Skip to main content

विहिर विचारी समुद्राला...

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 17/03/2012 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
एक होती विहीर. चांगलीच मोठी होती तशी, म्हणजे गुगल मॅप्स वरून बघितल्यास तिचा 'व्यास' कळावा इतपत मोठी होती ती. खरंतर त्या विहीरीत अपवाद म्हणावा की आठवे आश्चर्य अशा तर्‍हेने वैविध्यपूर्ण प्राणी रहात होते, गुण्यागोविंदाने(?). पण मध्येच पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्यावर पाणी भरपूर वाढून खूप हलकळ्ळोल व्ह्यायचा विहीरीत पण तो लगेच थंडही पडायचा. वेगवेगळ्या प्रकृतीचे, स्वभावधर्माचे विवीध प्राणी त्यावेळी आपापले अस्तित्व जाणवून द्यायचा प्रयत्न करायचे आणि गोंधळ मजवून द्यायचे. खूप आवाज व्ह्यायच्या विहीरीत अश्यावेळी. पण क्वचितच त्या विहीरीच्या मालकाला ते जाणवून यायचे, ते प्रमाण अगदी नगण्यच म्हणा ना. पण काही वेळा काही प्राण्यांचा खूपच अतिरेक व्ह्यायचा. ते थेट आकाशातून विहरीत पडल्यासारखे, स्वत:ला प्रेषित समजून इतरांना तुच्छ लेखायचे. त्यांनी तटच पाडले होते. उच्चभ्रू म्हणजे फक्त तेच जे विचार करू शकणारे आणि इतिहास घडवणार असा आत्मविश्वास (फाजील ?) असणारे व बाकीचे उपेक्षित, वैचारिक दलित जे विचार मांडू शकतात पण विस्कळीत, 'सप्रमाण' सिद्ध न करू शकणारे. त्या उपेक्षितांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे व्ह्यायचे बर्‍याच वेळेस. खूप गोंधळ व्ह्यायचा. मग मालकाला आणि त्याच्या 'मुनीम'जींना अशा गोंधळ करणार्‍या प्राण्यांच्या मुसक्या आवळाव्या लागायच्या, नाइलाजानेच. त्यालाही ते सर्व प्राणी प्राणाहून प्रिय होतेच. सर्वांनी गुण्यागोविंदाने रहावे असे त्याला वाटायचे. अशा 'वैविध्यतने नटलेल्या' विहीरीचा त्याला सार्थ अभिमान होता. पण आगतिक होऊन त्याला असे कडक पाऊल कधीकधी उचलावे लागायचे. परंतू एकदा फार मोठा,प्रचंड, महाप्रलय झाला. खुपशी भौगोलिक उलथापालथ झाली आणि चक्क एक समुद्रच वाटावा असा एक मोठा जलाशयच विहीरीच्या शेजारी तयार झाला. नुकताच भारत सरकारचा नद्याजोडणी प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे सर्वच प्राणी इकडच्या तिकडच्या पाण्यात जाऊ शकत होते. लोकशाही किंवा रामराज्यच होते म्हणा ना. त्यामुळे ज्याला जे पाणी अनुकूल वाटत होते तिथे जाऊन तो त्या पाण्यात डुंबून आनंद मिळवत असे. विहीरीतले बरेच उच्चभ्रू प्राणी त्या जलाशयाच्या आश्रयाला गेले आणि त्यांनीच त्या जलाशयला समुद्र असे नामाभिमान देऊ केले. हे त्या नामाभिमान मात्र त्या विहीरीतल्या प्राण्यांना ठाऊकच नव्हते. सर्व आलबेल आहे असे वाटावे अशी परिस्थीती होती. पण अचानक त्या मोठ्या जलाशयातले प्राणी विहीरीत येऊन त्या जलाशायाला त्यांनी समुद्र असे त्यांनी नामाभिमान दिले आहे असे सांगू लागले. समुद्रात कशी मज्जा-म्ज्जा असते, किती गुण्यागोविंदाने सगळे नांदतात हे सांगू लागले. समुद्रात खूप खूप जागा आहे, 'ऐस'पैस पसरता येते सर्वांना, विहीर फारच छोटी आहे हे सांगायचा प्रयत्न करू लागले. विहरीत सर्वांना संकोचित आयुष्य जगावे लागते आहे आणि त्यामुळे एकप्रकारची जैविक उत्क्रांती होऊन सर्व प्राण्यांचे बेडूक ह्या प्रजातीत रुपांतर झाले आहे आणि 'कूपमंडूक' प्रवृत्तीचा फैलाव झाला आहे असे एक मतप्रवाह त्यांनी विहीरीत सोडून दिला. समुद्रात कसे 'रामराज्य' आहे असे सर्वांना पटवून द्यायचा प्रयत्न जोर-जोरात होऊ लागला. अरेच्चा, विहीरीतल्या प्राण्यांना काहीच कळेना. हे काय? असे तर इथे होतेच, नव्हे नव्हे आहेच, मग हे काय नविनच? त्यांना काहीच कळेना की हा नविन समुद्र म्हटला जाणारा जलाशय म्हणजे नेमके काय? फार वैचारिक गोंधळ होऊ लागला. मग विहीरीलाच रहावेना, ती विहीर अखेर त्या समुद्रक्षम जलाशयाला विचारती झाली, 'हे विशाल 'ऐसी' ख्याती असलेल्या समुद्रा, माझ्या माहितीप्रमाणे समुद्राचे बरेच प्रकार असतात. जसे की समुद्र, महासमुद्र, पीत समुद्र, काळा समुद्र आणि चक्क मृत समुद्रही. तर हा जलाशय ह्यातला नेमका कुठल्या प्रकारचा समुद्र समजायचा आम्ही?' वि.सू.: ह्यात फक्त आणि फक्त साहित्यमूल्यच शोधण्याचे करावे, ईतर काही शोधण्याचा प्रत्यत्न केल्यास समुद्राच्या खारटपणाशिवाय काहिही हाती येणार नाही. :)

वाचने 30879
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

In reply to by मृगनयनी

रात्रीच्या वेळेस मन्गळाचा लाल रन्ग- काळा किन्वा ब्राऊनिश दिसतो का? की तो फक्त सूर्यास्ताच्या वेळीच सुस्पष्ट लाल रन्गाचा दिसू शकतो...?
नाही. मंगळाचा रंग अ‍ॅम्बियण्ट (मराठी?) रंगाप्रमाणे बदलताना दिसत नाही. कोणत्याही अवकाशस्थ वस्तूचा रंग पृथ्वीच्या वातावरणामुळे बदलत नाही, अपवाद सूर्य आणि चंद्र. गुरूच्या शेजारी पाहिलंत तर अश्चिनी नक्षत्रातले (=मेष रास) तीन तारे, गुरूच्या उत्तरेला जवळच दिसतील. हे तीन तारे मिळून चमच्यासारखा आकार दिसतो. साधारण असा: .......................................... ... ... ...........० ० या जागी तारे आहेत; असा साधारण आकार अश्विनी नक्षत्रात दिसतो. मीन राशीतले तारे फिकट आहेत. त्यात मज्जा नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ह्म्म्म.... अश्विनी नक्षत्राचे तीन तेजस्वी तारे आहेत.... तसेच त्याशेजारी थोडेसे कमी तेजस्वी व अश्विनी'च्या तार्‍यांच्या बर्‍यापैकी उलट्या आकारात असलेले भरणी नक्षत्राचे ३ तारे दिसतात. अर्थात ते अश्विनी'च्या तार्‍यांइतके तेजस्वी नसतात. तसेच मीन राशीत रेवती नक्षत्राचे साधारणतः ३२ तारे तर उत्तराभाद्रपदा नक्षत्राचे ३ तारे असतात. पण ते अत्यंत फिकट असल्याने दुर्बीणीतूनदेखील त्यांचा पान्ढुरका पुन्जका दिसतो! आपण म्हटल्याप्रमाणे त्यात मजा नाही. अश्विनी नक्षत्र हे "केतू"चे तर भरणी नक्षत्र हे "शुक्रा"चे मानतात. तसेच मीन राशीचा राशीस्वामी जरी "गुरु" असला तरी मीन राशीतला "शुक्र"हाही उच्चीचा मानला जातो. एखाद्या कुन्डलीत लग्नी मीनेचा शुक्र असेल, तर त्या व्यक्तीचे अनेकांशी प्रेमसम्बन्ध असू शकतात. पण लग्न मात्र एकाशीही होत नाही. आणि जरी महत्प्रयासाने झाले, तरी ते २ महिन्याहून अधिक काळ टिकू शकत नाही. तसेच अशी व्यक्ती अत्यंत सुन्दर व स्वतःची वेगळी ओळख जपणारी असते. उदाहरण द्यायचे झाले तर अभिनेत्री- रेखा.

In reply to by मृगनयनी

वरील संभाषण वाचून आम्हाला अगदी गलबलुन आणि भडभडून आले आहे. दुर्लक्षित पँथर तर्फे माननीय अदिती ह्यांना एक नऊवारी साडी, नथ, सत्य साईबाबांची दिव्य अंगठी आणि 'भांगेतील तुळस' ह्या चित्रपटाची व्हिसीडी देऊन गौरवण्यात येत आहे. तर माननीय मृगनैनीजी ह्यांना 'गॅलो' ची एक झिन्फाडेल वाईन, सिक्स पॉकेट जीन्स आणि 'न सांगता अंधश्रद्धा सोडवा' ह्या कार्यक्रमाची मेंबरशीप देऊन गौरवण्यात येत आहे. हे संभाषण वाचून फटाक्यांच्या आशेने आलेल्यांच्या पदरात काटे पडल्याने त्यासर्वांना एकेक हनुमान चड्डी व स्त्री असल्यास शिफॉनची साडी देऊन सांत्वन करण्यात येत आहे. धन्यवाद. परादास आठवले अध्यक्ष संस्थापक दुर्लक्षित पँथर मिसळपाव शाखा

In reply to by परिकथेतील राजकुमार

_/\_

In reply to by परिकथेतील राजकुमार

पराशेठला कुणीतरी फोन करा!!! चक्क आयडी हॅक झालाय. ;-) हा आवाज बिलकुल ओळखीचा नाहीय. शब्द तर बिलकुलच नाहीत. नक्की पुण्‍यातूनच ऑपरेट होताय ना?

In reply to by परिकथेतील राजकुमार

च्यायला, हे बेणं सुधरायचं नाही. _/\_ यकु, फोन केला. "आप जिस नंबरसे संपर्क करना चाहते हो, वो फिलहाल संपर्कक्षेत्रसे बाहर है. कृपया थोडी देर बाद संपर्क करे..." !!

In reply to by श्रावण मोडक

=)) =)) =)) हम्म. दीड वाजलाय फक्त श्रामो ऽ! चला आता पराशेठचे कॅरेक्टरच हॅक करावे म्हणतो. काय मजा येईल तिच्यायला ;-)

In reply to by परिकथेतील राजकुमार

भाषण वाचून आम्हाला अगदी गलबलुन आणि भडभडून आले आहे. >>. आम्हाला ही, आशा काळे नवयुगात आणि सई ताम्हणकर ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट जनरेशन मध्ये जावुन एकमेकांशी गप्पा मारत आहेत असे वाटुन गेले ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

परादास आठवले'जी _/\_ स्विकारा!!हसून हसून पुरेवाट झाली!!!

In reply to by परिकथेतील राजकुमार

सौजन्य सप्ताह असल्या कारणाने आम्ही यावेळी काही न बोलणेच्च उचित ठरेल... :) ऑलरेडी इयर एन्डिन्ग आणि अप्र्राईझलचे टेन्शन आहे.... :| :| बाकी काडीलाव्या पर्याला _/\_ ;) आणि बाकी आमच्या सर्व सुहृदांना- पक्षी : प्यारे'जी, सुहास'जी, स्नेहाराणी'जी... सगळ्यांनाच _/\_ अर्थात काही झाले... तरी आपली मैत्री आणि युती कायम राहील... व आमची मूलतत्वे ( पक्षी: बेसिक मूल्ये) देखील त्यान्च्या जागी अढळ आहेत... :) गुरु-शुक्र युतीचा विजय असो!!! जय भीम.. जय अर्जुन ...जय बिभिषण ...जय परशुराम !

In reply to by परिकथेतील राजकुमार

_/\_ इथली जुगलबंदी वाचून पडोसन मधले 'एक चतुर नार' आठवले. (ये सूर किधर गया जी, अय्यो फिर भटकाया, हम छोडेगा नही जी, हम पकडके रखेगा जी ...)

In reply to by परिकथेतील राजकुमार

वरील संभाषण वाचून आम्हाला अगदी गलबलुन आणि भडभडून आले आहे.
वरील वाक्याचा उत्तरार्ध सवयीप्रमाणे "..वाचून एक मिपाकर म्हणून शरम वाटली" असा वाचला. ;-) पर्‍यासारख्यांवर अशी ओळ लिहण्याची वेळ यावी हे पाहून मला एक मिपाकर म्हणून शरम वाटली हे जाता जाता नोंदवतो!

In reply to by परिकथेतील राजकुमार

नथ, सत्य साईबाबांची दिव्य अंगठी आणि 'भांगेतील तुळस' ह्या चित्रपटाची व्हिसीडी योग्य पॅकेजिंग आणि मार्केटींग करून विकल्यास येणार्‍या पैशात उच्चभ्रू कॅब्रेने सुव्हिन्यूच्या (३.१४) बाटल्या आणि त्याबरोबर खायला फ्रेंच चीजचे (३.१४) डबे येतील. नऊवारी साडी कापून त्यात सामान्य आकाराचे पाच-सात ड्रेसेसही मावतील. डील डन. अवांतरः भरणी नक्षत्रात माझी आवडती गुरूत्वीय भिंग सिस्टम आहे. भरणी नक्षत्र अश्विनीच्या उत्तर-पूर्वेला, समद्वीभुज त्रिकोणासारखं दिसतं, जोकरच्या टोपीसारखं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे तुम्ही तयार्र केलेलं चित्र कागदावर उतरवून आणि होकायंत्र घेऊन टेरेसवर गेले होते.काय बी दासाल न्हाही.सगळे तारे सारखेच. लाल मंगल्वागैरेही दिसलं नाही.हे सगळ तुम्ही दुर्बिणीतून बघितलं काय? :( या आधीही एकदा कॉलेजमध्ये असताना सकाळमध्ये एक लेख यायचा आणि त्याप्रमाणे आकाशच चित्रही यायचं.तो नकाशा दिशा जुळवून डोक्यावर धरून बघायचा.तसं हि काही वेळा केल होत.पण तेव्हाही काही दिसलं नाही. :( पण आकाशातले एका रेशेतले तीन तारे मला नेहमी दिसतात.त्यांना काहीतरी नाव पण आहे. o o o पण मुंबईच्या आणि हैदराबादच्या तारांगणात सगळ नीट बघितलाय.

In reply to by किचेन

हे तुम्ही तयार्र केलेलं चित्र कागदावर उतरवून आणि होकायंत्र घेऊन टेरेसवर गेले होते.काय बी दासाल न्हाही.सगळे तारे सारखेच. लाल मंगल्वागैरेही दिसलं नाही.
अगदी अगदी!! मीसुद्धा असाच प्रयत्न करून पाहिला पण मला तर तारेही दिसले नाहीत. आकाशात सगळा धूसरपणा दिसला. तू कसंकाय पाहिलंस गं अदिती? इथे नीट तपशीलवार सांगशील का?

In reply to by स्मिता.

सध्या सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात पहाल तर दोन तेजस्वी, पांढरे ठिपके दिसतील. (सूर्यास्तानंतर अर्ध्या तासात पश्चिम दिशा ओळखायला शक्यतोवर त्रास होऊ नये.) संधीप्रकाशातही गुरू आणि शुक्र दिसतात. त्यातला पश्चिम क्षितीजाजवळ जो दिसतो आहे तो गुरू. शुक्र त्यापासून साधारण ८-१० अंशावर असेल. आकाशात १ अंश म्हणजे किती? हात ताणून लांब करा आणि डोळ्यांसमोर धरा. एका बोटाची जाडी म्हणजे एक अंश. सूर्य आणि पौर्णिमेच्या चंद्राचा व्यास अर्धा अंश एवढा असतो. हात ताणून उभा धरल्यास अंगठा आणि करंगळीतलं अंतर म्हणजे साधारणतः ५-६ अंश. एक वीत ताणल्यास साधारण २० अंश. क्षितीजापासून ध्रुवतारा मुंबई-पुण्यातून एक वीत अंतरावर, ~ १८ अंशावर दिसतो. गुरू आणि शुक्र ओळखण्यात गडबड होणार नाही असं वाटतं. (संध्याकाळी दुकानं, जॉगिंग ट्रॅक ऐवजी रम्य ठिकाणी फिरायला गेल्यास तिथे बरेच लोकं आकाशात गुरू-शुक्राकडे बघताना दिसतात. त्यावरून एक अंदाज.) गुरूकडे तोंड केल्यास त्याच्या उजव्या बाजूला (उत्तरेला), साधारण २-३ अंशांवर अश्विनी नक्षत्र दिसते. हे तारे साधारणतः ध्रुव तार्‍यापेक्षा थोडेसे अधिक तेजस्वी आहेत. भरणी नक्षत्रातले तारे (आडव्या जोकरच्या टोपीसारखे, समद्विभुज त्रिकोण) त्याहीपेक्षा फिकट आहेत. साधारण सूर्यास्तानंतर अर्धा-पाऊण तासाने मंगळ पूर्व क्षितीजावर दिसतो आहे. किंचित पिवळट लाल रंगाचा तारा त्या बाजूला आकाशात नाही. प्रदूषण जास्त असेल तर पिवळा रंग जास्त दिसेल. पण माणसा-माणसाला जाणवणारे रंग वेगळे असतात. त्यामुळे रंगांच्या नावांच्या बाबतीत जरा सावध असणे उत्तम. सध्या मी ही अ‍ॅक्टीव्हली पॉप्युलरायझेशन करत नसल्यामुळे मलाही थोडं खोदकाम करूनच बघावं लागेल कोणते ग्रह कोणत्या नक्षत्र/राशीत आहेत ते. (स्मिता, तुझ्याकडे आकाशात ढग नाहीत ना याची खात्री करून घे. ;-) ढगांतून ग्रह-तारे बघायचे असतील तर एकत्रच बघू, फ्रेंच चीज आणि वारूणी मलाही आवडतात.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

डिट्टेलवार माहितीकरता धन्यवाद! कॉलेजात असताना काही हौशी लोकांनी 'अ‍ॅस्ट्रॉनॉमी क्लब' सुरू केला होता तेव्हा २-४ वेळा रात्री उशीरापर्यंत थांबून अवकाश निरिक्षण केलंय, पण तेवढंच. गुरू-शुक्र ओळखता येतात (आकाशात तेवढेच दोन तेजस्वी ग्रह दिसतात). बाकी नक्षत्र किंवा तारकासमूह म्हणशील तर मृग नक्षत्र, समद्विभुज त्रिकोण (तो भरणी नक्षत्रात असतो ते आता कळलं) आणि सप्तर्षी सोडल्यास बाकी काही ओळखता येत नाही. (इकडे आकाशात केव्हाही ढग असतातच. पण सध्या वसंतातली छान गुलाबी थंडी असल्याने 'ढगातून' तारे बघायला वेलकम!)

In reply to by मृगनयनी

>>पण व्यास *अर्धवट* असेल... तर त्याची त्रिज्या होते ना!!!!! कोटी बरी आहे. पण याआधी ऐकली आहे. बाकी बरेच काही बोलायचे होते पण पर्‍यानं आधीच हनुमानचड्डी देउन आमची अडचण करून ठेवली आहे. तेव्हा असो. आपल्या मताचा आदर आहेच. शुभेच्छा.. सोकाजींची जालीय राजकारणातील अल्पावधीतच केलेली प्रगती नेत्रदीपक आहे असे जाताजाता नोंदवतो. ;)

चला, कुणीतरी त्या ' निरागसता जपा सप्ताहाची ' नांदी वाजवा बरं पटकन! धमालदादा बारामतीकरांनी फेटा वगैरे बांधून डफासहीत मंचावर येण्याची विनंती करण्यात येते.. धमालदादा बारामतीकर.. अटेंशन प्लीज.

In reply to by यकु

निरागसता की सौजन्य रे यकु? ट्यार्पी कसा वाढायचा रे अशानं? सासू म्हणे सुनेला, नको स्वयंपाक करु, दमली असशील. सून म्हणे सासूला, करते की मी, तू तरी किती कामं करशील! . . . . हे असं गोग्गोड एखाद दिवस ठीक हो! भांडा सौख्यभरे... पावर्ड बाय यकु इन्दोरवाले ;)

In reply to by प्यारे१

प्‍यार्‍या, तुझ्या पाठीवर एकामागून एक 'दोन' लाटण्‍यांचे वळ उमटायला काहीच हरकत नाही ;-) असू दे की काय असायचं ते.. तु बी लय ताणतो राव.. (शांतीदूत) शेंबडा यक्कू 3.14 मिनिटांची समझौता सुपर एक्स्प्रेस स्टेशनवर येत आहे .. प्रवाशांनी प्लॅटफॉर्मपासून दूर उभे रहावे.. ;-)

In reply to by यकु

>>3.14 मिनिटांची समझौता सुपर एक्स्प्रेस स्टेशनवर येत आहे .. प्रवाशांनी प्लॅटफॉर्मपासून दूर उभे रहावे.. येवढं स्पेसिफिक टायमिंग ?? एक्स्प्रेस सेंट्रलची म्हणायची का वेस्टर्नची ??

In reply to by सूड

__/\__ येवढं स्पेसिफिक टायमिंग ?? एक्स्प्रेस सेंट्रलची म्हणायची का वेस्टर्नची ?? =)) =)) =)) सुड्क्या लैच माजलास बे पुण्याला जाऊन किती बाजार उठवशील

In reply to by स्पा

म्हणजे ? यात काय बाजार उठवला मी ? हल्ली एक्स्प्रेसची चौकशी करायची पण सोय नाही. काय दिवस आलेत. >>लैच माजलास बे पुण्याला जाऊन त्याला 'पुण्यकविषय' म्हणायचं, अभिमान हवा. पुणं बोलून स्टेटस घालवू नकोस. बाकी माजण्याचे कॉपीराईट्स मुंबैकरांकडे नाहीत अशी बातमी मिळते.

In reply to by प्यारे१

>>तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक तरी नाही तर डिले तरी.... ते जे मेगाब्लॉक वैगरे होतात ते म्हणे प्रवाशांच्या सोयीसाठी असतं. खरंखोटं बघायला कोण जातंय म्हणा. ;)

In reply to by सूड

तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक तरी नाही तर डिले तरी.... ते जे मेगाब्लॉक वैगरे होतात ते म्हणे प्रवाशांच्या सोयीसाठी असतं. खरंखोटं बघायला कोण जातंय म्हणा. खीक्क खीक्क खीक्क ! ;) हा धागा "जनजागॄती "करणारा दिसतोय ! ;) चला माझ्या मिपा ग्रहावरच्या ३ घटीका संपलेल्या दिसत आहेत.पुढची घटीका येई पर्यंत... नारायण ! नारायण ! ;) जाता जाता :- अगं मॄग्गा तुला उथळ पाण्याला खळखळाट फार ही म्हण ठावुक असेलच नै ? ;)

In reply to by मदनबाण

मदनबाण'जी... :) हा धागा सौजन्यपूर्ण जनजागृती करणारा आहे.. :) ;) ;) आंणि उथळ पाण्याला कितीही खळखळाट असला... तरी ते "उथळ" असल्यामुळे (पर्यायाने ते जास्त खोल नसल्याने) जास्तीत जास्त गुडघ्यापर्यन्तच येते... त्यामुळे याचा एक फायदा असा.. की यामध्ये "बुडण्याची" शक्यता अजिबात नसते. तसेच अश्या पाण्यात आपण अनेक खेळ खेळू शकतो.. उदा.: पकडापकडी, विषामृत, आन्धळी कोशीम्बीर, रन्गपन्चमी, इ... तसेच अश्या पाण्यात "लन्गडी" खेळण्याचा अनुभव काही औरच असतो... अर्थात समुद्राची मजा जरी या पाण्याला नसली.. तरी एकदा या पाण्यात खेळायला लागल्यावर या पाण्याचा खळखळाट आपल्याला सुमधुर आणि हवाहवासा वाटतो.... अजून एक फायदा... म्हणजे असे पाणी कुठेही अ‍ॅव्हेलेबल होते... किन्वा आपण स्वतःच एखादा छोटासा टॅन्क बान्धून किन्वा स्विमिन्ग पूल बान्धून त्यात गुडघ्यापर्यन्त पाणी सोडू शकतो... मला अश्या पाण्यात धुळवड खेळायला खूप आवडते... :) ... कारण धुळवडीच्या दिवशी सगळ्या प्रकारचे रन्ग "एक" होऊन जातात.... बाकी मदनबाण... तू मिपा'ला ग्रह सम्बोधून तसेच स्वतःला नारदाच्या ठिकाणी प्रस्थापित करून "नारायण नारायण" म्हटल्यामुळे माझा तुझ्याप्रतिचा आदर वाढलेला आहे.... कारण नारदाचे प्रत्येक विधान हे पुढे घडणार्‍या घटनांची नान्दी असते!!!!! :) :)

समुद्र मंथन करून काही गाळीव उच्चभ्रू रत्ने निघाली अशी कथा कलियुगातील पुराणात वाचली होती. दुर्दैवाने ह्या रत्नांची पारख करणार्या दर्दी जोहरी वाचक वर्गाने अवतार समाप्ती घेतल्याने ह्या रत्नांना काचेच्या मण्यां सोबत नाइलाजाने संगत करावी लागते. आणि असंगांची संगत म्हणजे प्राणाशी गाठ हि म्हण माहित असून सुद्धा हा धोका पत्करून ते विहिरीकडे धाव घेतात

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

तुम्ही बुआ फारच स्पष्ट वक्ते आहात: असा प्रश्न खुलेआम विचारला- क्लास आणि मास ह्या प्रवृत्ती आभसी जगतात शिरल्याने अनेक जण मूक वाचक बनणे पसंत करतात कालांतराने ह्या भूतलावर विरंगुळा आणि मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध असल्याने मराठी संस्थळ बहिष्कृत करतात: तेव्हा सदर प्रतिसाद जुने स्कोर सेटल करण्यासाठी नसून व्यक्तीशः कोणाविरुद्ध नसून त्या प्रवृत्तीसाठी होता: कोणाला राखी तर कोणाला करन जोहर ;थापर आवडतात: एकमेकांच्या आवडीचा सन्मान केला तर क्लास आणी मास समुद्र आणि विहीर ह्यांच्यातील फरक आपोआप मिटेल: नाहीतरी आजच्या जमान्यात सिनेमा गृहात बाल्कनी आणि स्टोल इतिहास जमा झाले आहे: या चिमण्यांनो ;परत फिरा रे असे आवर्जून सांगावेसे वाटते:

झाले बहू, होतील बहू, परन्तू या सम हा (ही) मिसळपावची सर सध्या आंजावर असलेल्या एकाही मराठी साईटला नाही एवढे छातीठोकपणे सांगू शकतो. बाकी चालू द्या.