उहापोह
झिजलेल्या काठची माती गिळून
विस्तारणारे तळे
ऊंच लाटांमधल्या रागाचे
सुटणारे संयमाचे कडे
पाउस न पडताच
मातीतली दडपण
पाउलवाटे वरची
विचारांची वण्-वण!
पानगळीतल्या गीतात
नव्या पालवी चे स्वर
न बदळणार्या रीतीं वर
बदळणारे अगणित मत!
ओळखीचे भाव अनोळखी चेहर्यांवर
भिंत्यांवरची ओल उतरते हळुच फरशी वर
खिडक्यांवर डोकावते सुंदर पानांची वेल
नव्-आकृतीत जागा शोधण्याचे खेळ!
परिस्थिती? कि मात्र एक क्षण?
अभिव्यक्ति? कि मात्र एक अनुभव?
खेळ? योगा-योग? कि भाग्यच हे?
बहुतेक, नकळत मनावर उठणारे वण!
लेखनविषय:
याद्या
1594
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
कविता आवडली.. झिजलेल्या
+१
In reply to कविता आवडली.. झिजलेल्या by गणेशा
छान कविता... न बदलणार्या
निनाव -काय बोलू.मस्त जमलीय
कविता आवडली.
कविता आवडली. पाण्याची,
कविता आवडली
सर्वांचे आभार!