काय करावे या किड्याला
साला लिहिता लिहु देत नाही
डोक्यात बरेच येत असते
पण डोळ्यांना पाहु देत नाही.
सुचत असते पान उघडल्यावर
'हे'...'हे'...लिहायचे..
पण बसले एकदा लिहायला
की..ते-तेच का रहायचे..? :-(
कुठे जातो विरुन एकदम
लेखनाचा अट्टाहास..?
का होतो मनात मात्र
लिहुन झाल्या सारखा भास?
या वैतागावर मी नक्की
उपाय काय शोधू..?
दुष्ट माझ्या या प्रतिभेला
कुठल्या तळातुन खोदू?
माहितीये मला तीही लाबाड
माझ्या इतकिच आळशी आहे.
खालच्या बाजुनी भोक पडलेली
ती पाण्याची कळशी आहे.
वरुन मेली भरलेली
ती कल्पनांशी जुळते
जमिनीवर टेकली,उचलली काय..
सारखी खालुन गळते.
म्हणुनच साला होत असतो
कल्पनांचा अव्याहत र्हास
साठा मात्र होत नाही
हाच आहे खरा त्रास...
काव्यरस
वाचने
3921
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै भारी भटजीबुवा. वरुन मेली
ठिक हाय वल्लीशेठ..पण,,,,
In reply to लै भारी भटजीबुवा. वरुन मेली by प्रचेतस
तो बोळा बिळा काय लाउ नका,
In reply to ठिक हाय वल्लीशेठ..पण,,,, by अत्रुप्त आत्मा
बाकीचे हसतात, हसू द्या, तंबु
In reply to ठिक हाय वल्लीशेठ..पण,,,, by अत्रुप्त आत्मा
@-तुंबल्यानंतर फटकन
In reply to बाकीचे हसतात, हसू द्या, तंबु by प्रचेतस
ऐकदम झक्कास्,लै आवड्ली
मस्त!!!
...
अरेरे !!काही सुलभ
@-अरेरे !!काही सुलभ>>> पुढे
In reply to अरेरे !!काही सुलभ by मनीषा
अरेच्च्चा !! हे राहीलच का इथं
In reply to @-अरेरे !!काही सुलभ>>> पुढे by अत्रुप्त आत्मा
@अरेरे !! फार वाईट वाटले ...
In reply to अरेच्च्चा !! हे राहीलच का इथं by मनीषा
छान कल्पनेतले काव्य आहे.
मजेशीर कविता --टुकुल
झक्कास !
@ती प्रतिभा का कोण ती भेटली
In reply to झक्कास ! by सोत्रि