एकल घाट
चालते आठवण उतरुन एकल घाट
क्षण; विसरुन थांबे उसंत घेइ रहाट
जन्मांच्या वेठी भावुकल्या भातुकल्या भेटी येती
चंद्रासह उजवे उगवे रमण पहाट
बागडे चांदणे; रास खेळती राती
कांही न उरे तळहाती सरल्या अंती
बहु शंख शिंपले आदळती ओघात
कातरला अवघा लाट झेलुनी काठ
पलकांतिल गाठी रमल फुलांची माला
शमवी हृदयातिल विरही दारुण ज्वाला
साकडे घालतो रोज नव्या स्वप्नांसाठी
तुम्हि येत रहा नित करुन वाकडी वाट
............................अज्ञात
वाचने
1555
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
प्रतिक्रिया
पुणे नाशिक महामार्गावर घारगाव -डोळासणे जवळ हा एकल घाट आहे ब्वा. ;)
परत एकदा अफाट रचना!!!
बागडे चांदणे; रास खेळती राती कांही न उरे तळहाती सरल्या अंती बहु शंख शिंपले आदळती ओघात कातरला अवघा लाट झेलुनी काठव्वाह... सुंदर!!
कविता आवडली
आवडली कविता
छान..शब्द रचना
परत एकदा अफाट रचना!!!
अगदी असेच म्हणते... याशिवाय दुसरे शब्द नाहीत....
बहु शंख शिंपले आदळती ओघात
कातरला अवघा लाट झेलुनी काठ
या ओळिंवरुन हा घाट म्हणजे किनारा असावा
सुंदर आहे रचना.
पुणे नाशिक रोडवर घारगाव