✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रंगात रंगलो मी - रंगाविना

च
चौकटराजा यांनी
Sat, 05/26/2012 - 16:46  ·  लेख
लेख
रसिक मित्रहो, नव्या तंत्रज्ञानाच्या युगाने आपल्याला अनेकविध साधने आपल्या मनोरंजनासाठी दिली, आपल्या आनंदाच्या निधानाच्या निकट जाण्याची संधी दिली. संगणक क्षेत्रात सहा फूट बाय चार फूट बाय तीन फूट या आकाराच्या संगणकावर कामाची संधी मिळाली.पण तेथे आजच्या हपिसांसारखी " चंगळ" करण्याची संधी नव्हती. एकाच रंगाचा मॉनिटर, एकच ओळ दुरूस्त करता येणारा " एडीटर" व आठ एम बी च्या दोन हार्डडिस्क ई च्या दिव्य कॉनफिगरेशन वर काम करता करता पी सी एक्स टी आला. मग क्विक बेसिक मधे रनिंग लाईट , गणपतीची आरास ,बीप चा वापर करून जन गण मन ई. उद्योग इतकी तरी " चंगळ" वाट्याला आली. मग आपल्या घरी पी सी आला रे आला . दडपून ग्राफिक एडीटर घाबरत घाबरत टाकले. काही दिवसात आडवा मेनू उभे टूलकिट समजू लागले. वाई येथे असताना मित्राच्या चहाच्या दुकानातून चहाची खोकी आणली होती .तोडून मोडून त्याचे लाकडी कॅनव्हास ( ?) तयार केले होते . ऑईल पेंट पुण्यातून " व्हीनस" मधून आणले.होते हुसेनच्या, जेपी सिंघाल च्या कॉप्या आईल मधे मारल्या. होत्या . मग रंगाचा खर्च नको , लीन्सिड तेल नको, टरपंटाईन नको अशी सोय संगणकावर आली. हे चित्र त्याचा उपयोग करून काढले आले.मूळ चित्र जॉन फर्नांडिस या कलाकाराचे आहे. २००३ साली कलर मॉडेल्स, ब्रश डायनामिक्स, ब्रश टीप , साईज , हार्डनेस, या बाबत मी "ढ" असताना हे चित्र काढले आहे. त्यासाठी ज्या अनामिक व्हिजुअलाझर नी मूळ आज्ञावली बनविली त्यांचा मी शतशः आभारी आहे. Left
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
मौजमजा
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
माहिती

प्रतिक्रिया द्या
13595 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

अप्रतिम

आबा
Sat, 05/26/2012 - 17:56 नवीन
सुरेख !
  • Log in or register to post comments

खरच सुरेख चौराकाका

अमृत
Sat, 05/26/2012 - 18:05 नवीन
पेंटींगमधलं जास्त कळत नाही पण तुम्ही चितारलेलं चित्र खरच उत्तम. माझा _/\_ अमृत
  • Log in or register to post comments

फोटो कुठे गेले हो चौकट राजा?

कान्होबा
Sat, 05/26/2012 - 19:28 नवीन
फोटो कुठे गेले हो चौकट राजा?
  • Log in or register to post comments

अप्रतिम. कसे काढले ते

प्रचेतस
Sat, 05/26/2012 - 19:32 नवीन
अप्रतिम. कसे काढले ते सांगाल?
  • Log in or register to post comments

मियां, हमा क्या कैते, तुमा

५० फक्त
Sat, 05/26/2012 - 21:19 नवीन
मियां, हमा क्या कैते, तुमा आमा खाओ तो, कोयां काय कु मोज रहे, तुमना लगानेके क्या झाडा, पिछेमें. घरके बोलर्‍हा मैं, नयतर तुमा दुसराच कुच तो समजनेका ओर लोगा आते मेरे को मारने फुक्कट में. सिझन खल्लास हो रा, बारिशा पडने लगी तो बंद करा भला क्या, नै तो भार आने को नक्को बोलेंगे घुसलखानेसे, हां.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/26/2012 - 22:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

चौरा, फोटो दिसत नाहीये

संजय क्षीरसागर
Sun, 05/27/2012 - 00:21 नवीन
आणि कोणतं सॉफ्टवेअर वापरून कसं काढलं ते पण कळवा
  • Log in or register to post comments

लै भारी!

मोहनराव
Sun, 05/27/2012 - 23:53 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments

सुरेख...

मदनबाण
Mon, 05/28/2012 - 09:27 नवीन
सुरेख... :)
  • Log in or register to post comments

चित्र काही दिसत नाही

संजय क्षीरसागर
Mon, 05/28/2012 - 12:58 नवीन
चौरा बघा काय झालय ते
  • Log in or register to post comments

चौकटराजा साहेब, चित्र खरच दिसत नाही आहे.

निश
Mon, 05/28/2012 - 13:54 नवीन
चौकटराजा साहेब, चित्र खरच दिसत नाही आहे.
  • Log in or register to post comments

हायला !

परिकथेतील राजकुमार
Mon, 05/28/2012 - 14:37 नवीन
चित्राला कुठल्या हलकटाची नजर लागली का काय ? दिसत नाही की चित्र. असो.. तुम्ही काढलेत म्हणजे नक्की राजा रवी वर्म्याच्या तोडीचेच असणार म्हणा. त्यामुळे आमचा 'अप्रतिम' हा प्रतिसाद चित्र न बघताच दिला असून देखील स्विकारावा.
  • Log in or register to post comments

काहीना !

चौकटराजा
Mon, 05/28/2012 - 15:42 नवीन
काहीना तांत्रिक कारणाने चित्र दिसत नाहीय काहीना दिसतेय . ज्याना दिसत नाही त्यांच्यासाठी लिंक - http://i1074.photobucket.com/albums/w408/arunbarve/adiwasi-2009-withcutlights-web.jpg दरम्यान प्रतिसादाबद्द्ल अत्यंत आभारीय !
  • Log in or register to post comments

हे कसे काढले त्याची माहिती

कवितानागेश
Mon, 05/28/2012 - 16:33 नवीन
हे कसे काढले त्याची माहिती कृपया पायरीपायरीनी द्याल का?
  • Log in or register to post comments

असे

चौकटराजा
Mon, 05/28/2012 - 17:29 नवीन
हे एक कॅलेंडर होते ते पीसी समोर लावले. फोटोशॉप मधे फिक्का रंग निवडून बारीक ब्रश निवडला व स्केच काढून घेतले. मग ब्रश हे टूल वापरून प्लेन रंग भरले. स्मज टूल वापरून शेडींग केले. चुकले तेथे इरेझर टूल वापरले. त्या चित्रात जे कट दिसतात ( रिम लाईटस) ते डॉज टूल वापरून केले. बाकी झाडाच्या खोडावरच्या लाईन्स या बारीक टीपचा ब्रश वापरून रेखल्या . हाय काय नाय काय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

@ त्याची माहिती कृपया

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/29/2012 - 11:15 नवीन
@ त्याची माहिती कृपया पायरीपायरीनी द्याल का? >>> "म्हणजे मलाही काढता येइल" हे वाक्य राहिले का? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

अफलातुन!

सर्वसाक्षी
Tue, 05/29/2012 - 09:57 नवीन
राजेसाहेब, अफलातुन कलाकृती. फार आवडली.
  • Log in or register to post comments

अ प्र ति म

जयवी
Wed, 05/30/2012 - 16:49 नवीन
अ प्र ति म !!!!!!!!!!!! चेहेरा फारच मोहक आलाय :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम....

सौरभ उप्स
Sun, 06/17/2012 - 15:26 नवीन
highlights अजुन स्पष्ट आले असते तर अजुन भारी zaal अस्त...
  • Log in or register to post comments

आपलाचा धागा ..

चौकटराजा
Fri, 02/01/2013 - 16:01 नवीन
मागची पाने चाळता चाळता हा धागा दिसला. माझाच आहे. त्यानंतर काही जण मिपाकर झाल्याने त्यांच्या आस्वादार्थ वर काढीत आहे.
  • Log in or register to post comments

भन्नाट आहे

II श्रीमंत पेशवे II
Fri, 02/01/2013 - 16:16 नवीन
अतिशय छान .
  • Log in or register to post comments

ओहो..! अगदी सुरेख. 'पेंटिंग'

सस्नेह
Fri, 02/01/2013 - 19:00 नवीन
ओहो..! अगदी सुरेख. 'पेंटिंग' टच खासच !
  • Log in or register to post comments

अप्रतिम

अभ्या..
Sat, 02/02/2013 - 00:51 नवीन
राजासाब हे चित्र २००३ मध्ये म्हण्जे फोटोशॉप ७ वापरुन असेल बहुतेक. अत्यंत मस्त रिझल्ट आलाय. त्यातल्या त्यात हिरव्या कापडाचे टेक्श्चर आणि हायलाईट अप्रतिम. बेळगावचे जॉन फर्नांडीस आपल्यात नाहीत सध्या पण त्यांचे डेमो बघितले आहेत. त्यांच्या चित्रात एक प्रकारचा गोडवा असायचा चेहर्‍यावर. (नवनीत मधली लहान मुलांची चित्रे त्यांचीच असत) तो अगदी तसाच उतरला आहे तुमच्या चित्रात. अगदी अप्रतिम चित्र.
  • Log in or register to post comments

नव्या आय डी साठी...

चौकटराजा
Tue, 11/18/2014 - 20:21 नवीन
खास नव्या आय डी नी पहावी म्हणून २००३ मधे फोटोशॉप वापरून केलेले चित्र. मूळ कलाकार जॉन फर्नांडिस.
  • Log in or register to post comments

चौरांचा नवा पैलू समजला !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/18/2014 - 20:42 नवीन
चौरांचा नवा पैलू समजला ! *ok* चित्र सुंदर आहे हेवेसांन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

चौराकाका,

प्यारे१
Tue, 11/18/2014 - 20:53 नवीन
चौराकाका, वाईचं मित्राचं चहाचं दुकान किसन वीर चौकातलं का काय हो? चित्र भारी आलंय हे वे सां न ल. :)
  • Log in or register to post comments

होय ..

चौकटराजा
Wed, 11/19/2014 - 06:08 नवीन
वळकलं बरूबर ! सत्या शेंडेचं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

गुड गुड!

प्यारे१
Wed, 11/19/2014 - 13:59 नवीन
गुड गुड!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

वा!

एस
Tue, 11/18/2014 - 21:21 नवीन
डिजिटल आर्ट आवडलं. मूळ चित्रही पहायला आवडेल. अशा पद्धतीने फक्त मायक्रोसॉफ्ट पेंट हे बेसिक सॉफ्ट्वेअर वापरून केलेल्या मोनालिसाचा व्हिडिओ आठवला. लिन्क मिळाल्यास डकवतो.
  • Log in or register to post comments

चौकट राजे: धाग्याचं उत्खनन केल्याबद्दल धन्यवाद!

बहुगुणी
Tue, 11/18/2014 - 22:32 नवीन
याआधी हा धागा पाहिला नव्हता, चित्र अप्रतिम आलंय. आता २०१४ मध्ये हेच चित्र तुम्ही upgraded Photoshop किंवा इतर तुमचा आवडता प्रोग्रॅम वापरून कसं काढाल ते पहायची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

जबरा आलंय चीत्र.

खटपट्या
Wed, 11/19/2014 - 08:18 नवीन
जबरा आलंय चीत्र.
  • Log in or register to post comments

मियां.. इसको बोलते हे क्रिएशन

स्पा
Wed, 11/19/2014 - 10:34 नवीन
मियां.. इसको बोलते हे क्रिएशन क्या बात क्या बात !!!!
  • Log in or register to post comments

खुपच छान

स्वीत स्वाति
Wed, 11/19/2014 - 10:38 नवीन
खरेच खुप सुन्दर
  • Log in or register to post comments

अप्रतिम.

बबन ताम्बे
Wed, 11/19/2014 - 11:06 नवीन
पिक्सारा पण वापरून पहा एकदा.
  • Log in or register to post comments

नव्या आय डी च्या आस्वादा खातर

चौकटराजा
Sun, 09/01/2019 - 08:50 नवीन
आता काही नवे , काही नवीन नाव घेऊन आलेले जुने यान्च्या साठी हे पहा !
  • Log in or register to post comments

झक्कास ...!!

फुटूवाला
Sun, 09/01/2019 - 09:26 नवीन
मी जवळपास १२ वर्षांपासून फोटोशॉप वापरतो. दुकानदारीही त्यातच. पण असं काही करणे मला अजिबात शक्य नाहीये. कडक सॅल्यूट. __/\__
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा