मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अखेर

अज्ञातकुल · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मी अडखळलो धडपडलो ठायी ठायी सांभाळ मुला रे सांगुन गेली आई ती प्राणपणाने लढली घन तिमिरात कष्टात गुंतली अथक राबली बाई मायेत गुंफुनी ऊब; गाइली अंगाई भेटलो कधी तिज अखेर; आठवत नाही वाढता वाढता वय गढले संसारात मन शिणले; अवचित वृद्ध पाहिली माई हरवल्या सावल्या हरले ऋण ओघात मी जडलो अंधारात जखडलो उणा पोरका आत ठरवून न ठरवूनही न घडले कांही निसटल्या क्षणांनो सांगा मज; मी कसा होउ उतराई.... .............अज्ञात

वाचने 1735 वाचनखूण प्रतिक्रिया 9

अत्रुप्त आत्मा 22/11/2011 - 20:29
शब्दात प्रतिक्रीया नोंदवायला तुमच्या कविते एवढीच प्रगल्भता आणी प्रतिभाही लागेल...ती माझेपाशी नाही. आपल्या ह्या काव्यांजलीस विनम्र अभिवादन

In reply to by अत्रुप्त आत्मा

मिसळलेला काव्यप्रेमी 23/11/2011 - 10:52
अगदी असेच म्हणायला आलो होतो!! अआ. माझ्या भावनांना शब्द दिल्याबद्दल आपले आभार!!

मनीषा 23/11/2011 - 07:24
(समृद्धी, प्रगतीचा हा शाप म्हणायचा की वास्तविकता ?) अतिशय सुंदर कविता !

विदेश 24/11/2011 - 09:10
ठरवून न ठरवूनही न घडले कांही निसटल्या क्षणांनो सांगा मज; मी कसा होउ उतराई.... आता शक्यच नाही .

राघव 30/11/2011 - 14:47
अगदी मनातून खोलवरून आल्यासारखे वाटले. एवढी सुंदर कविता वाचावयास दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. राघव