प्रॉब्लेम

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
4 Oct 2010 - 7:56 pm

आज लेक शाळेतुन जरा तडतडतच घरी आली.

बायकोने विचारल 'काय झाल गं? एवढी वैतागली का आहेस?'

लेक "तो यश सारखा मला 'आय लव्ह यु' म्हणतो."

बायको पण दचकली (लेक यत्ता पहिलीत आहे.)

पण सावरुन म्हणाली "नक्की काय करतो वर्गात, तुला त्रास गेतो का?"

लेक "त्रास नाही देत. मदत करतो. कधी मी क्रेयॉन्स विसरले, पेन्सिल/इरेझर विसरले तर तो लगेच देतो. पण दुसर्‍या कुणाला माझ्या बाजुला बसु पण देत नाही."

बायकोने मग तिला लाईक आणि लव्ह मधला फरक तिच्या वयाला साजेश्या शब्दात सांगितला.

बायको : "आता मला सांग तो नेहमी मदत करतो तर तो तुला आवडत नाही का?"

लेक : "अग पण तो केवडुसा आहे. माझ्या चिन पर्यंत पण येत नाही."

बायको पुन्हा स्तब्ध.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

भाऊ पाटील's picture

4 Oct 2010 - 7:58 pm | भाऊ पाटील

सही!

शेखर's picture

4 Oct 2010 - 7:59 pm | शेखर

प्रभु सरांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत..

समंजस's picture

4 Oct 2010 - 8:02 pm | समंजस

+१

धमाल मुलगा's picture

4 Oct 2010 - 8:49 pm | धमाल मुलगा

मे डे..मे डे.....कॉलिंग प्रभुबाबा....मे डे... मे डे
प्रभुबाबा इट इज ओ ओ फोर इमर्जन्सी.....

प्रियाली's picture

4 Oct 2010 - 8:05 pm | प्रियाली

आमच्या मित्रमंडळीत दोन कुटुंबांचे मुलगे एकाच वर्गात आहेत. सध्या वय ६ पण ही गोष्ट मागची असल्याने तेव्हा वय साडे ४-५. एकदा आम्ही एकत्र जमलो असताना या दोघांचे भांडण सुरू होते.

"डू नॉट टॉक टू सॅरा!"
"व्हाय इज शी योर गर्ल फ्रेंड?"
"येस शी इज! आय लव्ह हर अँड आय विल नेव्हर लेट यू टॉक टू हर."

छ्यॅ! आम्ही कीती मागासलेलो होते हे पाहुन स्वतःची दया येउ लागली आहे.

वर्गातील मुलीने असे म्हणले (असते) तर आम्ही चार कोस दुर पळालो असतो. कुणा गाढवाने आम्हाला मुली बावळट असतात हा पाठ पढवला होता कोण जाणे.

-यत्ता पहिलीत मुलींशी पट्ट्यांची मारामारी करणारा

प्रियाली's picture

4 Oct 2010 - 11:29 pm | प्रियाली

वर्गातील मुलीने असे म्हणले (असते) तर आम्ही चार कोस दुर पळालो असतो. कुणा गाढवाने आम्हाला मुली बावळट असतात हा पाठ पढवला होता कोण जाणे.

हे वरचे दोन पठ्ठे मुलगे आहेत. मुली नाहीत.

मुली मुलखाच्या श्मार्ट असतात. ;) त्या आपल्या वर्गमित्रांवर कधीच लायनी मारत नाहीत. त्यांची पहुंच जरा मोठी असते. :)

हे वरचे दोन पठ्ठे मुलगे आहेत. मुली नाहीत.

तसे नाही हो, वरील दोन ओळी आमच्या बावळपणाचा अंदाज येण्याकरता दिल्या आहेत. ;-)

बाकी आमचा मागासलेपणा, आम्ही कधी तसे म्हणुन शकलो नाही यात आहे हे सांगावे का लागावे?

मुली मुलखाच्या श्मार्ट असतात.त्या आपल्या वर्गमित्रांवर कधीच लायनी मारत नाहीत. त्यांची पहुंच जरा मोठी असते.

काय सांगता? मग आम्हीच अपवाद होतो की काय? हाय रे नसीब! ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Oct 2010 - 11:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुली मुलखाच्या श्मार्ट असतात.त्या आपल्या वर्गमित्रांवर कधीच लायनी मारत नाहीत. त्यांची पहुंच जरा मोठी असते.

एकदम सच्ची बात!

निळ्या, उगाच नाही रे तुला येता जाता लोकं 'मोठा हो'च्या टपल्या मारत!

आपण जेव्हा वर्गातल्या मुलीवर लाईन मारत असतो तेव्या तिचा नवरा कुठ्तरी प्रमोशनची खटपट करत अस्तो आणि आपली होणारी बायको आठवीचा गृहपाठ करत असते असे काहीसे वाचल्याचे आठवते.
पण ही ग्याप फारच कमी झालेली दिसत्ये आहे.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

6 Oct 2010 - 1:57 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

फारच बावळट होतो आपण!....
माझ्या लेकीबाबत (इयत्ता ३ री) घडलेला किस्सा!..
दोन वेळा doorbell वाजली. दोन्ही वेळा दारात कोणीच नाही...
जर्राशी साशंक मनाने दार बंद करायला गेले तर सहज पायात लक्ष गेले तर doormat वर एक चिट्ठी!
....बरं....लहान मुलाची करतूत असणार हे कळुन येत होत्...कारण तेच नेहमीचं...book मधल page फाडून बरेच fold घालून केलेली चिट्ठी!
..दोन सेकंदांसाठी ब्र्म्हांड आठवले होते....अरे देवा..त्यावेळी जी घालमेल झाली होती ना जिवाची...अजुन आठवते...
माझ्या नशिबाने चिठ्ठीत आक्षेपार्ह काहिहि नव्हते.... floor वरच्या denis आणि Daniel नामक टवाळ बंधुनी तिला झालेल्या भांडणाबद्दल official written कट्टी केली होती!
पण काय पोट्टी कुठून शिकुन येतात देव जाणे..!
आपण लई बावळट होतो नाहि या वयात?

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2010 - 5:22 pm | बिपिन कार्यकर्ते

आपण लई बावळट होतो नाहि या वयात?

मी अशीच आहे!

चुकून मी अजून अशीच आहे असं वाचलं. ;)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

8 Oct 2010 - 3:46 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

नाय तर काय?
तशीच आहे....
बौद्धिक पातळीत फारसा फरक पडला नाही...!
इत्क्या दिवसात कसं समजलं नाहि तुम्हाला? :)

तुमच्या वाढदिवसानंतर लेक मोठी झाल्याचा पुरावा लग्गेच मिळाला कि!;)
आमचा मुलगाही त्याच्या मैत्रिणीला यत्ता दुसरीत असताना 'आय लव्ह यू' म्हणाला होता.
थोड्याच दिवसात "ह्या! मी हे काय बोललो" असे झाले त्याला!

सूड's picture

4 Oct 2010 - 8:06 pm | सूड

निखिल देशपांडे's picture

4 Oct 2010 - 8:07 pm | निखिल देशपांडे

कठीण आहे..
प्रभु मास्तर कुठे आहेत???

अजुन एक किसा.
ती केजीत असताना आम्ही गमतीत विचारायचो की "तु मोठी होउन कोण होणार?"
आई तिची रोल मॉडेल असल्याने.
ती म्हणायची "आई होणार, टिचर होणार आणि खुप शिकणार"
आम्ही म्हणालो जरा उलट्या क्रमाने जा म्हणजे मिळवली.

शुचि's picture

4 Oct 2010 - 8:14 pm | शुचि

हा हा!! हे मस्त.

रेवती's picture

4 Oct 2010 - 8:18 pm | रेवती

हा हा हा!
मस्त!
माझा मुलगा मला त्याच्याशी लग्न करशील का असे विचारत असे.

गणपा's picture

4 Oct 2010 - 8:22 pm | गणपा

=)) =))

चिगो's picture

4 Oct 2010 - 10:48 pm | चिगो

----------^--
लोटांगण.. च्यामारी !! लै भारी..

कौशी's picture

4 Oct 2010 - 8:24 pm | कौशी

मस्त्...धमाल ....

"आय लव्ह यु" हा आहे की "चिनपर्यंत येतो" हा आहे? ;)

धमाल मुलगा's picture

4 Oct 2010 - 8:47 pm | धमाल मुलगा

:D :D :D :D
_/\_ दंडवत हो!

माझ्या मुलाच्या (वय वर्षे ६) वर्गातील एक (इथल्या, अमेरिकन) मुलीने त्यांच्या परिवारातील एका लग्न समारंभात तिच्या आईला सांगितलं होत की "मी याचं चर्च मध्ये ( माझ्या मुलाशी) लग्न करणार आहे !" तिच्या आईने मला इमेल लिहून कळवलं होत :)

ज्ञानेश...'s picture

4 Oct 2010 - 9:02 pm | ज्ञानेश...

मुलगा: डॅड, देअर इज अ बॉय इन माय स्कूल, हू कीप्स कॉलिंग मी 'गे'....

डॅड(लालबुंद): देन गो अ‍ॅन्ड कीक हीज फ*** **.. (जाणकारांनी आपल्या आवडीचे शब्द भरावेत! ;))

मुलगा: बट डॅsssssड, ही इज सो क्यूsssssट !!!

धमाल मुलगा's picture

4 Oct 2010 - 9:09 pm | धमाल मुलगा

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं......

मेलो! हाईट आहे हा किस्सा!

ए धमाल्या, अरे मुलं पटापट् मोठी होतात.
तूही मनाची तयारी कर.

धमाल मुलगा's picture

4 Oct 2010 - 9:18 pm | धमाल मुलगा

ओ... का मला भ्याव घालताय :(

चतुरंग's picture

4 Oct 2010 - 9:41 pm | चतुरंग

मार्लबरो पडली का रे तोंडातून गळून? ;)

(बिगजॉनी)रंगा

धमाल मुलगा's picture

4 Oct 2010 - 9:56 pm | धमाल मुलगा

गपा की! :D :D :D
च्यायला, मार्ल्बोरोचं काय घेऊन बसलात? मीच गळाठलो ना. :)

>>(बिगजॉनी)रंगा
=)) =)) =)) =))
आधी ही सही बंद करा राव. जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा ठ्या करुन फूटतो मी. :D

रामदास's picture

5 Oct 2010 - 9:16 pm | रामदास

दुसर्‍याची तयारी करा.

jaypal's picture

4 Oct 2010 - 9:13 pm | jaypal

आग बा$$$$बो कय ह्ये ऐकतुया गना?

विसोबा खेचर's picture

4 Oct 2010 - 9:22 pm | विसोबा खेचर

गणपा,

बुटक्या जावयाबद्दल अभिनंदन रे.. :)

तात्या.

--
बनी माळरानी राई
ठायी ठायी केले स्नेही
तुझ्या विना नव्हते कोणी
आत अंतरात..
(येथे ऐका)
आम्ही यालाच यमन म्हणतो..!

स्वाती२'s picture

4 Oct 2010 - 9:36 pm | स्वाती२

मस्त किस्से!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Oct 2010 - 10:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा हा ... बिकाकडेपण असे किस्से आहेत म्हणे!

पण मी तर इथेच अडकले.... "बायकोने मग तिला लाईक आणि लव्ह मधला फरक तिच्या वयाला साजेश्या शब्दात सांगितला." मला नाही ब्वॉ सांगता येणार पहिलीतल्या मुलांना असं काही!

धमाल मुलगा's picture

4 Oct 2010 - 10:18 pm | धमाल मुलगा

आई-बाप झालं की ही अक्कल आपोआप कल्टिवेट होते असं म्हणतात. :)

नावातकायआहे's picture

6 Oct 2010 - 1:20 am | नावातकायआहे

स्वानुभव का?
;-)

ह.घ्या

चतुरंग's picture

4 Oct 2010 - 10:26 pm | चतुरंग

करा किश्श्यांची पोतडी खुली! ;)

(किश्श्यातला)रंगा

मला नाही ब्वॉ सांगता येणार पहिलीतल्या मुलांना असं काही!
थोडं थांबा हो बाईसाहेब! सगळं आपोआप येतयं. आपणही शिकतो......न शिकून सांगतोय कुणाला?;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Oct 2010 - 10:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हो, तेही खरंच आहे म्हणा! पण मला तर शंका वाटत्ये, मी सगळं समजावून सांगायला लागले की तमाम आड्यंस झोपून जातो तसंच काही झालं तर ....

पैसा's picture

4 Oct 2010 - 10:56 pm | पैसा

प्रश्न विचारायला लागली ना, की मनासारखं उत्तर मिळेपर्यंत थांबतच नाहीत. मग आपल्याला झोप येते, नव्हे, लागते सुद्धा. पण "ऊठ ना ग! आधी सांग" चा हल्ला सुरूच रहातो!

सूड's picture

5 Oct 2010 - 3:05 pm | सूड

>>प्रश्न विचारायला लागली ना, की मनासारखं उत्तर मिळेपर्यंत थांबतच नाहीत.
वरील प्रश्नाशी सहमत.
मला माझ्या मित्राने त्याच्या लहानपणचा सांगितलेला किस्सा आठवला. तो चौथ्या यत्तेत आणि त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा दोन वर्ष लहान. तो टिव्हीवर ऐकलेलं 'कुटं कुटं जायाचं हनिमुनला' हे गाणं सारखा गुणगुणायचा. एकदोनदा आईने ऐकलं मग, 'बाळा, दुसरं कोणतं तरी गाणं गा. सारखं सारखं हे काय गातोयस'.
भाऊ: का या गाण्यात काय वाईट्टै ? आणि हो हनिमुन म्हणजे काय गं ममा ?
ममा:
भाऊ: सांग ना !!
ममा: पपा सांगतील.
पपा : ती म्हणजे ना, एक पिकनिक असते.
माझा मित्रः असं नाहीच मुळी !! पिकनिक असते तर त्यात लाजण्यासारखं काय असतं ?? मी पाह्यलंय मामाच्या लग्नात मामीच्या मैत्रीणींनी तिला हनिमुनला कधी जाताय विचारलं तेव्हा सारखी लाजत होती ती. तुम्ही खरं काय ते सांगा.

या आगाऊपणाचं उत्तर एक धम्मकलाडू होता.

यशोधरा's picture

5 Oct 2010 - 3:12 pm | यशोधरा

हा धपाटा खाल्लेला मुलगा म्हंजे तूच ना सुधांशू?

सूड's picture

5 Oct 2010 - 3:30 pm | सूड


माझ्याइतका गुणी मुलगा नव्हता हों आमच्या शाळेत. एक मुलगी फार गप्पा मारायची म्हणून शाळेत बाईंनी तिला माझ्याशेजारी बसवलं जेणेकरून ती शांत बसेल, पण नंतर आम्ही दोघं इतक्या गप्पा मारायचो की बाईंना त्यांनी केलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करावा लागला.

यशोधरा's picture

5 Oct 2010 - 3:51 pm | यशोधरा

अरे वा! भलताच गुणी की तू! :D

मुलगी, टिळक,स्वामी विवेकानंद आणि गांधीजींच्या पुतळ्यावाल्या जोक वर मी पण सपाटुन मार खाल्ला होता चौथीत असताना.

Pain's picture

6 Oct 2010 - 12:01 am | Pain

कुठला जोक?

ऋषिकेश's picture

4 Oct 2010 - 11:05 pm | ऋषिकेश

हा हा हा
हसून हसून दमलो!

धमाल मुलगा's picture

4 Oct 2010 - 11:12 pm | धमाल मुलगा

काय क्रूर मनुक्ष आहे हा ॠष्या!

तिकडं गणप्या पडलाय चिंतेत आणि हा हसुन हसुन दमला म्हणे. छे छे छे! कलीयुग हों कलीयुग.

ऋषिकेश's picture

4 Oct 2010 - 11:41 pm | ऋषिकेश

धम्या, तु कारे टेंशन घेतोयस कलीयुगाचं?
नुसता गणपा चिंतेत आहे म्हणावं तर प्रतिसाद बघुन जात्यात बरेच जण आहेतसं दिसतंय... का आता तु सुपात आहेस म्हणून .... ;)

धमाल मुलगा's picture

5 Oct 2010 - 3:37 pm | धमाल मुलगा

जगदंब, जगदंब!
ह्याला राक्षसी आनंद म्हणतात बरं ऋ.

हा हा हा.

वरिल किस्सा ऐकुन एव्हरीबडी लव्ह्स रेमंड मधील अ‍ॅली आपल्या बापाला, रेमंडला, सेक्स-मनुष्य जन्माला का येतो वगैरेंबद्दल प्रश्न विचारुन भांडावुन सोडते. ह्या एपिसोडची आठवण आली.

अत्यंत धमाल एपिसोड आहे, घरातील तमाम 'मोठ्यांची' अ‍ॅलीचा प्रश्न तारांबळ उडवुन देतो, बायबल चाळण्याप्सुन ते 'चर्च मधील फादर'ला फोन करणे, रेमंड एका प्रश्नाचा होमवर्क करुन जातो तर अ‍ॅली नविनच प्रश्न विचारुन त्याची दांडी गुल करते वगैरे प्रसंग बेस्ट आहेत.

हे सगळं आठवुन, गणपाशेठ रेमंडच्या रोलमध्ये दिसु लागल्याने अजुन ह ह पु वा झाली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Oct 2010 - 11:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तू ते 'डिफरंट स्ट्रोक्स' बघायचास का रे? त्यात ते गॅरी कोलमन "व्हॉच्यू टॉकिन्बाऊट विलिस?" विचारायचा ते?

त्यात तो छोटा त्याच्या (दत्तक) वडलांना मुलं कशी होतात हे विचारतो. वडील त्याला मुद्दामच जार्गन वापरत हे सगळं सांगतात. छोटू भलतंच काहीतरी (बहुदा पचनासंदर्भातले शब्द) समजतो आणि नंतर काही दिवसांत्/तासांत वडलांना म्हणतो, मुलं कशी होतात हे तुम्हाला माहितच नाही. आणि सोप्या शब्दांत वडलांना सगळं समजावतो.

नाही हे मी पहात नव्हतो. पण बील कॉस्बीचा हा इपिसोड पाहिला नसाल तर जरुर पहा.

http://www.youtube.com/watch?v=Dggt7PuoG00

प्राजु's picture

4 Oct 2010 - 11:21 pm | प्राजु

प्रश्न.. उत्तर.. पुन्हा प्रश्न.. पुन्हा उत्तर... पुन्हा प्रश्न... सारवासारव.. पुन्हा प्रश्न.. मी गप्प! असा.. खेळ माझा आणि लेकाचा चाललेला असतो.

उपास's picture

4 Oct 2010 - 11:24 pm | उपास

मला ही तो भाग आठवला.. (शोधावा लागेल पण ) तू नळीवर आहे तो भाग..

तुम्ही म्हणालात म्हणुन शोध घेतला तर प्रश्न विचारते ती क्लीप सापडली, पुर्ण एपिसोड मिळाला तर धमाल येईल.

(सद्ध्या टीबीएस वर पुन्हा मालिका सुरु आहे, ती पहातो आहे अर्थात.)

नायल्या बील कॉस्बीच्या इपिसोडच्या दुव्या बद्दल धन्स. रेमंड चा एपिसोड पाहिला होता.
मुलांच्या प्रश्नांना उत्तर देताना बरेच वेळा माझा रेमंड होतो. बर काही तरी थातुर मातुर उत्तर देउन भागत नाही. आपल्या उत्तरात नवा प्रश्न दडलेला नाहीना याची खात्री करुनच उत्तर द्याव लागत. नाही तर नविन प्रश्नांना उत्तर देताना तोंडाला फेस येतो.

रेवती's picture

5 Oct 2010 - 2:02 am | रेवती

तोंडाला फेस येतो
यालाच मुलांचे प्रश्न फेस करणे म्हणत असावेत.:)

@ रेवती, अगदी हेच मनात आले :)

गणपाभौ मस्त किस्सा !
मला एकदा शेजारच्या ४ वर्षाच्या मुलाने प्रपोज केले होते. का तर म्हणे ' तू मला स्कूटीवरून शाळेत सोडतेस म्हणून ! ' =))

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Oct 2010 - 1:18 am | विश्वनाथ मेहेंदळे

पूर्ण भाग नाही मिळाला. हे मिळाले.
http://www.youtube.com/watch?v=0j4iMm4yz8I

वाटाड्या...'s picture

4 Oct 2010 - 11:55 pm | वाटाड्या...

तू असले प्रसंग आलेस की तू खुष्कीचा मार्ग पकडुन स्वयंपाक घर गाठतोस ना? खरं सांग? आणि बायकोला प्रसंगाला फेस करायला लावतोस ना?

काळजी करु नकोस..मी पण तेच करतो...

(वाटसरु) - वाटी..

इंटरनेटस्नेही's picture

5 Oct 2010 - 1:12 am | इंटरनेटस्नेही

ह्म्म्म... मी किती मागास वर्गीय आहे याची जाणीव झाली.

(वर्गातील मुलींशी पेन ड्राईव्ह ने कॅच कॅच खेळणारा) इंट्या.

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Oct 2010 - 5:36 pm | ब्रिटिश टिंग्या

वरच्या प्रतिसादात काही क्रिप्टीक नसावं अशी अपेक्षा आहे! :)

टिउ's picture

5 Oct 2010 - 2:25 am | टिउ

आयला! बघावं तिथे चिनचा प्रश्न आहेच राव...काही खरं नाही आपल्या (आणि आपल्या पुढच्या) पिढीचं!

शिल्पा ब's picture

5 Oct 2010 - 6:02 am | शिल्पा ब

मी चौथीत असताना एका मुलाने माझ्या हातावर हात ठेवला होता ते आठवले ;)
त्याकाळी एवढे बॉय फ्रेंड / गर्ल फ्रेंड वगैरे काही नव्हते पण कदाचित इंग्रजी शाळेत असावे...कारण क्लास मधल्या इंग्रजी शाळेतल्या मुलींचं कोणाकोणावरून चिडवणं चालायचं...एकदा क्लासच्या टीचरने " कीस " चा वेगळा अर्थ (इंग्रजी ) सांगितल्याने एका मुलीला चांगलंच झापलं होतं...तो काळच साधा होता...त्याकाळी हे नव्हतं (आणि असलं तरी आम्हाला अनुभव नाही.)

सहज's picture

5 Oct 2010 - 6:37 am | सहज

भारी लिहले आहे.

स्पंदना's picture

5 Oct 2010 - 9:26 am | स्पंदना

"आई, आई, वन बिग बॉय हेल्पड मी फॉर माय सायन्स प्रोजेक्ट बिकॉज ही लाइक्ड इट, बट ही इज नॉट माय बॉय्फ्रेंड!!!"

आमची वय वर्षे १०.

लेकाच तर विचारुच नका, अजुन माझ्याच प्रेमात आहे.

गणपा भाउ फेस आला तरी फेस करावच लागत बर, वरील बाकिच्यांचे अनुभव सुद्धा मस्त.

विनायक प्रभू's picture

5 Oct 2010 - 9:36 am | विनायक प्रभू

ही एक पासींग फेज असते.
आधीही होती. आजही आहे. उद्या ही असेल.
फक्त संख्या वाढते आहे.
आणि आजुबाजुचे वातावरण ही संख्या वाढवेल.
ह्या वर इलाज- पक्का इलाज काही ही नाही. त्यातल्या त्यात लाफ इट ऑर स्माइल इट ऑफ बरा.
(१९६५ सालामधे हाचअनुभव घेतलेला विप्र)

अवलिया's picture

5 Oct 2010 - 10:24 am | अवलिया

=))

परिकथेतील राजकुमार's picture

5 Oct 2010 - 2:17 pm | परिकथेतील राजकुमार

गणपा, जोडे झिजवण्यापासून वाचवले हो लेकीने ;)

गणपाभौ, लेक एकदम हुश्शार आहे! :)

सुहास..'s picture

5 Oct 2010 - 3:15 pm | सुहास..

अग्गग !!

=))

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Oct 2010 - 8:09 pm | बिपिन कार्यकर्ते

गणप्या, तुझ्या भावना समजू शकतो. =))

आमचे किस्से (अदिती / रंगा फर्माईश)

०१.

"बाबा, तो क्ष अगदीच बॅड आहे."

"का?"

"तो मला आय लाईक यु म्हणला"

"बरं मग?" मी नेहमीसारखे अंडरप्ले करत.

"तुम्हाला काही समजतं की नाही? असं फक्त नवरा बायकोला म्हणतो."

मी ओव्हरप्ले झाल्याने बर्न आऊट.

०२.

मोठी धाकटीबद्दल तक्रार करतीये

"बाबा, ही बघा ना कशी करते आहे?"

"काय झालं?"

"स्वतःला हिरॉईन समजते की काय?"

"अगं काय झालं पण?"

"सारखी मला जवळ घेते आणि पप्पी घेते." हे म्हणजे धाकटी मोठीचे लाड / कौतुक इत्यादी करत होती. मोठीच्या डोक्यात भलतंच.

"मग काय झालं?"

"अहो पण तसं फक्त हिरोलाच करते ना हिरॉईन सिनेमात?"

०३. एका मित्राचा किस्सा.

भडक दृष्य आली की मित्र चॅनेल बदलायचा. त्याचा मुलगा तेव्हा ५वीत. एकदा असाच काहीसा सीन आला म्हणून त्याने गडबडीत रिमोटचे बटण दाबले आणि दुसरे चॅनेल आणले, तर त्यावर पहिल्यापेक्षा जास्त गंमत जंमत चालू होती.

"बाबा आता काय कराल?"

पैसा's picture

5 Oct 2010 - 8:24 pm | पैसा

haha

गणपा's picture

5 Oct 2010 - 8:21 pm | गणपा

बिचारा बाबा
=)) =)) =)) =))

सूड's picture

5 Oct 2010 - 8:32 pm | सूड

शिल्पा ब's picture

5 Oct 2010 - 10:39 pm | शिल्पा ब

=)) =)) " बाबा आता काय कराल?" =)) =))
बिचारा..

रेवती's picture

5 Oct 2010 - 9:10 pm | रेवती

मजेदार किस्से!

स्वप्निल..'s picture

5 Oct 2010 - 11:34 pm | स्वप्निल..

=)) =)) =))

स्वछंदी-पाखरु's picture

6 Oct 2010 - 12:06 am | स्वछंदी-पाखरु

असलाच एक किस्सा

मध्यंतरी काही कामा निमित्त मायदेशी आलो होतो. सकाळी एका मीटींगला जायचे म्हणून दाढी करत होतो.
माझ्या मोठ्या भ्राताश्रींची मुलगी सुखदा (वय ३ वर्ष ) माझ्या खोली मधे येउन मला दाढी करतांना बघत होती तेव्हाचा संवाद..

सुखदा: काका काय कलतोय? मला सांग ना???

मी: मी ... ना.... दाढी करतोय बेटा......

सुखदा: का???? काल लात्ली (रात्री )काकुला टोचली होती म्हनुन का??

हे ऐकून एकदम थक्क झालो... माझा चेहर्‍याला एका ठीकाणी सटकन ब्लेड लागली......

बायकोने मात्र "काल रात्री आपल्या खोलीच दार खरच उघड राहीलं होत की काय??? " ह्या प्रश्नाने
दीवसभर डोकं खाल्लं.........

स्वपा.
आजपण एकटा असलो तरी झोपायच्या आधी दार बंद असल्याची खात्री घेणारा......

चतुरंग's picture

6 Oct 2010 - 12:14 am | चतुरंग

खल्लास!! =)) =)) =))
तुमच्या पुतणीने एकदम बिनपाण्यानेच केली की तुमची! ;) (ह.घ्या.)

(फ्रेंचदाढीधारी)रंगा

गणपा मांडणी छान केलीत.
सेम किस्सा माझ्या भाचीच्या बाबतीत झाला होता. ती २रीत आहे. तिने लगेच जाऊन मॅडमना सांगितले. मॅडमने तिथेच त्याला खानाखाली लावुन दिली. आणी ह्यापुढे अस न वागण्याची हमी घेतली. आता ह्या गोष्टीवर हसाव की रडाव तेच कळत नाही.

गणपा's picture

6 Oct 2010 - 1:00 pm | गणपा

मॅडमने तिथेच त्याला खानाखाली लावुन दिली.

अरेरे हे म्हणजे फारच झाल.
इतक्या लहान मुलांनावर हात उगारु नये, त्यापेक्षा त्या शिक्षिकेने त्या मुलाला समजवुन सांगायला पाहिजे.
माराने मुलं सुधारतात या मताचा मी नाही.

तुमच बरोबर आहे गणपा माराने मुल सुधारत नाहीतच. उलत घाबरट किंवा अती झाल्यावर बेडर बनतात.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Oct 2010 - 2:07 pm | परिकथेतील राजकुमार

आमच्या एका मित्राचा ३ वर्षाचा भाचा उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी त्याच्याकडे आला होता. दुपारी तो मित्र आणि मी त्याच्या संगणकावर थोडे काम केले आणि तो बंद करायला लागलो.

भाचा :- मामा बंद नको करु. मला प्रिंसची गेम लावुन दे.

मित्र :- अरे काय सारखे प्रिंस प्रिंस ? जा ताई बरोबर पत्ते वगैरे खेळ.

भाचा :- तु मला गेम लावुन दिली नाहिस तर मी तुला बलविर पाशा म्हणेन.

========

ह्यावरुन एक विनोद आठवला.

दुसरीतला बंड्या शाळेतुन धावत धावत घरी येतो.

बंड्या :- बाबा, आज ना आम्हाला शिकवायला नविन मॅडम आल्यात. त्या असल्या चिकन्या आहेत ना.

बाबा :- बंड्या गाढवा अरे असे बोलतात का? त्या तुझ्या आईसारख्या आहेत.

बंड्या :- बाबा मला तुमचे हेच आवडत नाही ! जिथे तिथे स्वतःचे सेटिंग लावायला बघता.

भाचा :- तु मला गेम लावुन दिली नाहिस तर मी तुला बलविर पाशा म्हणेन.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

6 Oct 2010 - 2:17 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

पोट्टी फार आगोचर पणा करायला शिकतायत खरी!
पण आजुबाजुला जे पाहतात तेच शिकतात!
आपल्याकड्च्या अ‍ॅड्स पाहिल्यांनंतर त्यांचे प्रश्नार्थक झालेले चेहरे खुप त्रास देतात.
काय उत्तर द्यावं कळत नाही...
कारण त्यांनी ते विषय मित्र मैत्रिणीच्यात discuss केले तर जर्रा मोठे शाळकरी असतातच माहिती द्यायला...
wide stone ची अ‍ॅड पाहुन माझा ३ वर्षाचा पुतण्याने मला विचारले होते " काकी....तो छान छान वास (deo) फुस्स (spray) करत असताना त्या आंटी ला अस का होत?" आता काकी काय सांगणार?
अ‍ॅक्स ची लिफ्ट वाली अ‍ॅड पाहुनही तेच.... त्याचे कपडे कोणी विस्कटले....आणि नंतर च्या काकु अशा का दिसतात्?...हा प्रश्न लेकीच्या मैत्रीणीचा!

सुहास..'s picture

6 Oct 2010 - 5:10 pm | सुहास..

एका मित्राचा किस्सा.

भडक दृष्य आली की मित्र चॅनेल बदलायचा. त्याचा मुलगा तेव्हा ५वीत. एकदा असाच काहीसा सीन आला म्हणून त्याने गडबडीत रिमोटचे बटण दाबले आणि दुसरे चॅनेल आणले, तर त्यावर पहिल्यापेक्षा जास्त गंमत जंमत चालू होती.

"बाबा आता काय कराल?" >>>

अगगगगय्य्य्य्य्य्य !!