अखेर
मी अडखळलो धडपडलो ठायी ठायी
सांभाळ मुला रे सांगुन गेली आई
ती प्राणपणाने लढली घन तिमिरात
कष्टात गुंतली अथक राबली बाई
मायेत गुंफुनी ऊब; गाइली अंगाई
भेटलो कधी तिज अखेर; आठवत नाही
वाढता वाढता वय गढले संसारात
मन शिणले; अवचित वृद्ध पाहिली माई
हरवल्या सावल्या हरले ऋण ओघात
मी जडलो अंधारात जखडलो उणा पोरका आत
ठरवून न ठरवूनही न घडले कांही
निसटल्या क्षणांनो सांगा मज;
मी कसा होउ उतराई....
.............अज्ञात
वाचने
1735
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
प्रतिक्रिया
शब्दात प्रतिक्रीया नोंदवायला तुमच्या कविते एवढीच प्रगल्भता आणी प्रतिभाही लागेल...ती माझेपाशी नाही. आपल्या ह्या काव्यांजलीस विनम्र अभिवादन
In reply to या प्रतिभाशील काव्याला आमचा सलाम...! by अत्रुप्त आत्मा
अगदी असेच म्हणायला आलो होतो!! अआ. माझ्या भावनांना शब्द दिल्याबद्दल आपले आभार!!
छान कविता.
(समृद्धी, प्रगतीचा हा शाप म्हणायचा की वास्तविकता ?)
अतिशय सुंदर कविता !
ठरवून न ठरवूनही न घडले कांही
निसटल्या क्षणांनो सांगा मज;
मी कसा होउ उतराई....
आता शक्यच नाही .
सुंदर कविता.... :)
अतिशय सुंदर कविता !
कविता आवडलि.
अगदी मनातून खोलवरून आल्यासारखे वाटले.
एवढी सुंदर कविता वाचावयास दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
राघव
या प्रतिभाशील काव्याला आमचा सलाम...!