प्रयत्न ..आता एकच !!
आमचे प्रेरणास्थळ
......
गालावरच्या पिंपल्सचे जुनेच डाग अजून मिटत नाहीत,विटत नाहीत ,विरत नाहीत
डाळी एवढ्या आलेल्या पुळिची विल्हेवाट कशी लावतात ?
' पू 'वाने गच्चून भरलेल्या पुळिकडे बघताना
थोडी आंबे हळद ,आणि चंदन उगाळून लावावसं वाटत आहे
ताजी म्हणावी अशी पुळि आता उरली नाही
तुकतुकित म्हणावे असे तर आता ' गाल ' पण उरले नाहीत
फेस पॅक ,विको टर्मरिक ,बोरोलिन ह्यांचा वर खर्च
पिकत चाललेल्या पुळिला आज लेप लावणार कि नाही?
रात्र उलटताना पुन्हा त्याच पुळी कडे लक्ष जाते
आराश्यातनं तीच बघण ,अन जीवाच्या आकांताने फुगण
कधीही फुटेल अश्या अवस्थेत मरुन मरून जगण ..
पार्लरची वाट धरतात मग वणवण भटकणारे पाय,
दिसू लागतो आजूबाजूचा प्रत्येक क्लीन चेहेरा सुंदर
ऐकू येत त्यांच्या बोलण्यात स्वतःच स्वताहाचं केलेलं कौतुक
अश्यावेळी सांगा हि पुळी कुठे लपवू ?
कुणाकडे मागू पुळी वरच औषध ? :(
गालावरच्या ह्या पुळिला आज एकवीस दिवस झालेत तरीही
आरश्यासमोर जाताना असे वाटत आहे ,
उद्याच्या दिवसात ती स्वताहून पिकून फुटण्या आधी
मिळाली थोडी आंतरिक शक्ती तर
तर
.
.
.
.
.
.
.
.
पुळी पचकन दाबून फोडावी म्हणते :P
( पहिलाच प्रयत्न आहे ,चु.भु.दे.घे.):(
ताजी म्हणावी अशी पुळि आता
हे विडंबन टाकून अ.आ. च्या
@पुळी पचकन दाबून फोडावी
या एका लाइअनवर आमचा हसुन हसुन
@संभ्रमात पडल्या गेले आहे.
आत्माराम विडंबन विद्यापिठाची
@येथे मिस्स वर्ड प्रमाणे >>>
आत्म्याचा जर शिरच्छेद होऊ शकत
@तर वर्ल्ड चा वर्ड का बरे होऊ
गुर्जि शब्द गहाळ आहे कि अक्षर
काय ते नीट ठरवुन सांगा बघु
जय पुजादेवी.....