Skip to main content

प्रयत्न ..आता एकच !!

लेखक जेनी... यांनी सोमवार, 09/04/2012 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रेरणास्थळ ...... गालावरच्या पिंपल्सचे जुनेच डाग अजून मिटत नाहीत,विटत नाहीत ,विरत नाहीत डाळी एवढ्या आलेल्या पुळिची विल्हेवाट कशी लावतात ? ' पू 'वाने गच्चून भरलेल्या पुळिकडे बघताना थोडी आंबे हळद ,आणि चंदन उगाळून लावावसं वाटत आहे ताजी म्हणावी अशी पुळि आता उरली नाही तुकतुकित म्हणावे असे तर आता ' गाल ' पण उरले नाहीत फेस पॅक ,विको टर्मरिक ,बोरोलिन ह्यांचा वर खर्च पिकत चाललेल्या पुळिला आज लेप लावणार कि नाही? रात्र उलटताना पुन्हा त्याच पुळी कडे लक्ष जाते आराश्यातनं तीच बघण ,अन जीवाच्या आकांताने फुगण कधीही फुटेल अश्या अवस्थेत मरुन मरून जगण .. पार्लरची वाट धरतात मग वणवण भटकणारे पाय, दिसू लागतो आजूबाजूचा प्रत्येक क्लीन चेहेरा सुंदर ऐकू येत त्यांच्या बोलण्यात स्वतःच स्वताहाचं केलेलं कौतुक अश्यावेळी सांगा हि पुळी कुठे लपवू ? कुणाकडे मागू पुळी वरच औषध ? :( गालावरच्या ह्या पुळिला आज एकवीस दिवस झालेत तरीही आरश्यासमोर जाताना असे वाटत आहे , उद्याच्या दिवसात ती स्वताहून पिकून फुटण्या आधी मिळाली थोडी आंतरिक शक्ती तर तर . . . . . . . . पुळी पचकन दाबून फोडावी म्हणते :P ( पहिलाच प्रयत्न आहे ,चु.भु.दे.घे.):(
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2037
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

ताजी म्हणावी अशी पुळि आता उरली नाही तुकतुकित म्हणावे असे तर आता ' गाल ' पण उरले नाहीत
पूजा..आता तू सुद्धा!!! जमलंय :)

@पुळी पचकन दाबून फोडावी म्हणते >>> या एका लाइअनवर आमचा हसुन हसुन शिरच्छेद झाला आहे असे समजावे... व्वा...व्वा... बालिके... चांगलाच ग-धडा गिरवलास पहिल्या यशस्वी विडंबना खातर विद्वान बालिका पुजा हिला आत्माराम विडंबन विद्यापिठाची स्कॉलरशिप जाहिर करणेत येत आहे.... ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

या एका लाइअनवर आमचा हसुन हसुन शिरच्छेद झाला आहे असे समजावे...
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: । न चैनं क्लेदयन्तापो न शोषयति मारुत: || संभ्रमात पडल्या गेले आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्माराम विडंबन विद्यापिठाची स्कॉलरशिप ( येथे मिस्स वर्ड प्रमाणे दोन्हि हातानि तोंड लपवुन घेवुन आश्चर्य आणि जबडा तानुन आनंद व्यक्त करणारि स्मायलि कल्पावि ) :

In reply to by जेनी...

@येथे मिस्स वर्ड प्रमाणे >>> ही स्पर्धा कधी भरते..? मिस्स वर्ड ची..? यात शब्द गहाळ होत असावेत बहुतेक ;-)

In reply to by प्रचेतस

@तर वर्ल्ड चा वर्ड का बरे होऊ शकत नाही. >>> ही (शब्दांची) घेतलेली बाजू आंम्हाला पटली ;-)