मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकल घाट

अज्ञातकुल · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
चालते आठवण उतरुन एकल घाट क्षण; विसरुन थांबे उसंत घेइ रहाट जन्मांच्या वेठी भावुकल्या भातुकल्या भेटी येती चंद्रासह उजवे उगवे रमण पहाट बागडे चांदणे; रास खेळती राती कांही न उरे तळहाती सरल्या अंती बहु शंख शिंपले आदळती ओघात कातरला अवघा लाट झेलुनी काठ पलकांतिल गाठी रमल फुलांची माला शमवी हृदयातिल विरही दारुण ज्वाला साकडे घालतो रोज नव्या स्वप्नांसाठी तुम्हि येत रहा नित करुन वाकडी वाट ............................अज्ञात

वाचने 1554 वाचनखूण प्रतिक्रिया 7

परत एकदा अफाट रचना!!!
बागडे चांदणे; रास खेळती राती कांही न उरे तळहाती सरल्या अंती बहु शंख शिंपले आदळती ओघात कातरला अवघा लाट झेलुनी काठ
व्वाह... सुंदर!!