✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काय या पुणेकरांचे कौतुक !

न
नर्मदेतला गोटा यांनी
Mon, 12/10/2012 - 00:35  ·  लेख
लेख
पुण्याबाहेरच्या लोकांना नेहमी वाटते की पुणेकरांचे एवढे काय कौतुक. यांच्या उकडण्याचेही कौतुक, यांच्या थंडीचेही कौतुक. म्हणजे पुणेरी पेपरमधल्या बातम्या वाचल्या की कळेल. कधी सकाळी पावसाचे अजिबात चिन्ह नसते. पुणेकर छत्री न्यायचा कंटाळा करतात. पण संध्याकाळी ऑफीसमधून घरी यायला निघावे तर बेसावध क्षणी पाउस पुणेकरांना गाठतो आणि भिजवतो. दुसर्‍या दिवशीच्या पेपरमधे भिजलेल्या पुणेकरांचे, झाडाखाली थांबलेल्या, स्कार्फ बांधलेल्या तरुणींचे फोटो आणि बातमीचे हेडींग अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ कधी हा पाऊस प्रचंड कोसळतो. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागतात. झाडे पडतात. रस्त्यातील वाहतूक अडते. दुसर्‍या दिवशी फोटो आणि बातमी. पुणेकरांना पावसाने झोडपले. कधी हलक्याशा सरी पडत असतात. अशावेळी हिरवागार झालेल्या सिंहगडाचे फोटो, त्यावर पर्यटकांची गर्दी. बातमी असते - पावसाळी वातावरणात पुणेकरांनी केले सिंहगडाचे पर्यटन, पुणेकरांनी सिंहगडावर गरम गरम भजी खाणेच पसंत केले. थंडीचे दिवस सुरू होतात. सकाळी फिरायला पुणेकर बाहेर पडतात. अशावेळी कमला नेहरु पार्कमधला वॉकींग जॉगिंग करणार्‍या पुणेकरांचे फोटो. यातल्या काही जणांच्या अंगावर शाल. पुण्यातल्या पेपरात बातमी. बातमीत वर्णन असते. पुणेकरांनी स्वतःला शालीत लपेटून घेतले. फोटोवर हेडींग पुण्यात गुलाबी थंडी ! थंडी संपून थोड्याशा उकाड्याला सुरुवात होते, बातमी - पुण्यातील थंडी गायब कधी जूनमधे पाउस पडतो पण जुलैमधे पाऊस अजिबात पडत नाही. बातमी - पावसाचे दोन महीने उलटले पण पुणेकर कोरडेच अशा जरा उकडणार्‍या दिवसात हलकी पावसाची सर येते. तापलेले रस्ते जरा थंड होतात. उकाडा जरा कमी होतो. बातमी - पावसाच्या हलक्या सरीने पुणेकर सुखावले किंवा पुणेकरांवर पावसाचा प्रसन्न शिडकावा ! उन्हाळ्याच्या दिवसात उकाडा वाढतो. अशावेळी बातमी पुणेकर उकाड्याने हैराण कधी जरा हीच बातमी बदलून - रसाच्या गुर्‍हाळाचा फोटो, पुणेकर रस पिताहेत. बातमीचे शीर्षक - चहापेक्षा रस बरा ! कधी कधी पुण्यातल्या रस्त्यांवर बरेच खड्डे पडतात. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतो. अशावेळी बातमी 'पुणेकर खड्याने त्रस्त.' हेच रस्ते जर कोथरूडमधील असतील तर कौतुक आणखी वाढते. रस्त्यातील खड्ड्यांनी कोथरुडकर हैराण अशीही ओळ पहायला मिळते. पाणीटंचाईची बातमी असेल तर ऐन पावसाळ्यात कोथरुडकरांच्या टँकरसमोर रांगा सवाई गंधर्वचे दिवस असतात. कौशिकीसारखे कलाकार छान गाऊन जातात. मग त्या महोत्सवाचा फोटो. हेडींग-कौशिकीच्या गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध ! असा सारा पुणेकरांच्या कौतुकाचा मामला जो पुणेकर झाल्याशिवाय इतरांना नाही उमगायचा !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध

प्रतिक्रिया द्या
48536 वाचन

💬 प्रतिसाद (192)

प्रतिक्रिया

पैसातै यू टू???????

बॅटमॅन
Mon, 12/10/2012 - 23:05 नवीन
पैसातै यू टू??????? (अं.ह. & डो.पा.) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मग!

पैसा
Mon, 12/10/2012 - 23:12 नवीन
रविवारात महिनोन्महिने राहिले आहे. आणि पुण्याचा अभिमान असणारे कित्येक पुणेकर नातेवाईक आहेत, एवढं माहिती असायलाच पाहिजे ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कथिन आहे, लोकं कायकाय लक्षात

बॅटमॅन
Mon, 12/10/2012 - 23:15 नवीन
कथिन आहे, लोकं कायकाय लक्षात ठेवतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कोणची नदी व्हातेवो तुमच्या

जेनी...
Mon, 12/10/2012 - 23:16 नवीन
कोणची नदी व्हातेवो तुमच्या पुण्यात??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आहे एक नाला, त्यालाच नदी

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 12/10/2012 - 23:40 नवीन
आहे एक नाला, त्यालाच नदी म्हणतात. (मुंबईमध्ये नदीला नाला म्हणतात ती गोष्ट वेगळी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अय्या विशु

जेनी...
Tue, 12/11/2012 - 00:54 नवीन
अय्या विशु :) कित्ती हुस्शार आहेस रे तु =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

पहिल्यापासूनच...

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 12/11/2012 - 09:43 नवीन
पहिल्यापासूनच... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

राम नदी

चौकटराजा
Tue, 12/11/2012 - 19:53 नवीन
पुण्यातून राम नावाची नदी वहाते पण ही मुम्बईच्या मीठी नदी इतकीच प्रसिद्ध आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

काय या पुणेकरांचे कौतुक !

नर्मदेतला गोटा
Fri, 04/25/2014 - 13:44 नवीन
काय या पुणेकरांचे कौतुक ! मतदान केलं तरी फोटो झळकतात यांच्या बोटांचे केले नाही तर मतदारयादीत नाव नाही ही देशपातळीवरची बातमी होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

अओ सासुबै ... रविवारा बद्दल

जेनी...
Mon, 12/10/2012 - 23:18 नवीन
अओ सासुबै ... रविवारा बद्दल नैओ ... पुण्याबद्दल सांगा .. माझ्या ससुबै म्हणजे पण ना ! :-/ शी बै ... यांना सांभाळायचं म्हणजे कथिण होउन बसतं खरच :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कोठरूडमधील पुणेकरही हेच

नर्मदेतला गोटा
Tue, 12/18/2012 - 01:13 नवीन
कोठरूडमधील पुणेकरही हेच म्हणतात, नदीपलिकडे पुणं सम्पतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पुणे आणि पुणेकर दोन्ही ही

आनन्दिता
Tue, 12/11/2012 - 03:38 नवीन
पुणे आणि पुणेकर दोन्ही ही लाजवाब असून त्यांचे कौतुक होणे ही अतीशय साह्जिक आहे ... ज्याना हे मान्य नाही त्यांनी सामोर यावे शनिवार वाड्याचा राखवालदार जाहिर मुका घेऊन त्यांचा सत्कार करेल..!! हुकुमावरुन
  • Log in or register to post comments

आपली आपण करी स्तुती | तो एक

बॅटमॅन
Tue, 12/11/2012 - 20:12 नवीन
आपली आपण करी स्तुती | तो एक मूर्ख || - नारायण सूर्याजीपंत ठोसर , मु.पो.जांब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

पैसाताई शी सहमत. नदीपलीकडे

परंपरा
Tue, 12/11/2012 - 10:00 नवीन
पैसाताई शी सहमत. नदीपलीकडे पुणे संपते!!!! परीकथेतील राजकुमार यांना देखील +साडेबत्तेचाळीस पॉईंट. अरे पुण्याचा विषय आणि 'दिवाळी पहाट', 'बि आर टी', 'बचत गटाचे कौतुक', 'चितळे' इ. चा साधा उल्लेख देखील नाही ? लेख कुछ जम्या नही.
  • Log in or register to post comments

सवाई गंधर्व भीमसेन जोशी महोत्सव

ह भ प
Tue, 12/11/2012 - 17:23 नवीन
सवाई गंधर्व भीमसेन जोशी महोत्सव लाईव्ह दाखवला टीव्हीवर तर काय मज्जा येइल..
  • Log in or register to post comments

हो ना!

तिमा
Tue, 12/11/2012 - 18:00 नवीन
आणि, त्याच्या बाहेर जे खाण्याचे स्टॉल लावलेले असतात, त्यातून होम डिलिव्हरी मिळाली तर आणखीनच ब्येस्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ह भ प

-१

दादा कोंडके
Tue, 12/11/2012 - 19:57 नवीन
असहमत! अशाने पुणेकर नाराज होतील. सवाई गंधर्वला येणारे ९९% पुणेकर 'आम्ही सवाई गंधर्वला येतो!' हे दाखवायला उपस्थिती लावतात आणि बहुतांश वेळ गेटपाशी कोण कोण आलं आहे हे बघण्यात घालवतात. दुसर्‍या दिवशी सकाळ मध्ये आलेली माहिती वाचून काढतात कारण कुणी आणि काय गायलं म्हणून विचारलं तर फजिती नको व्हायला. *सदर मत हे पुणेद्वेशी मुंबईकर मित्राचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ह भ प

"९९% पुणेकर 'आम्ही सवाई

रामपुरी
Tue, 12/11/2012 - 23:51 नवीन
"९९% पुणेकर 'आम्ही सवाई गंधर्वला येतो!' हे दाखवायला उपस्थिती लावतात" हे मात्र तंतोतंत खरे आहे. ज्यावेळी हा कार्यक्रम रात्री होत असे तेंव्हा तर भलतीच मजा असायची. अंथरूण पांघरूण घेऊन लोक (पक्षी: पुणेकर) घरात पडायचे ते तिथे मैदानात झोपायला यायचे आणि १० वाजले की घोरासुराचे आख्यान सुरू करायचे... वर सकाळी उठून "रात्री रोणू काय जमला नाही बुवा" म्हणायला मोकळे. लेका, काय जमलं आणि काय नाही ते ऐकायला जागा तरी होतास काय? आणि असतास तरी त्यातलं काही कळ्लं असतं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

स्माइली कसे टन्कायचे.....

रुस्तम
Tue, 12/11/2012 - 19:58 नवीन
स्माइली कसे टन्कायचे.....प्लीज सान्गा...
  • Log in or register to post comments

असे

जेनी...
Tue, 12/11/2012 - 20:19 नवीन
:) :( :-/ :D :P =)) असे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम

नको हो.. काही मंडळींनी

गणपा
Tue, 12/11/2012 - 20:25 नवीन
नको हो.. काही मंडळींनी स्मायल्या टाकून ईतका उच्छाद मांडलाय की आता अजीर्ण झालय. इनोही संपलय. ;) तेव्हा स्मायल्या रहीत प्रतिसाद चालतील आम्हाला. :) : ) = स्मीत हास्य स्मायली. ; ) = डोळा मारणारी स्मायली. = )) लोळणारी स्मायली. : D = दात काढणारी स्मायली : ( = रडकी स्मायली. आम्ही शक्यतो येवढ्याच वापरतो. (वर दिलेल्या स्मायल्यां मधली रिकामी जागा (स्पेस) काढून टाका )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम

:)

सोत्रि
Tue, 12/11/2012 - 23:00 नवीन
होना! प्रतिसाद नको पण स्मायल्या आवर... ;) - (गणपाशी बाडीस असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

गणपा आणि सोत्रिंशी बाडीस.

सूड
Wed, 12/12/2012 - 08:04 नवीन
गणपा आणि सोत्रिंशी बाडीस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अगदी अगदी

इरसाल
Wed, 12/12/2012 - 10:08 नवीन
गणपा, सोत्री, सुडशी हज्जारदा सहमत. उठावणीला आणलय ह्या लोकांनी बर इतके वेळा किती लोकांच बोलुन झालय पण काडीमात्र फरक नाही (मराठीत याला काहीतरी विशिष्ट शब्द आहे म्हणे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मी असे प्रतिसाद वाचतच नाही.

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 12/12/2012 - 10:20 नवीन
मी असे प्रतिसाद वाचतच नाही. माउसवर छान स्क्रोल बटण आहे. (आणि चांगल्या प्रतीचा माउस घेतल्याने ते एखाददोन धागे वाचून मोडलेले नाही). ते वापरून पुढे जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

अगदि सहमत .

जेनी...
Wed, 12/12/2012 - 10:25 नवीन
अगदि सहमत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

+१ / -१

गणपा
Wed, 12/12/2012 - 13:10 नवीन
हो माउसचं स्र्कोल बटणं वापरणं हा उपाय आहेच. पण आम्हा थर्डवल्ड मध्ये रहाणार्‍या लोकांकडे नेट स्पीड भारत/युरोप/उसगाव आदी पुढरलेल्या देशांपेक्षा भलताच कमी असतो. त्यात हे असले नाका पेक्षा मोती जड असलेले स्मायल्यांनी बरबटलेले प्रतिसाद असले की धागा लोड व्हायला वेळ लागतो. वरुन आमचे बाईट्स फुकट जातात ते वायलं. परवडत नाय हो. :) :( =)) :P :D या व अश्या लहान-सहान स्मायलींना आमची ना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

थांबा, एखादे क्रोम किंवा

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 12/12/2012 - 13:51 नवीन
थांबा, एखादे क्रोम किंवा अग्नीकोल्हा प्लग-इन लिहिता येते का ते बघतो. असे प्रतिसाद फिल्टर करणारे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अगदी अगदी !!

सूड
Wed, 12/12/2012 - 13:54 नवीन
आम्हा थर्डवल्ड मध्ये रहाणार्‍या लोकांचे बाईट्स वाचवण्यासाठी तरी या लोकांनी नमतं घ्यावं अशी माफक इच्छा आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

वा रे वा

अभ्या..
Wed, 12/12/2012 - 16:01 नवीन
वा रे वा गंपादादा तुझ्या पाकृ च्या इमेज बघता बघता आमचे बाईटस आणि लाळ वाया जाते ते काय नाही का? ;) तुझ्या एका पाकृ प्रेसेंटेशन च्या साईजमध्ये कितीतरी लाख स्मायल्या बसतील की. (उगी आम्ही तुझ्यासाठी परवडण्याचा न परवडण्याचा हिसाब ठेवत नाही म्हणून ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हॅ हॅ हॅ.... ती काळजी घेत

गणपा
Wed, 12/12/2012 - 16:14 नवीन
हॅ हॅ हॅ.... ती काळजी घेत सध्या भटारखाना बंद केला आहे. :) वरी णॉट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अन्याव :(

अभ्या..
Wed, 12/12/2012 - 16:33 नवीन
अन्याव करु नकोस बाबा. ते प्राण्यांच्या फोटोपेक्षा तुझ्या वरिजिनल पाकृ तरी बघु दे. मग जाउ दे बाईट्स कितीपण. :) यू टू वरी णॉट. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

पुण्याचे शुद्ध नामकरण

रमेश आठवले
Tue, 12/11/2012 - 23:51 नवीन
बऱ्याच वर्षापूर्वी पुण्याच्या इंग्लिशमध्ये वापरात असलेल्या poona या नावाचा पुणे या सध्याच्या सरकारमान्य नावात बदल करण्यात आला. हा बदल बहुधा जून महिन्यात झाला असावा. कारण टाईम्स ऑफ इंडीआ मध्ये या नावावर कोटी करणारा pune in june या शीर्षकाचा अग्रलेख वाचल्याचे स्मरणात आहे.
  • Log in or register to post comments

चांगला प्रयत्न

श्रीरंग_जोशी
Wed, 12/12/2012 - 01:36 नवीन
आपल्या राज्याच्या सर्वच मोठ्या शहरांत राज्याच्या इतर भागांतून लोक पोटापाण्यासाठी स्थलांतरित होतात. यासाठी बहुतांश लोकांची पहिली (कधी कधी पहिली अन शेवटची दोन्हीही) पसंती पुण्यालाच असते. कारण पुणे जसे सहजपणे नव्या स्थलांतरीतांना सामावून घेतं, पोटापाण्याची सोय झाल्यावर ज्ञानाची, कलेची भूक शमवण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून देतं. पोटापाण्यासाठी नाईलाजाने स्वतःचं गाव सोडून येणाऱ्यांना आणखी काय हवं असतं? हे शहर महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक संस्कृतीचं प्रतिनिधित्व सशक्तपणे करतं यात शंकाच नाही. पण या योगदानाचे पाहिजे तसे कौतुक होते नाही. एखाद्या लोभसवाण्या गोष्टीला दृष्ट लागू नये म्हणून काही खटकणारेही असावेच लागते. त्यामुळे 'हुकुमावरून', 'कायमचा इलाज केला जाईल' 'अपमान करण्यात येईल' या प्रकारच्या सरंजामी (+/-) प्रवृत्तींचाही समावेश असतो. पण एवढ्या चांगल्या गोष्टीस दृष्ट लागू नये म्हणून जर कुणी स्वतः वाईटपणा घेत असेल तर त्यांच्या या त्यागासाठी त्यांचे आभार मानायलाच हवे. धागाकर्त्याची निरीक्षणशक्ती जोरदार दिसत आहे. इतर महाराष्ट्राविषयीपण लिहा...
  • Log in or register to post comments

बाकी महाराष्ट्रात आता उरलंयच

काळा पहाड
Wed, 05/13/2015 - 14:48 नवीन
बाकी महाराष्ट्रात आता उरलंयच काय? पुणे, मुंबई आणि फार फार तर नाशिक/औरंगाबाद/नागपूर्/कोल्हापूर (इथले लोक सुद्धा पुण्याकडेच यायला उत्सुक असतात). आघाडी सरकारनं ही शहरं सोडली तर बाकी सगळा महाराष्ट्र उजाड, भकास, रखरखीत आणि भटक्या टोळ्यांचा प्रदेश करून ठेवला आहे. जलसंधारणात इतके प्रचंड पैसे खाल्लेत की शेतीवर जगणं सामान्य शेतकर्‍याला शक्यच नाही. आणि आता त्यात सुधारणा करण्यासाठी सरकारकडं पैसे सुद्धा शिल्लक नसतील. सगळं प्रदूषित करून ठेवलंय. वीज, पाणी आणि रस्त्यासारख्या सामान्य सुविधांपासून ग्रामीण महाराष्ट्र आजही वंचित आहे आणि कदाचित आता कायमच वंचित राहील. गावं म्हणजे टग्या लोकांच्या राहण्याची आणि जनतेला त्रास देण्याची जहागिरीची स्थानं बनलियेत. काँग्रेस तशीही गावपातळीवर संपली होती. आता युवराजांच्या दिव्य नेतृत्वामुळं काय स्थिती असेल कुणास ठावूक. राष्ट्रवादीनं ज्या प्रकारे महाराष्ट्राची हानी केलिये त्याला तोड नाही. जनतेला असं कदाचित फक्त मोगलांनीच लुटलं असेल. नवीन सरकार कडे ना अनुभव आहे, ना नोकरशाहीवर जरब बसवण्याची क्षमता आहे. सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेनं पाय ओढणे एवढा एकचकलमी कार्यक्रम राबवलेला आहे. गाव पातळीवर राष्ट्रवादीचे गुंड आणि शिवसेनेचे वळू यांच्यात फारसा फरक नसावा. जनतेचं असं शोषण तर इंग्रजांनीही केलं नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

१००% सहमत

आनन्दिता
Wed, 12/12/2012 - 07:04 नवीन
१००% सहमत
  • Log in or register to post comments

एक किस्सा पुणेरी .

सस्नेह
Wed, 12/12/2012 - 14:50 नवीन
बदली निमित्त पुण्याला दोन वर्षे राहिले (हो, हो, खरंच) होते तेव्हाची गोष्ट. रोज हापिसात डब्याला दहा पाच सहकारी (बहुतांश भटें ) असत. भाजीचे समान वाटप होई. मग पंगत सुरु होई. एक दिवशी भाजी आणायचं राहिलं म्हणून अंडा बुर्जी डब्यात नेली होती. लंचटाईमला सगळे गोळा झाले. मी काही डबा वर काढला नाही. तशीच बसून राहिले. सगळे म्हणाले 'मॅडम आज उपास का ?' मी म्हटलं ‘उपास नाही, तुमचं झाल्यावर डबा खाणार आहे.’ ‘का हो ?’ ‘आज पांढरी वांगी आहेत....’ ‘मग आधी डबा द्या इकडे अन आमचा घ्या हा तुम्हाला.’ अन माझा डबा सगळ्या भटांनी फस्त केला. शेवटी म्हणाले, ‘लक्षात ठेवा, आम्हाला माणूस सोडून सगळं चालतं !’ अलीकडे पुण्यात जाणे फारसे होत नाही. पण ऐकायला मिळते की आता तर पुणेकर काहीच सोडत नाहीत....
  • Log in or register to post comments

किस्सा मस्तच!

दादा कोंडके
Wed, 12/12/2012 - 15:00 नवीन
पांढरी वांगी... हा हा. पहिल्यांदाच ऐकला हा शब्द. :) मटणाला या परिभाषेत काय म्हणतात हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

मटणाला..!!

ह भ प
गुरुवार, 12/13/2012 - 10:48 नवीन
नाण्वेज सोयाबीन म्हणा हवंतर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

परिभाषा

तिमा
Fri, 12/14/2012 - 19:29 नवीन
मटणाला या परिभाषेत काय म्हणतात हो? ' हाडकं पनीर'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

ओ हो..

दादा कोंडके
Sun, 12/16/2012 - 23:28 नवीन
पण 'पांढर्‍या वांग्या'ची मजा वाटत नाही हाडकं पनीरात. :) पण नशीब 'लाल सुरण' वगैरे म्हणत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/12/2012 - 15:17 नवीन
हा किस्सा नक्की पुणेरी म्हणून खपवण्याचा प्रयत्न आहे, का एका विशिष्ठ समाजाला टार्गेट करण्याचा ? काये, अंडी, मटण वैग्रे महाग केले म्हणून एका विशिष्ठ समाजाला नावे ठेवणारे खूप बघितले आहेत. पण शिक्षण महाग करणार्‍यांच्या नावाने गळे काढणारे कोणी बघितले नाहीत म्हणून आपले विचारतोय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

पुण्यातील काही ब्राह्मण घरात

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 12/12/2012 - 17:01 नवीन
पुण्यातील काही ब्राह्मण घरात अंडे असे म्हणत नाहीत पण खातात. आज पांढर्या लिंबाची भाजी केली होती असा उल्लेख करून, असे मला काही पिढ्या पुण्यात गेलेल्या एका पुणेकर मित्राने सांगितले होते. ऐकून मला आश्चर्य वाटले तेव्हा म्हणाला की बनवलेला किस्सा नाही, असे खरेच होते. काही शंका असेल तर व्यनी करा, त्या मित्राचे सदस्यनाम कळवतो. पुढे तुम्ही आणि तो काय तो सोक्षमोक्ष लावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हार प्रकार ऐकला होता पांढर्

बॅटमॅन
Wed, 12/12/2012 - 17:05 नवीन
हार प्रकार ऐकला होता पांढर्‍या बटाट्याची भाजी म्हणोन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

वरील प्रतिसाद

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/12/2012 - 17:10 नवीन
मला उद्देश्यून आहे काय ? असल्यास :- आपल्या मदतीबद्दल धन्यवाद. पण आपण आणि आपल्या मित्राची काय चर्चा झाली, अथवा कुठली रहस्ये उलगडली गेली ह्यात मला काही इंट्रेस्ट नाही. इथे सार्वजनीक पटलावरती जे काही लिहिले गेले आहे त्याला अनुसरुन एक प्रश्न मी प्रतिसादकास विचारला आहे. 'पुण्यात पांढरी लिंबे म्हणतात, मुंबईत चुन्याचे दगड म्हणतात, इचलकरंजीत कापसाचे बोळे म्हणतात' असल्यात मला रस नाही. धन्यावाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हा किस्सा नक्की पुणेरी म्हणून

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 12/13/2012 - 10:10 नवीन
हा किस्सा नक्की पुणेरी म्हणून खपवण्याचा प्रयत्न आहे, का एका विशिष्ठ समाजाला टार्गेट करण्याचा ?
हे तुमचे ओरिजिनल विधान. या विधानात तुम्ही किश्श्याच्या पुणेरी असण्यावर शंका घेत आहात. त्यावर उत्तर म्हणून असा किस्सा मला एका पुणेकरानेच सांगितला हे मला सांगायचे होते. परत माझ्यावरच कुणी पुणेकर मित्राच्या नावावर किस्सा खपवतो आहेस असा आरोप करू नये म्हणून "पाहिजे असेल तर खात्री करा" असे लिहिले. बाकी, यात कुठला समाज कसा "टार्गेट" झाला हे मला शष्प कळले नाही. अवांतर :- इचलकरंजीचे माहित नाही, पण मुंबईत अंड्याला अन्डेच म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

या प्रतिसादामधून

कपिलमुनी
Wed, 12/12/2012 - 15:21 नवीन
नक्की काय सांगायचा आहे ? पुण्यामधलेच भटं खातात ?? क्कि पुणे आले की भटांचा उल्लेख आलाच पाहिजे?? बाकी भट म्हणजे नक्की कोण ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

'भटे' हा सहकार्‍यांचाच शब्द.

सस्नेह
Wed, 12/12/2012 - 15:33 नवीन
'भटे' हा सहकार्‍यांचाच शब्द. तोपर्यंत तरी मला अज्ञात असलेला. आणि त्यानंतरही मी आताच वापरला. कोणत्याही समाजाच्य भावनांना धक्का पोचवण्याचा इरादा नसून घडले ते फक्त सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

काय सांगता ?

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/12/2012 - 15:42 नवीन
पण हा किस्सा कुठल्या सदरात मोडतो ते पण सांगा की जरा. का असे काही घडलेले तुम्ही त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवलेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

'असे काही' म्हणजे ?

सस्नेह
Wed, 12/12/2012 - 16:11 नवीन
'असे काही' म्हणजे ? रोख कळला नाही. आणि 'सदर' कसले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा