हिंदुत्व आणि भारतीयत्व
In reply to माझा अनुभव by अभिषेक पटवर्धन
In reply to अपेक्षाभंग ! बाकी त्या बाईला by अवलिया
In reply to "कळत" by विकास
In reply to दोन्ही चर्चा वाचल्या. मस्त by आमोद शिंदे
In reply to दोन्ही चर्चा वाचल्या. मस्त by आमोद शिंदे
In reply to हरकत नसावी by समीरसूर
कुणी अगदी अमेरिकेत देखील आपल्याला 'तुम्ही हिंदू आहात काय?' असे विचारले तर 'होय मी हिंदू आहे आणि मी भारतीय आहे' अशी ओळख करून देण्यात चूक काय?समीरशेठ आपण भवतेक लेखकाचे नाव निट वाचले नसावेत :) माझा अंदाज बरोबर असेल तर नाव वाचल्यावर आणि समजुन घेतल्यावर आपल्याला लेखनामागचा उद्देश लक्षात येईलच.
In reply to कुणी अगदी अमेरिकेत देखील by परिकथेतील राजकुमार
In reply to नाव वाचले by समीरसूर
In reply to हरकत नसावी by समीरसूर
आणि परदेशातही आपल्याला मराठी माणूस भेटल्यावर जितका आनंद होतो तितका पंजाबी माणूस भेटल्यावर होतोच असे नाही.समीरसूर, माझ्यासारखाच माणूस भेटल्यावर मला जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद मला माझीच भाषा, देश, जात, धर्म (म्हणजे नक्की काय?) असणारा माणूस भेटल्यावर होईल असं नाही. परदेशात असताना दिवाळीचा एकच लाँग विकेण्ड काही बालपणीच्या मित्र-मैत्रीणींबरोबर घालवला तेव्हा कधी एकदा परत मी माझ्या लोकांमधे (पोलीश, ब्रिटीश इ.) जाते असं झालं होतं. पण ही माझ्यासारखीच माणसं जेव्हा मराठी बोलणारी असतात तेव्हा काही कोट्या करता येतात त्याचा काकणभरच जास्त आनंद होतो, बस तेवढंच! जंतूंच्या प्रतिसादावरूनः मी इंग्लंडातल्या छोट्या खेड्यातच होते. तिथल्या (सधन) शेतकर्यांशी अशी गप्पा मारण्याइतपत गाठ पडली नाही; पण जे काही खेडूत भेटले त्यांच्या प्रश्नांवरूनतरी त्या लोकांना भारत आणि भारतीय सण-उत्सव यांची बर्यापैकी माहिती असावी असं वाटलं.
In reply to आणि परदेशातही आपल्याला मराठी by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हरकत नसावी by समीरसूर
'तुम्ही हिंदू आहात काय?' असे विचारले तर 'होय मी हिंदू आहे आणि मी भारतीय आहे' अशी ओळख करून देण्यात चूक काय?तुम्ही म्हणता तशी ओळख करून देणे माझ्यापुरते अप्रामाणिकपणाचे झाले असते. मी कुठलाही धर्म पाळत नाही ह्याचा लेखात उल्लेख केला आहे. त्यामुळे याच्यात 'बाणेदार' उत्तर देण्यापेक्षा मी प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला. निधर्मी असणे हे 'चित्रपटीय' कसे काय?
करण जोहरछाप चित्रपटांमधली इंग्रजाळलेली भारतीय पात्रे विकसित देशातील ऐषोआराम भोगतांना उसने देशप्रेम दाखविण्यासाठी असली उत्तरे देतात हे पाहिलेले आहे पण प्रत्यक्षात अशी 'बाणेदार' उत्तरे कदाचित मने दुखावू शकतात.माझा 'उसने देशप्रेम' वगैरे दाखवण्याचा हेतू नव्हता. यात तिचे मन दुखावल्याचे दिसले नाही. मला कुठल्या समाजगटात टाकावे ह्याचा ती मनाशी विचार करत असावी असे मला वाटले ( बर्याचदा मला मेक्सिकनही समजण्यात आले आहे.) मुख्य मुद्दा हिंदुत्व व भारतीयत्व याबाबतीत परदेशियांच्या मनात असलेला गोंधळ दाखवणं हा आहे.
In reply to हरकत आहे by शहराजाद
In reply to >>>>> तुम्ही म्हणता तशी ओळख by समीरसूर
मग ठीक आहे.
हे ही ठीक आहे.क्लिअरन्स दिल्याबद्दल आपली खूप आभारी आहे.
जिज्ञासेपोटी एक प्रश्न विचारतो: तुम्ही धर्म पाळत नाही म्हणजे तुम्ही नास्तिक आहात का? आणि नसलात तर मग कुठल्या देवाची पूजा करता? अगदी मनापासून क्षमा मागतो; खूप वैयक्तिक प्रश्न विचारल्याबद्दल....प्रश्न वैयक्तिक आहे खरा, परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणेच, स्वतःचा (नि)धर्म मान्य करण्यात मला कमीपणा वाटत नाही. उत्तर- कुठल्याहि देवाची मी पूजा करत नाही.
In reply to मग ठीक आहे. हे ही ठीक by शहराजाद
In reply to धन्यवाद by समीरसूर
आपण मूळ पुण्याचे का?नाही. परंतु मुळामुठेचे तीर्थ काही काळ प्राशन केलेले आहे. पण त्याचा इथे काय संबंध?
In reply to हरकत आहे by शहराजाद
In reply to तुम्ही म्हणता तशी ओळख करून by मनीषा
तुम्ही रुढार्थाने धर्म पाळत नसाल कदाचित, पण प्रत्येक माणूस जन्मजात धर्म आणि जात घेउनच येतो. त्या अर्थाने कुणीच निधर्मी नसते.असहमत. जन्मजात धर्म आणि जात न पाळणारी पुष्कळ माणसे परिचयात आहेत. त्यांचे हे वर्तन स्पष्ट दिसत असताना त्यांना विशिष्ट धर्माचे वा जातीचे मानण्याची प्राज्ञा वा अधिकार माझ्याकडे तरी नाही.
बर्याच वेळा काही सरकारी फॉर्म मधे सुद्धा धर्म आणि जात लिहावी लागते... मग तेव्हा तुम्ही जे लिहित असाल तेच उत्तर दिले असते तरी काही बिघडले नसते .उपरोल्लेखित माणसे अशा ठिकाणीही 'निधर्मी' आणि 'जात नाही' असे लिहितानाही पाहिले आहे. त्यामुळे अधिकृत, सरकारी फॉर्म्सवरही जन्मजात धर्म आणि जात लिहिणे अनिवार्य नाही, तो एक पर्याय आहे.
In reply to असहमत by चिंतातुर जंतू
In reply to निदान भारतात - जात जन्माने by अप्पा जोगळेकर
जात जन्माने मिळते आणि बदलता येत नाही असे कायदा सांगतो.हे निव्वळ विशिष्ट जातीचे असल्याचे दाखवून ज्यांना काही जातनिहाय सवलतींचा लाभ घ्यायचा आहे, त्यांच्यापुरतेच मर्यादित आहे. तुम्हांस लाभ नको आहे? तर मग जात न लावल्याने काही फरक पडत नाही. इथे जात नाकारली जात आहे; बदलली जात नाही, हे लक्षात घ्यावे.
जन्मजात धर्म आणि जात न पाळणारी पुष्कळ माणसे परिचयात आहेत. या विधानाला निदान भारतात तरी किंमत नाही. प्रत्येक फॉर्म, लीगल डोक्युमेंट आणि इतर सगळे कागद यावर जात-धर्म लिहावीच लागते.'धर्म - निधर्मी; जात - नाही' असे लिहिलेल्या माझ्या परिचयाच्या कुणालाही आजतागायत पॅन, पारपत्र, वाहनचालक परवाना, स्थावर-जंगम मालमत्ता खरेदीविक्रीचे दस्त, मतदार यादी, अशा कोणत्याही बाबतीत अडवले गेलेले नाही. 'जात - नाही' असे लिहिणे म्हणजे जात लिहिणे असे मानायचे असल्यास मानू शकता, पण मग लिहिलेली जात म्हणजे जन्मजात जात नाही, हे ओघाने मान्य व्हावेच.
In reply to हरकत नसावी by समीरसूर
In reply to >>आणि परदेशातही आपल्याला by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to >>आणि परदेशातही आपल्याला by विश्वनाथ मेहेंदळे
परदेशात एखादा मराठी माणूस अनपेक्षित रित्या भेटल्याचा आनंद पहिल्या १-२ वेळेला होतो. मग आपण बोलणे सुरु केले की आपल्या लक्षात येते की आपल्याला शिस्तीत फाट्यावर मारले जात आहे. तिसऱ्या वेळापासून आनंद वगैरे काही होत नाही. परदेशात मराठी माणूस दुसऱ्या अनोळखी मराठी माणसाकडे ज्या नजरेने बघतो त्याला योग्य उपमा द्यायची तर खुद्ध कालिदासाला खाली आले पाहिजे. इतरेजनांचे ते काम नोहे. तरीही सांगायचेच झाले तर, शिरीष कणेकरांच्या फिल्लमबाजीतील वाक्य उधार घेतो, "अरे असाल, तुम्ही कुणीतरी असाल, तुम्ही तुमच्या घरी मोठे, आम्ही आमच्या घरी मोठे...." साधारण असे स्वगत आपल्याला ऐकू येते (म्हणजे चेहऱ्यावर वाचता येते) बाकी पंजाबी माणूस भेटला तर निदान तोंडावर तरी गोड बोलतो. मागे शिव्या का घालत असेना. मराठी माणूस दोन्ही कडे शिव्या घालतो. (हा मला आलेला अनुभव आहे, सर्वांना येत असेल असे नाही. आणि ज्याअर्थी मला तो आला आहे त्याअर्थी माझ्यातच काही दोष असला पाहिजे असे कुणाचे मत असल्यास त्याबद्दल मी मतभेद व्यक्त करणार नाही. बाकी चालू द्या.)अगदी हाच अनुभव येतो सद्ध्या मला देखिल अमेरिकेत.. त्यामुळे हेच म्हणतो..
In reply to >>आणि परदेशातही आपल्याला by विश्वनाथ मेहेंदळे
आपला समाज, आपली संस्कृती, आपला देश, आपली ओळख (आयडेंटीटी) याबद्दल आपण जिथे राहतो त्या परदेशी समाजात जास्त अवेअरनेस असावा असे मनापासून वाटते. तुम्हाला असे काही अनुभव आले आहेत का?आपला अनुभव वैश्विक असावा. परदेशात कशाला, उत्तर भारतात मला अनेकदा आलेला अनुभव: मी मराठी आहे एवढं कळलं की मी ब्राह्मण असणार आणि शाकाहारी असणार असं गृहीत धरलं जातं. मला आकडेवारी माहीत नाही, पण महाराष्ट्रात ज्यांच्या घरी मांस शिजवलं जातं अशा लोकांची टक्केवारी शाकाहारी लोकांपेक्षा अधिक असावी. परंतु कदाचित असं होत असेल की माझा संबंध उत्तर भारतातल्या सुशिक्षित, पांढरपेशा समाजाशीच आला; अशा लोकांच्या समोर येणारे बहुतांश मराठी लोक शाकाहारी ब्राह्मण असतील म्हणून त्यांचा असा समज होतो. (हा माझा अंदाज आहे). थोडक्यात, एखादी परदेशी व्यक्ती कोणत्या वर्तुळात वावरते त्यावरून तिच्या संपर्कात कोणते भारतीय येतात हे ठरत असावं. त्यामुळे त्या अनुषंगानं त्या व्यक्तीची भारतीयांबद्दलची मतं/पूर्वग्रह बनत असावीत. अदिती यांचा इंग्लंडमधला अनुभव मलाही आलेला आहे. याचं कारण कदाचित असं असावं की इंग्लंडमध्ये भारतीय उपखंडातले विविध जाती-धर्मांचे लोक दैनंदिन जीवनात सामोरे येतात, तसेच सार्वजनिक नात्यानंही सामोरे येतात - उदा: लोकप्रतिनिधी, वृत्तपत्रस्तंभलेखक, साहित्यिक, वगैरे. यामुळे इंग्लंडमध्ये इतक्या मूलभूत पातळीवर आपल्याविषयी अज्ञान दिसत नाही. हे मात्र इथंही नमूद करावं लागेल की माझा संबंध तिथल्या शहरी, सुशिक्षित माणसांशीच आला. छोट्या खेड्यातल्या इंग्लिश शेतकर्याशी बोललं तर कदाचित अधिक अज्ञान दिसेल.
In reply to माझ्या माहिती प्रमाणे भारत हे by गणेशा
In reply to आता नेपाळही नाही. by यशोधरा
In reply to भारतीय मुसलमान by इन्द्र्राज पवार
In reply to >>जिल्ह्यातील एका मतदार संघात by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to लिंक शोधाच. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मला वाटतं शहरजाद यांनी पुरेशा by नगरीनिरंजन
In reply to निधर्म by इन्द्र्राज पवार
धागाकर्त्या 'शहराजाद' या (नावावरून तरी...) मुस्लिमधर्मीय आहेत असे गृहित धरतो (मराठी भाषा आणि टंकन यावर खूपच 'मास्टरी' दिसते)म्हणजे लेखक मुसलमान असल्यास मराठीवर (भाषा आणि टंकन) पुरेसे प्रभुत्व नसणार आणि तसे असल्यास ते उल्लेखनीय ठरावे, असा काहीसा सूर यात जाणवतो. तसेच आपल्याला सुचवायचे होते का?
In reply to निधर्मी म्हणून दिलगिरी, पण... by चिंतातुर जंतू
In reply to कात्रीत पकडला गेलो आहे....! by इन्द्र्राज पवार
In reply to माझं नाव लिहीलं आहे म्हणूनच by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to इंटरेस्टींग व्हर्च्युअल वर्ल्ड ! by इन्द्र्राज पवार
In reply to >>तर 'अर्धवट' आणि 'अर्धवटराव' by अर्धवट
In reply to >>तर 'अर्धवट' आणि 'अर्धवटराव' by अर्धवट
In reply to इंटुक by इन्द्र्राज पवार
In reply to कलियुग !!!!! by अर्धवटराव
In reply to आम्ही... आणि कसलं ते by अर्धवट
In reply to ह्या घाग्याची एवढी महती नाही! by यशोधरा
In reply to महती नाही ?! by दिपोटी
In reply to मी हिंदू धर्म पाळते हे by यशोधरा
धागाकर्ती मला जेव्हा हा प्रश्न विचारेल तेह्वा मी उत्तर द्यायचे की नाही हे बघेन. आपल्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही.बांधील नाही ??! कमाल आहे. आपण सर्व या संस्थळावर येतो व प्रतिसाद देतो ते चर्चेत सहभागी होण्यासाठी येतो. अशा चर्चेत जेव्हा धागाकर्ती/कर्त्याकडून व त्या अनुषंगाने धाग्यातील प्रतिसादकर्ती/कर्त्याकडून सुध्दा प्रश्न विचारला जातो, तेव्हा उत्तराची अपेक्षा ठेवली जाते यात काहीही गैर नाही. चर्चा पुढे नेण्यास याने हातभारच लागतो. हा केवळ बांधिलकीचा प्रश्न नसून औचित्याचा व संस्थळावरील सभ्यतेचा सुध्दा मुद्दा आहे. अर्थात 'फक्त धागाकर्ती/कर्त्यालाच प्रतिसाद देणार, प्रतिसादकर्ती/कर्त्याला नाही' असा आपला संकुचित विचार असता तर हे (पटण्यासारखे नसले तरी) निदान समजण्यासारखे होते. पण अन्य धाग्यांवर आपण दिलेले बरेच प्रतिसाद पाहिले तर असाही आपला विचार नाही हे कळते. (आशा आहे की 'फक्त आपल्या कंपूतील प्रतिसादकर्त्यांनाच उत्तर/प्रतिसाद देणार' असा पर्यायी संकुचित विचार सुध्दा आपण ठेवत नसाल). ३)
त्यांना समजले, तुम्हांला समजले नाही तरी चालण्याजोगे आहे.माझ्या प्रामाणिक प्रश्नांना असे आक्रमक (अवलियांचा 'उर्मट' शब्द वापरणे मी टाळत आहे) 'उत्तर' आले याचे कारण माझ्या आकलनाबाहेर आहे. वर नमूद केल्याप्रमाणे आपण अवलियांना व्यनि न पाठवता जेव्हा या जाहीर चर्चेतच उत्तर दिले तेव्हाच आपला प्रतिसाद या चर्चेचा एक घटक झाला. ही (व अन्य कोणतीही) जाहीर चर्चा सर्वांसाठी आहे, तेव्हा अशा जाहीर चर्चेत 'तुम्हाला समजले नाही तरी चालेल' हे विधान निश्चितच थोडे पळखाऊ वाटते. तेव्हा उत्तरांची अजूनही अपेक्षा ठेवत आहे. आपल्या सोयीसाठी प्रश्न परत एकदा विचारीत आहे : या धाग्यात 'एवढी' महती नसल्यासारखे आपल्याला काय आढळले ? का आपण पाळता तो हिंदू (वा अन्य कोणताही) धर्म न पाळणार्या व्यक्तीचा धागा अनुल्लेखाने मारण्यातच आपल्याला धन्यता मानायची आहे ? धन्यवाद. - दिपोटी
In reply to पटलं तर बघा by दिपोटी
In reply to इंग्लंड मधे लोकांना हिंदू by पुष्करिणी
In reply to हिंडू! by पैसा
In reply to इंग्लंड मधे लोकांना हिंदू by पुष्करिणी
In reply to शहराजाद by टिउ
स्वतःला निधर्मी म्हणवता आणी आयडी मात्र नेमका 'धर्मदर्शक' निवडलात...ईंट्रेस्टींग!माझा आयडी तुम्हाला धर्मदर्शक वाटला, हेच 'ईंट्रेस्टींग' वाटते. आता यशोधरा हे बुद्धाच्या पत्नीचे नाव, म्हणून ते बौद्धधर्मदर्शक म्हणाल का? एखाद्याला निव्वळ ते नाव आवडले म्हणूनही घेता येते. शाहरुख हे नाव अर्थ आवडला म्हणून किंवा आवडत्या नटाचे म्हणून देखील कोणी घेऊ शकतोच. जालावरचे आयडी ठरवताना सर्वच बाबतीत तुम्ही जसे आहात तीच व्यक्तीमत्व निवडायची का? निधर्मी म्हणवणाऱ्यांनी चार्वाक वगैरेसारखीच नावं घ्यावीत आणि धर्मश्रद्धांनी आपापल्या धर्माशी संबंधितच नावे घ्यावीत असे थोडेच आहे? एखादे नाव वेगवेगळ्या गोष्टींसाठी आवडू शकते. माझा आयडी म्हणजे 'परीकथेतल्या वजीरकन्ये'चे नाव आहे. मला माहीत असलेली फोड - शहर + आजाद अशी आहे. तो अर्थ आणि वाङमयीन संदर्भ मला आवडला. खलास.
In reply to धर्मदर्शक?? by शहराजाद
एखाद्याला निव्वळ ते नाव आवडले म्हणूनही घेता येते.बरोबर आहे. पण यशोधरा आयडी घेउन 'बुद्धधर्मात काही अर्थ नाही' किंवा शाहरुख आयडी घेउन 'ईंडस्ट्रीतले सगळे खान टुकार आहेत' असं म्हटलं की भुवया उंचावणारच! (यशोधरा किंवा शाहरुख या आयडींचे विचार असे आहेत असं म्हणायचं नाहीये). आयडी निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहेच की. तुम्ही परदेशी लोकांचं धर्माविषयी प्रबोधन करता पण आयडी मात्र असा निवडला म्हणुन मला आश्चर्य वाटलं. बर्याच लोकांचे विचार प्रत्यक्षात 'अनोळखी' लोकांचं प्रबोधन करण्याइतके कट्टर नसतात त्यामुळे त्यांचे आयडी वाचुन आश्चर्य वाटत नाही. जालावर काय, सगळेच प्रबोधनकार असतात!
In reply to तसं नाही! by टिउ
आयडी मात्र असा निवडला'असा ' म्हणजे धार्मीक असे तुम्हाला अभिप्रेत आहे असे वाटते. ( तसे नसल्यास असा म्हणजे कसा ते कळवावे) मुळात, हे नाव निधर्मी लोकांना न शोभणारे, धार्मीकांनाच शोभणारे आहे असे मला वाटत नाही. त्याबद्दल मी वरच्या प्रतिसादात लिहिले आहेच. माझी धर्मविषयक वैयक्तिक निवड आणि शहराजाद आयडी यांचा संबंध नाही. तसेच एखादा आयडी निवडण्यामागे वेगवेगळी कारणेही असू शकतात.
पण यशोधरा आयडी घेउन 'बुद्धधर्मात काही अर्थ नाही' किंवा शाहरुख आयडी घेउन 'ईंडस्ट्रीतले सगळे खान टुकार आहेत' असं म्हटलं की भुवया उंचावणारच!ह्याचा इथे संबंध काय? मी वरील लेखात कुठल्याच धर्माला, व्यक्तींना 'टुकार' , 'अर्थ नाही' असे म्हटलेले नाही. लेखामध्ये, 'मी स्वतः रूढार्थाने कुठलाही धर्म पाळत नाही' एवढेच म्हटलेले आहे, आणि ते पुढील उत्तराच्या संदर्भात आले आहे. शहराजाद आयडीने हे लिहिण्यात मला काही गैर वाटत नाही. असो.
In reply to च्छ्या:! काय बॉ झोल by धमाल मुलगा
In reply to सिंधूनदीकाठचा देश तो by सुहास..
In reply to सिंधूनदीकाठचा देश तो by सुहास..
In reply to च्छ्या:! काय बॉ झोल by धमाल मुलगा
सिंधूनदीकाठचा देश तो हिंदूस्थान, त्या हिंदूस्तानात राहणारे ते हिंदू... हा मुलभुत मुद्दाच आपल्याकडच्या मानसिकतेमधून पुरता पुसला गेलाय हेच खरं.+१, हेच आमचे मत आहे. शहराजाद ह्यांचे अंडरस्टँगिंग नेमके उलटे आहे व त्याणी हटकुन चुकीचा असा मेसेज तिथपर्यंत पोहचवला. "हिंदु" म्हणजे नक्की काय ह्याची परकियांना ( पक्षी : परदेशात राहणार्या नॉन्-भारतियांना ) पुरेपुर ओळख करुन देण्याचा चान्स त्यांनी उगाच तात्विक उच्चभ्रुतेच्या नादात फुकट घालवला असे आमचे वैयक्तिक मत आहे. बाकी हिंदु म्हणजे काय हो ? ती आहे एक संस्कृती, कसली ह्याचे उत्तर फार गहन आहे, आम्हाला कळालेले नाही हे स्पष्ट मान्य करतो. पण जे काही लोक सिंधुनदीच्या आसपास रहात होते, ज्यांनी स्वतःची एक संस्कृती विकसिक केली आणि आपल्याबरोबर ते ती ठिकठिकाणी घेऊन गेले आणि त्यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी ती संस्कृती, विचारधारा, जीवनपद्धती वगैरे आत्मसात केले ते सर्व हिंदु ... ह्यात मध्येच कुठे धर्म आला ? आजकाल काही हाय प्रोफाईल सेलेब्रिटी "हिंदु" होतात ते काय त्यांनी 'ख्रिश्चन' हे ओळख मिटवायला का ? अहो त्यांना ह्या 'हिंदु संस्कृती'चे तत्वज्ञान भावले असते, त्यांना त्यातुन काहीतरी चांगले हवे असते. "मी हिंदु नाही , भारतीय आहे " हा उगाच तात्विकपणा शुद्ध बिनडोकपणा झाला ( हे शहराजाद ह्यांना उद्देशुन नाही ), भारत हा आजचा ( ऑफिशियली म्हटले त ६० वर्षे, अंदाजे ३०० वर्षे च्या पुढे नाही ), हिंदु संस्कृती हजारो वर्षे जुनी आहे. धर्म आणि राष्ट्र वगैरे व्याख्या नंतर निघाल्या, संस्कृती त्याहुन पुरातन आहे. आपल्या भारतात राहणार्यांची हिंदु ही ओळख धर्मामुळे नसुन इथल्या सिंधु नदीच्या प्रदेशात विकसीत झालेल्या आणि नंतर आख्ख्या भारतात फोफावलेल्या 'हिंदु संस्कृती' मुळे आहे, त्यात मग सगळेच धर्म आणि जाती येतात ... जाऊ द्या, बाकी तात्विक चर्चा झान चालु आहेत. वाचताना डोके दुखते आहे तरीही वाचतो आहे, छान छान मजेशीर अतर्क्य तर्क आणि उच्चभ्रु मते वाचायला मज्जा येते आहे. अवांतर : आता महाराष्ट्र सोडुन भारताच्या इतर भागात प्रचलित असलेल्या "मराठे, मरगठ्ठे, मरहट्टे" बद्दल इथल्या थोर तात्विक अभ्यासकांचे आणि चिंतकांचे मत वाचायला आवडेल. उत्तर भारतात "मराठे" जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना "जात" अपेक्षित असते की विशिष्ठ भागात राहणारा समुदाय ? अतिअवांतर : चर्चा चालु द्यात, अनेक मतेही येऊद्यात पण ही चर्चा नक्की कशासाठी आहे ते आधी ठरवा. म्हणजे कसे "बेटिंग"च्या प्रतिसादांपक्षी आम्हाला इतर 'थोर तात्विक आणि चिंतनीय मते' वाचण्याचा अनुभव मिळेल ( टीप : हे मत 'छोटा डॉन' ह्या सदस्याचे वैयक्तिक असे प्रामाणिक मत समजावे. बाकी सर्व काही उत्तम !!! - छोटा डॉन
In reply to संस्कृती की धर्म ? by छोटा डॉन
In reply to >>उत्तर भारतात "मराठे" जेव्हा by धमाल मुलगा
In reply to संस्कृती की धर्म ? by छोटा डॉन
In reply to >>बाकी हिंदु म्हणजे काय हो by पक्या
In reply to धर्म = वैदिक. कागदोपत्री धर्म by धमाल मुलगा
In reply to कागदोपत्री धर्म हिंदू ना - मग by पक्या
आणि जगात पसरलेल्या इतर बर्याच देशांच्या दृष्टीनं देश = हिंदू!:)
In reply to संस्कृती की धर्म ? by छोटा डॉन
In reply to संस्कृती की धर्म ? by छोटा डॉन
In reply to आसिंधू सिंधु पर्यंता यस्य by अर्धवट
आसिंसिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका | पित्रूभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः || हिंदू हा शब्द हिंदूसंघटनाचा केवळ पायाच होय. त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ ज्या मानाने व्यापक वा आकुंचित, बळकट अथवा ढिला, चिरंतन वा चंचल त्या प्रमाणातच त्या पायावर उभारलेले हे हिंदुसंघटनाचे प्रचंड बांधकाम व्यापक, भक्क, टिकाऊ ठरणारे आहे. वेद ह्या धर्म ग्रंथापासून त्याचे अनुयायांचे नांव वैदिक हे जसे पडले, बुद्ध या नांवावररून त्या धार्मिक अनुयायांचे नाव जसे बौद्ध, जिनमताच्या अनुयायांचे नाव जैन, नानकाच्या धर्मशिष्याचे नांव जसे शिख, विष्णू देवतेचे उपासक वैष्णव, लिंगपूजक ते जसे लिंगायत, तसे हिंदू हे नाव कोणत्याही धर्मग्रंथावरून, धर्मसंस्थापकावरून वा धर्ममतावरून मुख्यतः वा मुलतः निघालेले नसून आसिंधुसिंधु विस्तारलेल्या देशास नि त्यात निवसणार्या राष्ट्रासच मुख्यतः निर्देशणारे आहे. आणि अनुषंगाने त्याच्या धर्मसंस्कृतींनाही.
In reply to स वै हिंदुरिति स्मृतः by विकास
In reply to अर्थात हा श्लोक by अर्धवट
In reply to खुलासा by विकास
In reply to सुरेख विश्लेषण! by मेघवेडा
In reply to खुलासा by विकास
In reply to माझी समजूत by सुनील
हिंदू हे नाव कोणत्याही धर्मग्रंथावरून, धर्मसंस्थापकावरून वा धर्ममतावरून मुख्यतः वा मुलतः निघालेले नसून आसिंधुसिंधु विस्तारलेल्या देशास नि त्यात निवसणार्या राष्ट्रासच मुख्यतः निर्देशणारे आहे. आणि अनुषंगाने त्याच्या धर्मसंस्कृतींनाही.ज्यांची भारताशी जन्माने अथवा वंशाने (अर्थात अनिभांच्या पुढील पिढ्या) अथवा स्वेच्छेने आणि म्हणून पर्यायाने भारतीय संस्कृतीशी नाळ जोडली गेली आहे त्यांना हिंदू म्हणावे असा याचा अर्थ आहे. त्या संदर्भात मी सावरकरांचे इतरत्रही वाचलेले आठवते पण आत्ता माझ्याकडे संदर्भ नाही. वर "हिंडू" (Hindoo) हा शब्द देखील आला आहे. जो आधी वापरला जायचा. त्याचा पहीला अर्थ देखील विकीमधे भारतातून आलेले असाच दिला आहे.
In reply to तसे नाही by विकास
In reply to एक शंका by आमोद शिंदे
आयला मला वाटलं होतं अजून एक