रस्सा.. मराठमोळी मेजवानी !!
लेखनप्रकार (Writing Type)
गविंनी खादाडी पोस्टचा सपाटा लावल्याने, त्यात अजुन एक भर.... ;)
मुंबई पश्चिम उपनगरात मराठमोळी खाण्याची ठिकाणे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच... त्यात आणखी एक भर म्हणजे हे हॉटेल. पाच तरुण मराठी मुलांनी एकत्र येऊन केलेला हा प्रयत्न. हॉटेलचं नाव हे या पाच मुलांच्या नावाच्या आद्याक्षारांपासून बनले आहे.... रस्सा...!! मराठमोळी मेजवानी
चारकोप, कांदिवली (पश्चिम) येथे.. PF ऑफिसच्या बाजूला हे छोटेखानी हॉटेल आहे. शाकाहारी आणि मांसाहारी, असं दोन्ही प्रकारचं उत्तम जेवण इथे मिळतं. चिकन थाळी, सुरमई थाळी, वांग्याचे भरीत, झुणका निव्वळ अफलातून...
इथे पदार्थांचे खूप कमी फोटो दिले आहेत... पण..पण खरंच लक्षातच राहत नाही फोटो काढायचं, जेवण आलं की नुसतं तुटून पडायचं इतकंच माहिती .. शेवटी एक नंबरचा खादाडखौ ;)
चिकन थाळी.. :)
भाकरी आणि वांग्याचं भरीत... :)
रस्सा !!
एकदा जरूर भेट द्या... :) :)
भाकरी आणि वांग्याचं भरीत... :)
रस्सा !!
एकदा जरूर भेट द्या... :) :)
प्रतिक्रिया
वा.. तातडीने जायला पाहिजे..
वा. वा.
गविंनी सुरुवात करून दिलिये
वा.... काय मस्त आहे हे.....
आता जायलाच पाहिजे!!
अरे वा !!
रस्सा मारके....
रस्सा भारीच दिसतो.
मस्त रे... रस्सा चापल्या नंतर