✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सुखी संसाराची सोपि वाटचाल

क
किचेन यांनी
Sun, 11/06/2011 - 18:23  ·  लेख
लेख
समोर २५ वर्षांची मुलगी बघितल्यावर बरेचदा चेहेर्यावर अविश्वासच दिसायचा! हिच्याकडून जमणार आहे का आपली मुलाच /मुळीच लग्न? मुळात हि आपल्या मुलापेक्षा वयाने लहान, हिला कितीस कळणार आहे? हाच अविश्वास माझा आत्मविश्वास बनला.समोर आलेल्या अनेकांनी माझ्याकडे नोदणी करायचं टळल, पण एकदा का त्यांच्या मुलाला अनुरूप मुली मिळवून दिल्या कि मग आपोआप नोंदणी करायचे आणि दुसर्या पालाकानाही घेऊन यायचे.मला कधी कधी गम्मत वाट्याची.पहिल्या भेटीत आणि आत्ताच्या भेटीत किती फरक झालाय या माणसात!जशी जशी लग्न ठरत गेली तसा तसा आत्मविश्वास आणखीन वाढला.माझ्यातही बराच बदल होता ! पूर्वी सिंहाचा चेहेरा घेऊन असायचे पण मनात मात्र उंदीरच दडलेला असायचा.आता जे चेहऱ्यावर आहे तेच मनातही.गेल्या २ वर्षात बराच काही बदललाय! अनेक मुल आणि मुली.जे लक्षात राहिलेत आणि ज्यांना विसरणं कठीण आहे.कधी अवाजवी अपेक्षांमुळे तर कधी पत्रिकेवर अति विश्वास.कधी बाह्य सौंदर्या तर कधी हवा मुलाला गल्लेलाठ्ठा पगार.काहींनी भरपूर विचार करून अपक्षांची एक चौकट मधून ठेवलेली.तर काहीहंनी काहीच विचार केलेला नसतो. सुन्न करून गेलेल्या अशा कितीतरी घटना आहेत. हुंड्यामुळे परत माहेरी आलेल्या नाममात्र घटस्फोटीत कविता.लग्नानंतर १५ दिवसातच हुंड्यासाठी जाच होऊ लागला.जीवावर बेतलं तेव्हा भावाने माहेरी परत आणल.सुंदर,सळस आणि नेहमी फ्रेश असणार्या कविताने लग्नाचा विचार सोडला.पण लहान भावाला तिची घुसमट कळत होती.त्याने तिला खूप समजावून माझ्याकडे आणली.योगायोगाने तेव्हाच एका घटस्फोटीत मुलाचे वडील बाहेर बसले होते.आमची केबिन मधली चर्चा त्यांनी ऐकली आणि माफ करा अस म्हणून आत आले.माझा मुलगा आत्ता बरोबर नाहीये पण उल्गी आमच्या अपेक्षेप्रमाणे आहे.माझ्या अंदाजाने २९ गुण जुळतील.हा मुलाचा फोटो म्हणून खिश्तून एक फोटो काढून दाखवला.पुढच्या रविवारी कविता आणि तिचा भाऊ लग्न ठरल्याची, आणि रेजीस्तर लग्न करत असल्याची बातमी घेऊन आले. राहुलची कथा वेगळीच.जागरण गोंधळ झाल्यावर सार्वजन जेजुरीला गेले.गाडी पार्क करून उतरतात तोच bayako ओळख करून 'हा माझा बबॉयफ्रेंड " अशी ओळख करून देते.दचकलेला राहुल आणि त्याचे आई वडील तिच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न करतात,पण त्यांना न जुमानता ती त्याच्याबरोबर बाईकवरून गेलेली असते.(लग्नात सासरकडून घातलेल्या मंगळसूत्र आणि चांदीच्या दागीण्यान्साहित).राहुल आता प्रत्येक मुलीशी किमान ३ वेळा घराच्या बाहेर भेट झाल्याशिवत पुढच मत सांगत नाही.अनेक आई-वडिलाना हे खटकत.पण राहुलचा निर्णय योग्य आहे.हे सगळ थोड्या-फार फरकाने अनेकांच्या बाबतीत घडलंय.कधी घटस्फोट होतो तर कधी मानाविरुध्ह संसार चालू राहतो.राहुलच्या धाकट्या भावाने 'मी लग्नच करणार नाही' अस आई बाबांना सागून ठेवलाय.त्या एका मुलीने पूर्ण घराच्या आनंदावर विरजण टाकलाय. यात दिलासा म्हणून माझी भेट झाली ती कौशलशी. कौशालच्या आणि त्याच्या आई-वडिलांच्या अपेक्षा माफक होत्या.बरेच जन आम्हाला काहीही नको पण तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे सोन घाला असे म्हणणारे असतात.पण कौशाल्चे आई-वडील आम्हाला काह्ही नको.आदितीची घारीची परिस्थिती बेताची असल्यामुळे लग्नाचा खर्ची दोघात वाटून घेण्याची त्यांची तयारी होती.आदितीची आणि कौशल सर्व बाबतीत एकमेकांना सुट करणारे होते.माझ्याकडून जमत असलेल हे पहिलाच लग्न.मला बैठकीसाठी आमंत्रण होत.सगळ काही सुरळीत चालू असताना कौशालच्या मामांनी सोन्याची साखळी आणि लोकेटची मागणी केली.मुलीकडचे आणि कौशल आणि त्याचे आई वडील जरा गोन्ध्लेले दिसले.सुपारी फोडून मुलाकडची मंडळी घरी गेली.मी आदितीच्या घरीच होते.कौशालच्या आईचा फोने आला."आग कीर्ती सोन वैगैरे काही नकोय आम्हाला.मुलगी सोन्यासारखी आहे तीच हवीये फक्त.पण मामा बोलून गेले.चार चौघात त्यांना काही बोलू शकलो नाही, पण आमची काहीच अपेक्षा नाही." भर लग्नात काही अडथला नको म्हणून कौशालच्या आई वडिलांनीच लग्नाआधी सोन्याची चेन आणि लोकेत आदितीच्या आई वडिलाना दिल आणि तेच लग्नात कौशाल्साठी द्यायला सांगितलं.लग्न निर्विघ्न पाने पार पडल.दोघांचा संसार सुखाचा चालू आहे. मी केबिनमध्ये असताना बाहेर मनीष आणि सीमाचे आई वडील थांबले होते.त्याचं हळू हळू बोलन सुरु झाल.एकमेकांची माहितीही कळली."पण हि मला पसंद करेल का? नाही करणार...त्यापेक्षा नकोच..."म्हणून त्याने तिचा विचार डोक्यातून काढला.३-४ दिवसानंतर सीमाच्या घर्च्यानीच विचारल तेव्हा मनीषच्या चेहऱ्यावरचा आनद ओसंडून वाहत होता. काळाने झडप ghalun आपल्या साथीदाराला नेले पण म्हातारपणाची काठी म्हणन बघितलेल्या मुलांनीही झिडकारले.अनेक ५५-६० चे वर मानसिक आधारासाठी दुसर्या लग्नाचा विचार करतात.पण घर्तून पाठींबा मिळत नाही.अनेक जन मुलांना प्रोपेतीतून बेदखल करण्याची तयारी दाखवतात.पण आपल्या समाजामध्ये अशा वधू मला अजून तरी सापडल्या नाहीत. आयुष्यभराचा जोडीदार हा कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे ह्याकडे नित लक्ष दिल जात नाही.अजूनही लग्न पत्रिका बघूनच होतात.आषाढात, पौष महिन्यात,पितृ पंधरवड्यात लग्नाची बोलणी होत नाही.नाशिक मध्ये जाऊन नागबलीसाठी २५-२५ हजार खर्च करणारे अनेक आई-वडील बघितलेत. अमुक तमुक shanti, बोटात विविधरंगी खडे.आणि अपेक्षांचे मोठ-मोठे डोंगर.वयाची ३५ वर्षे उलटली तरी कुठेही तडजोड करायला नकार देणारे वधू आणि वर.कितीही जाड मुलगा असला तरी त्याला सडपातळ मुलगीच हवी असते.१२ वी पास मुलीला इंजिनिअर मुलगाच हवा असतो!मुलीला ५,००० पगार असला तरीही मुलाला पन्नास हजार दरमहा हीच अप्केक्षा असते! मुलाचा अगदी व्यवस्थित व्यासाय असला तरी मुलाला नोकरी असं गरजेच आहे.मुलगा कितीही जबाबदार,हुशार,मनमिळावू असला तरी डोक्यावरचे गळालेले केसांमुळे त्याला नकार येत राहतो.जरा सावली मुलगी असली तरी तिला नकार येतच राहतो.स्वतः सापत्या घटस्फोटीत असेल तरी बायको मात्र विनाप्त्या घटस्फोटीत हवी.अपत्य असेल तर मुलगा अपत्य नको.आणखीनही बराच काही....मात्र हे सगळ बदलण्याची गरज आहे.आणि त्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत.घरी कांदापोहे आयोगीत करण्यापेक्षा ऑफिसमध्ये एकमेकांची ओळख करून दिल्यावर मुल-मुली एकमेकांशी जास्त मोकालेपान्ने बोलतात.तरुण पिढी बदलतीये पण जुनी पिढी आपली मत बदलायला तयार नाही.कसाही करा पण वधू-वरंचा शोध डोळसपणे करा.आपल्या अपेक्षा मांडण्याआधी एकदा मनाच्या आरशात स्वतःला जरूर पहा.भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.नांदा सौख्य भरे!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत
अनुभव

प्रतिक्रिया द्या
14259 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

+ १

दादा कोंडके
Tue, 11/08/2011 - 13:59 नवीन
असल्या बातम्या पेपरमध्ये वाचत असतो. पण समोरच्याच वस्तीत, लग्नहोउन २ वर्षानी पोटच्या पोराला सुद्धा टाकून प्रियकराबरोबर पळून गेलेली बाई बघून धक्का बसला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

तुम्हाला नक्कि काय म्हणायचं

५० फक्त
Tue, 11/08/2011 - 14:14 नवीन
तुम्हाला नक्कि काय म्हणायचं आहे, नाममात्र घटस्फोटीत की नाममात्र विवाहित ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

नाममात्र घटस्फोटीत

स्मिता.
Tue, 11/08/2011 - 14:44 नवीन
मला वाटतं ते नाममात्र घटस्फोटीतच असावं. लग्नानंतर ८-१० दिवसात वेगळे झालेल्यांना बहुदा पुन्हा वधू-वर शोधताना 'नाममात्र घटस्फोटीत' असा टॅग लागलेला पाहिलाय. नाममात्र विवाह होवून घटस्फोट घेतलेला/ली अशी त्याची फोड असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आनंद आहे.

नगरीनिरंजन
Tue, 11/08/2011 - 15:16 नवीन
पळूनच जायचं तर लग्नाआधी पळून जायला काय अडचण असते देव जाणे. उगाचच एका माणसाचं भावविश्व उध्वस्त करतात सहजपणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

उगाचच एका माणसाचं भावविश्व

किचेन
Tue, 11/08/2011 - 17:09 नवीन
उगाचच एका माणसाचं भावविश्व उध्वस्त करतात सहजपणे. उगाचच एका माणसाचं भावविश्व उध्वस्त करतात सहजपणे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

किचेन तै मै आक्का ( जे आहात

५० फक्त
Tue, 11/08/2011 - 19:30 नवीन
किचेन तै मै आक्का ( जे आहात ते समजुन घ्या कारण तुम्हि २५+२ = २७ असा हिशोब दिलेला असला तरी २५ कधी आणि २७ कधि ते क्ळायला काही संदर्भ नाही ) तुमचे प्रतिसाद आणि स्वाक्षरी यात एक - - - - - - अशी लाईन टाका गविंसारखी, म्हणजे गविंच्या प्रतिसादात असते तशी, (माझ्या किंवा गविंसारखी लाईन टाकायला लागलात तर प्रतिसाद मेगाबायटी होतील.) बराच वे़ळा अर्थाचा अनर्थ नाही तर आर्थिक ताण होतोय. आता हे बघा, उगाचच एका माणसाचं भावविश्व उध्वस्त करतात सहजपणे. सुखि संसाराची सोपी वाटचाल! आणि हे बघा मन बर्यापैकी कठोर झालाय.नाममात्र घटस्फोटीत! सुखि संसाराची सोपी वाटचाल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

मन बर्यापैकी कठोर

धन्या
Tue, 11/08/2011 - 22:07 नवीन
मन बर्यापैकी कठोर झालाय.नाममात्र घटस्फोटीत! सुखि संसाराची सोपी वाटचाल!
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

उगाचच एका माणसाचं भावविश्व

किचेन
Tue, 11/08/2011 - 17:11 नवीन
उगाचच एका माणसाचं भावविश्व उध्वस्त करतात सहजपणे. माणसाच नव्हे कुटुंबाच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

तुमचं मराठी टंकन एकदम भन्नाट

रेवती
Tue, 11/08/2011 - 20:13 नवीन
तुमचं मराठी टंकन एकदम भन्नाट झालय हो. नाहीतर दोन दिवसांपूर्वीच हेल्प लागली होती. फाष्टंफाष्ट काम आहे सगळं.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

ते लग्नंही अशीच फटाफट जमवत

धन्या
Tue, 11/08/2011 - 22:09 नवीन
ते लग्नंही अशीच फटाफट जमवत असावेत. झट मंगनी पट ब्याह :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

लेख आवडला . नाममात्र

निनाद मुक्काम …
Tue, 11/08/2011 - 20:33 नवीन
लेख आवडला . नाममात्र घटस्फोटीत ह्या ´सदरात परिचयातील एका व्यक्तींचा किस्सा आठवतो . लग्न झाल्यावर दोन दिवसात मुलीला मुलगा पुरुष नाही आहे. हे त्याच्याकडून कळाले. तिचा घटस्फोट झाला. आता अरेंज मेरेज करतांना आपला साथीदार बेडरूम मध्ये कसा निघेन ह्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. निळे सिनेमे पाहून आपल्या जोडी दारासोबत अवास्तव मागण्या केल्याने अनेक प्रकरणे घट स्फोटा पर्यंत गेल्याचे वृत्त पत्रात वाचले आहेत.( भोसले ह्यांचे सदर वृत्त पत्रात यायचे.) येथे एखादी गोष्ट अवास्तव किंवा वास्तविक असणे हे व्यक्ती सापेक्ष असते लैंगिकता आणी भारतीय समाज ह्यावर राजन खान ह्यांचे सकाळ मधील लेख वाचनीय आहेत
  • Log in or register to post comments

लाटकर काकांच्या

नाखु
Wed, 11/23/2016 - 16:16 नवीन
"ज्वलंत" धाग्याला पाच वर्षापुर्वीच (उत्तर) वाचा फुटली होती त्याचा हा पुरावा म्हणून धागा वर काढीत आहे. लेखक मजकूर पुन्हा लिहिते झाल्यास नवोदीतांना फायदा किंवा दिशादर्शन होईल हाही अतिरिक्त लाभ आहेच. मिपा वारकरी नाखु
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा