Skip to main content

" अजून आहे लहान मी... ! "

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 15/06/2012 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
. नवे कपडे नवे बूट पुन्हा तीच शाळा - आजपासून पुन्हा दप्तर करा गोळा ! छान होती सुट्टी कित्ती कित्ती आराम रोज भोवताली गोळा राजा राणी गुलाम ! मित्र मैत्रिणी घालत अवतीभवती पिंगा, आईस्क्रीमच्या पार्टीचा रोजचा धांगडधिंगा रात्री होई जागरण दुपारी खूप दंगा - अभ्यासाचा मुळीच पाठीशी नव्हता भुंगा अस्सू दे ना ग आई शाळेला कायम सुट्टी अजून आहे लहान मी... अस्सू दे थोडा हट्टी !
काव्यरस

वाचने 2997
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

ए! धपाटा हवा का? बस झाल. काय ते महिनाभर एका दुपारी म्हणुन विश्रांती ती नाही. सारखा आपला धागड धिंगा? चल निमुट बॅग भर अन विदेशा शाळेची वाट धर! हलके घ्यालच.

मगाशीच चेपूवरती वाचली. एकदम भारी झाली आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा ? मी शाळेला धाडतेय अन तु काका म्हणुन बोलवतो? असो . आता आलाच आहेस तर त्याच्या पाटीवर सरस्वती काढुन दे नऊ आकड्यांची. येते ना?

In reply to by नाना चेंगट

पराला आकडे काढता येत नाहीत, फक्त लावता येतात कुठ ? आंबाड्यात? च नाना ! मी त्या केसातल्या आकड्यांबद्दल नाही बोलत आहे. १ २ असे पाठ्य्पुस्तकातले आकडे. व्यवहारातले नव्हे काही!

In reply to by स्पंदना

तुम्हाला मट्क्याच्या आकड्या बद्दल काहीच माहित नाही का ? :bigsmile: :bigsmile: :bigsmile: बाकी आंबाडे आहेतच कुठे आता आकडे लावायला....? :)

In reply to by पक पक पक

पुण्यात ते काहीतरी तमाशाच केंद्र आहे ना? कलाकेंद्र ! तिथे आंबाड्या शिवाय चालत नसाव असा एक अंदाज. आपुन कभी गया नै । देख्या भी नै ।

छान आहे कविता!