मिसळपाववर स्वागत (म्हणजे पहिलाच धागा म्हणून स्वागतप्रपंच)!
इंग्लंडात मला बराच वेगळा अनुभव आला आहे. इंग्लंडात साधारण ५-७% लोकं 'इंडीयन' (म्हणजे ब्रिटीश इंडीयातले, भारत+पाकीस्तान+बांग्लादेश) आहेत. त्यामुळे बर्याच लोकांना भारताबद्दल बेसिक माहिती असते, जसं हिंदू हा धर्म आहे, हिंदी (आणि बांग्ला) या भाषा आहेत इत्यादी. माझ्या काही मित्रांना इलिफंड गॉड, मंकी गॉड माहित होते हे पाहून खरंतर मलाच लाज वाटली. कारण नवरात्राला बंगालमधे दुर्गापूजा म्हणतात यापुढे मला दुर्गापूजेबद्दल काहीच माहिती नव्हती/नाही.
माझ्या गोर्या, ब्रिटीश अॅडव्हायझरला मराठी भाषेचं नाव माहित होतं, भारतात ती कुठे बोलली जाते, साधारण किती लोकं मराठी बोलतात याचीही कल्पना होती हे पाहून मलाच चक्कर येणं बाकी होतं. त्याच्या मुलाचा बेस्ट फ्रेंड मराठी असल्यामुळे ही माहिती त्याला होती. (नशीब, आता मला मोदक करायला शिकव म्हणाला नाही तो!)
म्हणे, साधारण १९६० च्या दशकात बरेच 'भारतीय' तिकडे गेले, जेव्हा व्हीजाचीही गरज भासत नसे. त्यामुळे इंग्लंडात तुम्ही म्हणता आहात तसा अनुभव नाहीच.
माझा अनुभव थोडासा वेगळा आहे. म्हणजे हा अनुभव एका भारतीया बद्दलचा आहे. मी दुबईत रहातो. आता युअई हा भारताबाहेरचा सर्वाधिक हिंदु लोकसंख्येचा देश आहे. भारतिय आणि पाकिस्तनी मिळुन एकुण लोकसंख्येच्या ५०-६०% आहेत. तेव्हा अशा देशातला अनुभव.
माझ्या ओफीसजवळ एक हाय-फाय भारतिय रेस्टॉरंट आहे. जाता येता तिथे काम करणारा एक माणुस मराठी बोलतो हे मी ऐकलं. एक दिवस न राहवुन मी त्याला तु मराठी आहेस का अस विचारलं, तर हा पठ्ट्या मला म्हणला कि मी मुस्लिम आहे. मी त्याला म्हणालो की मी तुला मराठी बोलताना ऐकलय आणि मी पण मराठीच आहे. त्याने मला परत एकदा तो मुस्लीम असल्याचं सांगितलं. यावर मी त्याला त्याचा धर्म नाही, भाषा कोणती अस विचारतोय अस म्हणालो. शेवटी एकदाचं आपल्याला मराठी येत असल्याचं त्याच्या तोंडातुन निघालं. तरी पण शेवटी जाता जाता आपण कोकणी मुसल्मान असल्याची पुस्ती त्याने जोडलीच.
आता याला काय म्हणालं? माझ्या स्वतापुरतीतरी हिंदु ही भारतीय, मराठी आणि हिंदु यातली शेवटची ओळख आहे. (ती या तिन्ही मधे सर्वात कमी दर्जाची आहे असा याचा अर्थ होत नाही)
ईतर मिपाकरांना काय वाटतं या बद्दल?
याचं कारण मराठी असणे आणि हिंदू असणे यात आपणच करीत असलेली सरसकट गल्लत. बहुतेकवेळी मराठी माणसाचं, मराठी बाण्याचं, मराठी पिंडाचं वर्णन करताना लोक (काही प्रथितयश लेखकही) हिंदू सणांचा, हिंदू चालीरीतींचाच उल्लेख करताना दिसतात. 'गणपती बाप्पा मोरया' अशी आरोळी न ठोकणारा माणूस मराठी असू शकतो की नाही?
सत्यनारायणाचा तीर्थप्रसाद न खाणारा माणूस मराठी असू शकतो की नाही? 'मराठी माणूस' असं म्हटल्यावर अशी माणसं आपल्याला अभिप्रेत असतात?
बाकी त्या बाईला जे कळले ते अनेकांना कळले नाही. आश्चर्यच नाही का ?
यात "अनेकांना कळले नाही" च्या ऐवजी "अनेकांना कळत नाही" असे म्हणायला हवे होते. :-)
बाकी या लेखनाच्या संदर्भात मला माझेच "ओळख" हे लेखन आठवले...
तसेच हिंदू असणे/नसणे यावरून ही चर्चा आठवली.
त्या व्यतिरिक्त २-३ वर्षांपूर्वी एकदा एका आंतर्राष्ट्रीय कॉन्फरन्ससाठी संयुक्त राष्ट्र संघात* जाण्याचा योग आला होता. तेथे देखील एक पूर्व युरोपिय देशातील बाई तिच्या पाण्यावरील प्रेझेंटेशनमधे भारतीयांचे नाव घेताना, "हिंदू"च म्हणत होती. नंतर समजले असे म्हणणारे इतर काही देशातील नागरीकही आहेत.
दोन्ही चर्चा वाचल्या. मस्त आहेत. माझाही समज बरेच दिवस हिंदू हा धर्म नसून विचारपद्धती आहे वगैरे असाच होता. परंतू त्यावर अधिक विचार केल्यावर तो फोल आहे असे वाटू लागले आहे.
ह्याविषयी माझी एक बेसिक शंका आहे. भारतातील संस्कृतीशी एकजीव असलेले अनेक मुसलमान/ख्रिश्चन असे जगभरात आहेत. तुमच्या व्याख्येने त्यांनाही आपण हिंदूच म्हणायची गरज पडते आणि तिथे ही व्याख्या तोकडी पडते. तुम्ही दिलेल्या चर्चेत श्री.धनंजय ह्यांनी हाच मुद्दा सुरेख मांडला आहे. त्यावर तुमचा प्रतिसाद वाचण्याची इच्छा आहे.
विस्तृत उत्तर तुमच्या पुढील पानावरील प्रतिसादात दिले आहे. मला वाटते त्यात सर्व मुद्दे येतात.
माझाही समज बरेच दिवस हिंदू हा धर्म नसून विचारपद्धती आहे वगैरे असाच होता. परंतू त्यावर अधिक विचार केल्यावर तो फोल आहे असे वाटू लागले आहे.
नक्की काय आणि कसा विचार केलात?
तुमच्या व्याख्येने त्यांनाही आपण हिंदूच म्हणायची गरज पडते आणि तिथे ही व्याख्या तोकडी पडते.
गरज कशाचीच पडत नाही. "हिंदू" शब्दाची व्याख्या केली याचा अर्थ उद्या कोणी मुस्लीम/ख्रिश्चनच कशाला अगदी निधर्मी असला तर त्याला जाऊन "तू हिंदूच" असे छळण्याचा काही प्रकार नाही आहे. भारतापुरते केवळ भारतीय म्हणायची आणि असण्याची आहे. मात्र या चर्चा लेखकास जो अनुभव आला आहे, जो येथील इतर काहींना आला आहे, जे मी देखील पाहीले आहे त्यावरून हिंदू हा शब्द स्थलदर्शक आहे हे देखील समजू शकते. त्यामुळे माझ्या मते हा वाद हा हिंदू धर्माची व्यापक व्याख्या करत सगळ्यांना सामावून घेणे अथवा "हिंदू " शब्द केवळ रिलीजन या कोत्या अर्थानेच आहे असे सारखे सांगत त्याला कमी करत अजून धार्मिक वाद वाढवण्यास मदत करणे यातील आहे. माझा पक्ष हा पहीला आहे... :-)
कुणी अगदी अमेरिकेत देखील आपल्याला 'तुम्ही हिंदू आहात काय?' असे विचारले तर 'होय मी हिंदू आहे आणि मी भारतीय आहे' अशी ओळख करून देण्यात चूक काय? नंतर भारत हा सर्व धर्मांना एकजूटीने वागवणारा; सगळ्या धर्मांचा आदर करणारा देश आहे; तिथे हजारो भाषा बोलल्या जातात आणि तरीही सगळे सुरळीत चालते इत्यादी शिक्षण आपण देऊ शकतो. पण त्या आधी आपण हिंदू आहोत हे मान्य करण्यात कमीपणा का वाटावा?
माझ्या मते मी जर त्या बाईच्या जागी असतो तर मला विचारलेल्या प्रश्नाचं सरळ उत्तर मिळालं नाही म्हणून वाईट नक्कीच वाटलं असतं. आपल्या पहिल्या बाणेदार उत्तराने समोरच्या भारताविषयी तुलनेने कमी ज्ञान असणार्या परदेशी व्यक्तीचा जर गोंधळ उडणार असेल आणि त्या व्यक्तीच्या मनात कदाचित थोडी नाराजी देखील निर्माण होणार असेल तर मग असले 'बाणेदार' चित्रपटीय उत्तर देण्यात काय हशील?
संभाषण कुठल्याही दृष्टीकोनातून यशस्वी करायचे असेल (आणि ते ही अनोळखी व्यक्तींमधले) तर आदर्शवाद थोडा बाजूला ठेवून आपण प्रत्यक्षतेच्या पातळीवर येऊन संभाषण फुलवणे आणि मग आपले म्हणणे मांडणे उचित नाही का?
करण जोहरछाप चित्रपटांमधली इंग्रजाळलेली भारतीय पात्रे विकसित देशातील ऐषोआराम भोगतांना उसने देशप्रेम दाखविण्यासाठी असली उत्तरे देतात हे पाहिलेले आहे पण प्रत्यक्षात अशी 'बाणेदार' उत्तरे कदाचित मने दुखावू शकतात.
आणि परदेशातही आपल्याला मराठी माणूस भेटल्यावर जितका आनंद होतो तितका पंजाबी माणूस भेटल्यावर होतोच असे नाही.
परासाहेब,
मी नाव वाचले. ते मुस्लिम आहे की हिंदू हा विचार मी केला नाही. माझे म्हणणे एवढेच होते की हिंदू असो किंवा मुस्लिम किंवा शीख किंवा येशूभक्त (किंवा ज्यू, जैन, बौद्ध....) किंवा कुणीही असो; आपण आपला धर्म सांगतांना लाजायचे कशासाठी. इथे हिंदू मी एक उदाहरण म्हणून वापरलेले आहे. "तुम्ही हिंदू आहात का?" या प्रश्नाला तितकेच साधे आणि सरळ "नाही मी मुस्लिम आहे आणि भारतीय आहे" असे सांगणे अजिबात चूक नसावे. नंतर आपण शिकवणी घेऊ शकतोच पण आधी मूळ प्रश्नाला व्यवस्थित उत्तर देणे उचित आहे असे मला वाटते.
लेखामागचा उद्देश लक्षात आला नव्हता...
कोकणी मुसलमान हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. डॉ. झाकीर नाईक नावाचा एक इसम सध्या सगळीकडे व्याख्याने देत फिरत असतो. मी पीस टीव्हीवर याची बरीच व्याख्याने ऐकली आहेत. कटाक्षाने इतर धर्मांना कमी लेखणे आणि आपल्या धर्माचे 'स्तोम' माजविणे असले धंदे हा माणूस कायम करत असतो. तो मुस्लिम राष्ट्रांमध्ये खूप लोकप्रिय आहे असे देखील ऐकीवात आहे. विशेष म्हणजे तो कोकणी मुसलमान आहे. म्हणजे तसं पाहिलं तर मराठीच आहे पण कुठेही त्याला ही (दुसरी कुठलीच) ओळख ठेवायची नाहीये; त्याला फक्त 'मुस्लिम' हीच ओळख ठेवायची आहे. मग सोयीस्करपणे अमेरिकेसारख्या देशात ही ओळख झाकण्याचे प्रकारही सर्रास चालतात. असली रिकामटेकडी माणसे असल्यावर धार्मिक उन्माद न पसरला तरच नवल! कोकणात मुस्लिम लोकांची गावेच आहेत आणि इतर गावातल्या त्यांच्या टोलेजंग, आलिशान इमारती इतर छोट्या घरांच्या पार्श्वभूमीवर नजरेत भरतात. आणि असा फरक कसा हा प्रश्न ही पडतोच. दाऊदसारखे देशद्रोही आणि उलट्या काळजाचे गिधाड कोकणातलेच....
आणि परदेशातही आपल्याला मराठी माणूस भेटल्यावर जितका आनंद होतो तितका पंजाबी माणूस भेटल्यावर होतोच असे नाही.
समीरसूर,
माझ्यासारखाच माणूस भेटल्यावर मला जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद मला माझीच भाषा, देश, जात, धर्म (म्हणजे नक्की काय?) असणारा माणूस भेटल्यावर होईल असं नाही.
परदेशात असताना दिवाळीचा एकच लाँग विकेण्ड काही बालपणीच्या मित्र-मैत्रीणींबरोबर घालवला तेव्हा कधी एकदा परत मी माझ्या लोकांमधे (पोलीश, ब्रिटीश इ.) जाते असं झालं होतं. पण ही माझ्यासारखीच माणसं जेव्हा मराठी बोलणारी असतात तेव्हा काही कोट्या करता येतात त्याचा काकणभरच जास्त आनंद होतो, बस तेवढंच!
जंतूंच्या प्रतिसादावरूनः
मी इंग्लंडातल्या छोट्या खेड्यातच होते. तिथल्या (सधन) शेतकर्यांशी अशी गप्पा मारण्याइतपत गाठ पडली नाही; पण जे काही खेडूत भेटले त्यांच्या प्रश्नांवरूनतरी त्या लोकांना भारत आणि भारतीय सण-उत्सव यांची बर्यापैकी माहिती असावी असं वाटलं.
आपलं म्हणणं कदाचित बरोबर असेलही पण मी फक्त त्याक्षणी मनात येणार्या भावनेविषयी बोलत होतो. आपल्याला सवय असलेली जीवनाची वाट असं कायमचं सोडून फक्त आपल्या माणसात राहणं हे माझ्या म्हणण्यात अपेक्षित नव्हतं. माहेराला आलेली सासुरवाशीण देखील ४-८ दिवसांनंतर कंटाळते आणि तिच्या घराची ओढ तिला अस्वस्थ करते.
शेवटी जी आपली वहिवाट असते ती सगळ्यांनाच प्रिय असते. मलाही आता पुण्यात १८ वर्षे राहिल्यानंतर माझ्या गावात तितकसं करमत नाही. ४-५ दिवसात मला माझ्या लोकांमध्ये येण्याची घाई होते. पण तिथे पाऊल टाकल्या-टाकल्या मन उल्हसित होतं, तिथले दिवस आठवतात आणि मन मोहरतं. हेच फीलिंग मला इतर कुठल्या गावात येणार नाही. हेच तत्व माणसाला लागू पडतं. अमेरिकेत मला एका स्टोअरमध्ये एक मराठी कुटुंब भेटलं तर मी स्वतःहून त्यांच्याशी बोललो. त्यांनाही आनंद झाला. पण हेच जी इतर हजारो भारतीय माणसे दिसतात त्यांच्याबाबतीत घडेल याची शक्यता नेहमीच कमी असणार आहे. शेवटी एक समान धागा, मग तो संस्कृतीचा असो; संस्कारांचा असो; विविक्षित जीवनपद्धतीचा असो; स्थळ-काळाचा असो; आपल्या भाषेचा असो, सापडला की मग अगदी थोडा वेळ का असेना पण मनाला बरं वाटतं हे खरं. असं बरं वाटणं मला पंजाबी माणूस भेटल्यावर वाटेलच याची शाश्वती नाही कारण माझ्या दृष्टीने तो भारतात असला काय किंवा अमेरिकेत असला काय; शेवटी तो आहे तर अनोळखीच!
माझा हा मुद्दा होता. आणि आपल्या लोकांमध्ये यायची घाई ही मुख्यत्वेकरून आपल्या सुरक्षित असल्याच्या भावनेपोटी जन्म घेते. आपलं सगळं सुरळीत चालू आहे; आपल्या अनुपस्थितीमुळे काही बिघडू नये ही असुरक्षिततेची भावना आपल्याला पुन्हा आपल्या लोकांकडे; आपल्या नेहमीच्या जीवनाकडे वळवते. असं माझं मत आहे. मागे एकदा मी माझ्या गावाला काही कारणास्तव १२ दिवस सलग राहिलो होतो. ४-५ दिवसांनंतर मला माझे कार्यालय; माझे सहकारी; माझे घर; माझ्या दुचाक्या; त्यांची सर्विसिंग; कार्यालयातली कामे इत्यादी गोष्टी अस्वस्थ करायला लागल्या होत्या. यात माझी असुरक्षिततेची भावना होती. माझ्या पश्चात कंपनीमध्ये काय झाले असेल; माझे काम पडून आहे याचा माझ्या नोकरीवर परिणाम तर होणार नाही ना; माझ्या गाड्या सुरक्षित असतील ना; माझे घर व्यवस्थित असेल ना...एक ना हजार प्रश्न....
'तुम्ही हिंदू आहात काय?' असे विचारले तर 'होय मी हिंदू आहे आणि मी भारतीय आहे' अशी ओळख करून देण्यात चूक काय?
तुम्ही म्हणता तशी ओळख करून देणे माझ्यापुरते अप्रामाणिकपणाचे झाले असते. मी कुठलाही धर्म पाळत नाही ह्याचा लेखात उल्लेख केला आहे. त्यामुळे याच्यात 'बाणेदार' उत्तर देण्यापेक्षा मी प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला. निधर्मी असणे हे 'चित्रपटीय' कसे काय?
करण जोहरछाप चित्रपटांमधली इंग्रजाळलेली भारतीय पात्रे विकसित देशातील ऐषोआराम भोगतांना उसने देशप्रेम दाखविण्यासाठी असली उत्तरे देतात हे पाहिलेले आहे पण प्रत्यक्षात अशी 'बाणेदार' उत्तरे कदाचित मने दुखावू शकतात.
माझा 'उसने देशप्रेम' वगैरे दाखवण्याचा हेतू नव्हता. यात तिचे मन दुखावल्याचे दिसले नाही. मला कुठल्या समाजगटात टाकावे ह्याचा ती मनाशी विचार करत असावी असे मला वाटले ( बर्याचदा मला मेक्सिकनही समजण्यात आले आहे.) मुख्य मुद्दा हिंदुत्व व भारतीयत्व याबाबतीत परदेशियांच्या मनात असलेला गोंधळ दाखवणं हा आहे.
>>>>> तुम्ही म्हणता तशी ओळख करून देणे माझ्यापुरते अप्रामाणिकपणाचे झाले असते. मी कुठलाही धर्म पाळत नाही ह्याचा लेखात उल्लेख केला आहे. त्यामुळे याच्यात 'बाणेदार' उत्तर देण्यापेक्षा मी प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला. निधर्मी असणे हे 'चित्रपटीय' कसे काय?
मग ठीक आहे. निधर्मी असणे चांगलेच पण सगळ्यांनाच जमते असे नाही. ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी माझे मत लागू पडावे.
>>>>> माझा 'उसने देशप्रेम' वगैरे दाखवण्याचा हेतू नव्हता. यात तिचे मन दुखावल्याचे दिसले नाही. मला कुठल्या समाजगटात टाकावे ह्याचा ती मनाशी विचार करत असावी असे मला वाटले ( बर्याचदा मला मेक्सिकनही समजण्यात आले आहे.) मुख्य मुद्दा हिंदुत्व व भारतीयत्व याबाबतीत परदेशियांच्या मनात असलेला गोंधळ दाखवणं हा आहे.
हे ही ठीक आहे. 'धर्म' ही संकल्पना अजूनही 'देश' या संकल्पनेपेक्षा जास्त वजनदार आहे. त्यामुळे ती बिचारी बावचळली असावी. शिवाय आपल्या देशात अधिकच जास्त वजनदार आहे....
जिज्ञासेपोटी एक प्रश्न विचारतो: तुम्ही धर्म पाळत नाही म्हणजे तुम्ही नास्तिक आहात का? आणि नसलात तर मग कुठल्या देवाची पूजा करता? अगदी मनापासून क्षमा मागतो; खूप वैयक्तिक प्रश्न विचारल्याबद्दल....
जिज्ञासेपोटी एक प्रश्न विचारतो: तुम्ही धर्म पाळत नाही म्हणजे तुम्ही नास्तिक आहात का? आणि नसलात तर मग कुठल्या देवाची पूजा करता? अगदी मनापासून क्षमा मागतो; खूप वैयक्तिक प्रश्न विचारल्याबद्दल....
प्रश्न वैयक्तिक आहे खरा, परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणेच, स्वतःचा (नि)धर्म मान्य करण्यात मला कमीपणा वाटत नाही. उत्तर- कुठल्याहि देवाची मी पूजा करत नाही.
शहराजाद,
उत्तराबद्दल धन्यवाद.
मी क्लिअरन्स देणारा कोण? माझ्या क्लिअरन्सला काय किंमत. मी फक्त माझे मत मांडले.
बाकी माझ्या 'क्लिअरन्स'साठी आपण ज्या खोचक पद्धतीने माझे आभार मानले आहेत ती पद्धत आवडली. :-)
मी पूर्वग्रहदूषित नाही. आपण आपले मत मांडले; मी माझे मांडले. आपणास आपले मत; आपली विचारसरणी पटते; मला माझी मते; माझी विचारसरणी पटते. चालायचंच... शेवटी माणसे म्हटल्यावर मतभेद व्हायचेच....
आपण मूळ पुण्याचे का?
तुम्ही म्हणता तशी ओळख करून देणे माझ्यापुरते अप्रामाणिकपणाचे झाले असते. मी कुठलाही धर्म पाळत नाही ह्याचा लेखात उल्लेख केला आहे. त्यामुळे याच्यात 'बाणेदार' उत्तर देण्यापेक्षा मी प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला. निधर्मी असणे हे 'चित्रपटीय' कसे काय?
तुम्ही रुढार्थाने धर्म पाळत नसाल कदाचित, पण प्रत्येक माणूस जन्मजात धर्म आणि जात घेउनच येतो. त्या अर्थाने कुणीच निधर्मी नसते. बर्याच वेळा काही सरकारी फॉर्म मधे सुद्धा धर्म आणि जात लिहावी लागते... मग तेव्हा तुम्ही जे लिहित असाल तेच उत्तर दिले असते तरी काही बिघडले नसते .
तुम्ही रुढार्थाने धर्म पाळत नसाल कदाचित, पण प्रत्येक माणूस जन्मजात धर्म आणि जात घेउनच येतो. त्या अर्थाने कुणीच निधर्मी नसते.
असहमत. जन्मजात धर्म आणि जात न पाळणारी पुष्कळ माणसे परिचयात आहेत. त्यांचे हे वर्तन स्पष्ट दिसत असताना त्यांना विशिष्ट धर्माचे वा जातीचे मानण्याची प्राज्ञा वा अधिकार माझ्याकडे तरी नाही.
बर्याच वेळा काही सरकारी फॉर्म मधे सुद्धा धर्म आणि जात लिहावी लागते... मग तेव्हा तुम्ही जे लिहित असाल तेच उत्तर दिले असते तरी काही बिघडले नसते .
उपरोल्लेखित माणसे अशा ठिकाणीही 'निधर्मी' आणि 'जात नाही' असे लिहितानाही पाहिले आहे. त्यामुळे अधिकृत, सरकारी फॉर्म्सवरही जन्मजात धर्म आणि जात लिहिणे अनिवार्य नाही, तो एक पर्याय आहे.
निदान भारतात -
जात जन्माने मिळते आणि बदलता येत नाही असे कायदा सांगतो.
धर्म हा विश्वास अर्थात बिलिफ होय. तो बदलण्याची परवानगी कायदा देतो.
जन्मजात धर्म आणि जात न पाळणारी पुष्कळ माणसे परिचयात आहेत.
या विधानाला निदान भारतात तरी किंमत नाही. प्रत्येक फॉर्म, लीगल डोक्युमेंट आणि इतर सगळे कागद यावर जात-धर्म लिहावीच लागते.
जात जन्माने मिळते आणि बदलता येत नाही असे कायदा सांगतो.
हे निव्वळ विशिष्ट जातीचे असल्याचे दाखवून ज्यांना काही जातनिहाय सवलतींचा लाभ घ्यायचा आहे, त्यांच्यापुरतेच मर्यादित आहे. तुम्हांस लाभ नको आहे? तर मग जात न लावल्याने काही फरक पडत नाही. इथे जात नाकारली जात आहे; बदलली जात नाही, हे लक्षात घ्यावे.
जन्मजात धर्म आणि जात न पाळणारी पुष्कळ माणसे परिचयात आहेत.
या विधानाला निदान भारतात तरी किंमत नाही. प्रत्येक फॉर्म, लीगल डोक्युमेंट आणि इतर सगळे कागद यावर जात-धर्म लिहावीच लागते.
'धर्म - निधर्मी; जात - नाही' असे लिहिलेल्या माझ्या परिचयाच्या कुणालाही आजतागायत पॅन, पारपत्र, वाहनचालक परवाना, स्थावर-जंगम मालमत्ता खरेदीविक्रीचे दस्त, मतदार यादी, अशा कोणत्याही बाबतीत अडवले गेलेले नाही. 'जात - नाही' असे लिहिणे म्हणजे जात लिहिणे असे मानायचे असल्यास मानू शकता, पण मग लिहिलेली जात म्हणजे जन्मजात जात नाही, हे ओघाने मान्य व्हावेच.
>>आणि परदेशातही आपल्याला मराठी माणूस भेटल्यावर जितका आनंद होतो तितका पंजाबी माणूस भेटल्यावर होतोच असे नाही.
परदेशात एखादा मराठी माणूस अनपेक्षित रित्या भेटल्याचा आनंद पहिल्या १-२ वेळेला होतो. मग आपण बोलणे सुरु केले की आपल्या लक्षात येते की आपल्याला शिस्तीत फाट्यावर मारले जात आहे. तिसऱ्या वेळापासून आनंद वगैरे काही होत नाही. परदेशात मराठी माणूस दुसऱ्या अनोळखी मराठी माणसाकडे ज्या नजरेने बघतो त्याला योग्य उपमा द्यायची तर खुद्ध कालिदासाला खाली आले पाहिजे. इतरेजनांचे ते काम नोहे. तरीही सांगायचेच झाले तर, शिरीष कणेकरांच्या फिल्लमबाजीतील वाक्य उधार घेतो, "अरे असाल, तुम्ही कुणीतरी असाल, तुम्ही तुमच्या घरी मोठे, आम्ही आमच्या घरी मोठे...." साधारण असे स्वगत आपल्याला ऐकू येते (म्हणजे चेहऱ्यावर वाचता येते)
बाकी पंजाबी माणूस भेटला तर निदान तोंडावर तरी गोड बोलतो. मागे शिव्या का घालत असेना. मराठी माणूस दोन्ही कडे शिव्या घालतो.
(हा मला आलेला अनुभव आहे, सर्वांना येत असेल असे नाही. आणि ज्याअर्थी मला तो आला आहे त्याअर्थी माझ्यातच काही दोष असला पाहिजे असे कुणाचे मत असल्यास त्याबद्दल मी मतभेद व्यक्त करणार नाही. बाकी चालू द्या.)
परदेशात एखादा मराठी माणूस अनपेक्षित रित्या भेटल्याचा आनंद पहिल्या १-२ वेळेला होतो. मग आपण बोलणे सुरु केले की आपल्या लक्षात येते की आपल्याला शिस्तीत फाट्यावर मारले जात आहे. तिसऱ्या वेळापासून आनंद वगैरे काही होत नाही. परदेशात मराठी माणूस दुसऱ्या अनोळखी मराठी माणसाकडे ज्या नजरेने बघतो त्याला योग्य उपमा द्यायची तर खुद्ध कालिदासाला खाली आले पाहिजे. इतरेजनांचे ते काम नोहे. तरीही सांगायचेच झाले तर, शिरीष कणेकरांच्या फिल्लमबाजीतील वाक्य उधार घेतो, "अरे असाल, तुम्ही कुणीतरी असाल, तुम्ही तुमच्या घरी मोठे, आम्ही आमच्या घरी मोठे...." साधारण असे स्वगत आपल्याला ऐकू येते (म्हणजे चेहऱ्यावर वाचता येते)
बाकी पंजाबी माणूस भेटला तर निदान तोंडावर तरी गोड बोलतो. मागे शिव्या का घालत असेना. मराठी माणूस दोन्ही कडे शिव्या घालतो.
(हा मला आलेला अनुभव आहे, सर्वांना येत असेल असे नाही. आणि ज्याअर्थी मला तो आला आहे त्याअर्थी माझ्यातच काही दोष असला पाहिजे असे कुणाचे मत असल्यास त्याबद्दल मी मतभेद व्यक्त करणार नाही. बाकी चालू द्या.)
अगदी हाच अनुभव येतो सद्ध्या मला देखिल अमेरिकेत.. त्यामुळे हेच म्हणतो..
आपला समाज, आपली संस्कृती, आपला देश, आपली ओळख (आयडेंटीटी) याबद्दल आपण जिथे राहतो त्या परदेशी समाजात जास्त अवेअरनेस असावा असे मनापासून वाटते. तुम्हाला असे काही अनुभव आले आहेत का?
आपला अनुभव वैश्विक असावा. परदेशात कशाला, उत्तर भारतात मला अनेकदा आलेला अनुभव: मी मराठी आहे एवढं कळलं की मी ब्राह्मण असणार आणि शाकाहारी असणार असं गृहीत धरलं जातं. मला आकडेवारी माहीत नाही, पण महाराष्ट्रात ज्यांच्या घरी मांस शिजवलं जातं अशा लोकांची टक्केवारी शाकाहारी लोकांपेक्षा अधिक असावी. परंतु कदाचित असं होत असेल की माझा संबंध उत्तर भारतातल्या सुशिक्षित, पांढरपेशा समाजाशीच आला; अशा लोकांच्या समोर येणारे बहुतांश मराठी लोक शाकाहारी ब्राह्मण असतील म्हणून त्यांचा असा समज होतो. (हा माझा अंदाज आहे). थोडक्यात, एखादी परदेशी व्यक्ती कोणत्या वर्तुळात वावरते त्यावरून तिच्या संपर्कात कोणते भारतीय येतात हे ठरत असावं. त्यामुळे त्या अनुषंगानं त्या व्यक्तीची भारतीयांबद्दलची मतं/पूर्वग्रह बनत असावीत.
अदिती यांचा इंग्लंडमधला अनुभव मलाही आलेला आहे. याचं कारण कदाचित असं असावं की इंग्लंडमध्ये भारतीय उपखंडातले विविध जाती-धर्मांचे लोक दैनंदिन जीवनात सामोरे येतात, तसेच सार्वजनिक नात्यानंही सामोरे येतात - उदा: लोकप्रतिनिधी, वृत्तपत्रस्तंभलेखक, साहित्यिक, वगैरे. यामुळे इंग्लंडमध्ये इतक्या मूलभूत पातळीवर आपल्याविषयी अज्ञान दिसत नाही. हे मात्र इथंही नमूद करावं लागेल की माझा संबंध तिथल्या शहरी, सुशिक्षित माणसांशीच आला. छोट्या खेड्यातल्या इंग्लिश शेतकर्याशी बोललं तर कदाचित अधिक अज्ञान दिसेल.
"आदर्शवाद थोडा बाजूला ठेवून आपण प्रत्यक्षतेच्या पातळीवर येऊन संभाषण फुलवणे आणि मग आपले म्हणणे मांडणे उचित नाही का?"
श्री.समीरसूर यांच्या प्रतिसाद वाचल्यानंतर मनात आले की, त्यांच्या या वाक्यातील 'आदर्शवाद' म्हणजे नक्की त्यांना काय अभिप्रेत आहे? का तेवढ्या भाजी खरेदी करण्यास लागलेल्या वेळेपुरताच शहराजाद यांनी ती भूमिका घ्यायला हवी होती?? धागाकर्त्या 'शहराजाद' या (नावावरून तरी...) मुस्लिमधर्मीय आहेत असे गृहित धरतो (मराठी भाषा आणि टंकन यावर खूपच 'मास्टरी' दिसते) आणि त्यामुळे त्यांनी स्वतःची ओळख परकीयाला करून देताना 'भारतीय' (संभाषणात त्या "इंडियन" असे उच्चारल्या असतील) असे म्हटल्यामुळे 'हिंदू' संकल्पनेला त्यांनी कुठे धक्का लावला असे आपण समजू नये, किंबहुना त्यांनी "मी मुस्लिम स्त्री" अशी तर त्या अमेरिकन भाजीवालीला करून दिली नाही, ही देखील एक औचित्याची बाब मानली पाहिजे.
मुस्लिम धर्मात अस्तित्वात असलेल्या सनातनवाद्यांचे आज 'सॉफ्ट टार्गेट' कुणी बनले असतील तर हिंदू धर्माशी जवळीक ठेऊन तसेच 'भारत माझा देश आहे आणि मी भारतीय आहे' असे म्हणणारा मुस्लिमातील एक मोठा वर्ग आहे. उच्च आणि वैज्ञानिक शिक्षणामुळे वैचारीक प्रगती केलेला हा वर्ग प्रतिगामी तत्वापासून दूर जाण्यातच धर्माची खरी शिकवण आहे असे मानतो. त्यामुळे 'शहराजाद' यांच्यासारखी व्यक्ती किमान इतपत भूमिका उघडपणे मांडून हिंदू धर्माशी वा देशातील मतप्रवाहाशी सलगी साधते त्यावेळी ती बाब स्वागतार्ह वाटली पाहिजे किंबहुना अशाच विचारसरणीच्या व्यक्ती त्या धर्मात/समाजात वाढाव्यात अशी कामना करणे ठीक होईल. भारतीय मुस्लिम समाजाविषयी (मी दिल्ली-मुंबई-कलकत्ता या मेट्रो सिटीजमधील मुस्लिमाविषयी लिहित नाही...तर राज्याच्या अनेक जिल्ह्यातून अनेकविध कामानिमित्त विखुरलेल्या व तेथील समाजराहणीशी नाळ जुळविलेल्या मुस्लिमांविषयी लिहित आहे) अद्यापि नीटशी कल्पना नसलेला फार मोठा वर्ग भारतात अस्तित्वात आहे; आणि हाच वर्ग मुस्लिम जनमानस नीट समजावून घेण्याचा प्रयत्न करीत नाही, ही मुस्लिमातील सुधारकांची खंत आहे.
मुस्लिम समाजातील प्रतिगामी चळवळी जणू त्या समाजाचा जैविक घटक (बायॉलॉजिकल फॅक्टर) आहे ही धारणा इतकी पक्की झाली आहे की या चळवळीत अ पासून ज्ञ पर्यन्त सर्व मुस्लिम सामील झाले आहेत, हा एक सहजगत्या काढला जाणारा 'हिंदू लॅबोरेटरी' तील रिझल्ट असतो. मग एकदा का संख्येने बहुजन ठरलेल्या समाजाचे मनोगत अशारितीने 'कॉन्क्रीट' झाले की त्या भूमिकेतून वावरताना सामाजिक बदलाच्या प्रक्रियेकडे नैसर्गिकरित्या दुर्लक्ष होत जाते..... आणि नेमके हेच शल्य सुधारणावादी मुस्लिमांचे आहे... (जरी ते संख्येने लहान असले तरी).
'इकॉनॉमिक टाईम्स' मधील एक ज्येष्ठ पत्रकार श्री.समर खडस यांनी 'मी मुसलमान?' या लेखात नेमकी हीच व्यथा मांडली होती. त्यांचे वडील समाजवादी पक्षाचे काम करत. घरात धार्मिक रूढीना अजिबात स्थान नव्हते. मुस्लिम असूनही आईवडिलांनी समरकडून अभ्यासाअगोदर 'शुभं करोति' म्हणवून घेण्याचा प्रघात ठेवला होता. समर याना शाळेच्या वयात हिंदू-मुसलमान म्हणजे काय हेच माहित नव्हते. समीर म्हणतात "एकदा क्रिकेट खेळताखेळता मला माझा धर्म कळला." मुलांत खेळताना नेहमी होतात तशीच काहीतरी भांडणं झाली, आणि एक मित्र समीरकडे पाहत सगळ्यांना म्हणाला, "ए याला घ्यायचा नाही आपण. हा मुसलमान आहे. काढून टाकू या." समीर याना तो पर्यंत 'खेळातून काढून टाकणे म्हणजे ' हा रडी खातो, मारले तर घरी नाव सांगतो, हा स्वत:ची बॅट आणत नाही' यासारखी कारणे असतात इतपतच ज्ञान. पण "मुसलमान आहे म्हणून काढून टाका' हे ज्ञान एका हिंदूनेच दिले. पुढे पुढे तर कॉलेज शिक्षण पूर्ण झाले, उमेदवारी झाली, पक्की नोकरी सुरू झाली, नोकरीनिमित्या हिंडणे सुरू झाले, पण 'लोकांच्याच काय पण सहकार्यांच्यादेखील मनातून माझी जात जाता जाईना.." आणि हे नित्याचेच झाले होते...त्यामुळे एक गोष्ट समीर याना नक्की जाणवली ती म्हणजे, स्वतः कितीही नाकारलं तरी या देशात जन्माने मिळालेली जात वा धर्म सुटत नाही. त्यांच्या शाळा/कॉलेजच्या दाखल्यावर धर्म "भारतीय" असे लिहिलेले आहे, असं असलं तरी ते म्हणतात, "का कोण जाणे, लोकांना माझा धर्म बरोबर कळतोच आणि ते मला मुस्लिम म्हणूनच ट्रीट करतात."
नेमकी हीच खंत आहे "भारतीय मुस्लिमां"ची.
इन्द्रा
(याच विषयाशी थोडेसे अवांतर ~~ कोल्हापुरातील एका "भारतीय" मुस्लिम नेत्याच्या बंगल्याचे नाव "श्री" आहे. या बद्दल स्थानिक मुस्लिमांनी कधीही रोष व्यक्त केलेला नाही. तर जिल्ह्यातील एका मतदार संघात ८०% पेक्षा जास्त हिंदू मतदार आहेत तरी तेथील "आमदार" पदी एक मुसलमान व्यक्ती निवडून आली आहे.)
>>जिल्ह्यातील एका मतदार संघात ८०% पेक्षा जास्त हिंदू मतदार आहेत तरी तेथील "आमदार" पदी एक मुसलमान व्यक्ती निवडून आली आहे.
८०% पेक्षा जास्त मुसलमान मतदार आणि हिंदू व्यक्ती निवडून आलेली असा मतदार संघ कुठे असेल का याचा विचार करतो आहे. (असेलही कदाचित म्हणा, आपले ज्ञान तोकडे आहे)
बाकी बरेचसे मुद्दे पटले. या विषयावर सलीम खान यांनी काही लेख लिहिले होते मटा मध्ये साधारण २ वर्षांपूर्वी. कुठून मिळवता आले तर वाचा.
सलीम खान यांच्या लेखाची लिंक शोधाच. त्यांच्या (बहुदा त्याच) लेखातला एक प्रसंग:
गाडीला ड्रायव्हर करकचून ब्रेक मारतो आणि आपण एखाद्या अपघातातून बचावलो हे समजल्यावर मी (सलीम खान) म्हणतो "या अल्ला!", बायको म्हणते "अरे देवा" आणि आमची सगळी मुलं एका सुरात "ओ माय गॉड" म्हणतात.
इंद्रा, शहरजान मुस्लिम आहेत का नाहीत हे कोणी ठरवायचं?
"कोणताही धर्म नसल्यावर पुन्हा धर्म ठरवण्याचा प्रश्नच का यावा?"
~~ होय हा मुद्दा बिनतोड असाच आहे. त्यामुळे माझ्या प्रतिसादात 'त्या मुस्लिम आहेत' आहेत असे कुठेतरी ध्वनीत होत असेल तर तो भाग (आता) संपादित करता येत असेल तर जरूर करतो. त्यांचे मूळ वाक्य "रुढार्थाने कुठलाच धर्म पाळीत नाही..." असे असले तरी मी केवळ 'नामसदृश्या'मुळे त्या मुस्लिम आहेत असे गृहित धरून तो प्रतिसाद व्यापक स्वरूपात नेला.
शहराजाद यांच्या त्यामुळे भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करीत आहे.
इन्द्रा
आपण दिलगिरी व्यक्त केलीत ते ठीकच आहे, पण एक कुतुहल म्हणून अवांतर प्रश्नः
धागाकर्त्या 'शहराजाद' या (नावावरून तरी...) मुस्लिमधर्मीय आहेत असे गृहित धरतो (मराठी भाषा आणि टंकन यावर खूपच 'मास्टरी' दिसते)
म्हणजे लेखक मुसलमान असल्यास मराठीवर (भाषा आणि टंकन) पुरेसे प्रभुत्व नसणार आणि तसे असल्यास ते उल्लेखनीय ठरावे, असा काहीसा सूर यात जाणवतो. तसेच आपल्याला सुचवायचे होते का?
".....मुसलमान असल्यास मराठीवर (भाषा आणि टंकन) पुरेसे प्रभुत्व नसणार"
~ अगदी उज्ज्वल निकम फंडा माझ्या गळ्यात मारला आहे, श्री.चिंजं यानी.... अँण्ड आय अप्रेसिएट इट्स रेलेव्हन्स, माय फ्रेंड !!
माझी या वाक्यापाठीमागील भूमिका >>
१. सन्माननीय सदस्या 'शहराजाद' यांचे नाव व लेखन मी प्रथमच (आजच या धाग्याच्या निमित्ताने) इथे पाहिले. धागा तर राहू दे, पण या नावाने कुठे प्रतिसादही वाचनात आलेला नव्हता. त्यामुळे त्या नव्या सदस्या असून या एकदोन दिवसात त्यांनी इथे भाग घेण्यास सुरुवात केली आहे असा हिशोब मी मनोमनी मांडला. या महिन्यात (खरेतर ऑगस्टपासून) खूप नव्या आयडी (फेमस प्रविन भ्प्कर पासून) मिपावर आल्या आहेत आणि त्यांचा येथील सहभाग अनुभवताना सारखे जाणवत होते की बर्याच जणांचे टंकन कौशल्य उच्च दर्जाचे नाही, पण असे असले तरी विषयातील नावीन्य भावले तर प्रतिसाद त्यांना जात होता. इथे शहराजाद यांची टंकनातील अचूकता (जी कौतुकास्पद आहेच...) मला नोंदवावी वाटली ती याच कारणासाठी की त्यांचा येथील पहिला सहभाग (अदिती यांनी नोट केली आहे ही बाब, हे मी वाचले होते) आणि तोही योग्य त्या सादरीकरणासह....बस्स.
२. 'मुसलमान असल्यास मराठी' वर प्रभुत्व नसणार > हा मुद्दा वादासाठी निसरडा ठरणार हे मी जाणतो. कुठेतरी हा विचार माझ्या मनाला स्पर्शून गेला हे मी निर्विवादपणे कबूल करतो, त्याला कारण म्हणजे नावातील 'अरेबियन इसेन्स' + मिपावरील पहिले लेखन + यापूर्वी कुठेच प्रतिसाद नाहीत + रुढार्थाने निधर्मी असल्या तरी नावावरून मी बांधलेला धर्माचा अंदाज + आणि अमेरिकन वातावरणातील राहणी = उत्तर (मी काढलेला) मराठी भाषेवरील प्रभुत्वाचा मुद्दा !
असो....आशा आहे की, दस्तूरखुद्द शहराजाद याबाबत माझ्यावर कोणतीही केस दाखल करणार नाहीत. प्लीज क्लोज द फाईल !
इन्द्रा
इंद्रा, मी मिपावर आले तो माझा पहिला प्रतिसाद पाहिलास तिथपासूनच माझ्याही टंकनात खूप कमी चुका आहेत. मिपाबाहेर लोकं मराठी टंकन करतच नाहीत असा काही प्रकार नाही.
दुसरा मुद्दा, इथे जाशील तर शहराजाद यांनी इतर काही ठिकाणी प्रतिसाद दिलेले आहेत ते दिसेल. मी स्वागत करताना आधी लेखिकेची वाटचाल पाहिली होतीच.
तिसरा (कदाचित निरर्थक मुद्दा) मिपावरचा शाहरूख हा मुसलमान नाही असं त्यानेच कुठेतरी प्रतिसादात लिहीलं होतं. त्यामुळे व्हर्च्युअल जगातल्या नावांवरून कोणाच्या धर्म-पंथ-जात-वयाचा अंदाज करण्यात अर्थ नसतो. (आप्पा जोगळेकरास त्याचं वय लिहावं लागतं सहीत!)
असो. हे फार्फार अवांतर सुरू आहे, त्यामुळे इथेच थांबलेलं बरं!
अदिती....
होय... तू म्हणतेस त्यात तथ्य आहेच (आय मीन... मिपाबाहेर लोकं मराठी टंकन करतच नाहीत असा काही प्रकार नाही.) ~ पण वर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मला त्यांचा येथील पहिलाच दिवस आहे असे वाटले आणि तोही असा प्रभावी वाटावा असा (दोन्ही अर्थाने ~ विषयाची मांडणी प्लस मराठी टायपिंग) मग त्यांचे आपण यापूर्वी प्रतिसाद वाचले की नाहीत हा प्रश्नच आला नाही.
आता तू 'इथे' जा म्हणालील, मग मी तिथे गेलो आणि तिथून परत आलो कारण "तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही." हा फटका बसला. पण, असो....तू म्हणतेस तसे हे फार अवांतर सुरू आहे.
"व्हर्च्युअल जगातल्या नावांवरून कोणाच्या धर्म-पंथ-जात-वयाचा अंदाज करण्यात अर्थ नसतो."
~~ राईट यू आर. याच न्यायाने 'चिंतातर जंतू' हा नेहमी चिंतेतच असेल असे काही नाही...तोही पिझ्झा बर्गर खात खात आपल्या मित्रांसमवेत डेक्कन जिमखान्यावर धमाल उडवत असेल..... तर 'अर्धवट' आणि 'अर्धवटराव' ही नावे खरे तर 'इंटुक' आहेत हे ते वारंवार सिद्ध करीत असतात....तर इथे 'विक्षिप्त' नावाने वावरणारी एक भद्र महिला इतरांचा विक्षिप्तपणा नेमकेपणे हेरत असते.
इंटरेस्टींग व्हर्च्युअल वर्ल्ड !
इन्द्रा
>>तर 'अर्धवट' आणि 'अर्धवटराव' ही नावे खरे तर 'इंटुक' आहेत हे ते वारंवार सिद्ध करीत असतात....
इंद्रदेव.. तुमच्यासारखी जाणती माणसं पण धाग्याच्या प्रतिसादसंख्येच्या सुपार्या घ्यायला लागली हे पाहुन अंमळ खेद वाटला. ;)
अधिकाधिक सदस्यांची नावं घेउन काउंट वाढवायचा प्रयत्न आवडला. :)
अवांतर - इंटुक म्हणजे काय ब्वॉ?
इंद्रदेव.. तुमच्यासारखी जाणती माणसं पण धाग्याच्या प्रतिसादसंख्येच्या सुपार्या घ्यायला लागली हे पाहुन अंमळ खेद वाटला. >>>
अर्ध्या लेका , तु का रिअॅक्ट करतोयस ? घरातली पुस्तक सोडुन खवंच्या अभ्यास कर आधी :)
अवांतर : चमनचिंधी लोंकाच्या नादी नाय लागायच जास्त ..
आजचा गृहपाठ : चमनचिंधी या शब्दाचा ऊगम व अर्थ शोधा
नाही ओ भाऊ ~~ त्या सुपार्यांच्या बागेत मी कधी जात नाही. अदितीताईनी मी 'वाईच' त्या प्रतिसादात गडबडलो म्हणून माझे कान पिळले, त्यासाठी आभारस्वरूपात त्यांना उत्तर देणे क्रमप्राप्त होते म्हणून एका पाठोपाठ दोनतीन प्रतिसादाची पिसे इथे घरंगळली. असो.
"अवांतर - इंटुक म्हणजे काय ब्वॉ?"
'इंटुक' प्रकरण तुम्हास खरंच माहित नाही असे गृहित धरून खुलासा करतो ~~
महेश एलकुंचवार यांच्या सुप्रसिद्ध 'गार्बो' नाटकातील नायकाचे हे नाव. तो इंटेलेक्चुअल (प्रोफेसर आहे यासाठी) आहे, म्हणून त्याच्या मित्रांनी त्याचे 'इंटुक' या टोपणनावाने बारसे केलेले असते.
इन्द्रा
आम्ही... आणि कसलं ते 'ईठ्ठलाकुचल' का काय ते... काय अधोगती ही समाजाची..
चार दिवस प्रतिसादमौन.. आणि प्रार्थना पण करणार आहोत..
इंद्रदेवांना सुरा, अप्सरा वगैरे बंद करावी म्हणून उपोषणालाही बसावं म्हणतो.. ;)
प्रतिक्रिया
आयला मला वाटलं होतं अजून एक
स्वागत
शहराजाद मिपावर स्वागत असो
माझा अनुभव
याचं कारण मराठी असणे आणि
बिचारा माणुस
अपेक्षाभंग ! बाकी त्या बाईला
"कळत"
दोन्ही चर्चा वाचल्या. मस्त
सहमत
उत्तर
मला आत्तापर्यंत कोणत्याच
हरकत नसावी
कुणी अगदी अमेरिकेत देखील
नाव वाचले
ते peace चॅनल होते की
आणि परदेशातही आपल्याला मराठी
बरोबर आहे
हरकत आहे
>>>>> तुम्ही म्हणता तशी ओळख
मग ठीक आहे. हे ही ठीक
धन्यवाद
आपण मूळ पुण्याचे का? नाही.
तुम्ही म्हणता तशी ओळख करून
असहमत
निदान भारतात - जात जन्माने
पुन्हा असहमत
>>आणि परदेशातही आपल्याला
खरे आहे..
परदेशात एखादा मराठी माणूस
>>बाकी पंजाबी माणूस भेटला तर
वैश्विक अनुभव
माझ्या माहिती प्रमाणे भारत हे
माझ्या माहिती प्रमाणे भारत हे
आता नेपाळही नाही.
निधर्मी
भारतीय मुसलमान
>>जिल्ह्यातील एका मतदार संघात
लिंक शोधाच.
मला वाटतं शहरजाद यांनी पुरेशा
निधर्म
निधर्मी म्हणून दिलगिरी, पण...
कात्रीत पकडला गेलो आहे....!
माझं नाव लिहीलं आहे म्हणूनच
इंटरेस्टींग व्हर्च्युअल वर्ल्ड !
>>तर 'अर्धवट' आणि 'अर्धवटराव'
इंद्रदेव.. तुमच्यासारखी जाणती
इंटुक
कलियुग !!!!!
आम्ही... आणि कसलं ते