विहिर विचारी समुद्राला...
एक होती विहीर. चांगलीच मोठी होती तशी, म्हणजे गुगल मॅप्स वरून बघितल्यास तिचा 'व्यास' कळावा इतपत मोठी होती ती. खरंतर त्या विहीरीत अपवाद म्हणावा की आठवे आश्चर्य अशा तर्हेने वैविध्यपूर्ण प्राणी रहात होते, गुण्यागोविंदाने(?). पण मध्येच पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्यावर पाणी भरपूर वाढून खूप हलकळ्ळोल व्ह्यायचा विहीरीत पण तो लगेच थंडही पडायचा. वेगवेगळ्या प्रकृतीचे, स्वभावधर्माचे विवीध प्राणी त्यावेळी आपापले अस्तित्व जाणवून द्यायचा प्रयत्न करायचे आणि गोंधळ मजवून द्यायचे. खूप आवाज व्ह्यायच्या विहीरीत अश्यावेळी. पण क्वचितच त्या विहीरीच्या मालकाला ते जाणवून यायचे, ते प्रमाण अगदी नगण्यच म्हणा ना. पण काही वेळा काही प्राण्यांचा खूपच अतिरेक व्ह्यायचा. ते थेट आकाशातून विहरीत पडल्यासारखे, स्वत:ला प्रेषित समजून इतरांना तुच्छ लेखायचे. त्यांनी तटच पाडले होते. उच्चभ्रू म्हणजे फक्त तेच जे विचार करू शकणारे आणि इतिहास घडवणार असा आत्मविश्वास (फाजील ?) असणारे व बाकीचे उपेक्षित, वैचारिक दलित जे विचार मांडू शकतात पण विस्कळीत, 'सप्रमाण' सिद्ध न करू शकणारे. त्या उपेक्षितांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे व्ह्यायचे बर्याच वेळेस. खूप गोंधळ व्ह्यायचा. मग मालकाला आणि त्याच्या 'मुनीम'जींना अशा गोंधळ करणार्या प्राण्यांच्या मुसक्या आवळाव्या लागायच्या, नाइलाजानेच. त्यालाही ते सर्व प्राणी प्राणाहून प्रिय होतेच. सर्वांनी गुण्यागोविंदाने रहावे असे त्याला वाटायचे. अशा 'वैविध्यतने नटलेल्या' विहीरीचा त्याला सार्थ अभिमान होता. पण आगतिक होऊन त्याला असे कडक पाऊल कधीकधी उचलावे लागायचे.
परंतू एकदा फार मोठा,प्रचंड, महाप्रलय झाला. खुपशी भौगोलिक उलथापालथ झाली आणि चक्क एक समुद्रच वाटावा असा एक मोठा जलाशयच विहीरीच्या शेजारी तयार झाला. नुकताच भारत सरकारचा नद्याजोडणी प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे सर्वच प्राणी इकडच्या तिकडच्या पाण्यात जाऊ शकत होते. लोकशाही किंवा रामराज्यच होते म्हणा ना. त्यामुळे ज्याला जे पाणी अनुकूल वाटत होते तिथे जाऊन तो त्या पाण्यात डुंबून आनंद मिळवत असे. विहीरीतले बरेच उच्चभ्रू प्राणी त्या जलाशयाच्या आश्रयाला गेले आणि त्यांनीच त्या जलाशयला समुद्र असे नामाभिमान देऊ केले. हे त्या नामाभिमान मात्र त्या विहीरीतल्या प्राण्यांना ठाऊकच नव्हते.
सर्व आलबेल आहे असे वाटावे अशी परिस्थीती होती. पण अचानक त्या मोठ्या जलाशयातले प्राणी विहीरीत येऊन त्या जलाशायाला त्यांनी समुद्र असे त्यांनी नामाभिमान दिले आहे असे सांगू लागले. समुद्रात कशी मज्जा-म्ज्जा असते, किती गुण्यागोविंदाने सगळे नांदतात हे सांगू लागले. समुद्रात खूप खूप जागा आहे, 'ऐस'पैस पसरता येते सर्वांना, विहीर फारच छोटी आहे हे सांगायचा प्रयत्न करू लागले. विहरीत सर्वांना संकोचित आयुष्य जगावे लागते आहे आणि त्यामुळे एकप्रकारची जैविक उत्क्रांती होऊन सर्व प्राण्यांचे बेडूक ह्या प्रजातीत रुपांतर झाले आहे आणि 'कूपमंडूक' प्रवृत्तीचा फैलाव झाला आहे असे एक मतप्रवाह त्यांनी विहीरीत सोडून दिला. समुद्रात कसे 'रामराज्य' आहे असे सर्वांना पटवून द्यायचा प्रयत्न जोर-जोरात होऊ लागला.
अरेच्चा, विहीरीतल्या प्राण्यांना काहीच कळेना. हे काय? असे तर इथे होतेच, नव्हे नव्हे आहेच, मग हे काय नविनच? त्यांना काहीच कळेना की हा नविन समुद्र म्हटला जाणारा जलाशय म्हणजे नेमके काय? फार वैचारिक गोंधळ होऊ लागला.
मग विहीरीलाच रहावेना, ती विहीर अखेर त्या समुद्रक्षम जलाशयाला विचारती झाली, 'हे विशाल 'ऐसी' ख्याती असलेल्या समुद्रा, माझ्या माहितीप्रमाणे समुद्राचे बरेच प्रकार असतात. जसे की समुद्र, महासमुद्र, पीत समुद्र, काळा समुद्र आणि चक्क मृत समुद्रही. तर हा जलाशय ह्यातला नेमका कुठल्या प्रकारचा समुद्र समजायचा आम्ही?'
वि.सू.: ह्यात फक्त आणि फक्त साहित्यमूल्यच शोधण्याचे करावे, ईतर काही शोधण्याचा प्रत्यत्न केल्यास समुद्राच्या खारटपणाशिवाय काहिही हाती येणार नाही. :)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
यावर कसला काथ्याकुट अपेक्षीत
आमच्या सगळीकडच्या मित्र
तुमचे डावपेच आम्हाला कळतात
ते काही असो ! तुम्हा
बाकी या पुजाविधी सांगून
बाकी
समुद्र म्हटला तरी तो खार्या
सूड्शी सहमत
सोत्रि!!
दारवा संग्रह...
हुश्श्य!
तु किनै पैसातै, तुझा आयडी
=))
ह्म्म्म...
हम्म्म
ब्वॉरं...ब्वॉरं...
अरे कोल्या,
आमी भटजीबुवाना म्हनलं व्हत़ं
चुक
(No subject)
माज्या
हीरीला इंजन कवाच बसवून झालंय
@मजूर मान्सं परत आली की बगा
तसं न्हाई...
डराव डराव
बाकी यानिमित्ताने आमच्या एका
आता परत सगळे इथे येतील
हम्म.............समुद्रात
'जलाशयातले' खारे पाणी ......
माका येक समजुन सांगा, ह्ये
कंत्राटं?
सोत्री ब्याक इन फॉर्म..
हा घ्या
भविष्य खरे ठरले.... ;-)
लोकांकडे कुठल्याही गोष्टीचा
:)
पुन्हा विचार करा
यावरुन आठवलं...
"आभास देखिल खराच असतो आणि खरे
>>>> "आभास देखिल खराच असतो
चांगदेव-पासष्टी
स्वतः परमात्मा दाखवतोय तर
आम्ही कसची नावं
चालू दया...
ॐ शांती: शांती: शांती: हरि
बाकी सगळं जाऊ दे, तो ॐ कसा
आमच्या कुंपणीच्या इनहाउस
कॅपिटल मध्ये AUM टाइप करून
द्विरुक्ती
म्हंजे..