Skip to main content

एकल घाट

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 16/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
चालते आठवण उतरुन एकल घाट क्षण; विसरुन थांबे उसंत घेइ रहाट जन्मांच्या वेठी भावुकल्या भातुकल्या भेटी येती चंद्रासह उजवे उगवे रमण पहाट बागडे चांदणे; रास खेळती राती कांही न उरे तळहाती सरल्या अंती बहु शंख शिंपले आदळती ओघात कातरला अवघा लाट झेलुनी काठ पलकांतिल गाठी रमल फुलांची माला शमवी हृदयातिल विरही दारुण ज्वाला साकडे घालतो रोज नव्या स्वप्नांसाठी तुम्हि येत रहा नित करुन वाकडी वाट ............................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1559
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

परत एकदा अफाट रचना!!!
बागडे चांदणे; रास खेळती राती कांही न उरे तळहाती सरल्या अंती बहु शंख शिंपले आदळती ओघात कातरला अवघा लाट झेलुनी काठ
व्वाह... सुंदर!!

बहु शंख शिंपले आदळती ओघात कातरला अवघा लाट झेलुनी काठ या ओळिंवरुन हा घाट म्हणजे किनारा असावा