Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on गुरुवार, 04/21/2011 - 14:01
आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला अवघे आभाळ काजळून कंठ माझा दाटला पंचप्राण शोषून माझे जीव असा टांगला तुझ्या स्मरणात भिजता कसा हा जडावला वर्षाव मोहरलेल्या तुझ्या स्वप्नांचा बरसला मनास माझ्या वाहवत क्षितीजास घेऊन गेला क्षितिजी तुझ्या स्मरणांचा आता वणवा पेटला वाहत आलेल्या मनास माझ्या चटका लावून गेला प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला जीवास सुखावून काळजास हुरहूर देऊन गेला |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२१/०४/२०११)

Submitted by विदेश on गुरुवार, 04/21/2011 - 17:24

Permalink

नवा खेळ -

प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला सुरेख !
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on गुरुवार, 04/21/2011 - 18:22

Permalink

अरे

अरे काय चाल्लेय काय? पावसात वणवा? पावसात गारपीट ठीक पण वणवा? गारपीटीत तुझ्या सरणांचा आता वणवा पेटला वाट पाहत आलेल्या मनास माझ्या मटका लावून गेला कसे वाटते? -काव्य बाधिर्याचा बादश्शा निनाद
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on गुरुवार, 04/21/2011 - 18:34

In reply to अरे by निनाद

Permalink

:)

गारपीटीत तुझ्या सरणांचा आता वणवा पेटला वाट पाहत आलेल्या मनास माझ्या मटका लावून गेला
हा ! हा!! हा!! भारी आहे!! __/\__ तुम्हाला!!
  • Log in or register to post comments

Submitted by निनाव on Fri, 04/22/2011 - 02:18

Permalink

मि.का., खूपच सुंदर. प्रेमओली

मि.का., खूपच सुंदर. प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला सुंदरच. व्वाह.
  • Log in or register to post comments

Submitted by अलोककुमार on Sun, 04/24/2011 - 15:34

Permalink

आवडलि

प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला सुंदरच. व्वाह.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1472 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com