Skip to main content

सय नाही जात

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 16/04/2012 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
सय नाही जात, गेल्या दिसांची येती न जाऊन जे दिस, मन का पुकारे, त्यांस दिस पाखरू जर असते, पकडून मी ठेविता पाळता त्यांना खुशीने, मोत्यांचे दाणे देता छातीशी जपता धरून प्रतिमा तयांची जरी मी, लपवली नजरेसमोरून हृदयी उमटली मूर्ती, परंतु हटे न हटवून परकेच म्हटले जरी ते गतदिवसांच्या आठवणी विसरता विसरत नाहीत. त्यांचीच कैफियत कवीने मांडली आहे. तो कवी कोण? पाहा ओळखता आला तर! हे मराठी आविष्करण मात्र माझेच आहे. http://anuvad-ranjan.blogspot.in/ "अनुवाद रंजन" या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

वाचने 1366
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

रूपांतर छान झालंय.

किरवाणी या रागावर आधारीत असलेले हे गीत आहे.आपले रुपांतर त्याच चालीवर गाउन पाहिले एक दोन जागी मीटर जमत नाही. एरवी अनुवाद बेस्ट ! गीत शैलेंद्र यांचे आहे. थोडा स्वैरपणा घेऊन ना जाई आठव तो , गेल्या दिसांचा परतीचा मार्ग नुरे , गेल्या दिसांचा मन का पुकारे व्यर्थ ,गेल्या दिसांना .......................