मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शब्दांच्या मालगाड्या

निनाद · · जे न देखे रवी...
काल परवा कधी तरी रक्तवर्णी वारुणी सोबत मिसळपाव पाहतांना मिकासोबत खरडाखरडी झाली त्यात मी दिलेला हा प्रतिसाद बहुदा कविता आहे असा 'सौंक्ष्यय' आला. फक्त मिकानेच का माझ्या काव्याचे भोग भोगावेत? या विचाराने मला दया आली. दु:ख वाटल्याने कमी होते असे शाहरूख खान म्हणतो, म्हणून ही एक शब्द करूण आणि भयाण कविता सगळ्यांनाच वाटून टाकत आहे. घ्या! ती गझल तुम्हाला जमेना शोधीता केसुही दिसेना, यमकांचे मिटर हरवता त्यात नाट्य सापडेना || जमवा की चार जोड्या यमकेही दोन पाडा, अन पाठवा पाठोपाठ शब्दांच्या मालगाड्या || काव्यात मिकाची थोरवी तरी प्रतिसादांची गरीबी, जणु दूधवाला तो गवळी पाण्याची दडवतो चरवी || तो एक घासू येता पन्नास कविता पुढती, पालीसमान टपाटप कसे ते प्रतिसाद पडती || त्यातही तुम्ही पाडला पाऊस असा अवेळी, वणव्यात आमचीही एक गारपीटीची खेळी ||

वाचने 1939 वाचनखूण प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

त्यातही तुम्ही पाडला पाऊस असा अवेळी, वणव्यात आमचीही एक गारपीटीची खेळी ||
हा अगदी वर्मी घाव घातलात. असो. याद रख्खुंगा!! तुझे याद रख्खुंगा!!! ;)
अप्रतिम लिहिले आहे मस्त वाटाले एकदम .. मालगाड्या ... पाण्याची चरवी .. भारीच एकदम बाकी तमाम वाचकांच्या दु:खात सामिल झाल्याचा आनंद वाटला ... हि सुरुवात आहे ...लिहित रहा... शेवट पर्यंत वाचण्यास उत्सुक... -

In reply to by पाषाणभेद

निनाद 27/04/2011 - 17:18
आम्हालाही थोडे दु:ख मिळाल्याने आम्ही आनंदित झालो आहोत. वाचकांचा संतोष हेच आमचे भांडवल. - टीपः आमची कोठेही शाखा नाही! लक्षात ठेवा आमच्याही अधिकाराचा मान प्रत्येकवेळी राखत चला. काही प्रोशिजर प्रोटोकाल असेल तर सांगून ठेवा साहेब, फालो करणेत येईल. - हुकुमावरहून.