.
नवे कपडे नवे बूट
पुन्हा तीच शाळा -
आजपासून पुन्हा
दप्तर करा गोळा !
छान होती सुट्टी
कित्ती कित्ती आराम
रोज भोवताली गोळा
राजा राणी गुलाम !
मित्र मैत्रिणी घालत
अवतीभवती पिंगा,
आईस्क्रीमच्या पार्टीचा
रोजचा धांगडधिंगा
रात्री होई जागरण
दुपारी खूप दंगा -
अभ्यासाचा मुळीच
पाठीशी नव्हता भुंगा
अस्सू दे ना ग आई
शाळेला कायम सुट्टी
अजून आहे लहान मी...
अस्सू दे थोडा हट्टी !
काव्यरस
वाचने
2997
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
ए! धपाटा हवा का? बस झाल. काय
भारीच हो काका.
काका?
In reply to भारीच हो काका. by परिकथेतील राजकुमार
पराला आकडे काढता येत नाहीत,
In reply to काका? by स्पंदना
पराला आकडे काढता येत नाहीत,
In reply to पराला आकडे काढता येत नाहीत, by नाना चेंगट
तुम्हाला मट्क्याच्या आकड्या
In reply to पराला आकडे काढता येत नाहीत, by स्पंदना
काय?
In reply to तुम्हाला मट्क्याच्या आकड्या by पक पक पक
@ फक्त लावता येतात>>>
In reply to पराला आकडे काढता येत नाहीत, by नाना चेंगट
जा ब र द स्त !!
In reply to पराला आकडे काढता येत नाहीत, by नाना चेंगट
कविता भारिये
छान
चान चान...!
लय लय भारी...