शब्दांच्या मालगाड्या
काल परवा कधी तरी रक्तवर्णी वारुणी सोबत मिसळपाव पाहतांना मिकासोबत खरडाखरडी झाली त्यात मी दिलेला हा प्रतिसाद बहुदा कविता आहे असा 'सौंक्ष्यय' आला. फक्त मिकानेच का माझ्या काव्याचे भोग भोगावेत? या विचाराने मला दया आली. दु:ख वाटल्याने कमी होते असे शाहरूख खान म्हणतो, म्हणून ही एक शब्द करूण आणि भयाण कविता सगळ्यांनाच वाटून टाकत आहे. घ्या!
ती गझल तुम्हाला जमेना
शोधीता केसुही दिसेना,
यमकांचे मिटर हरवता
त्यात नाट्य सापडेना ||
जमवा की चार जोड्या
यमकेही दोन पाडा,
अन पाठवा पाठोपाठ
शब्दांच्या मालगाड्या ||
काव्यात मिकाची थोरवी
तरी प्रतिसादांची गरीबी,
जणु दूधवाला तो गवळी
पाण्याची दडवतो चरवी ||
तो एक घासू येता
पन्नास कविता पुढती,
पालीसमान टपाटप
कसे ते प्रतिसाद पडती ||
त्यातही तुम्ही पाडला
पाऊस असा अवेळी,
वणव्यात आमचीही
एक गारपीटीची खेळी ||
वर्गीकरण
निनाव - ती गझल तुम्हाला
हा
मी म्हटलं मिका कोण! कळालं,
In reply to मी म्हटलं मिका कोण! कळालं, by यशोधरा
आता
अप्रतिम लिहिले आहे मस्त
हा हा हा!! मस्तच रे
आम्हालाही थोडे दु:ख
In reply to आम्हालाही थोडे दु:ख by पाषाणभेद
जरूर
त्यातही तुम्ही पाडला पाऊस असा
त्यातही तुम्ही पाडला पाऊस असा
In reply to त्यातही तुम्ही पाडला पाऊस असा by नरेशकुमार
आता
In reply to आता by निनाद
ohh असे आहे काय. माझी Tube