✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रभू मास्तरांचे अभिनंदन

स
सरपंच यांनी
Fri, 06/22/2012 - 15:25  ·  लेख
लेख
मिसळपाव सुरू झालं आणि इथे अनेक लोक येऊ लागले. त्यातले काही अगदी शांतपणे इथे राहू लागले तर काहींनी अल्पावधीत स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले. आमचे प्रभू मास्तर ऊर्फ विनायक प्रभू हे त्यातलेच एक भन्नाट व्यक्तिमत्व. (http://www.misalpav.com/user/1235/guestbook) इथे आल्यावर त्यांच्या क्रिप्टिक बोलण्यामुळे चक्रावला नाही असा एकही सदस्य नसेल. पण आज प्रभू मास्तर हे स्वतःच एक इन्स्टिट्युशन होऊन बसले आहेत. अनेक क्षेत्रांची जाण असलेला पण मन खर्‍या अर्थाने शिक्षण क्षेत्रात रमणारा हा कलंदर माणूस. झोपेतही कोणासाठी काहीतरी (आणि ते ही निरपेक्ष वृत्तीने) करण्याची स्वप्नं बघणारे आणि जागेपणी ती स्वप्नं प्रत्यक्षात आणणारे प्रभू मास्तर. मिसळपावसारख्या माध्यमाचाही त्यांनी केवळ याच दृष्टीने उपयोग केला. गुणवंत पण गरजवंत असलेल्या विद्यार्थ्यांना खूप आधीच शोधून काढून त्यांना हरप्रकारे मदत ते करतात. या मदतीत काय नसतं? या मुलांना दहावीमधे उत्तम गुण कसे मिळवायचे, बारावी / सीइटीसाठी मार्गदर्शन करणे, शिष्यवृत्ती मिळवून देणे इतकंच नाही तर त्यांच्या पालकांनाही गरजेप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असं कोणत्याही प्रकारे प्रभू मास्तर त्यांचं काम करत असतात. सांगण्यास आनंद होतो की या वर्षीप्रभू मास्तरांच्या मार्गदर्शनाखालील १५ पैकी १२ विद्यार्थ्यांनी मेडिकल व इंजिनियरिंग सीइटीमधे शासकिय महाविद्यालयांमधे प्रवेश मिळवण्याइतके गुण मिळवले आहेत. या सगळ्या मुलांना गेल्या दोन तीन वर्षांपासून प्रभू मास्तरांची साथ लाभलेली आहे. इतकंच नव्हे तर या मुलांचा पुढच्या सगळ्या शिक्षणाच्या खर्चाचीही (सुमारे रु. २,५०,०००/-) सोय प्रभू मास्तरांनी केली आहे. या घवघवीत यशाबद्दल मास्तरांचे अभिनंदन आणि ते एक मिपाकर आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो हे आम्ही कृतज्ञापूर्वक नमूद करतो. या सीइटी परिक्षांमधे १७२ किंवा अधिक गुण मिळवणारे आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. २,५०,०००/- किंवा त्याहून कमी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडे अजूनही मदतीचे मार्ग उपलब्ध आहेत. इच्छुकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा आणि इतरांनी ही बातमी गरजूंपर्यंत पोचवावी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
बातमी
शिफारस
सल्ला
मदत
माहिती

प्रतिक्रिया द्या
12023 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

_/\_अभिनंदन!!!!!!!!!!!!!!!!!

मराठमोळा
Fri, 06/22/2012 - 17:11 नवीन
_/\_ अभिनंदन!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! अवांतर : मी मधे एका ऑफिसबॉयला मदत केली होती. त्याच्या बहिणीचे लग्न आणि त्याचे शिक्षण यासाठी, नंतर हे साहेब, गुटखा खाऊन पैसे उडवत शिक्षण अपुरे ठेवुन बसले. बंगलोरच्या कामवालीच्या मुलांनी मात्र चांगलं यश मिळवलं. मदत केवळ पैशांची न करता अशीही करता येते हे मात्र प्रभू मास्तरांकडुन शिकण्यासारखं. :)
  • Log in or register to post comments

व्वा !!!!!!!!प्रभु मास्तरांचे

पियुशा
Fri, 06/22/2012 - 15:30 नवीन
व्वा !!!!!!!!प्रभु मास्तरांचे कार्य खरच उल्लेखणीय आहे . कोचिंग क्लासचा सुळ्सुळाट झालेला असताना अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन ध्येयपुर्तीचा रस्ता दाखवणारे " निर्वाज्य" लोक विरळाच :) अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो. मास्तरांचे

प्रचेतस
Fri, 06/22/2012 - 15:49 नवीन
हेच म्हणतो. मास्तरांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

+१

प्रास
Fri, 06/22/2012 - 16:24 नवीन
मास्तरांचं अभिनंदन आणि पुढील कार्याला शुभेच्छा! बाकी पियुबैंनी लिहिलेला शब्द 'निर्व्याज' असावा असा समज करून घेतलेला आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

ग्रेट वर्क मास्तर

गणपा
Fri, 06/22/2012 - 15:31 नवीन
ग्रेट वर्क मास्तर. बोलणारे फार असतात पण न बोलता करणारे फार कमी. मास्तर तुम्हाला (जुजबी का असेना पण ) ओळखतो याचा मला अभिमान आहे. सरपंचांचे ही आभार.
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!

सूड
Fri, 06/22/2012 - 15:37 नवीन
>>बोलणारे फार असतात पण न बोलता करणारे फार कमी. असेच म्हणतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अत्यंत सहमत.. ग्रेट

गवि
Fri, 06/22/2012 - 15:43 नवीन
अत्यंत सहमत.. ग्रेट व्यक्तिमत्व..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हार्दिक अभिनंदन!

खडीसाखर
Fri, 06/22/2012 - 17:33 नवीन
>>बोलणारे फार असतात पण न बोलता करणारे फार कमी. एकदम सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मास्तरांचे प्रचंड आणि जबरदस्त

बॅटमॅन
Fri, 06/22/2012 - 15:35 नवीन
मास्तरांचे प्रचंड आणि जबरदस्त अभिनंदन!!!!!! मानलं ब्वॉ :)
  • Log in or register to post comments

प्रभु मास्तरांचे

sneharani
Fri, 06/22/2012 - 15:35 नवीन
अभिनंदन!! अभिनंदन!! अभिनंदन!!! _/\_ :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सहज
Fri, 06/22/2012 - 15:37 नवीन
मास्तुरे!!! सहज सराफ
  • Log in or register to post comments

--^-- सलाम....

अत्रुप्त आत्मा
Fri, 06/22/2012 - 15:47 नवीन
--^-- सलाम....
  • Log in or register to post comments

मास्तर अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/22/2012 - 15:50 नवीन
_/\_ ग्रेट मास्तर. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

__/\__

मेघवेडा
Fri, 06/22/2012 - 15:53 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

अभिनंदन

ऋषिकेश
Fri, 06/22/2012 - 16:09 नवीन
भर्पूर कष्ट करून यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या (आणि आमच्याही) प्रभु मास्तरांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

स्वाती दिनेश
Fri, 06/22/2012 - 16:09 नवीन
प्रभूमास्तर, अभिनंदन! स्वाती
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा.

मृत्युन्जय
Fri, 06/22/2012 - 16:14 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

+१ सहमत

नाखु
Fri, 06/22/2012 - 16:28 नवीन
आणि शुभेच्छा....
  • Log in or register to post comments

हाबिणंदण गुर्जी.

परिकथेतील राजकुमार
Fri, 06/22/2012 - 16:30 नवीन
हाबिणंदण गुर्जी.
  • Log in or register to post comments

अभिनंदन! आणि शुभेच्छा.

सन्दीप
Fri, 06/22/2012 - 16:39 नवीन
अभिनंदन! आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

ब्राव्हो!

विनीत संखे
Fri, 06/22/2012 - 16:41 नवीन
मास्तरांच्या कार्याचा आणखीन लेखाजोखा वाचण्यास आवडेल... मास्तरांच्या स्वतःच्या निगर्वी लिखाणातून तर अगदीच.
  • Log in or register to post comments

अरे वा!

विकास
Fri, 06/22/2012 - 16:45 नवीन
चांगली बातमी. नुसतेच मार्गदर्शन नाही तर शैक्षणिक खर्चावर होणार्‍या अवाढव्यव खर्चाला मार्ग देखील दाखवणे फारच स्पृहणीय आहे! प्रभू मास्तरांचे आणि त्यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

_/\_

मूकवाचक
Fri, 06/22/2012 - 16:47 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

प्रभुमास्तरांचे आणि त्यांच्या

कवटी
Fri, 06/22/2012 - 16:51 नवीन
प्रभुमास्तरांचे आणि त्यांच्या शिष्यांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

भारीच काम आहे!

संजय क्षीरसागर
Fri, 06/22/2012 - 16:53 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

मिपा वरील प्रभू मास्तर हे

निनाद मुक्काम …
Fri, 06/22/2012 - 16:54 नवीन
मिपा वरील प्रभू मास्तर हे आजच्या काळातील चितळे मास्तर आहेत. देव त्यांच्या कार्यास उंदंड यश देओ.
  • Log in or register to post comments

+१

स्पंदना
Fri, 06/22/2012 - 17:00 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

अभिनन्दन!.. गुड लक !!! ||

मृगनयनी
Sat, 06/23/2012 - 11:01 नवीन
अभिनन्दन!.. गुड लक !!! || *~*_*~* ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

वा मास्तर!

सर्वसाक्षी
Fri, 06/22/2012 - 17:02 नवीन
तुमच्या या कार्याला तोड नाही. हार्दिक अभिनंदन आणि अभिवादन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन व शुभेच्छा...

अमितसांगली
Fri, 06/22/2012 - 17:04 नवीन
अभिनंदन....अतिशय स्त्युत उपक्रम....
  • Log in or register to post comments

विनायक प्रभू यांना प्रणाम

विसुनाना
Fri, 06/22/2012 - 17:11 नवीन
प्रभू सरांच्या या अनमोल कार्याबद्दल त्यांना प्रणाम. त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी जीवनासाठी सदिच्छा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन....

मुक्त विहारि
Fri, 06/22/2012 - 17:23 नवीन
मस्त काम करत आहेत..
  • Log in or register to post comments

कौतुकास्पद

शुचि
Fri, 06/22/2012 - 17:31 नवीन
देशाला फक्त नावे ठेवण्यात अग्रणी बरेच जण असतात. पण या ना त्या प्रकारे खारीचा का होईना वाटा उचलून , समाजसेवा किती लोक करतात? मास्तरांचे फक्त लेखन माहीत होते, ही माहीती नवीन आहे. विप्रं _/\_
  • Log in or register to post comments

प्रभुजी

तिमा
Fri, 06/22/2012 - 17:34 नवीन
दंडवत स्वीकारावा. आम्हाला तुमचा अभिमान आहे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा!

सुनील
Fri, 06/22/2012 - 18:27 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

प्रभू गुर्जींचे अभिनंदन

पैसा
Fri, 06/22/2012 - 18:35 नवीन
प्रभू गुर्जीँचे अभिनंदन आणि त्याना पुढील कार्यासाठी शुभेच्छा! तसंच त्यांच्या "मुलांनाही" अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अभिनंदन गुर्जी

संदीप चित्रे
Fri, 06/22/2012 - 18:47 नवीन
अनेक मुलांना तुमच्या मार्गसर्शनाचा लाभ व्हावा ह्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

प्रभो तेरे धाम

चौकटराजा
Fri, 06/22/2012 - 19:06 नवीन
प्रभू तेरो धाम जो अध्याये फल पाये यश लाये तेरो काम ! मास्तर , न हि ज्ञानेन सदृश्यं पवित्रं इह विद्यते हेच खरे ! सलाम !
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

रम्या
Fri, 06/22/2012 - 19:17 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन...!

श्रीरंग_जोशी
Fri, 06/22/2012 - 19:46 नवीन
प्रभू मास्तरांचे व त्यांच्या गुणी विद्यार्थ्यांचे. अन पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

मदनबाण
Fri, 06/22/2012 - 19:51 नवीन
अभिनंदन ! :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा!

कवितानागेश
Fri, 06/22/2012 - 20:05 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

प्रभू मास्तरांचे अभिनंदन

गणेशा
Fri, 06/22/2012 - 20:17 नवीन
प्रभू मास्तरांचे अभिनंदन मास्तर होणे जमु शकते पण त्याबरोबर प्रभू होऊन जगता येणे अशक्य असते .. दोन्हीचा मिलाप झालेला पाहुन छान वाटले
  • Log in or register to post comments

मस्त प्रतिसाद!!!

शुचि
Fri, 06/22/2012 - 20:18 नवीन
हाडाचे कवी आहात गणेशा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

साष्टांग नमस्कार.

प्रभाकर पेठकर
Fri, 06/22/2012 - 20:25 नवीन
प्रभू साहेब, आपल्या कार्यापुढे नतमस्तक आहे. आपल्या चरणी आमचा साष्टांग नमस्कार रुजू करून घ्यावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

मास्तर, आपण ग्रेट आहात. आपले

रेवती
Fri, 06/22/2012 - 20:40 नवीन
मास्तर, आपण ग्रेट आहात. आपले व आपल्या मुलांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

मास्तरांचे अन त्यांच्या

शिल्पा ब
Fri, 06/22/2012 - 20:46 नवीन
मास्तरांचे अन त्यांच्या मेहनीतीची किंमत ठेउन ती वाया न जाउ देणार्‍या त्यांच्या विद्यार्थ्यांचे कौतुक.
  • Log in or register to post comments

मास्तरांशी ओळख आहे याचा

शैलेन्द्र
Fri, 06/22/2012 - 20:47 नवीन
मास्तरांशी ओळख आहे याचा नेहमीच अभिमान व आधार वाटत राहील.. अभिनंदन सरं, तुमच्या विद्यार्थ्यांचही अभिनंदन..
  • Log in or register to post comments

वेल डन मास्तर तुमचे आणि

जाई.
Fri, 06/22/2012 - 20:48 नवीन
वेल डन मास्तर तुमचे आणि तुमच्या विद्यार्थाचे मनापासून अभिनंदन त्या विद्यार्थाना पुढील वाटचालीस शुभेच्छा
  • Log in or register to post comments

प्रभुजी तुम चंदन हम पानी

jaypal
Fri, 06/22/2012 - 21:17 नवीन
Image removed.Image removed. मास्तर आणि मास्तरचा विश्वास सार्थ ठरविणा-या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढिल वाटचालीस शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा