✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सुखी संसाराची सोपि वाटचाल

क
किचेन यांनी
Sun, 11/06/2011 - 18:23  ·  लेख
लेख
समोर २५ वर्षांची मुलगी बघितल्यावर बरेचदा चेहेर्यावर अविश्वासच दिसायचा! हिच्याकडून जमणार आहे का आपली मुलाच /मुळीच लग्न? मुळात हि आपल्या मुलापेक्षा वयाने लहान, हिला कितीस कळणार आहे? हाच अविश्वास माझा आत्मविश्वास बनला.समोर आलेल्या अनेकांनी माझ्याकडे नोदणी करायचं टळल, पण एकदा का त्यांच्या मुलाला अनुरूप मुली मिळवून दिल्या कि मग आपोआप नोंदणी करायचे आणि दुसर्या पालाकानाही घेऊन यायचे.मला कधी कधी गम्मत वाट्याची.पहिल्या भेटीत आणि आत्ताच्या भेटीत किती फरक झालाय या माणसात!जशी जशी लग्न ठरत गेली तसा तसा आत्मविश्वास आणखीन वाढला.माझ्यातही बराच बदल होता ! पूर्वी सिंहाचा चेहेरा घेऊन असायचे पण मनात मात्र उंदीरच दडलेला असायचा.आता जे चेहऱ्यावर आहे तेच मनातही.गेल्या २ वर्षात बराच काही बदललाय! अनेक मुल आणि मुली.जे लक्षात राहिलेत आणि ज्यांना विसरणं कठीण आहे.कधी अवाजवी अपेक्षांमुळे तर कधी पत्रिकेवर अति विश्वास.कधी बाह्य सौंदर्या तर कधी हवा मुलाला गल्लेलाठ्ठा पगार.काहींनी भरपूर विचार करून अपक्षांची एक चौकट मधून ठेवलेली.तर काहीहंनी काहीच विचार केलेला नसतो. सुन्न करून गेलेल्या अशा कितीतरी घटना आहेत. हुंड्यामुळे परत माहेरी आलेल्या नाममात्र घटस्फोटीत कविता.लग्नानंतर १५ दिवसातच हुंड्यासाठी जाच होऊ लागला.जीवावर बेतलं तेव्हा भावाने माहेरी परत आणल.सुंदर,सळस आणि नेहमी फ्रेश असणार्या कविताने लग्नाचा विचार सोडला.पण लहान भावाला तिची घुसमट कळत होती.त्याने तिला खूप समजावून माझ्याकडे आणली.योगायोगाने तेव्हाच एका घटस्फोटीत मुलाचे वडील बाहेर बसले होते.आमची केबिन मधली चर्चा त्यांनी ऐकली आणि माफ करा अस म्हणून आत आले.माझा मुलगा आत्ता बरोबर नाहीये पण उल्गी आमच्या अपेक्षेप्रमाणे आहे.माझ्या अंदाजाने २९ गुण जुळतील.हा मुलाचा फोटो म्हणून खिश्तून एक फोटो काढून दाखवला.पुढच्या रविवारी कविता आणि तिचा भाऊ लग्न ठरल्याची, आणि रेजीस्तर लग्न करत असल्याची बातमी घेऊन आले. राहुलची कथा वेगळीच.जागरण गोंधळ झाल्यावर सार्वजन जेजुरीला गेले.गाडी पार्क करून उतरतात तोच bayako ओळख करून 'हा माझा बबॉयफ्रेंड " अशी ओळख करून देते.दचकलेला राहुल आणि त्याचे आई वडील तिच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न करतात,पण त्यांना न जुमानता ती त्याच्याबरोबर बाईकवरून गेलेली असते.(लग्नात सासरकडून घातलेल्या मंगळसूत्र आणि चांदीच्या दागीण्यान्साहित).राहुल आता प्रत्येक मुलीशी किमान ३ वेळा घराच्या बाहेर भेट झाल्याशिवत पुढच मत सांगत नाही.अनेक आई-वडिलाना हे खटकत.पण राहुलचा निर्णय योग्य आहे.हे सगळ थोड्या-फार फरकाने अनेकांच्या बाबतीत घडलंय.कधी घटस्फोट होतो तर कधी मानाविरुध्ह संसार चालू राहतो.राहुलच्या धाकट्या भावाने 'मी लग्नच करणार नाही' अस आई बाबांना सागून ठेवलाय.त्या एका मुलीने पूर्ण घराच्या आनंदावर विरजण टाकलाय. यात दिलासा म्हणून माझी भेट झाली ती कौशलशी. कौशालच्या आणि त्याच्या आई-वडिलांच्या अपेक्षा माफक होत्या.बरेच जन आम्हाला काहीही नको पण तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे सोन घाला असे म्हणणारे असतात.पण कौशाल्चे आई-वडील आम्हाला काह्ही नको.आदितीची घारीची परिस्थिती बेताची असल्यामुळे लग्नाचा खर्ची दोघात वाटून घेण्याची त्यांची तयारी होती.आदितीची आणि कौशल सर्व बाबतीत एकमेकांना सुट करणारे होते.माझ्याकडून जमत असलेल हे पहिलाच लग्न.मला बैठकीसाठी आमंत्रण होत.सगळ काही सुरळीत चालू असताना कौशालच्या मामांनी सोन्याची साखळी आणि लोकेटची मागणी केली.मुलीकडचे आणि कौशल आणि त्याचे आई वडील जरा गोन्ध्लेले दिसले.सुपारी फोडून मुलाकडची मंडळी घरी गेली.मी आदितीच्या घरीच होते.कौशालच्या आईचा फोने आला."आग कीर्ती सोन वैगैरे काही नकोय आम्हाला.मुलगी सोन्यासारखी आहे तीच हवीये फक्त.पण मामा बोलून गेले.चार चौघात त्यांना काही बोलू शकलो नाही, पण आमची काहीच अपेक्षा नाही." भर लग्नात काही अडथला नको म्हणून कौशालच्या आई वडिलांनीच लग्नाआधी सोन्याची चेन आणि लोकेत आदितीच्या आई वडिलाना दिल आणि तेच लग्नात कौशाल्साठी द्यायला सांगितलं.लग्न निर्विघ्न पाने पार पडल.दोघांचा संसार सुखाचा चालू आहे. मी केबिनमध्ये असताना बाहेर मनीष आणि सीमाचे आई वडील थांबले होते.त्याचं हळू हळू बोलन सुरु झाल.एकमेकांची माहितीही कळली."पण हि मला पसंद करेल का? नाही करणार...त्यापेक्षा नकोच..."म्हणून त्याने तिचा विचार डोक्यातून काढला.३-४ दिवसानंतर सीमाच्या घर्च्यानीच विचारल तेव्हा मनीषच्या चेहऱ्यावरचा आनद ओसंडून वाहत होता. काळाने झडप ghalun आपल्या साथीदाराला नेले पण म्हातारपणाची काठी म्हणन बघितलेल्या मुलांनीही झिडकारले.अनेक ५५-६० चे वर मानसिक आधारासाठी दुसर्या लग्नाचा विचार करतात.पण घर्तून पाठींबा मिळत नाही.अनेक जन मुलांना प्रोपेतीतून बेदखल करण्याची तयारी दाखवतात.पण आपल्या समाजामध्ये अशा वधू मला अजून तरी सापडल्या नाहीत. आयुष्यभराचा जोडीदार हा कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे ह्याकडे नित लक्ष दिल जात नाही.अजूनही लग्न पत्रिका बघूनच होतात.आषाढात, पौष महिन्यात,पितृ पंधरवड्यात लग्नाची बोलणी होत नाही.नाशिक मध्ये जाऊन नागबलीसाठी २५-२५ हजार खर्च करणारे अनेक आई-वडील बघितलेत. अमुक तमुक shanti, बोटात विविधरंगी खडे.आणि अपेक्षांचे मोठ-मोठे डोंगर.वयाची ३५ वर्षे उलटली तरी कुठेही तडजोड करायला नकार देणारे वधू आणि वर.कितीही जाड मुलगा असला तरी त्याला सडपातळ मुलगीच हवी असते.१२ वी पास मुलीला इंजिनिअर मुलगाच हवा असतो!मुलीला ५,००० पगार असला तरीही मुलाला पन्नास हजार दरमहा हीच अप्केक्षा असते! मुलाचा अगदी व्यवस्थित व्यासाय असला तरी मुलाला नोकरी असं गरजेच आहे.मुलगा कितीही जबाबदार,हुशार,मनमिळावू असला तरी डोक्यावरचे गळालेले केसांमुळे त्याला नकार येत राहतो.जरा सावली मुलगी असली तरी तिला नकार येतच राहतो.स्वतः सापत्या घटस्फोटीत असेल तरी बायको मात्र विनाप्त्या घटस्फोटीत हवी.अपत्य असेल तर मुलगा अपत्य नको.आणखीनही बराच काही....मात्र हे सगळ बदलण्याची गरज आहे.आणि त्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत.घरी कांदापोहे आयोगीत करण्यापेक्षा ऑफिसमध्ये एकमेकांची ओळख करून दिल्यावर मुल-मुली एकमेकांशी जास्त मोकालेपान्ने बोलतात.तरुण पिढी बदलतीये पण जुनी पिढी आपली मत बदलायला तयार नाही.कसाही करा पण वधू-वरंचा शोध डोळसपणे करा.आपल्या अपेक्षा मांडण्याआधी एकदा मनाच्या आरशात स्वतःला जरूर पहा.भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.नांदा सौख्य भरे!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत
अनुभव

प्रतिक्रिया द्या
14259 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

सुरेख

टवाळ कार्टा
Sun, 11/06/2011 - 18:54 नवीन
अतिशय सुरेख मी सद्ध्या स्वता हे सगळे अनुभवतो आहे :)
  • Log in or register to post comments

बरं

मी-सौरभ
Sun, 11/06/2011 - 23:17 नवीन
टवाळपणा टाळावा असे सुचवतो!! ;) लवकर जमेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बरं

मी-सौरभ
Sun, 11/06/2011 - 23:17 नवीन
टवाळपणा टाळावा असे सुचवतो!! ;) लवकर जमेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अय्या तुम्ही लग्न जमवता

पियुशा
Mon, 11/07/2011 - 12:40 नवीन
अय्या तुम्ही लग्न जमवता ;) तुम्हाला इथे फार स्कोप आहे मग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

होय, यांचीच कमी होती, बाकी

५० फक्त
Mon, 11/07/2011 - 14:08 नवीन
होय, यांचीच कमी होती, बाकी लग्नाच्या पाकृमध्ये लागणारे सगळे आयटम सगळे आचारी, बँडवाले, भटजी , रांगोळी (साधी आणि फुलांची), दिवेवाले, हॉटेलवाले, डॉक्टर (एम्बिबिएस ते साहित्यिक ते धनगरी), व-हाडी, ज्योतिषी (नाडी आणि इलॅस्टिक) सगळे आहेतच इथं , आणि हो सगळ्यात महत्वाचे म्हणजे एलिजिबल आणि एडिटेबल बॅचलर आणि स्पिनस्टर पण आहेत. पण हे सगळे आयटम एकत्र करुन त्यात अंडे न घालता पाकृ करणा-याचीच कमी होती. एक शंका आहे - स्कोप आहे तो टेलि आहे का मायक्रो आहे का बायो आहे कि नॅनो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

धन्य आहात ५०राव.

प्रचेतस
Mon, 11/07/2011 - 14:31 नवीन
_/\_ धन्य आहात ५०राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

स्कोप आहे तो टेलि आहे का

पियुशा
Mon, 11/07/2011 - 17:14 नवीन
स्कोप आहे तो टेलि आहे का मायक्रो आहे का बायो आहे कि नॅनो ? ते त्या ताइना अन सर्वाना कळेणच लवकर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

''ते त्या ताइना अन सर्वाना

५० फक्त
Mon, 11/07/2011 - 19:14 नवीन
''ते त्या ताइना अन सर्वाना कळेणच लवकर '' तुमचं सुद्दलेकन तोढं तोढ शुदारत होत याधा ग्यावर य्वुन पुनासुदिक बिडगल ं बगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

अन्ड्याशी वैर का बर? संडे हो

किचेन
Tue, 11/08/2011 - 13:11 नवीन
अन्ड्याशी वैर का बर? संडे हो या मंडे अस म्हणतात न...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

एक शंका आहे - स्कोप आहे तो

किचेन
Tue, 11/08/2011 - 18:25 नवीन
एक शंका आहे - स्कोप आहे तो टेलि आहे का मायक्रो आहे का बायो आहे कि नॅनो ? टेली आहे.पदविका (electronics अंड telicommunication) बाकी लग्नाच्या पाकृमध्ये लागणारे सगळे आयटम सगळे आचारी, बँडवाले, भटजी , रांगोळी (साधी आणि फुलांची), दिवेवाले, हॉटेलवाले, डॉक्टर (एम्बिबिएस ते साहित्यिक ते धनगरी), व-हाडी, ज्योतिषी (नाडी आणि इलॅस्टिक) सगळे आहेतच इथं , आणि हो सगळ्यात महत्वाचे म्हणजे एलिजिबल आणि एडिटेबल बॅचलर आणि स्पिनस्टर पण आहेत. ठीक आहे तर ..सगळे मिळून आणखीन एक 'बंड बाजा बारात' बनवू ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

लवकरच मिपावर 'शुभमंगल सावधान'

मोहनराव
Tue, 11/08/2011 - 18:56 नवीन
लवकरच मिपावर 'शुभमंगल सावधान' असे सदर चालु होणार असं दिसतय तर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

वा वा!

पैसा
Sun, 11/06/2011 - 19:10 नवीन
मिसळपाववर स्वागत! तुमचा पहिला धागा पाहता तुम्ही खूपच फास्ट शिकताय. आणखी असेच अनुभव जरूर लिहा. वाचायला आवडतील!
  • Log in or register to post comments

+१ टु पैसातै, उजवीकडे मदतीचा

५० फक्त
Sun, 11/06/2011 - 19:20 नवीन
+१ टु पैसातै, उजवीकडे मदतीचा धागा आणि डावीकडे डायरेक्ट लिखाण, मजा आली,
  • Log in or register to post comments

वेगात प्रगती आहे! :-)

बहुगुणी
Sun, 11/06/2011 - 19:29 नवीन
नुकतंच मराठी टंकायला शिकलात, हे लक्षात घेता लेख उत्तमच झाला आहे, माहितीपूर्ण आहेच, आणखी लिखाण येउ द्यात. मिपावर स्वागत.
  • Log in or register to post comments

वेगात प्रगती आहे! हे वाक्य

यकु
Sun, 11/06/2011 - 19:37 नवीन
वेगात प्रगती आहे!
हे वाक्य "अजून जीव आहे!!* " असं ऐकू आलं... ;-) =)) =)) * म्हैस, पुलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

अच्रत

पैसा
Sun, 11/06/2011 - 19:57 नवीन
अच्र्त बव्ल्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

पाणी पाणी

पाषाणभेद
Mon, 11/07/2011 - 01:51 नवीन
पाणी पाणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

वाह क्या बात!

आनंदी गोपाळ
Sun, 11/06/2011 - 23:01 नवीन
+१ पैसा ताई. --- किचेन ताई लेखावरून अंदाज बांधायचा तर तुम्ही विवाहविच्छेदितांसाठी मॅरेजब्यूरो सारखे काही तरी काम करता असे दिसते. ते नक्की काय? तुम्ही मांडलेला विषय वेगळा अन चांगला आहे. यावर चांगली चर्चा वाचायला मिळणे अपेक्षित आहे. मिपावर स्वागत.
  • Log in or register to post comments

Keep it up.

मन१
Sun, 11/06/2011 - 23:39 नवीन
Keep it up. छान लिहिताय.
  • Log in or register to post comments

पुलेशु लिहायचे विसरु नकोस,

अन्या दातार
Mon, 11/07/2011 - 00:11 नवीन
पुलेशु लिहायचे विसरु नकोस, नंतर तुला फायदाही होऊ शकतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

नको बे...

मन१
Mon, 11/07/2011 - 07:11 नवीन
"फायदाही होउ शकतो " म्हणजे काय? मॅरेज काउन्सिलरकडे जाउन एकापेक्षा अधिक वेळेस "फायदा" झाला तर ती प्रत्यक्षाअतली डोकेदुखीच नव्हे काय? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

हे पुलेशु काय आहे.तसं मिपा

किचेन
Tue, 11/08/2011 - 13:14 नवीन
हे पुलेशु काय आहे.तसं मिपा परेच महिन्यांपासून वाचतीये पण हा शब्द कधी वाचल्याचे आठवत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

पुलेशु - पुढील लेखास

मोहनराव
Tue, 11/08/2011 - 15:15 नवीन
पुलेशु - पुढील लेखास शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

आणि पुलशु म्हणजे पुढील लग्नास

५० फक्त
Tue, 11/08/2011 - 19:02 नवीन
आणि पुलशु म्हणजे पुढील लग्नास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

=)) =)) =)) =))

मोहनराव
Tue, 11/08/2011 - 19:17 नवीन
=)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

लेखन आवडले. अवघड वाटतं हे

रेवती
Mon, 11/07/2011 - 07:05 नवीन
लेखन आवडले. अवघड वाटतं हे सगळं.
  • Log in or register to post comments

आमच्या काळीसुद्धा मी लग्न

शिल्पा ब
Mon, 11/07/2011 - 07:38 नवीन
आमच्या काळीसुद्धा मी लग्न करायच्या आधी बरेच मुलगे पाहीले...शेवटी तर अगदी वय वाढलेलं म्हणजे चक्क २२ झालं तेव्हा घटस्फोटीत, वयाने खुप मोठे वगैरेसुद्धा पाहीले. शेवटी यांना भेटले तेव्हा आमच्या विचारधारा जुळल्या (अन हुंडा पण नको म्हणाले, म्हणजे फक्त शास्त्रापुरता म्हणुन १०१ दिले )म्हणुन जुळलं...मुलं मोठी झाल्यावर आता मागे वळुन पहाताना मजा वाटते. हल्ली सगळंच अवघड आहे. सगळ्यांना सगळं कसं परफेक्ट पैजे...ते कसं जमायचं. पण तुम्ही २५व्या वर्षी स्वत:च लग्न जमवायचं सोडुन इतरांना मदत करताय हे वाचुन मनास आनंद जाहला.
  • Log in or register to post comments

i la!

आनंदी गोपाळ
Tue, 11/08/2011 - 00:08 नवीन
धारा जुळल्या? अन "मुलं मोठी झाल्यावर आता मागे वळुन पहाताना मजा वाटते." अजून वळता येतं तुम्हाला?? पर्फेक्ट हा! कठीणचै नै का? (वळवळ करण्यात आनंदी) गोपाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

माझ वय तेव्हा २५ होत आत्ता २७

किचेन
Tue, 11/08/2011 - 13:01 नवीन
माझ वय तेव्हा २५ होत आत्ता २७ आहे आणि माझ लग्न झालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

:(

वपाडाव
Tue, 11/08/2011 - 16:17 नवीन
सुन्न !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

+ १

दादा कोंडके
Tue, 11/08/2011 - 17:23 नवीन
मस्त पाकृ. या विकांतालाच करुन बघतो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

??

स्मिता.
Tue, 11/08/2011 - 20:27 नवीन
किचेनचे लग्न झालेय यात वपाडावला सुन्न होण्यासारखे काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

काळ बदलला आहे तै...

धन्या
Tue, 11/08/2011 - 22:05 नवीन
काळ बदलला आहे तै...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

*

मदनबाण
Mon, 11/07/2011 - 10:58 नवीन
*
  • Log in or register to post comments

शिल्पातै नी म्हणल्याप्रमाणे

५० फक्त
Mon, 11/07/2011 - 11:53 नवीन
शिल्पातै नी म्हणल्याप्रमाणे ''पण तुम्ही २५व्या वर्षी स्वत:च लग्न जमवायचं सोडुन इतरांना मदत करताय हे वाचुन मनास आनंद जाहला.' रेवतीआजै, गोदाकाकु, अपर्णातै यांचं एक काम किती हलकं झालं नाय,, चला एक आभाराचा प्रतिसाद टाका कुणीतरी आणि बाकिच्यांनी + १ , + १० , + १०० असे उपपत्रिसाद् द्या त्याला.
  • Log in or register to post comments

तुमचा पाय बरा दिसतोय

रेवती
Mon, 11/07/2011 - 19:01 नवीन
तुमचा पाय बरा दिसतोय आता!;) आनंदानं प्रतिसाद देताय म्हणून विचारतिये. बाकी या वयात माझं काम हलकं केलं कोणी तर आनंदच आहे.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

'बाकी या वयात माझं काम हलकं

५० फक्त
Mon, 11/07/2011 - 19:15 नवीन
'बाकी या वयात माझं काम हलकं केलं कोणी तर आनंदच आहे.'' असं कसं असं कसं, मग मंगलाष्टकं कोण करणार, त्याला चाली कोण लावणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

असं म्हणताय्.........बरं,

रेवती
Mon, 11/07/2011 - 19:25 नवीन
असं म्हणताय्.........बरं, म्हणते मंगलाष्टकं! जरा आवाज कापतो माझा पण तुमचा इतका आग्रहच दिसतोय तर .........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

>>जरा आवाज कापतो माझा .... मग

अन्या दातार
Mon, 11/07/2011 - 22:11 नवीन
>>जरा आवाज कापतो माझा .... मग तर काय विचारु नका. मंगलाष्टका म्हणायला तुम्हीच एकदम परफेक्ट :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मुहुर्त टळतो की काय अशी भिती

रेवती
Tue, 11/08/2011 - 00:21 नवीन
मुहुर्त टळतो की काय अशी भिती डोळ्यात दाटलेले वधुवर तरी आठवा. का त्यांच्याशी वैर घेताय?;) अकमी आत्या, तमकी मावशी किंवा आज्जी वगैरे पब्लिक ठेवणीतल्या आवाजाने वर्‍हाडी मंडळींना मंत्रमुग्ध करतायत असा देखावा डोळ्यासमोर तरळला. लोक चुळबुळ करत घड्याळाकडे कटाक्ष टाकत असतात. त्यांच्या शिव्या खायला माझी बळीची बकरी करताय.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

होय होय वधुवर लग्नाला भटजी

५० फक्त
Tue, 11/08/2011 - 10:26 नवीन
होय होय वधुवर लग्नाला भटजी लग्न आटोपुन घाटावर जायला व-हाडी त्या त्या गावातल्या बाजारपेठेत जायला अन पाकिट देउन पहिल्या पंगतीला जेवुन ऑफिस गाठायला सगळे अगदी अगदी ताटकळत असणार ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मंगलाष्टक वाल्यांचा भारी राग

किचेन
Tue, 11/08/2011 - 13:06 नवीन
मंगलाष्टक वाल्यांचा भारी राग येतो मला.एक तर ते काय गातायत हे ते सोडून दुसर्या कोणाला कळत नाही, आणि आपण हे का एकतोय हे आपल्याला कळत नाही.मला "ताराबलं चाद्रबलम " ऐकल्यावर मला सुटले एकदाची अस म्हणावस वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

<<मंगलाष्टक वाल्यांचा भारी

मोहनराव
Tue, 11/08/2011 - 15:25 नवीन
<<मंगलाष्टक वाल्यांचा भारी राग येतो मला.एक तर ते काय गातायत हे ते सोडून दुसर्या कोणाला कळत नाही>> मी अशा वेळी मंगलाष्टक ऐकण्यापेक्षा हातातल्या अक्षता नेम धरुन कुणातरी ट्कल्यावर नाहीतर दोस्तांवर, बावचळलेल्या वरावर ट्पाटप मारत बसतो, तेवढाच टाइमपास!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

वेगवेगळे अनुभव छान मांडलेत.

नगरीनिरंजन
Tue, 11/08/2011 - 11:35 नवीन
वेगवेगळे अनुभव छान मांडलेत. जेजुरीचा किस्सा वाचून धक्का बसायला नको पण बसला. लग्नाच्या बाजारातले आणखीही किस्से आणि त्यावरचे भाष्य वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

जेजुरीचा किस्सा ' हनिमुन

५० फक्त
Tue, 11/08/2011 - 11:56 नवीन
जेजुरीचा किस्सा ' हनिमुन ट्रॅव्हल्स प्रा लि' मध्ये आहे, दिया मिर्झा आणि अर्जुन रामपाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

हो.

नगरीनिरंजन
Tue, 11/08/2011 - 12:21 नवीन
पण त्या पिक्चरमध्येही तो फार आचरटपणा वाटला होता. प्रत्यक्षात असं झालं असेल तर बिनडोकपणाची आणि निगरगट्टपणाची कमालच म्हणायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आचरट्पणा, ननि फारच सभ्य शब्द

५० फक्त
Tue, 11/08/2011 - 14:08 नवीन
आचरट्पणा, ननि फारच सभ्य शब्द वापरलात, असे प्रकार होत असतील तर ऑनर किलिंग योग्य आहे असं वाटायला लागतं,. या पेक्षा आयझेड प्रकार होता तो हम दिल दे चुके सनम,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

नंदिनी

वपाडाव
Tue, 11/08/2011 - 16:22 नवीन
या पेक्षा आयझेड प्रकार होता तो हम दिल दे चुके सनम !
<अजय देवगण मोड ऑन> " झुट बरदाश्त नही है, मैने कहाँ था.... झुट बरदाश्त नही है ! " <अजय देवगण मोड ऑफ>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

झुट बरदाश्त नही है, मैने कहाँ

धन्या
Tue, 11/08/2011 - 22:11 नवीन
झुट बरदाश्त नही है, मैने कहाँ था.... झुट बरदाश्त नही है !
बास. फक्त एव्हढंच. बाकी मग तू काहीही काशी घाल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

सुरुवातीला मलाही बसला होता,

किचेन
Tue, 11/08/2011 - 13:09 नवीन
सुरुवातीला मलाही बसला होता, पण अश्या अनेक मुली आहेत ज्या लग्नानंतर ५ ते १० दिवसात पळून गेल्यात.आता माझ मन बर्यापैकी कठोर झालाय.नाममात्र घटस्फोटीत!:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा