सुखी संसाराची सोपि वाटचाल
समोर २५ वर्षांची मुलगी बघितल्यावर बरेचदा चेहेर्यावर अविश्वासच दिसायचा! हिच्याकडून जमणार आहे का आपली मुलाच /मुळीच लग्न? मुळात हि आपल्या मुलापेक्षा वयाने लहान, हिला कितीस कळणार आहे? हाच अविश्वास माझा आत्मविश्वास बनला.समोर आलेल्या अनेकांनी माझ्याकडे नोदणी करायचं टळल, पण एकदा का त्यांच्या मुलाला अनुरूप मुली मिळवून दिल्या कि मग आपोआप नोंदणी करायचे आणि दुसर्या पालाकानाही घेऊन यायचे.मला कधी कधी गम्मत वाट्याची.पहिल्या भेटीत आणि आत्ताच्या भेटीत किती फरक झालाय या माणसात!जशी जशी लग्न ठरत गेली तसा तसा आत्मविश्वास आणखीन वाढला.माझ्यातही बराच बदल होता ! पूर्वी सिंहाचा चेहेरा घेऊन असायचे पण मनात मात्र उंदीरच दडलेला असायचा.आता जे चेहऱ्यावर आहे तेच मनातही.गेल्या २ वर्षात बराच काही बदललाय!
अनेक मुल आणि मुली.जे लक्षात राहिलेत आणि ज्यांना विसरणं कठीण आहे.कधी अवाजवी अपेक्षांमुळे तर कधी पत्रिकेवर अति विश्वास.कधी बाह्य सौंदर्या तर कधी हवा मुलाला गल्लेलाठ्ठा पगार.काहींनी भरपूर विचार करून अपक्षांची एक चौकट मधून ठेवलेली.तर काहीहंनी काहीच विचार केलेला नसतो. सुन्न करून गेलेल्या अशा कितीतरी घटना आहेत.
हुंड्यामुळे परत माहेरी आलेल्या नाममात्र घटस्फोटीत कविता.लग्नानंतर १५ दिवसातच हुंड्यासाठी जाच होऊ लागला.जीवावर बेतलं तेव्हा भावाने माहेरी परत आणल.सुंदर,सळस आणि नेहमी फ्रेश असणार्या कविताने लग्नाचा विचार सोडला.पण लहान भावाला तिची घुसमट कळत होती.त्याने तिला खूप समजावून माझ्याकडे आणली.योगायोगाने तेव्हाच एका घटस्फोटीत मुलाचे वडील बाहेर बसले होते.आमची केबिन मधली चर्चा त्यांनी ऐकली आणि माफ करा अस म्हणून आत आले.माझा मुलगा आत्ता बरोबर नाहीये पण उल्गी आमच्या अपेक्षेप्रमाणे आहे.माझ्या अंदाजाने २९ गुण जुळतील.हा मुलाचा फोटो म्हणून खिश्तून एक फोटो काढून दाखवला.पुढच्या रविवारी कविता आणि तिचा भाऊ लग्न ठरल्याची, आणि रेजीस्तर लग्न करत असल्याची बातमी घेऊन आले.
राहुलची कथा वेगळीच.जागरण गोंधळ झाल्यावर सार्वजन जेजुरीला गेले.गाडी पार्क करून उतरतात तोच bayako ओळख करून 'हा माझा बबॉयफ्रेंड " अशी ओळख करून देते.दचकलेला राहुल आणि त्याचे आई वडील तिच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न करतात,पण त्यांना न जुमानता ती त्याच्याबरोबर बाईकवरून गेलेली असते.(लग्नात सासरकडून घातलेल्या मंगळसूत्र आणि चांदीच्या दागीण्यान्साहित).राहुल आता प्रत्येक मुलीशी किमान ३ वेळा घराच्या बाहेर भेट झाल्याशिवत पुढच मत सांगत नाही.अनेक आई-वडिलाना हे खटकत.पण राहुलचा निर्णय योग्य आहे.हे सगळ थोड्या-फार फरकाने अनेकांच्या बाबतीत घडलंय.कधी घटस्फोट होतो तर कधी मानाविरुध्ह संसार चालू राहतो.राहुलच्या धाकट्या भावाने 'मी लग्नच करणार नाही' अस आई बाबांना सागून ठेवलाय.त्या एका मुलीने पूर्ण घराच्या आनंदावर विरजण टाकलाय.
यात दिलासा म्हणून माझी भेट झाली ती कौशलशी. कौशालच्या आणि त्याच्या आई-वडिलांच्या अपेक्षा माफक होत्या.बरेच जन आम्हाला काहीही नको पण तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे सोन घाला असे म्हणणारे असतात.पण कौशाल्चे आई-वडील आम्हाला काह्ही नको.आदितीची घारीची परिस्थिती बेताची असल्यामुळे लग्नाचा खर्ची दोघात वाटून घेण्याची त्यांची तयारी होती.आदितीची आणि कौशल सर्व बाबतीत एकमेकांना सुट करणारे होते.माझ्याकडून जमत असलेल हे पहिलाच लग्न.मला बैठकीसाठी आमंत्रण होत.सगळ काही सुरळीत चालू असताना कौशालच्या मामांनी सोन्याची साखळी आणि लोकेटची मागणी केली.मुलीकडचे आणि कौशल आणि त्याचे आई वडील जरा गोन्ध्लेले दिसले.सुपारी फोडून मुलाकडची मंडळी घरी गेली.मी आदितीच्या घरीच होते.कौशालच्या आईचा फोने आला."आग कीर्ती सोन वैगैरे काही नकोय आम्हाला.मुलगी सोन्यासारखी आहे तीच हवीये फक्त.पण मामा बोलून गेले.चार चौघात त्यांना काही बोलू शकलो नाही, पण आमची काहीच अपेक्षा नाही." भर लग्नात काही अडथला नको म्हणून कौशालच्या आई वडिलांनीच लग्नाआधी सोन्याची चेन आणि लोकेत आदितीच्या आई वडिलाना दिल आणि तेच लग्नात कौशाल्साठी द्यायला सांगितलं.लग्न निर्विघ्न पाने पार पडल.दोघांचा संसार सुखाचा चालू आहे.
मी केबिनमध्ये असताना बाहेर मनीष आणि सीमाचे आई वडील थांबले होते.त्याचं हळू हळू बोलन सुरु झाल.एकमेकांची माहितीही कळली."पण हि मला पसंद करेल का? नाही करणार...त्यापेक्षा नकोच..."म्हणून त्याने तिचा विचार डोक्यातून काढला.३-४ दिवसानंतर सीमाच्या घर्च्यानीच विचारल तेव्हा मनीषच्या चेहऱ्यावरचा आनद ओसंडून वाहत होता.
काळाने झडप ghalun आपल्या साथीदाराला नेले पण म्हातारपणाची काठी म्हणन बघितलेल्या मुलांनीही झिडकारले.अनेक ५५-६० चे वर मानसिक आधारासाठी दुसर्या लग्नाचा विचार करतात.पण घर्तून पाठींबा मिळत नाही.अनेक जन मुलांना प्रोपेतीतून बेदखल करण्याची तयारी दाखवतात.पण आपल्या समाजामध्ये अशा वधू मला अजून तरी सापडल्या नाहीत.
आयुष्यभराचा जोडीदार हा कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे ह्याकडे नित लक्ष दिल जात नाही.अजूनही लग्न पत्रिका बघूनच होतात.आषाढात, पौष महिन्यात,पितृ पंधरवड्यात लग्नाची बोलणी होत नाही.नाशिक मध्ये जाऊन नागबलीसाठी २५-२५ हजार खर्च करणारे अनेक आई-वडील बघितलेत. अमुक तमुक shanti, बोटात विविधरंगी खडे.आणि अपेक्षांचे मोठ-मोठे डोंगर.वयाची ३५ वर्षे उलटली तरी कुठेही तडजोड करायला नकार देणारे वधू आणि वर.कितीही जाड मुलगा असला तरी त्याला सडपातळ मुलगीच हवी असते.१२ वी पास मुलीला इंजिनिअर मुलगाच हवा असतो!मुलीला ५,००० पगार असला तरीही मुलाला पन्नास हजार दरमहा हीच अप्केक्षा असते! मुलाचा अगदी व्यवस्थित व्यासाय असला तरी मुलाला नोकरी असं गरजेच आहे.मुलगा कितीही जबाबदार,हुशार,मनमिळावू असला तरी डोक्यावरचे गळालेले केसांमुळे त्याला नकार येत राहतो.जरा सावली मुलगी असली तरी तिला नकार येतच राहतो.स्वतः सापत्या घटस्फोटीत असेल तरी बायको मात्र विनाप्त्या घटस्फोटीत हवी.अपत्य असेल तर मुलगा अपत्य नको.आणखीनही बराच काही....मात्र हे सगळ बदलण्याची गरज आहे.आणि त्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत.घरी कांदापोहे आयोगीत करण्यापेक्षा ऑफिसमध्ये एकमेकांची ओळख करून दिल्यावर मुल-मुली एकमेकांशी जास्त मोकालेपान्ने बोलतात.तरुण पिढी बदलतीये पण जुनी पिढी आपली मत बदलायला तयार नाही.कसाही करा पण वधू-वरंचा शोध डोळसपणे करा.आपल्या अपेक्षा मांडण्याआधी एकदा मनाच्या आरशात स्वतःला जरूर पहा.भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.नांदा सौख्य भरे!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुरेख
बरं
बरं
अय्या तुम्ही लग्न जमवता
होय, यांचीच कमी होती, बाकी
धन्य आहात ५०राव.
स्कोप आहे तो टेलि आहे का
''ते त्या ताइना अन सर्वाना
अन्ड्याशी वैर का बर? संडे हो
एक शंका आहे - स्कोप आहे तो
लवकरच मिपावर 'शुभमंगल सावधान'
वा वा!
+१ टु पैसातै, उजवीकडे मदतीचा
वेगात प्रगती आहे! :-)
वेगात प्रगती आहे! हे वाक्य
अच्रत
पाणी पाणी
वाह क्या बात!
Keep it up.
पुलेशु लिहायचे विसरु नकोस,
नको बे...
हे पुलेशु काय आहे.तसं मिपा
पुलेशु - पुढील लेखास
आणि पुलशु म्हणजे पुढील लग्नास
=)) =)) =)) =))
लेखन आवडले. अवघड वाटतं हे
आमच्या काळीसुद्धा मी लग्न
i la!
माझ वय तेव्हा २५ होत आत्ता २७
:(
+ १
??
काळ बदलला आहे तै...
*
शिल्पातै नी म्हणल्याप्रमाणे
तुमचा पाय बरा दिसतोय
'बाकी या वयात माझं काम हलकं
असं म्हणताय्.........बरं,
>>जरा आवाज कापतो माझा .... मग
मुहुर्त टळतो की काय अशी भिती
होय होय वधुवर लग्नाला भटजी
मंगलाष्टक वाल्यांचा भारी राग
<<मंगलाष्टक वाल्यांचा भारी
वेगवेगळे अनुभव छान मांडलेत.
जेजुरीचा किस्सा ' हनिमुन
हो.
आचरट्पणा, ननि फारच सभ्य शब्द
नंदिनी
झुट बरदाश्त नही है, मैने कहाँ
सुरुवातीला मलाही बसला होता,