जेनी...

पुण्यातून राम नावाची नदी वहाते पण ही मुम्बईच्या मीठी नदी इतकीच प्रसिद्ध आहे .

In reply to by चौकटराजा

काय या पुणेकरांचे कौतुक ! मतदान केलं तरी फोटो झळकतात यांच्या बोटांचे केले नाही तर मतदारयादीत नाव नाही ही देशपातळीवरची बातमी होते

In reply to by पैसा

अओ सासुबै ... रविवारा बद्दल नैओ ... पुण्याबद्दल सांगा .. माझ्या ससुबै म्हणजे पण ना ! :-/ शी बै ... यांना सांभाळायचं म्हणजे कथिण होउन बसतं खरच :-/

In reply to by पैसा

कोठरूडमधील पुणेकरही हेच म्हणतात, नदीपलिकडे पुणं सम्पतं

पुणे आणि पुणेकर दोन्ही ही लाजवाब असून त्यांचे कौतुक होणे ही अतीशय साह्जिक आहे ... ज्याना हे मान्य नाही त्यांनी सामोर यावे शनिवार वाड्याचा राखवालदार जाहिर मुका घेऊन त्यांचा सत्कार करेल..!! हुकुमावरुन

In reply to by आनन्दिता

आपली आपण करी स्तुती | तो एक मूर्ख || - नारायण सूर्याजीपंत ठोसर , मु.पो.जांब.

पैसाताई शी सहमत. नदीपलीकडे पुणे संपते!!!! परीकथेतील राजकुमार यांना देखील +साडेबत्तेचाळीस पॉईंट. अरे पुण्याचा विषय आणि 'दिवाळी पहाट', 'बि आर टी', 'बचत गटाचे कौतुक', 'चितळे' इ. चा साधा उल्लेख देखील नाही ? लेख कुछ जम्या नही.

In reply to by ह भ प

आणि, त्याच्या बाहेर जे खाण्याचे स्टॉल लावलेले असतात, त्यातून होम डिलिव्हरी मिळाली तर आणखीनच ब्येस्ट!

In reply to by ह भ प

असहमत! अशाने पुणेकर नाराज होतील. सवाई गंधर्वला येणारे ९९% पुणेकर 'आम्ही सवाई गंधर्वला येतो!' हे दाखवायला उपस्थिती लावतात आणि बहुतांश वेळ गेटपाशी कोण कोण आलं आहे हे बघण्यात घालवतात. दुसर्‍या दिवशी सकाळ मध्ये आलेली माहिती वाचून काढतात कारण कुणी आणि काय गायलं म्हणून विचारलं तर फजिती नको व्हायला. *सदर मत हे पुणेद्वेशी मुंबईकर मित्राचं आहे.

In reply to by दादा कोंडके

"९९% पुणेकर 'आम्ही सवाई गंधर्वला येतो!' हे दाखवायला उपस्थिती लावतात" हे मात्र तंतोतंत खरे आहे. ज्यावेळी हा कार्यक्रम रात्री होत असे तेंव्हा तर भलतीच मजा असायची. अंथरूण पांघरूण घेऊन लोक (पक्षी: पुणेकर) घरात पडायचे ते तिथे मैदानात झोपायला यायचे आणि १० वाजले की घोरासुराचे आख्यान सुरू करायचे... वर सकाळी उठून "रात्री रोणू काय जमला नाही बुवा" म्हणायला मोकळे. लेका, काय जमलं आणि काय नाही ते ऐकायला जागा तरी होतास काय? आणि असतास तरी त्यातलं काही कळ्लं असतं काय?