✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विहिर विचारी समुद्राला...

स
सोत्रि यांनी
Sat, 03/17/2012 - 15:20  ·  लेख
लेख
एक होती विहीर. चांगलीच मोठी होती तशी, म्हणजे गुगल मॅप्स वरून बघितल्यास तिचा 'व्यास' कळावा इतपत मोठी होती ती. खरंतर त्या विहीरीत अपवाद म्हणावा की आठवे आश्चर्य अशा तर्‍हेने वैविध्यपूर्ण प्राणी रहात होते, गुण्यागोविंदाने(?). पण मध्येच पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्यावर पाणी भरपूर वाढून खूप हलकळ्ळोल व्ह्यायचा विहीरीत पण तो लगेच थंडही पडायचा. वेगवेगळ्या प्रकृतीचे, स्वभावधर्माचे विवीध प्राणी त्यावेळी आपापले अस्तित्व जाणवून द्यायचा प्रयत्न करायचे आणि गोंधळ मजवून द्यायचे. खूप आवाज व्ह्यायच्या विहीरीत अश्यावेळी. पण क्वचितच त्या विहीरीच्या मालकाला ते जाणवून यायचे, ते प्रमाण अगदी नगण्यच म्हणा ना. पण काही वेळा काही प्राण्यांचा खूपच अतिरेक व्ह्यायचा. ते थेट आकाशातून विहरीत पडल्यासारखे, स्वत:ला प्रेषित समजून इतरांना तुच्छ लेखायचे. त्यांनी तटच पाडले होते. उच्चभ्रू म्हणजे फक्त तेच जे विचार करू शकणारे आणि इतिहास घडवणार असा आत्मविश्वास (फाजील ?) असणारे व बाकीचे उपेक्षित, वैचारिक दलित जे विचार मांडू शकतात पण विस्कळीत, 'सप्रमाण' सिद्ध न करू शकणारे. त्या उपेक्षितांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे व्ह्यायचे बर्‍याच वेळेस. खूप गोंधळ व्ह्यायचा. मग मालकाला आणि त्याच्या 'मुनीम'जींना अशा गोंधळ करणार्‍या प्राण्यांच्या मुसक्या आवळाव्या लागायच्या, नाइलाजानेच. त्यालाही ते सर्व प्राणी प्राणाहून प्रिय होतेच. सर्वांनी गुण्यागोविंदाने रहावे असे त्याला वाटायचे. अशा 'वैविध्यतने नटलेल्या' विहीरीचा त्याला सार्थ अभिमान होता. पण आगतिक होऊन त्याला असे कडक पाऊल कधीकधी उचलावे लागायचे. परंतू एकदा फार मोठा,प्रचंड, महाप्रलय झाला. खुपशी भौगोलिक उलथापालथ झाली आणि चक्क एक समुद्रच वाटावा असा एक मोठा जलाशयच विहीरीच्या शेजारी तयार झाला. नुकताच भारत सरकारचा नद्याजोडणी प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे सर्वच प्राणी इकडच्या तिकडच्या पाण्यात जाऊ शकत होते. लोकशाही किंवा रामराज्यच होते म्हणा ना. त्यामुळे ज्याला जे पाणी अनुकूल वाटत होते तिथे जाऊन तो त्या पाण्यात डुंबून आनंद मिळवत असे. विहीरीतले बरेच उच्चभ्रू प्राणी त्या जलाशयाच्या आश्रयाला गेले आणि त्यांनीच त्या जलाशयला समुद्र असे नामाभिमान देऊ केले. हे त्या नामाभिमान मात्र त्या विहीरीतल्या प्राण्यांना ठाऊकच नव्हते. सर्व आलबेल आहे असे वाटावे अशी परिस्थीती होती. पण अचानक त्या मोठ्या जलाशयातले प्राणी विहीरीत येऊन त्या जलाशायाला त्यांनी समुद्र असे त्यांनी नामाभिमान दिले आहे असे सांगू लागले. समुद्रात कशी मज्जा-म्ज्जा असते, किती गुण्यागोविंदाने सगळे नांदतात हे सांगू लागले. समुद्रात खूप खूप जागा आहे, 'ऐस'पैस पसरता येते सर्वांना, विहीर फारच छोटी आहे हे सांगायचा प्रयत्न करू लागले. विहरीत सर्वांना संकोचित आयुष्य जगावे लागते आहे आणि त्यामुळे एकप्रकारची जैविक उत्क्रांती होऊन सर्व प्राण्यांचे बेडूक ह्या प्रजातीत रुपांतर झाले आहे आणि 'कूपमंडूक' प्रवृत्तीचा फैलाव झाला आहे असे एक मतप्रवाह त्यांनी विहीरीत सोडून दिला. समुद्रात कसे 'रामराज्य' आहे असे सर्वांना पटवून द्यायचा प्रयत्न जोर-जोरात होऊ लागला. अरेच्चा, विहीरीतल्या प्राण्यांना काहीच कळेना. हे काय? असे तर इथे होतेच, नव्हे नव्हे आहेच, मग हे काय नविनच? त्यांना काहीच कळेना की हा नविन समुद्र म्हटला जाणारा जलाशय म्हणजे नेमके काय? फार वैचारिक गोंधळ होऊ लागला. मग विहीरीलाच रहावेना, ती विहीर अखेर त्या समुद्रक्षम जलाशयाला विचारती झाली, 'हे विशाल 'ऐसी' ख्याती असलेल्या समुद्रा, माझ्या माहितीप्रमाणे समुद्राचे बरेच प्रकार असतात. जसे की समुद्र, महासमुद्र, पीत समुद्र, काळा समुद्र आणि चक्क मृत समुद्रही. तर हा जलाशय ह्यातला नेमका कुठल्या प्रकारचा समुद्र समजायचा आम्ही?' वि.सू.: ह्यात फक्त आणि फक्त साहित्यमूल्यच शोधण्याचे करावे, ईतर काही शोधण्याचा प्रत्यत्न केल्यास समुद्राच्या खारटपणाशिवाय काहिही हाती येणार नाही. :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30594 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

एक सुधारणा:- "विहिरीतून किंवा

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 03/19/2012 - 16:32 नवीन
एक सुधारणा:- "विहिरीतून किंवा समुद्रातून बाहेर पडल्यावर पण ज्यांच्या डोक्यात तिकडचाच विचार चालू असतो त्यांची कीव वाटते." हे वाक्य "विहिरीतून किंवा समुद्रातून बाहेर पडल्यावर पण ज्यांच्या डोक्यात सतत तिकडचाच विचार चालू असतो त्यांची कीव वाटते." असे वाचले जावे. आता विहीर, समुद्र सोडून थेट मुद्द्यावर येतो. चर्चा वेगवेगळ्या संस्थळांबद्दल चालू आहे ना ? तर आता ऐक. मी जास्त करून मिपा वर असलो तरीही इतर ४ संस्थळांवर माझा हाच आयडी आहे. तिथे मी अधून मधून जात असतो. आता मी मिपावर जास्त रमतो याचा अर्थ मिपा हेच सर्वोत्तम संस्थळ आहे आणि बाकीची टाकाऊ आहेत असे मी मानायलाच पाहिजे असे नाही, माझ्यापुरते मिपा हे या क्षणाला सर्वात सुटेबल आहे हे आणि इतकेच सत्य आहे. यु ट्यूब च्या कुठल्याही व्हीडीओ वर जा किंवा TOI च्या एखाद्या बातमीवर. जर ती बातमी किंवा व्हीडीओ खान त्रयीन्पैकी कुणाशी संबंधित असेल तर त्यांचे पंखे तिथे कुत्र्या मांजरांसारखे एकमेकांवर तुटून पडलेले दिसतील, मग कोण जास्ती चांगला आहे, कोण हिट आहे, कोण सुपरस्टार आहे अशा स्वतःच्या जीवनाशी काहीही संबंध नसलेल्या मुद्द्यावरून एकमेकांची आईबहिण काढत असतात. हे केवळ एक उदाहरण दिले, अशीच अजून दहा पण देऊ शकतो. पण त्यातला प्रकार इथे होऊ नये असे वाटते. दुसऱ्या संस्थळावर चिखलफेक करून काय होणार? बाकी काही झाले किंवा नाही झाले तरी आपलेच हात चिखलात बरबटून जातील इतके नक्की. शिवाय मला खात्री आहे की उपरोल्लेखित अनेक संस्थाळांचे मालक/चालक हे व्यक्तिगत जीवनात एकमेकांचे मित्र आणि हितचिंतक असतील त्यामुळे असल्या प्रकारात त्यांना वैयक्तिक रीत्या रस नसणार. जे संस्थळ चांगले असेल, लोकांना भावेल ते टिकेल, बाकीची टिकणार नाहीत. शिवाय प्रत्येकाने आपली वेगळी जातकुळी ठेवली तर एकत्र ही त्यांचा विकास होईल की. या पेक्षा जास्त एनर्जी या विषयावर घालवण्यात काही हशील नाही असे माझे सुस्पष्ट मत आहे. इतके बोलून माझे चार शब्द संपवतो. जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

प्रश्न दुसर्‍या संस्थळाला कोण

प्यारे१
Mon, 03/19/2012 - 16:55 नवीन
प्रश्न दुसर्‍या संस्थळाला कोण काय म्हणतंय त्यापेक्षा संस्थळ सदस्यांना काय म्हटले जात आहे याचा आहे ना वि मे? आपण जो विचार करतो तो आणि तोच बरोबर आहे आणि आम्ही ज्या संस्थळावर वावरतो तेच चांगले (ते का निर्माण झाले, त्याचं मू ळ कारण काय इ.इ. सगळं सध्या बाजूला ठेवू) या भावनेतून इतरेजनांना कमी लेखणं कितपत योग्य आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

आम्ही ज्या संस्थळावर वावरतो

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 03/21/2012 - 00:01 नवीन
आम्ही ज्या संस्थळावर वावरतो तेच चांगले या भावनेतून इतरेजनांना कमी लेखणं कितपत योग्य आहे?
कुणी लेखले कमी तर लेखुदे रे. त्यांनी तू आणि मी काही कमी होणार नाही. मुद्दा वाढवण्यात काय point आहे ? दुर्लक्ष हा सगळ्यात वाईट अपमान असतो असे म्हणतात म्हणे. दुर्लक्ष कर झाले. मी दोन्ही कडच्या संचालक-संपादकांपैकी किमान एकेकाला व्यक्तिश: ओळखतो. स्वभावात: कुणीही वाईट नाही आणि त्यांच्या मनात एकमेकांबद्दल आदरभाव आहे. अशा वेळेला आपण भांडणे म्हणजे..... (शिवाय दोन्ही कडच्या सदस्यांचा इंटरसेक्शन सेट बराच मोठा आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

विमे, तुमचा आधिचा प्रतिसाद

सोत्रि
Mon, 03/19/2012 - 16:56 नवीन
विमे, तुमचा आधिचा प्रतिसाद आणि हा प्रतिसाद, अगदी अशीच संतुलित प्रतिक्रिया अपेक्षित होती. तुमचे प्रतिसाद वाचल्यावर आज मला मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान दाटून आला आहे. छाती अंमळ दोन इंच फुगली आहे आणि (पोट एक इंच आत गेले आहे*) अभिमानाने. माझे मत तर असे आहे की कसलीही तमा न बाळगता ज्या पाण्यात आवडेल त्या पाण्यात मनसोक्त डुंबायचे, उगा गोष्टींचे अबडंबर माजवण्यात काही मजा नाही. चार घटका विरंगुळा म्हणून आंजावर यायचे असते. आभासी जग आणी सत्य जग ह्यात एक थीन लाईन असते, ती समजून आभासी जगाला किती महत्व द्यायचे ह्याचे तारतम्य असले की पाणी कुठलेही असो डुंबायला मज्जा येतेच. काय म्हणता ? - (छाती अभिमानाने फुगलेला) सोकाजी * तरीही पोट छातीपेक्षा पुढेच आहे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

तुमचा आधिचा प्रतिसाद आणि हा

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 03/21/2012 - 00:09 नवीन
तुमचा आधिचा प्रतिसाद आणि हा प्रतिसाद, अगदी अशीच संतुलित प्रतिक्रिया अपेक्षित होती.
कसचं कसचं !!! ठांकू बरे का !!!
तुमचे प्रतिसाद वाचल्यावर आज मला मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान दाटून आला आहे. छाती अंमळ दोन इंच फुगली आहे आणि (पोट एक इंच आत गेले आहे*) अभिमानाने.
म्हणजे एका प्रतिसादाला एक इंच छाती बाहेर आणि अर्धा इंच पोट आत असे प्रमाण पडले.
* तरीही पोट छातीपेक्षा पुढेच आहे
आज अजून दोन संतुलित (;-)) प्रतिसाद दिले आहेत. वरील प्रमाणाप्रमाणे अजून टोटल ३ इंचांचा फरक पडला पाहिजे. मग तरी होईल ना छाती पोटापेक्षा पुढे ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

>>>>>>एक सुधारणा:- "विहिरीतून

यकु
Mon, 03/19/2012 - 17:03 नवीन
>>>>>>एक सुधारणा:- "विहिरीतून किंवा समुद्रातून बाहेर पडल्यावर पण ज्यांच्या डोक्यात तिकडचाच विचार चालू असतो त्यांची कीव वाटते." हे वाक्य "विहिरीतून किंवा समुद्रातून बाहेर पडल्यावर पण ज्यांच्या डोक्यात सतत तिकडचाच विचार चालू असतो त्यांची कीव वाटते." असे वाचले जावे. ----------- सतत विचार वगैरे काही चालू असत नाही. इथले रहिवासी इथून भांडणं करुन निघून गेले ते कसे आहेत, काय करताहेत ते पाहिलं जातं अधूनमधून. ते तिथेही इथल्या आठवणींनी झोपेत बडबडताना दिसतातच आणि इकडे येऊन चिमटे पण काढून जातात.. मग असा एखादेवेळी विचार करावा लागतो. पण तुम्हाला वाटत ‍असेल सतत तिकडचा विचार चालू असतो तर तिकडे नजर सुद्धा टाकणार नाही. >>>>>>आता विहीर, समुद्र सोडून थेट मुद्द्यावर येतो. चर्चा वेगवेगळ्या संस्थळांबद्दल चालू आहे ना ? तर आता ऐक. मी जास्त करून मिपा वर असलो तरीही इतर ४ संस्थळांवर माझा हाच आयडी आहे. तिथे मी अधून मधून जात असतो. आता मी मिपावर जास्त रमतो याचा अर्थ मिपा हेच सर्वोत्तम संस्थळ आहे आणि बाकीची टाकाऊ आहेत असे मी मानायलाच पाहिजे असे नाही, माझ्यापुरते मिपा हे या क्षणाला सर्वात सुटेबल आहे हे आणि इतकेच सत्य आहे. -------- सहमत आहे. मिपाला सर्वोत्तम मानावं किंवा मानू नये असा कुठे मुद्दा आहे. पण नसत्या भ्रमातही रहायला पाहिजे असंही नाही ना? >>>>>> यु ट्यूब च्या कुठल्याही व्हीडीओ वर जा किंवा TOI च्या एखाद्या बातमीवर. जर ती बातमी किंवा व्हीडीओ खान त्रयीन्पैकी कुणाशी संबंधित असेल तर त्यांचे पंखे तिथे कुत्र्या मांजरांसारखे एकमेकांवर तुटून पडलेले दिसतील, मग कोण जास्ती चांगला आहे, कोण हिट आहे, कोण सुपरस्टार आहे अशा स्वतःच्या जीवनाशी काहीही संबंध नसलेल्या मुद्द्यावरून एकमेकांची आईबहिण काढत असतात. हे केवळ एक उदाहरण दिले, अशीच अजून दहा पण देऊ शकतो. पण त्यातला प्रकार इथे होऊ नये असे वाटते. -------- हाहाहा.. बास का.. असलं काही होत नाही. अशी खडाखडी काही मिपाला नवीन नाही. इथे कुणाचीही आईबहीण काढली गेलेली नाही. घाबरण्‍याचं काहीच कारण नाही. >>>>>> दुसऱ्या संस्थळावर चिखलफेक करून काय होणार? बाकी काही झाले किंवा नाही झाले तरी आपलेच हात चिखलात बरबटून जातील इतके नक्की. शिवाय मला खात्री आहे की उपरोल्लेखित अनेक संस्थाळांचे मालक/चालक हे व्यक्तिगत जीवनात एकमेकांचे मित्र आणि हितचिंतक असतील त्यामुळे असल्या प्रकारात त्यांना वैयक्तिक रीत्या रस नसणार. -------- ज्या चालक/मालकांनी इथे अभिव्यक्तीसाठी आणि ज्या पठडीतील अभिव्यक्तीसाठी स्थळ उपलब्ध करुन दिलंय त्या पठडीत इथले सदस्य व्यक्त होत आहेत. कुणी रेषा ओलांडत असेल तर त्याचं काय करायचं आणि कुणी करायचं हे कोण ठरवणार असतील ते ठरवतील. >>>>>> जे संस्थळ चांगले असेल, लोकांना भावेल ते टिकेल, बाकीची टिकणार नाहीत. शिवाय प्रत्येकाने आपली वेगळी जातकुळी ठेवली तर एकत्र ही त्यांचा विकास होईल की. या पेक्षा जास्त एनर्जी या विषयावर घालवण्यात काही हशील नाही असे माझे सुस्पष्ट मत आहे. --------- माझंही हेच मत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

पण तुम्हाला वाटत ‍असेल सतत

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 03/20/2012 - 23:51 नवीन
पण तुम्हाला वाटत ‍असेल सतत तिकडचा विचार चालू असतो तर तिकडे नजर सुद्धा टाकणार नाही.
ते वाक्य व्यक्तिश: तुझ्या बद्दल नव्हते रे. एकूणच दोन्ही ठिकाणी चाललेली चर्चा पाहून तसे लिहिले. कदाचित प्रतिसाद तुझ्या प्रतिसादाला असल्याने तसे वाटत असेल तर आय माय स्वारी :-) अरे पण खरेच सांगतो, असे नमुने पाहिले आहेत. बोलू कधी तरी. सांगेन तपशील. :-) आणि तू तिथे जाऊ नकोस असे मी अजिबात म्हणणार नाही. जरूर जा.
-------- हाहाहा.. बास का.. असलं काही होत नाही. अशी खडाखडी काही मिपाला नवीन नाही. इथे कुणाचीही आईबहीण काढली गेलेली नाही. घाबरण्‍याचं काहीच कारण नाही.
अरे म्हणूनच "त्यातला प्रकार" असा जनरल उल्लेख केला होता. तिथे तर अगदीच खालच्या स्तरावर उतरतात. मिपा किंवा कुठल्याही संस्थळावर तसे प्रतिसाद २ मिनिटे टिकणार नाहीत . मी भावनेबद्दल बोलत आहे. संस्थळे माणसांनी जवळ यावे म्हणून बनवली गेली ना, मग त्यांचा वापर करून द्वेष का वाढवावा ? असो, आपली काही मते तरी जुळली आहेत या बाबतीत. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

आपली काही मते तरी जुळली आहेत

यकु
Tue, 03/20/2012 - 23:57 नवीन
आपली काही मते तरी जुळली आहेत या बाबतीत.
यास्स स्सार! बरीच. :) आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे, नभात भरला दिशात उरला वगैरे वगैरे वगैरे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

छे !!! सध्या हाफिसातून

माझीही शॅम्पेन
Mon, 03/19/2012 - 13:39 नवीन
छे !!! सध्या हाफिसातून समुद्रावर जायला बंदी असल्याने गड्या आपली विहीरच बरी (विमे नी अधिक प्रकाश टाकावा अशी विनंती) शेवटी अस्सल गोड पाणी विहिरितकच मिळत , काही (की बरेच) प्राणी दोन्ही कडे पडिक असतात अस ऐकून आहे.. तरीही कधीही समुद्र ना पहिलेली माझीही शॅम्पेन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

ऑ ?

परिकथेतील राजकुमार
Mon, 03/19/2012 - 12:40 नवीन
लेख अजून टिकला आहे ? मला वाटले पंख लागले असतील आतापर्यंत. असो... बाकी विहिरीची प्रायव्हसी पॉलिसी आणि समुद्राची प्रायव्हसी पॉलिसी, विहिरीतला कंपू आणि समुद्रातला कंपू, विहिरीतला दारुडा समाज आणि समुद्रातला दारुडा समाज, विहिरीतली लोकशाही आणि समुद्रातली लोकशाही इ. इ. काहीच भाष्य नसल्याने लेख वाचताना निराशा झाली. आणि हो, तळे राखील तो पाणी चाखील ही ओळ पण ह्यात का नाही ? असो बदलीन.
  • Log in or register to post comments

हे सगळे सखोल अभ्यासाचे विषय

कवितानागेश
Mon, 03/19/2012 - 16:12 नवीन
हे सगळे सखोल अभ्यासाचे विषय आहेत. त्यासाठी विदा गोळा करावा लागेल. :( बाकी दारुड्या समाजाचा विदा सोत्रिंजवळ असल्यास ते लवकरच एक तुलनात्मक आभ्यासाचा विचारप्रवर्तक पेपर मांडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

>>>लेख वाचताना निराशा

प्यारे१
Mon, 03/19/2012 - 16:19 नवीन
>>>लेख वाचताना निराशा झाली. अभ्यास कमी पडत असेल त्यांचा. मार्गदर्शन करा की त्यांना. तुमचा दांडगा अभ्यास आहे ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

खर तर विहिर, मोठा जलाशय व समुद्र ह्यात जीव जगतात..

निश
Mon, 03/19/2012 - 13:08 नवीन
खर तर विहिर, मोठा जलाशय व समुद्र ह्यात जीव जगतात.. ह्यातल प्रत्येका मध्ये जीव जगतात, वाढतात , आपापल्या भल्या बुर्‍या जाणिवा जोपासतात. त्या मुळे प्रत्येकाचच महत्व आहे.
  • Log in or register to post comments

सोत्री पोहायला येत नसेल तर

गणपा
Mon, 03/19/2012 - 17:26 नवीन
सोत्री पोहायला येत नसेल तर क्लास लावा. गेला बाजार फ्लोटर बाळगा पाण्यात उतरताना. :)
  • Log in or register to post comments

=))

सोत्रि
Mon, 03/19/2012 - 17:34 नवीन
पट्टीचा (नाडीची नव्हे) पोहणारा आहे मी. सगळ्या पाण्यात व्यवस्थित पोहू शकतो आरामात अगदी दमछाक न होता. उगाच नाही... - (पट्टीचा पोहणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

सोत्रि'जी..लय भारी लेख!!!!!

मृगनयनी
Tue, 03/20/2012 - 19:52 नवीन
सोत्रि'जी..लय भारी लेख!!!!! आवडल्या गेला.... :)
एक होती विहीर. चांगलीच मोठी होती तशी, म्हणजे गुगल मॅप्स वरून बघितल्यास तिचा 'व्यास' कळावा इतपत मोठी होती ती
या पहिल्याच्च वाक्याला फुटल्या गेले आहे!!!!! ;) ;) ;) ठ्ठोSS ठ्ठोSSS ठ्ठो ठ्ठोSSSSS... =)) =)) =)) =)) =)) पण व्यास *अर्धवट* असेल... तर त्याची त्रिज्या होते ना!!!!! =)) =)) =)) =)) विहीरीतले काही बेडूक स्वतःला उच्चभ्रू समजत असल्याने कम्पूबाजांव्यतिरिक्त इतर जणांना तुच्छ लेखत असत. अर्थात हे हुच्चब्रूत्व फार दिवस टिकले नाही... विहीरीतल्या अनेक जणांनी या हुच्चब्रूंना योग्य ती जागा दाखवून दिल्याने यावेळी मात्र त्यांचे काहीच चालू शकले नाही.. मग खोट्या अहन्कारापोटी आणि त्यांच्या अवास्तव मागण्या मान्य न झाल्याने या कुपमन्डूकांची गच्छंती अटळ झाली.. पण स्थलांतरित प्राणी कितीही कूपमन्डूक वृत्तीचे असले.. तरी विहिरीचे मन मात्र खूप्प मोठ्ठे असल्याकारणाने त्यांच्या बाबतीत विहिरीने अजूनही "आओ जाओ विहीर तुम्हारी" अशी भूमिका ठेवलेली आहे. तसेच या बेडकांच्या लेखांना प्रतिक्रिया पाडणारे लोक्स तिकडे जलाशय उर्फ समुद्रात कमी असल्याने किन्वा तिकडे सगळेच्च जण स्वतःला "हुच्चब्रू" समजत असल्याने मध्यंतरी या कूपमन्डूकांची स्थिती मन्गळावरच्या पाण्यासारखी झाली होती... (पक्षी: बघायलाच्च कुणी नाही... ;) ) त्यामुळे विहिरीकडे न येण्याची शपथ घेतलेली असूनसुद्धा त्यांना परत विहिरीकडे येऊन लेख पाडावे लागले.... असो... आजकाल असेही ऐकीवात आले आहे, की जलाशय उर्फ "लाल समुद्रा"तल्या काही "क्ष" हुच्चब्रूंना म्हणे "ज्ञ" हुच्चब्रूंचा त्रास होत असल्याने हे "क्ष" हुच्चब्रू आता नवीन जलाशयाच्या शोधात आहेत!!! (लाल रन्ग यासाठी की... ज्योतिषशास्त्रानुसार मन्गल ग्रहाचा रन्ग लाल आहे!!! ;) ;) ;) ;) )
  • Log in or register to post comments

तांबडा समुद्र

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/20/2012 - 20:03 नवीन
तांबडा समुद्र. Red sea ला मराठीत तांबडा समुद्र म्हणतात. तोच तो, सौदी आणि येमेनच्या दक्षिण पश्चिमेला असणारा समुद्र, जो आफ्रीकेच्या उत्तर पूर्वेला येतो. ज्योतिषातच कशाला, प्रत्यक्ष डोळ्यांनीही शनी आणि मंगळ दोघेही लालच दिसतात. सध्या मंगळ सूर्यास्ताच्या सुमारास पूर्व क्षितीजावर असतो. संधी मिळाल्यास बघून घ्या. जवळजवळ संपूर्ण रात्रभर मंगळ आकाशात दिसतो आहे. शिवाय अलिकडेच मंगळ पृथ्वीच्या जवळही येऊन गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

प्रत्यक्ष डोळ्यांनीही शनी आणि

मृगनयनी
Tue, 03/20/2012 - 20:15 नवीन
प्रत्यक्ष डोळ्यांनीही शनी आणि मंगळ दोघेही लालच दिसतात. :) शनि हा नुसत्या डोळ्यांना दिसू शकतो.... हे आम्हांस आत्तापर्यन्त ठाऊकच नव्हते. आणि ज्योतिषशास्त्रानुसार "शनि" ग्रहाचा रन्ग "काळसर निळा" आहे. सध्या मंगळ सूर्यास्ताच्या सुमारास पूर्व क्षितीजावर असतो. संधी मिळाल्यास बघून घ्या सान्गितल्याबद्दल धन्यवाद! आम्ही दोनेक महिन्यांपासून पश्चिमेस "गुरु" आणि ":शुक्र" युती रोज बघतो. अर्थात हे दोन्ही ग्रह आकाशात लवकर सापडतात.. बाकी मन्गळाचे अजून वर्णन सान्गितल्यास आम्हांस तो सापडणे सोपे जाईल!! :) शिवाय अलिकडेच मंगळ पृथ्वीच्या जवळही येऊन गेला. अरे वा!!!... शेवटी "मन्गळ" हा भूमिपुत्रच आहे... आणि "पृथ्वी" म्हणजे भूमितत्वच आहे! त्यामुळे मुलगा आईजवळ आल्याचा सर्वतोपरी आनन्द आम्हांस झाला आहे!! :) * लाल समुद्राचा आणि मन्गळाचा काही शात्रीय / भौगोलिक सम्बन्ध असल्यास जरूर सान्गावा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

होय तर. नुस्त्या डोळ्यांनी

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/20/2012 - 20:27 नवीन
होय तर. नुस्त्या डोळ्यांनी दिसणारा शनी हा सर्वात लांबचा ग्रह आहे. त्याच्या पुढचे युरेनस आणि नेपच्यून (मराठी नावं?) साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत. युरेनस फारच क्वचित थिअरेटीकली डोळ्यांनी दिसण्याएवढा तेजस्वी असतो, पण मुंबई-पुण्यातून किंवा कोणत्याही इतर शहरांतून तो साध्या डोळ्यांना दिसणं कठीण आहे. गुरू आणि शुक्र १३ मार्चला एकमेकांच्या सर्वात जवळ होते (भासमान). २५-२६ तारखेच्या आसपास चंद्रही त्यांच्या जवळ दिसेल. गुरू, शुक्र आणि चंद्र युती डोळ्यांना छानच दिसेल. शुक्र आणि गुरू हे दोन तेजस्वी ग्रह आणि त्यातून डोळ्यांना निळसर पांढरे दिसतात त्यामुळे शोधायला सोपे असतात. मंगळ सूर्यास्तानंतर पूर्वेला दिसेल, गुरू-शुक्र दिसत आहेत त्याच्या अगदी विरूद्ध दिशेला. त्या बाजूच्या आकाशात एवढा लालसर रंगाचा तारा नाहीच, त्यामुळे सूर्यास्तानंतर पूर्व क्षितीजाजवळ जी लाल वस्तू दिसेल तो मंगळ. दुर्बिणीतून पाहिल्यास फार काही वेगळं दिसणार नाही. शनी किंचित पिवळट तांबडा दिसतो आणि दुर्बिणीतून पाहिल्यास शनीची कडीही दिसतात. आता अमावस्या जवळ येते आहे, त्यामुळे चंद्रप्रकाश नसताना इतर अवकाशस्थ गोष्टी सहज सापडतील. तांबड्या समुद्राला तांबडा का म्हणतात यावर म्हणे अजून शास्त्रज्ञांचं एकमत नाही. मंगळाचा लाल रंग त्याच्यावर असणार्‍या लोहाच्या (फेरस का फेरिक आठवत नाही) ऑक्साईडमुळे, थोडक्यात गंज चढल्यामुळे आहे. तो दर सव्वादोन वर्षांनी पृथ्वीच्या जवळ येतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

खूपच्च सुरचित आणि

मृगनयनी
Tue, 03/20/2012 - 21:10 नवीन
खूपच्च सुरचित आणि महत्त्वपूर्ण माहिती! आवडलं!!!.. :) एक शन्का:- रात्रीच्या वेळेस मन्गळाचा लाल रन्ग- काळा किन्वा ब्राऊनिश दिसतो का? की तो फक्त सूर्यास्ताच्या वेळीच सुस्पष्ट लाल रन्गाचा दिसू शकतो...? दुर्बिणीतून शनि व त्याची कडीही नक्कीच पाहू!! :) २५-२६ तारखेला चन्द्र, शुक्र, गुरु युतीही पाहायला आवडेल! अशीच युती मागे जानेवारी एन्डिन्गला पाहिली होती. तेव्हा गुरु आणि शुक्र दोघेही मेष राशीत होते. आता गुरु १५ मे'पर्यन्त मेषराशीतच असेल आणि शुक्र १४ मार्चला मीन राशीत आलेला आहे. त्यामुळे कदाचित अजून दीडदोन महिने तरी गुरु शुक्र युती आपल्याला पाहायला मिळेल. * नेपच्यूनला मराठीत "वरूण" म्हणतात. नेपच्यून'ला पर्जन्याची देवता मानतात. ज्यांच्या पत्रिकेत नेपच्यून उच्चीचा आणि जलराशीत असतो... त्यांना गूढशास्त्रात (उदा.- ज्योतिष, हिप्नॉटिझम, लोलकविद्या... इ.) गती असून त्यात ते बरीच प्रगती करतात आणि प्रसिद्धीसही येतात. :) * सौजन्यसप्ताहाच्या शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

रात्रीच्या वेळेस मन्गळाचा लाल

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/20/2012 - 22:31 नवीन
रात्रीच्या वेळेस मन्गळाचा लाल रन्ग- काळा किन्वा ब्राऊनिश दिसतो का? की तो फक्त सूर्यास्ताच्या वेळीच सुस्पष्ट लाल रन्गाचा दिसू शकतो...?
नाही. मंगळाचा रंग अ‍ॅम्बियण्ट (मराठी?) रंगाप्रमाणे बदलताना दिसत नाही. कोणत्याही अवकाशस्थ वस्तूचा रंग पृथ्वीच्या वातावरणामुळे बदलत नाही, अपवाद सूर्य आणि चंद्र. गुरूच्या शेजारी पाहिलंत तर अश्चिनी नक्षत्रातले (=मेष रास) तीन तारे, गुरूच्या उत्तरेला जवळच दिसतील. हे तीन तारे मिळून चमच्यासारखा आकार दिसतो. साधारण असा: .............................० ............. ... ... .. ०.........० ० या जागी तारे आहेत; असा साधारण आकार अश्विनी नक्षत्रात दिसतो. मीन राशीतले तारे फिकट आहेत. त्यात मज्जा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

ह्म्म्म.... अश्विनी

मृगनयनी
Wed, 03/21/2012 - 12:03 नवीन
ह्म्म्म.... अश्विनी नक्षत्राचे तीन तेजस्वी तारे आहेत.... तसेच त्याशेजारी थोडेसे कमी तेजस्वी व अश्विनी'च्या तार्‍यांच्या बर्‍यापैकी उलट्या आकारात असलेले भरणी नक्षत्राचे ३ तारे दिसतात. अर्थात ते अश्विनी'च्या तार्‍यांइतके तेजस्वी नसतात. तसेच मीन राशीत रेवती नक्षत्राचे साधारणतः ३२ तारे तर उत्तराभाद्रपदा नक्षत्राचे ३ तारे असतात. पण ते अत्यंत फिकट असल्याने दुर्बीणीतूनदेखील त्यांचा पान्ढुरका पुन्जका दिसतो! आपण म्हटल्याप्रमाणे त्यात मजा नाही. अश्विनी नक्षत्र हे "केतू"चे तर भरणी नक्षत्र हे "शुक्रा"चे मानतात. तसेच मीन राशीचा राशीस्वामी जरी "गुरु" असला तरी मीन राशीतला "शुक्र"हाही उच्चीचा मानला जातो. एखाद्या कुन्डलीत लग्नी मीनेचा शुक्र असेल, तर त्या व्यक्तीचे अनेकांशी प्रेमसम्बन्ध असू शकतात. पण लग्न मात्र एकाशीही होत नाही. आणि जरी महत्प्रयासाने झाले, तरी ते २ महिन्याहून अधिक काळ टिकू शकत नाही. तसेच अशी व्यक्ती अत्यंत सुन्दर व स्वतःची वेगळी ओळख जपणारी असते. उदाहरण द्यायचे झाले तर अभिनेत्री- रेखा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आ हा हा

परिकथेतील राजकुमार
Wed, 03/21/2012 - 13:07 नवीन
वरील संभाषण वाचून आम्हाला अगदी गलबलुन आणि भडभडून आले आहे. दुर्लक्षित पँथर तर्फे माननीय अदिती ह्यांना एक नऊवारी साडी, नथ, सत्य साईबाबांची दिव्य अंगठी आणि 'भांगेतील तुळस' ह्या चित्रपटाची व्हिसीडी देऊन गौरवण्यात येत आहे. तर माननीय मृगनैनीजी ह्यांना 'गॅलो' ची एक झिन्फाडेल वाईन, सिक्स पॉकेट जीन्स आणि 'न सांगता अंधश्रद्धा सोडवा' ह्या कार्यक्रमाची मेंबरशीप देऊन गौरवण्यात येत आहे. हे संभाषण वाचून फटाक्यांच्या आशेने आलेल्यांच्या पदरात काटे पडल्याने त्यासर्वांना एकेक हनुमान चड्डी व स्त्री असल्यास शिफॉनची साडी देऊन सांत्वन करण्यात येत आहे. धन्यवाद. परादास आठवले अध्यक्ष संस्थापक दुर्लक्षित पँथर मिसळपाव शाखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

_/\_

जाई.
Wed, 03/21/2012 - 13:16 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पराशेठला कुणीतरी फोन

यकु
Wed, 03/21/2012 - 13:25 नवीन
पराशेठला कुणीतरी फोन करा!!! चक्क आयडी हॅक झालाय. ;-) हा आवाज बिलकुल ओळखीचा नाहीय. शब्द तर बिलकुलच नाहीत. नक्की पुण्‍यातूनच ऑपरेट होताय ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मेलो...

श्रावण मोडक
Wed, 03/21/2012 - 13:35 नवीन
च्यायला, हे बेणं सुधरायचं नाही. _/\_ यकु, फोन केला. "आप जिस नंबरसे संपर्क करना चाहते हो, वो फिलहाल संपर्कक्षेत्रसे बाहर है. कृपया थोडी देर बाद संपर्क करे..." !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

=)) =)) =)) हम्म. दीड वाजलाय

यकु
Wed, 03/21/2012 - 13:38 नवीन
=)) =)) =)) हम्म. दीड वाजलाय फक्त श्रामो ऽ! चला आता पराशेठचे कॅरेक्टरच हॅक करावे म्हणतो. काय मजा येईल तिच्यायला ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ही ही !

सुहास..
Wed, 03/21/2012 - 13:36 नवीन
भाषण वाचून आम्हाला अगदी गलबलुन आणि भडभडून आले आहे. >>. आम्हाला ही, आशा काळे नवयुगात आणि सई ताम्हणकर ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट जनरेशन मध्ये जावुन एकमेकांशी गप्पा मारत आहेत असे वाटुन गेले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

परादास आठवले

sneharani
Wed, 03/21/2012 - 13:37 नवीन
परादास आठवले'जी _/\_ स्विकारा!!हसून हसून पुरेवाट झाली!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ !!!

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 03/21/2012 - 13:39 नवीन
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सौजन्य सप्ताह असल्या कारणाने

मृगनयनी
Wed, 03/21/2012 - 14:09 नवीन
सौजन्य सप्ताह असल्या कारणाने आम्ही यावेळी काही न बोलणेच्च उचित ठरेल... :) ऑलरेडी इयर एन्डिन्ग आणि अप्र्राईझलचे टेन्शन आहे.... :| :| बाकी काडीलाव्या पर्याला _/\_ ;) आणि बाकी आमच्या सर्व सुहृदांना- पक्षी : प्यारे'जी, सुहास'जी, स्नेहाराणी'जी... सगळ्यांनाच _/\_ अर्थात काही झाले... तरी आपली मैत्री आणि युती कायम राहील... व आमची मूलतत्वे ( पक्षी: बेसिक मूल्ये) देखील त्यान्च्या जागी अढळ आहेत... :) गुरु-शुक्र युतीचा विजय असो!!! जय भीम.. जय अर्जुन ...जय बिभिषण ...जय परशुराम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

_/\_

मूकवाचक
गुरुवार, 03/22/2012 - 09:53 नवीन
_/\_ इथली जुगलबंदी वाचून पडोसन मधले 'एक चतुर नार' आठवले. (ये सूर किधर गया जी, अय्यो फिर भटकाया, हम छोडेगा नही जी, हम पकडके रखेगा जी ...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सवयीप्रमाणे

Nile
Wed, 03/21/2012 - 20:53 नवीन
वरील संभाषण वाचून आम्हाला अगदी गलबलुन आणि भडभडून आले आहे.
वरील वाक्याचा उत्तरार्ध सवयीप्रमाणे "..वाचून एक मिपाकर म्हणून शरम वाटली" असा वाचला. ;-) पर्‍यासारख्यांवर अशी ओळ लिहण्याची वेळ यावी हे पाहून मला एक मिपाकर म्हणून शरम वाटली हे जाता जाता नोंदवतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नथ, सत्य साईबाबांची दिव्य

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/21/2012 - 21:01 नवीन
नथ, सत्य साईबाबांची दिव्य अंगठी आणि 'भांगेतील तुळस' ह्या चित्रपटाची व्हिसीडी योग्य पॅकेजिंग आणि मार्केटींग करून विकल्यास येणार्‍या पैशात उच्चभ्रू कॅब्रेने सुव्हिन्यूच्या (३.१४)२ बाटल्या आणि त्याबरोबर खायला फ्रेंच चीजचे (३.१४)२ डबे येतील. नऊवारी साडी कापून त्यात सामान्य आकाराचे पाच-सात ड्रेसेसही मावतील. डील डन. अवांतरः भरणी नक्षत्रात माझी आवडती गुरूत्वीय भिंग सिस्टम आहे. भरणी नक्षत्र अश्विनीच्या उत्तर-पूर्वेला, समद्वीभुज त्रिकोणासारखं दिसतं, जोकरच्या टोपीसारखं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

फुटलो...

मन१
गुरुवार, 03/22/2012 - 01:24 नवीन
ठार झालोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हे तुम्ही तयार्र केलेलं चित्र

किचेन
गुरुवार, 03/22/2012 - 15:00 नवीन
हे तुम्ही तयार्र केलेलं चित्र कागदावर उतरवून आणि होकायंत्र घेऊन टेरेसवर गेले होते.काय बी दासाल न्हाही.सगळे तारे सारखेच. लाल मंगल्वागैरेही दिसलं नाही.हे सगळ तुम्ही दुर्बिणीतून बघितलं काय? :( या आधीही एकदा कॉलेजमध्ये असताना सकाळमध्ये एक लेख यायचा आणि त्याप्रमाणे आकाशच चित्रही यायचं.तो नकाशा दिशा जुळवून डोक्यावर धरून बघायचा.तसं हि काही वेळा केल होत.पण तेव्हाही काही दिसलं नाही. :( पण आकाशातले एका रेशेतले तीन तारे मला नेहमी दिसतात.त्यांना काहीतरी नाव पण आहे. o o o पण मुंबईच्या आणि हैदराबादच्या तारांगणात सगळ नीट बघितलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत

स्मिता.
गुरुवार, 03/22/2012 - 21:10 नवीन
हे तुम्ही तयार्र केलेलं चित्र कागदावर उतरवून आणि होकायंत्र घेऊन टेरेसवर गेले होते.काय बी दासाल न्हाही.सगळे तारे सारखेच. लाल मंगल्वागैरेही दिसलं नाही.
अगदी अगदी!! मीसुद्धा असाच प्रयत्न करून पाहिला पण मला तर तारेही दिसले नाहीत. आकाशात सगळा धूसरपणा दिसला. तू कसंकाय पाहिलंस गं अदिती? इथे नीट तपशीलवार सांगशील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

सध्या सूर्यास्तानंतर पश्चिम

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 03/22/2012 - 22:28 नवीन
सध्या सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात पहाल तर दोन तेजस्वी, पांढरे ठिपके दिसतील. (सूर्यास्तानंतर अर्ध्या तासात पश्चिम दिशा ओळखायला शक्यतोवर त्रास होऊ नये.) संधीप्रकाशातही गुरू आणि शुक्र दिसतात. त्यातला पश्चिम क्षितीजाजवळ जो दिसतो आहे तो गुरू. शुक्र त्यापासून साधारण ८-१० अंशावर असेल. आकाशात १ अंश म्हणजे किती? हात ताणून लांब करा आणि डोळ्यांसमोर धरा. एका बोटाची जाडी म्हणजे एक अंश. सूर्य आणि पौर्णिमेच्या चंद्राचा व्यास अर्धा अंश एवढा असतो. हात ताणून उभा धरल्यास अंगठा आणि करंगळीतलं अंतर म्हणजे साधारणतः ५-६ अंश. एक वीत ताणल्यास साधारण २० अंश. क्षितीजापासून ध्रुवतारा मुंबई-पुण्यातून एक वीत अंतरावर, ~ १८ अंशावर दिसतो. गुरू आणि शुक्र ओळखण्यात गडबड होणार नाही असं वाटतं. (संध्याकाळी दुकानं, जॉगिंग ट्रॅक ऐवजी रम्य ठिकाणी फिरायला गेल्यास तिथे बरेच लोकं आकाशात गुरू-शुक्राकडे बघताना दिसतात. त्यावरून एक अंदाज.) गुरूकडे तोंड केल्यास त्याच्या उजव्या बाजूला (उत्तरेला), साधारण २-३ अंशांवर अश्विनी नक्षत्र दिसते. हे तारे साधारणतः ध्रुव तार्‍यापेक्षा थोडेसे अधिक तेजस्वी आहेत. भरणी नक्षत्रातले तारे (आडव्या जोकरच्या टोपीसारखे, समद्विभुज त्रिकोण) त्याहीपेक्षा फिकट आहेत. साधारण सूर्यास्तानंतर अर्धा-पाऊण तासाने मंगळ पूर्व क्षितीजावर दिसतो आहे. किंचित पिवळट लाल रंगाचा तारा त्या बाजूला आकाशात नाही. प्रदूषण जास्त असेल तर पिवळा रंग जास्त दिसेल. पण माणसा-माणसाला जाणवणारे रंग वेगळे असतात. त्यामुळे रंगांच्या नावांच्या बाबतीत जरा सावध असणे उत्तम. सध्या मी ही अ‍ॅक्टीव्हली पॉप्युलरायझेशन करत नसल्यामुळे मलाही थोडं खोदकाम करूनच बघावं लागेल कोणते ग्रह कोणत्या नक्षत्र/राशीत आहेत ते. (स्मिता, तुझ्याकडे आकाशात ढग नाहीत ना याची खात्री करून घे. ;-) ढगांतून ग्रह-तारे बघायचे असतील तर एकत्रच बघू, फ्रेंच चीज आणि वारूणी मलाही आवडतात.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

धन्यवाद!

स्मिता.
Fri, 03/23/2012 - 16:21 नवीन
डिट्टेलवार माहितीकरता धन्यवाद! कॉलेजात असताना काही हौशी लोकांनी 'अ‍ॅस्ट्रॉनॉमी क्लब' सुरू केला होता तेव्हा २-४ वेळा रात्री उशीरापर्यंत थांबून अवकाश निरिक्षण केलंय, पण तेवढंच. गुरू-शुक्र ओळखता येतात (आकाशात तेवढेच दोन तेजस्वी ग्रह दिसतात). बाकी नक्षत्र किंवा तारकासमूह म्हणशील तर मृग नक्षत्र, समद्विभुज त्रिकोण (तो भरणी नक्षत्रात असतो ते आता कळलं) आणि सप्तर्षी सोडल्यास बाकी काही ओळखता येत नाही. (इकडे आकाशात केव्हाही ढग असतातच. पण सध्या वसंतातली छान गुलाबी थंडी असल्याने 'ढगातून' तारे बघायला वेलकम!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

>>पण व्यास *अर्धवट* असेल...

अर्धवट
गुरुवार, 03/22/2012 - 09:17 नवीन
>>पण व्यास *अर्धवट* असेल... तर त्याची त्रिज्या होते ना!!!!! कोटी बरी आहे. पण याआधी ऐकली आहे. बाकी बरेच काही बोलायचे होते पण पर्‍यानं आधीच हनुमानचड्डी देउन आमची अडचण करून ठेवली आहे. तेव्हा असो. आपल्या मताचा आदर आहेच. शुभेच्छा.. सोकाजींची जालीय राजकारणातील अल्पावधीतच केलेली प्रगती नेत्रदीपक आहे असे जाताजाता नोंदवतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

चला, कुणीतरी त्या ' निरागसता

यकु
Tue, 03/20/2012 - 20:55 नवीन
चला, कुणीतरी त्या ' निरागसता जपा सप्ताहाची ' नांदी वाजवा बरं पटकन! धमालदादा बारामतीकरांनी फेटा वगैरे बांधून डफासहीत मंचावर येण्याची विनंती करण्यात येते.. धमालदादा बारामतीकर.. अटेंशन प्लीज.
  • Log in or register to post comments

निरागसता की सौजन्य रे

प्यारे१
Wed, 03/21/2012 - 12:46 नवीन
निरागसता की सौजन्य रे यकु? ट्यार्पी कसा वाढायचा रे अशानं? सासू म्हणे सुनेला, नको स्वयंपाक करु, दमली असशील. सून म्हणे सासूला, करते की मी, तू तरी किती कामं करशील! . . . . हे असं गोग्गोड एखाद दिवस ठीक हो! भांडा सौख्यभरे... पावर्ड बाय यकु इन्दोरवाले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

प्‍यार्‍या, तुझ्या पाठीवर

यकु
Wed, 03/21/2012 - 12:58 नवीन
प्‍यार्‍या, तुझ्या पाठीवर एकामागून एक 'दोन' लाटण्‍यांचे वळ उमटायला काहीच हरकत नाही ;-) असू दे की काय असायचं ते.. तु बी लय ताणतो राव.. (शांतीदूत) शेंबडा यक्कू 3.14 मिनिटांची समझौता सुपर एक्स्प्रेस स्टेशनवर येत आहे .. प्रवाशांनी प्लॅटफॉर्मपासून दूर उभे रहावे.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>3.14 मिनिटांची समझौता सुपर

सूड
Wed, 03/21/2012 - 16:05 नवीन
>>3.14 मिनिटांची समझौता सुपर एक्स्प्रेस स्टेशनवर येत आहे .. प्रवाशांनी प्लॅटफॉर्मपासून दूर उभे रहावे.. येवढं स्पेसिफिक टायमिंग ?? एक्स्प्रेस सेंट्रलची म्हणायची का वेस्टर्नची ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

सुड्क्या

स्पा
Wed, 03/21/2012 - 16:10 नवीन
__/\__ येवढं स्पेसिफिक टायमिंग ?? एक्स्प्रेस सेंट्रलची म्हणायची का वेस्टर्नची ?? =)) =)) =)) सुड्क्या लैच माजलास बे पुण्याला जाऊन किती बाजार उठवशील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

म्हणजे ?

सूड
Wed, 03/21/2012 - 16:21 नवीन
म्हणजे ? यात काय बाजार उठवला मी ? हल्ली एक्स्प्रेसची चौकशी करायची पण सोय नाही. काय दिवस आलेत. >>लैच माजलास बे पुण्याला जाऊन त्याला 'पुण्यकविषय' म्हणायचं, अभिमान हवा. पुणं बोलून स्टेटस घालवू नकोस. बाकी माजण्याचे कॉपीराईट्स मुंबैकरांकडे नाहीत अशी बातमी मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

भावना पोहोचल्या...

मोदक
Wed, 03/21/2012 - 17:19 नवीन
भावना पोहोचल्या :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

एक्स्प्रेस सेंट्रलची म्हणायची

गवि
Wed, 03/21/2012 - 17:32 नवीन
एक्स्प्रेस सेंट्रलची म्हणायची का वेस्टर्नची ??
हार्बरची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक

प्यारे१
Wed, 03/21/2012 - 17:37 नवीन
तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक तरी नाही तर डिले तरी.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

>>तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक

सूड
Wed, 03/21/2012 - 18:28 नवीन
>>तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक तरी नाही तर डिले तरी.... ते जे मेगाब्लॉक वैगरे होतात ते म्हणे प्रवाशांच्या सोयीसाठी असतं. खरंखोटं बघायला कोण जातंय म्हणा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा