✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

"दरवाजाची धूळ" ओमर खय्याम - २

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Tue, 05/24/2011 - 12:46  ·  लेख
लेख
ओमर खय्याम - १ दरवाजाची धूळ ' अब्द अल् रहीम नवासी ' हा फ़ार्स प्रांताचा प्रमुख क्वादी आणि इमाम होता. त्याने १०८२ मधे खय्यामला एक पत्र पाठवले. ह्या विद्वान गृहस्थाच्या मनात आत्मज्ञान आणि धार्मिक कर्तव्ये ह्याबद्दल काही शंका होत्या. त्या शंका दूर करायची विनंती त्याने खय्यामला पत्राद्वारे केली. हे पत्र त्याने थोडेसे काव्यात रचले. त्याने लिहिले – हे साबाच्या वार्‍या, जेव्हा तू जाशील तेव्हा, माझ्यावर एक उपकार कर. माझा नमस्कार खय्यामला सांग आणि लिनतेने त्याच्या दरवाजाची धुळ कपाळी लाव. मी सांगतो, त्याची योग्यता ह्याहुनही थोर आहे. त्या थोर हकिमाला विचार माझे “प्रयोजन” काय, आणि “कर्तव्ये” काय. ते ज्ञान मिळव आणि परत येऊन मला वाचून दाखव. मित्रहो, फ़ार्सचा इमाम हा फार मोठा अधिकारी झाला. त्याने खय्यामप्रती दाखवलेला हा आदर आपल्याला त्याच्या बद्दल खूप काही सांगून जातो. खाली दाखवली आहेत ती त्याच्या रुबायाच्या सगळ्यात जुन्या हस्तलिखितातील दोन पाने. ओमरने जे विपुल लिखाण केले त्यातील काहीच आता उपलब्ध आहे. ओमर खय्यामची १० पुस्तके काळाच्या तडाख्यातून वाचली. त्यात गणितावरची ४, बीजगणितावरचे १, भूमितीवरचे १, पदार्थविज्ञानावरची ३, आणि अध्यात्मावरची ३ आहेत, जी वाचलीत पाहिजेत. ओमर इराणमधल्या पहिल्या धर्मांतरीत पार्शी पिढीतील होता. म्हणजे त्याचे वडील इब्राहीम जे तंबू शिवणारे सामान्य कामगार होते, त्यांनी इस्लाम धर्म स्विकारला. त्यावेळी मरण किंवा धर्मांतर हे दोनच पर्याय उपलब्ध होते. एक तिसराही असायचा, तो म्हणजे देश सोडणे. आपला धर्म का भूमी? हे निवडणे मरणाहूनही अवघड. आपली निष्ठा जमिनीशी का धर्माशी? मला पोसणारी जमीन पहिली का धर्म पहिला? सामान्य माणसे देश सोडत नाहीत. जी सोडतात ती असामान्य असेही म्हणता येत नाही. देश सोडणे त्यांना शक्य असते एवढेच ! यांच्यातले नशिबवान कोण ते काळच ठरवतो. वर एका सुंदर स्त्रीचे चित्र बघितले का ? खय्यामच्या अनेक रुबायांमधे जे सुंदर चेहरा, प्रेयसी यांचे उल्लेख येतात त्या सौंदर्याचे हे प्रातिनिधीक चित्र समजा. स्त्री-पुरुषातील प्रेमाविषयी एकूणच त्या काळातील माणसांना फार आदर आणि कुतूहल होते. कारण त्याकाळी मनुष्य निसर्गाच्या फार जवळ होता आणि त्याविरुध्द जाण्यात त्याला फारसा शहाणपणा वाटत नसे. निसर्गात सौंदर्य होते आणि स्त्रीच्या सौंदर्याला भुलणे हे नैसर्गिक होते. ते नाते खरोखरच फुले आणि त्याच्यावर फिरणार्‍या भ्रमरासारखे होते आणि प्रेम हा त्याचा आविष्कार होता. आणि मला वाटते तो तसा आजही आहे. उद्या आपण त्याचे अजून एक बीजगणितातील इक्वेशन सोडवण्याची एक पध्दत बघणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्या काव्याकडे वळणार आहोत. जयंत कुलकर्णी.

Book traversal links for "दरवाजाची धूळ" ओमर खय्याम - २

  • ‹ ओमर खय्याम आणि त्याच्या रुबाया....
  • Up
  • ओमर खय्याम- भाग-१८ व मृत्यू. हा भाग शेवटचा ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
इतिहास
कविता
चारोळ्या
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
7224 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

सुरेख!

मी ऋचा
Tue, 05/24/2011 - 13:01 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

माहिती उत्तमच आहे. आपला

डॉ.श्रीराम दिवटे
Tue, 05/24/2011 - 13:09 नवीन
माहिती उत्तमच आहे. आपला अभ्यास प्रशंसनीय... पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments

सुंदर माहिती, छान चाल्लय

नन्दादीप
Tue, 05/24/2011 - 13:11 नवीन
सुंदर माहिती, छान चाल्लय तुमच,,,!!!! बाकी......
  • Log in or register to post comments

मस्त माहिती अमोल केळकर

अमोल केळकर
Tue, 05/24/2011 - 13:42 नवीन
मस्त माहिती अमोल केळकर
  • Log in or register to post comments

दरवाज्याची धूळ आपण आमच्या

अन्या दातार
Tue, 05/24/2011 - 14:02 नवीन
दरवाज्याची धूळ आपण आमच्या माथी लावताय याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

>>>>निसर्गात सौंदर्य होते आणि

यकु
Tue, 05/24/2011 - 14:02 नवीन
>>>>निसर्गात सौंदर्य होते आणि स्त्रीच्या सौंदर्याला भुलणे हे नैसर्गिक होते. क्या बात.. क्या बात.. क्या बात!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

गणेशा
Tue, 05/24/2011 - 15:31 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

सुंदर ओळख......

प्यारे१
Tue, 05/24/2011 - 16:26 नवीन
सुंदर ओळख......
  • Log in or register to post comments

जयंतराव,

प्रास
Tue, 05/24/2011 - 20:19 नवीन
फर्मास लिहिताय. असंच सुरू राहू द्या. सुरुवातीचेच भाग आहेत परंतु हा भागही अंमळ त्रोटकच वाटतोय. खय्यामच्या रुबायांचं रसग्रहण सुरू कराल तेव्हा विस्तृतपणे भाग येतील अशी आशा आहे. मी काही मूळ रुबाई वाचलेली नाही आणि तशी पर्शियनची तोंडओळखही मला नाही पण
हे साबाच्या वार्‍या,
यात द्विरुक्ती वाटतेय. माझ्या माहितीप्रमाणे सबा म्हणजेच जन्नतकी हवा. तेव्हा हे एकदा बघून घ्यावे ही विनंती. बाकी नेहमीप्रमाणेच पुलेप्र :-)
  • Log in or register to post comments

अरे व्वा ! बरोबर आहे. सबा

जयंत कुलकर्णी
Tue, 05/24/2011 - 20:46 नवीन
अरे व्वा ! बरोबर आहे. सबा म्हणजे पुर्वे कडून येणारी थंड आल्हादकारक, मनाला इल्हसित करणारी वार्‍याची झुळूक. म्हणून त्या दिशेने येणार्‍या वार्‍याला मी साबाच्या वार्‍या असे उल्लेखलेले आहे. दुसरे म्हणजे पुर्वेकडच्या प्रांताला त्या काळी साबा असे म्हणत. त्यामुळे कदाचित त्या इमामाने असे लिहीले असेल. मला माहीत नाही... :-)
  • Log in or register to post comments

छान .. लेखमाला वाचायला उत्सुक

लिखाळ
Tue, 05/24/2011 - 21:08 नवीन
छान .. लेखमाला वाचायला उत्सुक आहे. ती सुंदर स्त्री कोण?
  • Log in or register to post comments

सोपे आहे...

जयंत कुलकर्णी
Wed, 05/25/2011 - 09:10 नवीन
ती सुंदर स्त्री म्हणजे कोणतीही स्त्री जी तुमची मैत्रीण, बायको, किंवा प्रेयसी असते आणि जी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कटकटी, वैताग विसरायला लावते आणि तुमचे भरकटलेले मन परत तुमच्या ताब्यात आणून देते. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

सुंदर स्त्री म्हणजे कोणतीही

विजुभाऊ
Wed, 05/25/2011 - 11:44 नवीन
सुंदर स्त्री म्हणजे कोणतीही स्त्री जी तुमची मैत्रीण, बायको, किंवा प्रेयसी असते आणि जी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कटकटी, वैताग विसरायला लावते आणि तुमचे भरकटलेले मन परत तुमच्या ताब्यात आणून देते. वल्ला क्या बात है. सौंदर्याची ही नवी व्याख्या खूप आवडली. झकास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

छान

धनंजय
Wed, 05/25/2011 - 04:48 नवीन
चांगली माहिती मिळत जाते आहे.
  • Log in or register to post comments

लई भारि , उर्दु हि भाषा मला

५० फक्त
Wed, 05/25/2011 - 07:35 नवीन
लई भारि , उर्दु हि भाषा मला खुप आवडते, खुप छान अलंकारिक भाषा आहे, शब्दांचे खेळ समजावुन घ्यायला फार आवडेल, जयंत कुलकर्णी सर अतिशय धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मित्रांनो व

जयंत कुलकर्णी
Wed, 05/25/2011 - 09:15 नवीन
मित्रांनो व मैत्रिणिंनो, धन्यवाद. ही महफील अशीच रंगत जावी ही इच्छा ! आणि आपल्याला सगळ्यांना (मी धरून ) त्यातून आनंद मिळावा.
  • Log in or register to post comments

चांगले

आंसमा शख्स
Wed, 05/25/2011 - 11:24 नवीन
चांगले छोटेसे लेखन केले आहे. पुढील लेखाची वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा