सय नाही जात
सय नाही जात, गेल्या दिसांची
येती न जाऊन जे दिस,
मन का पुकारे, त्यांस
दिस पाखरू जर असते,
पकडून मी ठेविता
पाळता त्यांना खुशीने,
मोत्यांचे दाणे देता
छातीशी जपता धरून
प्रतिमा तयांची जरी मी,
लपवली नजरेसमोरून
हृदयी उमटली मूर्ती,
परंतु हटे न हटवून
परकेच म्हटले जरी ते
गतदिवसांच्या आठवणी विसरता विसरत नाहीत.
त्यांचीच कैफियत कवीने मांडली आहे. तो कवी कोण? पाहा ओळखता आला तर!
हे मराठी आविष्करण मात्र माझेच आहे.
http://anuvad-ranjan.blogspot.in/
"अनुवाद रंजन" या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
कवि शैलेन्द्र
ओळखलं!
मी गाउन पाहिले