✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मोहोळ

ज — जयवी, गुरुवार, 04/26/2012 - 12:06
आठवणींचं मोहोळ आज फुटलं फिरुन सयी छळती जीवाला डंख मारुन मारुन जखमा जुन्या पुराण्या पुन्हा नव्याने सलती भळाभळा लागे वाहू जरी खपली वरती कधी आसूड शब्दांचे गेले कातडी सोलून कधी कुणी फसविले गळा केसाने कापून घाव वर्मावर झाले काही काळजाच्या पार परी दुखावून गेले सग्या सोयर्‍याचे वार सार्‍या कटू आठवांचे येई मळभ दाटून होई चित्त सैरभैर राही काळोख भरुन ओझे झाले पापण्यांना काळ्या सावळ्या ढगांचे कोसळे झडझडून मन ऋणी आसवांचे जयश्री

प्रतिक्रिया द्या
1658 वाचन

💬 प्रतिसाद (8)

आवडेश

पियुशा
गुरुवार, 04/26/2012 - 12:39 नवीन
आवडेश :)
  • Log in or register to post comments

ओझे झाले पापण्यांना काळ्या

प्रचेतस
गुरुवार, 04/26/2012 - 12:41 नवीन
ओझे झाले पापण्यांना काळ्या सावळ्या ढगांचे कोसळे झडझडून मन ऋणी आसवांचे
सुरेख एकदम.
  • Log in or register to post comments

भावस्पर्शी काव्य

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/26/2012 - 17:35 नवीन
भावस्पर्शी काव्य
  • Log in or register to post comments

जयवी जी , अतिशय आशयघन कविता आहे.

निश
गुरुवार, 04/26/2012 - 17:43 नवीन
जयवी जी , अतिशय आशयघन कविता आहे. अस म्हणावेसे वाटते जगण्यातले दुख जगुनच कळते सुखावरही भारी दुखाचेच काटे....
  • Log in or register to post comments

सुंदर कविता आणि सुंदर निश

शुचि
गुरुवार, 04/26/2012 - 23:35 नवीन
सुंदर कविता आणि सुंदर निश यांचा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

मनापासून धन्यवाद

जयवी
Sun, 04/29/2012 - 12:19 नवीन
मनापासून धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

मस्त !

परिकथेतील राजकुमार
Sun, 04/29/2012 - 12:27 नवीन
लाईकले आहे.
  • Log in or register to post comments

धन्यु परा

जयवी
गुरुवार, 05/03/2012 - 12:52 नवीन
धन्यु परा :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा