Skip to main content

उहापोह

लेखक निनाव यांनी गुरुवार, 18/08/2011 19:29 या दिवशी प्रकाशित केले.

झिजलेल्या काठची माती गिळून
विस्तारणारे तळे
ऊंच लाटांमधल्या रागाचे
सुटणारे संयमाचे कडे

पाउस न पडताच
मातीतली दडपण
पाउलवाटे वरची
विचारांची वण्-वण!

पानगळीतल्या गीतात
नव्या पालवी चे स्वर
न बदळणार्या रीतीं वर
बदळणारे अगणित मत!

ओळखीचे भाव अनोळखी चेहर्‍यांवर
भिंत्यांवरची ओल उतरते हळुच फरशी वर
खिडक्यांवर डोकावते सुंदर पानांची वेल
नव्-आकृतीत जागा शोधण्याचे खेळ!

परिस्थिती? कि मात्र एक क्षण?
अभिव्यक्ति? कि मात्र एक अनुभव?
खेळ? योगा-योग? कि भाग्यच हे?
बहुतेक, नकळत मनावर उठणारे वण!

लेखनविषय:

वाचने 1621
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

कविता आवडली..

झिजलेल्या काठची माती गिळून
विस्तारणारे तळे
ऊंच लाटांमधल्या रागाचे
सुटणारे संयमाचे कडे

मस्त


छान कविता...

न बदलणार्‍या रीतीं वर
बदलणारे अगणित मत!

हे बाकी अगदी खरं आहे... सध्या चालू असलेल्या चर्चांवरुनही हे लक्षात येतं :)


कविता आवडली. पाण्याची, मातीची, पाऊलवाटांची रूपकं छानच. शेवटच्या कडव्यांत या रूपकांचा त्याग केला आहे. तो थोडासा खटकतो, पण कदाचित कवीने ते जाणूनबुजून केलं असाव.

अजून येऊ द्यात.