Skip to main content

काय करावे या किड्याला ?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 28/12/2011 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
काय करावे या किड्याला साला लिहिता लिहु देत नाही डोक्यात बरेच येत असते पण डोळ्यांना पाहु देत नाही. सुचत असते पान उघडल्यावर 'हे'...'हे'...लिहायचे.. पण बसले एकदा लिहायला की..ते-तेच का रहायचे..? :-( कुठे जातो विरुन एकदम लेखनाचा अट्टाहास..? का होतो मनात मात्र लिहुन झाल्या सारखा भास? या वैतागावर मी नक्की उपाय काय शोधू..? दुष्ट माझ्या या प्रतिभेला कुठल्या तळातुन खोदू? माहितीये मला तीही लाबाड माझ्या इतकिच आळशी आहे. खालच्या बाजुनी भोक पडलेली ती पाण्याची कळशी आहे. वरुन मेली भरलेली ती कल्पनांशी जुळते जमिनीवर टेकली,उचलली काय.. सारखी खालुन गळते. म्हणुनच साला होत असतो कल्पनांचा अव्याहत र्‍हास साठा मात्र होत नाही हाच आहे खरा त्रास...
काव्यरस

वाचने 3921
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

लै भारी भटजीबुवा.
वरुन मेली भरलेली ती कल्पनांशी जुळते जमिनीवर टेकली,उचलली काय.. सारखी खालुन गळते....
म्हणूनच म्हणतो बोळे लावा, तुंबू द्या जरा.

In reply to by प्रचेतस

@-म्हणूनच म्हणतो बोळे लावा, तुंबू द्या जरा. :bigsmile: तुमचे म्हणने ऐकतो मी बोळा लावतो...तुंबू द्या पण बोळा लावताना..बकिचे हसतात त्या साठी एक तंबु द्या.. :-D

In reply to by अत्रुप्त आत्मा

बाकीचे हसतात, हसू द्या, तंबु लावून तुंबु द्या तुंबल्यानंतर फटकन फुटेल, तुमची प्रतिभा झरझर झरेल.

In reply to by प्रचेतस

@-तुंबल्यानंतर फटकन फुटेल, तुमची प्रतिभा झरझर झरेल. >>> वरची कविता म्हणजे तुंम्हाला अपेक्षित परिणाम साधला गेल्याचे द्योतक आहे....त्या मुळे मला अता काही काळ भिजु द्या ;-)

म्हणुनच साला होत असतो कल्पनांचा अव्याहत र्‍हास साठा मात्र होत नाही हाच आहे खरा त्रास...
हे तर चांगलयं एका कल्पनेला चिकटून राहण्यापेक्षा सतत नवीन कल्पना करत राहणे चांगले नाही का??

In reply to by अत्रुप्त आत्मा

अरेच्च्चा !! हे राहीलच का इथं ? सॉरी हं ! आता पुढीलप्रमाणे वाचा - अरेरे !! फार वाईट वाटले ... काळजी घ्या आणि हो - कविता आवडली

झक्कास हो गुर्जी! ती प्रतिभा का कोण ती भेटली जणू तुम्हाला ;) वर पाभेंचीही पोच मिळाली! - (किंचीत काव्यप्रेमी) सोकाजी अवांतरः गाथा तंबाखूचीचं काय झाले?

In reply to by सोत्रि

@ती प्रतिभा का कोण ती भेटली जणू तुम्हाला>>> मला(ही) तसच वाटतय :-) @अवांतरः गाथा तंबाखूचीचं काय झाले?>>> अता अ-भंग लेखन करावे अश्या सुप्त विचारात आहे. ;-)