✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रयत्न ..आता एकच !!

ज — जेनी..., Mon, 04/09/2012 - 20:57
आमचे प्रेरणास्थळ ...... गालावरच्या पिंपल्सचे जुनेच डाग अजून मिटत नाहीत,विटत नाहीत ,विरत नाहीत डाळी एवढ्या आलेल्या पुळिची विल्हेवाट कशी लावतात ? ' पू 'वाने गच्चून भरलेल्या पुळिकडे बघताना थोडी आंबे हळद ,आणि चंदन उगाळून लावावसं वाटत आहे ताजी म्हणावी अशी पुळि आता उरली नाही तुकतुकित म्हणावे असे तर आता ' गाल ' पण उरले नाहीत फेस पॅक ,विको टर्मरिक ,बोरोलिन ह्यांचा वर खर्च पिकत चाललेल्या पुळिला आज लेप लावणार कि नाही? रात्र उलटताना पुन्हा त्याच पुळी कडे लक्ष जाते आराश्यातनं तीच बघण ,अन जीवाच्या आकांताने फुगण कधीही फुटेल अश्या अवस्थेत मरुन मरून जगण .. पार्लरची वाट धरतात मग वणवण भटकणारे पाय, दिसू लागतो आजूबाजूचा प्रत्येक क्लीन चेहेरा सुंदर ऐकू येत त्यांच्या बोलण्यात स्वतःच स्वताहाचं केलेलं कौतुक अश्यावेळी सांगा हि पुळी कुठे लपवू ? कुणाकडे मागू पुळी वरच औषध ? :( गालावरच्या ह्या पुळिला आज एकवीस दिवस झालेत तरीही आरश्यासमोर जाताना असे वाटत आहे , उद्याच्या दिवसात ती स्वताहून पिकून फुटण्या आधी मिळाली थोडी आंतरिक शक्ती तर तर . . . . . . . . पुळी पचकन दाबून फोडावी म्हणते :P ( पहिलाच प्रयत्न आहे ,चु.भु.दे.घे.):(

प्रतिक्रिया द्या
2028 वाचन

💬 प्रतिसाद (12)

ताजी म्हणावी अशी पुळि आता

प्रचेतस
Mon, 04/09/2012 - 21:03 नवीन
ताजी म्हणावी अशी पुळि आता उरली नाही तुकतुकित म्हणावे असे तर आता ' गाल ' पण उरले नाहीत
Image removed. पूजा..आता तू सुद्धा!!! जमलंय :)
  • Log in or register to post comments

हे विडंबन टाकून अ.आ. च्या

गणामास्तर
Mon, 04/09/2012 - 21:11 नवीन
Image removed. हे विडंबन टाकून अ.आ. च्या शिष्या शोभलात हो अगदी.
  • Log in or register to post comments

@पुळी पचकन दाबून फोडावी

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/09/2012 - 21:37 नवीन
@पुळी पचकन दाबून फोडावी म्हणते >>> Image removed. या एका लाइअनवर आमचा हसुन हसुन शिरच्छेद झाला आहे असे समजावे... Image removed. व्वा...व्वा... बालिके... चांगलाच ग-धडा गिरवलास Image removed. पहिल्या यशस्वी विडंबना खातर विद्वान बालिका पुजा हिला आत्माराम विडंबन विद्यापिठाची स्कॉलरशिप जाहिर करणेत येत आहे.... ;-)
  • Log in or register to post comments

या एका लाइअनवर आमचा हसुन हसुन

प्रचेतस
Tue, 04/10/2012 - 08:40 नवीन
या एका लाइअनवर आमचा हसुन हसुन शिरच्छेद झाला आहे असे समजावे...
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: । न चैनं क्लेदयन्तापो न शोषयति मारुत: || संभ्रमात पडल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@संभ्रमात पडल्या गेले आहे.

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/10/2012 - 09:02 नवीन
@संभ्रमात पडल्या गेले आहे. >>> ह्हा ह्हा ह्हा...! पडुन रहा... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आत्माराम विडंबन विद्यापिठाची

जेनी...
Tue, 04/10/2012 - 08:55 नवीन
आत्माराम विडंबन विद्यापिठाची स्कॉलरशिप ( येथे मिस्स वर्ड प्रमाणे दोन्हि हातानि तोंड लपवुन घेवुन आश्चर्य आणि जबडा तानुन आनंद व्यक्त करणारि स्मायलि कल्पावि ) :
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@येथे मिस्स वर्ड प्रमाणे >>>

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/10/2012 - 09:05 नवीन
@येथे मिस्स वर्ड प्रमाणे >>> ही स्पर्धा कधी भरते..? मिस्स वर्ड ची..? यात शब्द गहाळ होत असावेत बहुतेक ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

आत्म्याचा जर शिरच्छेद होऊ शकत

प्रचेतस
Tue, 04/10/2012 - 09:07 नवीन
आत्म्याचा जर शिरच्छेद होऊ शकत असेल तर वर्ल्ड चा वर्ड का बरे होऊ शकत नाही. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@तर वर्ल्ड चा वर्ड का बरे होऊ

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/10/2012 - 09:16 नवीन
@तर वर्ल्ड चा वर्ड का बरे होऊ शकत नाही. >>> ही (शब्दांची) घेतलेली बाजू आंम्हाला पटली ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गुर्जि शब्द गहाळ आहे कि अक्षर

जेनी...
Tue, 04/10/2012 - 09:18 नवीन
गुर्जि शब्द गहाळ आहे कि अक्षर गहाळ आहे? :-o काय ते नीट ठरवुन सांगा बघु :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

काय ते नीट ठरवुन सांगा बघु

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/10/2012 - 09:24 नवीन
काय ते नीट ठरवुन सांगा बघु >>> अक्षराचा गाळ,त्यात शब्द गहाळ :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

जय पुजादेवी.....

पक पक पक
Mon, 04/09/2012 - 23:12 नवीन
:bigsmile: :bigsmile: :bigsmile: जय पुजादेवी.....
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा