✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जेम्स लेनच्या पुस्तकावरची बंदी उठवली.

श
शानबा५१२ यांनी
Sat, 07/10/2010 - 01:58  ·  लेख
लेख
जेम्स लेन ह्याच्या 'शिवाजी - अ हींदु कींग इन इस्लामिक इंडीया' ह्या पुस्तकावरची बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली आहे.त्या पुस्तकात शिवप्रेमी मराठी माणसला बोलताना लाज वाटावी अस लिखाण आहे. ज्या मराठीप्रेमी(?) नेत्यांनी 'ह्या पुस्तकाची एकही प्रत विकु देणार नाही' व तत्सम वाक्य मीडीयासमोर बोलली त्यांना एकच सांगु इच्छीतो की तुम्ही कीतीही बोललात तरी पुस्तकाला आधीच ब-यापैकी प्रसिद्धी मिळाली आहे.व महाराष्ट्रात आपण कीतीही रोखल तरी 'ऑक्सफर्ड' आपला धंदा चांगला चालवुन घेणार.हे नेते निदान भारतात तरी ह्या पुस्तकाची विक्री होण थांबवु शकतील? सुप्रीम कोर्टाने कोणत्या मुद्दांना विचारात घेउन ही बंदी उठवली आहे? मराठी माणसांनी एवढा विरोध करुनही व तो विरोध योग्य असुनही जर 'व्यक्तीस्वातंत्रा'च्या नावाखाली हे अस छापुन येणार असेल हा कायदा का पाळायचा? कोणता कायदा बंदी आणलेल्या पुस्तकाचे समर्थन करतो? कोणता कलम वगैरे वापरुन हे मराठी इतिहासाला बदनाम करणार पुस्तक छापु दील जातय,त्याबद्दल कोर्ट का नाही सांगत? जेम्स लेन्,सुप्रीम कोर्ट्,ऑक्सफर्ड प्रकाशन व त्या लेखकाला लिखाणात मदत करणारे सर्व लोक ह्या सर्वांचा निषेध!! नोंद : मी फक्त निषेध नाही करणार जिथे ते पुस्तक दीसेल तिथे 'कारवाई' करणार,परीणाम काहीही होओत!! X(
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24929 वाचन

💬 प्रतिसाद (109)

प्रतिक्रिया

वेताळ

Pain
Sun, 07/11/2010 - 12:07 नवीन
अश्या भांडारकर संस्था मोडतोड करुन कसे भागेल? ह्याच्या पेक्षा ज्यादा विरोध अपेक्षित आहे. ???? तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते. भांडारकर ही इतिहास संशोधन संस्था आहे. फक्त महाराजच नव्हे तर अतिशय पुरातन काळातील ग्रंथ आणि इतर गोष्टी तिथे आहेत / होत्या. हा लेन तिथे जेव्हा कधी गेला आणि काही पुस्तके मागितली असतील तर एक अभ्यासू म्हणुन त्याला ती दिली गेली असावीत. आता त्या मुर्खाने असे लिखाण केले त्यात संस्थेचा काय दोष ? त्याचे हुसेन सारखे ट्रॅक रेकॉर्ड नाहीये. संस्थेला थोडीच प्रत दिली होती प्रूफरीडींगसाठी ? परत गेल्यावर त्याने लिखाण प्रसिद्ध केले. हे समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्रात राहणारा कोणीही महाराजांबद्दल असे बोलणार नाही आणि खपवून घेणार नाही. आपापसात भांडणे आणि आपल्याच पैशाने बांधलेल्या संस्था, बसेस इ. फोडून काय मिळणार ? हिंदू-मुस्लिम, दलित-दलितेतर याबरोबर ही नवीन दरी मराठी माणसांमधे पाडण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

तुम्ही

मेघवेडा
Sat, 07/10/2010 - 05:36 नवीन
तुम्ही वाचलं आहे का हे पुस्तक?
  • Log in or register to post comments

बरोबरीला आहोत. खांद्याला खांदा लाऊन.

Manoj Katwe
Sat, 07/10/2010 - 06:23 नवीन
कोणीही यावे आणि टपली मारून जावे अशी भारताची गत झाली आहे. तो नालायक हुसेन सुद्धा भारत मातेचा आणि संस्कृतीचा अपमान करून गेला, तरी सगळे ढिम्म शानबा आम्ही तुमच्या बरोबरीला आहोत. खांद्याला खांदा लाऊन. ( तुम्ही व्हा पुढे , आम्ही तुमचे कपडे सांभाळतो, हि असली भाषा आम्हाला जमत नाय ) जग काय नावे ठेवायचे ते ठेऊ दे, पुण्यात काय आम्ही हे पुस्तक विकू देणार नाय बाकी पुण्यात कुठे कुठे विकले जाण्याची शक्यता आहे ते कळवा, म्हणजे आमचे काम जरा सोपे होईल crossword , आप्पा बळवंत चौक, कॅम्प, आणि अजून कुठे कुठे मनसे प्रमुखाला गाठतो आता. फिल्डिंग लावतो आता जमेल तिथे, अर्धवटराव रावांनी जे सुचविलेले आहे ते सुद्धा अंमलबजावणी करायचा प्रयत्न करू .
  • Log in or register to post comments

हेच

शानबा५१२
Sat, 07/10/2010 - 09:36 नवीन
हेच अपेक्षित आहे. साला विकत घ्यायच सोडा,कोणी विकायला ही तयार नाही झाला पाहीजे!! _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Manoj Katwe

एक

समंजस
Sat, 07/10/2010 - 15:29 नवीन
आणखी एक उपाय सुचवतो अश्या लोकांबद्दल(लेखकांबद्दल) जे इतरांकडून (फक्त) ऐकीव (बदनामीकारक) गोष्टींवर आधारीत पुस्तकं लिहीतात, त्यांना त्यांच्याच हत्याराने त्रासून सोडावे :) म्हणजे उदा. असे की जेम्स लेन हा काही स्वतःच्या वैयक्तीक आयुष्यात संत/त्यागी/सगळ्याच वाईट गोष्टींपासून दुर असलेला असा शक्यतोवर नसेलच. त्याची सुद्धा काही लफडी/कृष्णकृत्ये/लपवण्यासारखे आयुष्यातील काही प्रसंग(पालकांबद्दल चे सुद्धा चालतील) असतीलच किंवा किमान काही अफवा तरी असतील ज्या ईतरांमधे चर्चील्या जात असतील तर अशा गोष्टींची/घटनांची माहिती काढून त्या वर पुस्तक लिहावे आणि जमेल तेवढी किंमतीत सुट देउन ती पुस्तके त्याच्या देशात/गावात विकली जाणार याची काळजी घ्यावी.... :) कुठलं न्यायालय मग अश्या पुस्तकांवर बंदी घालणार? काय म्हणून? काय म्हणताय ? उपाय पटला का? बघा जमतंय का :) [शिवाजी महाराजांबद्दलच्या बदनामीकारक माहिती बद्दल आणि ती सुद्धा ऐकीव अश्या माहितीवर आधारीत पुस्तक लिहिण्या मागचा लेखकाचा उद्देश नाही कळला :? कदाचीत कोणा विचारवंतास ठाउक असल्यास सांगण्याची कृपा करावी]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

नावातला

शानबा५१२
Sat, 07/10/2010 - 16:02 नवीन
नावातला गुण वापरा ना सर! सर्व प्रतिसाद वाचा मी दीलय ह्याच उत्तर,उगाच री ओढुन फायदा नाही.आपल्याला काय वाटत ते पुस्तक आक्षेपार्ह नाही? मी वाचलय पुस्तक..........बोला अजुन काही? _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

कृपया

समंजस
Sat, 07/10/2010 - 16:43 नवीन
आपल्याला काय वाटत ते पुस्तक आक्षेपार्ह नाही? >>आपण माझ्या प्रतिसादातील शेवटच्या दोन ओळी वाचल्या नाहीत वाटतं -- मी वाचलय पुस्तक..........बोला अजुन काही? >>आपण पुस्तक वाचलं किंवा नाही याबद्दल मी काहीच विचारणा केलेली नाही ----------------------------------------------------------------------- धन्यवाद. तुमचे सर्वच प्रतिसाद वाचलेत मी. नंतरच माझा प्रतिसाद टाकला. कृपया माझा प्रतिसाद पुर्ण वाचावा, व्यवस्थीत. मग विचार करावा आणि मग ठरवावं काय उत्तर द्यावे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

महागाईच्य

अविनाशकुलकर्णी
Sat, 07/10/2010 - 07:30 नवीन
महागाईच्या प्रश्णा वरुन लोकांचे लक्ष दुसरी कडे वलवन्या साठी तर हे टायमिंग साधले नसेल
  • Log in or register to post comments

विक्रेते....

कवितानागेश
Sat, 07/10/2010 - 11:19 नवीन
पुस्तक विक्रेत्यांना 'योग्य' शब्दात 'समजावून' सांगावे लागेल! नाहीतर.................. ============ (वाघाची मावशी)माउ
  • Log in or register to post comments

काल अशाच

परिकथेतील राजकुमार
Sat, 07/10/2010 - 11:27 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) काल अशाच एका धाग्यावर एका 'महात्म्याने' दिलेला हा प्रतिसाद वाचनात आला होत :-
अस इंटरनेटवर लेखात लिहुन एखाद्या नदीकाठचा दगडही हलणार नाही.तेव्हा फक्त हे होइल नी ते होइल अशी स्वप्न पहात रहा तुम्ही सर्वजण. [मी काय करतोय? असा प्रश्न आला तर 'मी स्वप्नच बघतोय/बघत आलोय व स्वःताच्या स्वार्थासाठी स्वता: कष्ट(?) करतोय] उगाच हे अस व ते बेळगाव वगैरे लिहुन फक्त टाइम पास होतो अजुन काही नाही.आपण काहीतरी समाजपयोगी कार्य करतोय अशा भ्रमात राहु नका कींवा खुप माहीती पुरवतोय असाही समज करुन घेउ नका.एखादा सरदार जोक वाचुन पुर्ण झाला की आपल्या क्रुतीत काही बदल होतो का..........मग हे पण तसच आहे. 'मी आपल्याबरोबर आहे,'माझा पाठींबा आहे','काही करावस वाटतय','खुप माहीती मिळाली','मन अस्वस्थ झाल' अशी नाटकं बंद करा व प्रॅक्टीकली काही तरी करा.
ह्यालाच लोका सांगे ब्रम्हज्ञान असे म्हणत असावेत काय ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

अच्छा हे

शानबा५१२
Sat, 07/10/2010 - 12:19 नवीन
अच्छा हे पहील आपल्याला सुचल तर.....असो,म्हणुनच मी लिहल आहे.. नोंद : मी फक्त निषेध नाही करणार जिथे ते पुस्तक दीसेल तिथे 'कारवाई' करणार,परीणाम काहीही होओत!! मी सर्व काही भानावर ठेउन लिहल आहे/होत्(निदान ह्यावेळी).खर म्हणजे असा काही लेख लिहुन मला काही जाग्रुती वगैरे अपे़क्षित नाही,ज्यांना तळमळ आहे ते नक्की जाणुन आहेत काय करायच ते! _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नोंद : मी

परिकथेतील राजकुमार
Sat, 07/10/2010 - 12:24 नवीन
नोंद : मी फक्त निषेध नाही करणार जिथे ते पुस्तक दीसेल तिथे 'कारवाई' करणार,परीणाम काहीही होओत!!
म्हणजे तुम्ही नक्की काय करणार हे जाणुन घ्यायला आवडेल. तसेच जागृती वगैरे अपेक्षीत नसताना हे लेखन का केले गेले हे देखील जाणुन घ्यायला उत्सुक आहे. स्वंयस्फुर्तीने लोक जी शिक्षा ह्या पुस्तकाला देतील ते अधिक योग्य ठरणार नाही काय ? बाकी ह्या पुस्तकात जे काय 'अयोग्य' लिहिले गेले आहे ते तुम्ही इथे लिहु शकत नाही असे तुम्ही म्हणत आहात. (ते योग्यही आहे) पण मग निदान संदर्भासाठी पान क्रमांक व परिच्छेद क्रमांक तरी देउ शकाल काय ?? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

मी हा वाद

शानबा५१२
Sat, 07/10/2010 - 12:44 नवीन
मी हा वाद ताजा होता तेव्हा वाचनात आलेले काही संदर्भ आपल्याला कळवतो. मी त्यानंतर ते पुस्तक कुठेच शोधल नाही कारण शोधयच नव्हत अगदी हीन पातळीवर जाउन काही विधान लिहली गेली आहेत.कोणी अपेक्षाही नाही करु शकत असे शब्द जसे "नॉटी" वगैरे वापरले आहेत. मित्राच दुकान असो वा गावच घर आम्ही महाराजांची प्रतिमा आग्रहाने लावतो.ही घरातली महाराजांची प्रतिमा......... Image removed. माझा कुठल्याही सेनेशी राजकीय संबंध नाही. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मी हा वाद

परिकथेतील राजकुमार
Sat, 07/10/2010 - 12:44 नवीन
मी हा वाद ताजा होता तेव्हा वाचनात आलेले काही संदर्भ आपल्याला कळवतो. मी त्यानंतर ते पुस्तक मी कुठेच शोधल नाही कारण शोधयच नव्हत अगदी हीन पातळीवर जाउन काही विधान लिहली गेली आहेत.कोणी अपेक्षाही नाही करु शकत असे शब्द जसे "नॉटी" वगैरे वापरले आहेत.
म्हणजे तुम्ही स्वतः हे पुस्तक वाचलेले नाहीत. ह्याचाच अर्थ तुम्ही लेखात लिहिलेला सर्व मजकुर हा ऐकीव माहितीवर आधारीत आहे. त्याचे पुरावे तुमच्याकडे नाहीत अथवा हा लेख लिहिण्याचा आधी तुम्ही ते जवळ ठेवण्याची तसदी देखील घेतलेली नाहीत. ह्यालाच ते 'हिअर-से एव्हिडंस' का काय म्हणतात ना हो ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

पुरावे

शानबा५१२
Sat, 07/10/2010 - 13:11 नवीन
पुरावे माझ्याकडॅ हवेत हे खर आहे.काही संदर्भ देतो. *पान क्रमांक ९३ *एका व्रुत्तपत्राच्या अग्रलेखामधे नीट उल्लेख आला होता. *एका ब्लॉग साइट वर स्कॅन्ड कॉपी ज्यात 'तो'भग अधोरेखीत केला गेला होता तो वाचला आहे.(ह्याला आपण 'मी वाचल आहे' अस म्हणण्यास हरकत नाही) आपणास सर्व संदर्भ देण्यासाठी प्रयत्न करतोय.'मी बरोबरच आहे' हे दाखवण्यासाठी नाही तर 'तो' भाग कीती आक्षेपार्ह आहे ते दाखवण्यासाठी. प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद! ________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ज्या वरून

पुष्करिणी
Sat, 07/10/2010 - 13:20 नवीन
ज्या वरून वाद चालू आहे ते सगळं मटेरियल वृत्तपत्र, ब्लॉग्ज इत्यादी ठिकाणी उपलब्ध आहे ( तेही फुकट ) तर पुस्तकांवर बंदी घालणं / उठवणं याच प्रयोजन काय? म्हणजे ज्यांना हे वाचायच होतं / आहे त्यांना पुश्तक विकत घेण्याची अजिबात गरज नाही, त्यांनी ऑलरेडीच वाचल असावं . मग इतका आकांड्तांडव कशाला करायचा? पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

पहील गोष्ट

शानबा५१२
Sat, 07/10/2010 - 13:46 नवीन
पहील गोष्ट म्हणजे कोणत्याच व्रुत्तपत्रात ते लिखाण तेव्हाही जपुन लिहल गेल होत व आज ते लिहलच जात नाही. ब्लॉग्स मधुन ते आता नाही भेटत्/मिळत,काहींनी लिंक्स काढल्या आहेत हे आपणास मान्य करावे लागेल. महारांजाच्या पोषाखात युट्युब वरचा विडीओ सह्या करुन आरडाओरड केल्यावरच लगेच काढला गेला ना! इथे इतर नॉनसेन्स गोष्टींवर होइल ती 'चर्चा' व ह्या विषयावरच 'तांडव' असेल तर तसच म्हणा..........आपल आपल मत असत. I hope it's not crap acc. to you!!!! _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

महाराजांब

पुष्करिणी
Sat, 07/10/2010 - 13:54 नवीन
महाराजांबद्द्ल अपार आदर आहेच. कुणीही, कधीही, काहीही लिहिलं तरी. प्रश्न फक्त इतकाच आहे की हे सगळं म्हणजे तुम्ही ज्याला 'कारवाई' असं म्हणताय ते कुणासाठी चाललयं, यानं काय सिद्ध होइल? महाराजांचा फोटो आणि सह्यांच प्रकरण मला माहित नाही. पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

यानं काय

शानबा५१२
Sat, 07/10/2010 - 14:19 नवीन
यानं काय सिद्ध होइल?
ह्या पुस्ताकातला हीन पातळीवर उतरुन लिहलेल्या भागाचा प्रसार थांबेल आणि तेच हव आहे. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

उचकवतोय....

कवितानागेश
Sat, 07/10/2010 - 11:50 नवीन
असे बोलुन तू लोकाना 'कृती' करायला उचकवतोयस! हे चिथावणीखोर कृत्य आहे! ................ खरे तर काम करणारे आणी बोलणारे असे २ पंथ प्रत्येक ठिकाणी असतातच. असुदेत बापडे! मीमात्र मघाचपासूनच माझ्या नख्यांना धार लावायला सुरुवात केली आहे. हा बघा चुरा पड्तोय, ............. ============ माउ
  • Log in or register to post comments

खरंतर ह्या

शैलेन्द्र
Sat, 07/10/2010 - 12:17 नवीन
खरंतर ह्या विषयावर काय बोलावं हा प्रश्न पडतो. ज्या गोष्टी केवळ आणी केवळ विश्वासावरच चालतात तीथे आपल्या मताची पिंक टाकत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कुल्ले बडवण्यात काय अर्थ आहे, आणी ही माहिती आपल्याच लोकांनी दिली असा दावा करत क्षुद्र राजकीय हिशोब पुरे करणे तरी कुठे शहाणपणाचे आहे? या गोष्टीचा गाजावाजा केलाच नसता तर ते टीन्पाट पुस्तक कधीच गायब झाले असते. पण असा शहाणपणा हल्ली दुर्मीळ आहे. आमच्या बाल-पौंगंडावस्थेत जी शंकाही आम्हाला शिवली नाही ती आजच्या मुलांच्या मनात येणार. दीड दमडीचे भैय्ये/ मद्रासी महाराजांबद्दल बोलताना गालात हसणार. सुर्याला ग्रहण लागुच शकत नाही, तो फक्त आभास असतो... आपण मात्र फुकट आंघोळी करत सुटलोय..
  • Log in or register to post comments

गाजावाजा

शानबा५१२
Sat, 07/10/2010 - 12:24 नवीन
गाजावाजा नाही केला तर कुणीही काहीही लिहेल्,सर्वाकडे दुर्लक्ष करायच का? एखादा महान माणुस एका पामराने केलेल्या निंदेने काय बदनाम होणार अशी आशा बाळगुन राहीलो तर आपलेच हसे होइल अशा पुस्तकांतुन! मधे सावरकर-गांधी संबंधित वाद का जोर धरत होता?? जयंत्या ज्यांच्या साज-या केल्या जातात ते सर्वजण महारा़ज नसते तर हींदु म्हणुन जन्माला तरी आले असते का? _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

नेहमीची वाक्ये

नितिन थत्ते
Sat, 07/10/2010 - 12:45 नवीन
>>सर्वजण महारा़ज नसते तर हींदु म्हणुन जन्माला तरी आले असते का? चला. मूळपदावर गाडी आली म्हणायची ;) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

गाडी

शानबा५१२
Sat, 07/10/2010 - 14:24 नवीन
गाडी पहील्यापासुन ह्याच पदावर आहे.आपणच नको तिथे भटकताय! 8} नितिन सर,प्राधान्य महाराजांनाच मिळाव अस नाही वाटत का तुम्हाला? _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

येस्स.

भोचक
Sat, 07/10/2010 - 16:12 नवीन
येस्स. उत्तर भारतात भूतकाळात बव्हंशी मुसलमानी सत्ता असूनही हिंदू लोक अजूनही कसे काय आहेत ब्वॉ. काय कळत नाही. (भोचक) जाणे अज मी अजर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

जयंत्या

अप्पा जोगळेकर
Sat, 07/10/2010 - 18:53 नवीन
जयंत्या ज्यांच्या साज-या केल्या जातात ते सर्वजण महारा़ज नसते तर हींदु म्हणुन जन्माला तरी आले असते का? शिवाजी जन्माला आला नसता तर या देशात हिंदू राहिलेच नसते हा एक गैरसमज आहे. मुसलमानांची भारतावरची पहिली स्वारी सन ६३७ मध्ये झाली. (अब्दुल अझीझ्ची स्वारी) त्यानंतर महंमद बिन कासीम(सन ७१२), गझनीचा महमूद(सन १००१ पासून केलेल्ञा पंधरा स्वार्‍या) आणि त्यानंतर सुद्धा महंमद घोरी, कुतुबुद्दिन ऐबक, बाबर, अकबर आणि अशाच आत्ता मला आथवत नाहीयेत अशा अनेक मुस्लिम आक्रमकांनी स्वार्‍या केल्या. शिवाजीचा जन्म सन ६२७ मधला आहे. तोपर्यंत हिंदू टिकून होतेच की. सन ६३२ च्या सुमारास मुसलमानांनी जी घोडदौड सुरु केली ती पश्चिम आशिया आणि स्पेनपर्यंतचा युरोप आणि पूर्वेला सिंध प्रांतापाशी येऊन सन ७१२ मध्ये थांबली. पण सगळा भारत जिंकायला ६५० पेक्षाही जास्त वर्षे लागली(सन १३१०). हे होतत नाहोतय तोच विजयनगरचं साम्राज्य उदयाला आलंच. राणा प्रताप उदयाला आलाच. गुरू गोविंदसिंग जन्माला आलेच. बाप्पा रावळ, खुष्रूखान आणि असे असंख्य हिंदू सम्राट ज्यांच्यापैकी कित्येकांची नावं लिहायला बसलो तर दमायला होईल. सांगायचा हेतू हा की शिवाजी जन्माला आला नसता तर दुसरा कोणीतरी जन्माला आला असताच. बाकी थोरवीबद्दल म्हणाल तर शिवाजी हा एक अति थोर राजा होता यात वादच नाही. जे त्याला दैवत मानतात (मी शिवाजीला दैवत मानत नाही, महामानव मानतो. एकदा दैवत्व मान्य केलं की तिथे तर्कबुद्धी कुंठित होते आणि श्रद्धेला सुरुवात होते. महामानव चु़का करु शकतो. देव चुका करु शकत नाही हे लक्षात यावे म्हणून हे लिहिले. ) त्यांना मी इतकेच विचारू इच्छितो की तुम्ही ज्याला देव मानलं तो कुणाच्याही टीकेमुळे छोटा असेल तर तुम्ही स्वतःची त्या देवावर असलेली निष्ठा एकदा तपासून घेतली पाहिजे. एव्हाना जाळपोळ, तोडफोडीला सुरुवात झालीच असेल. त्यांच्यापैकी निदान पन्नास टक्के लोकांनी हे पुस्तक वाचलं नसणारच याबद्दल माझ्या मनात तरी अजिबात शंका नाही. म्हणे गृहमंत्र्यांना फिरु देणार नाही. अजमल कसाब, अफझल गुरु सारखी असंख्य झुरळं आपण जिवंत ठेवली आहेत. त्यांना फाशी दिली नाही म्हणून एकाच्याही पोटात दुखलेलं दिसत नाही. पण शिवाजीच्याबद्दल काहीतरी वेडंवाकडं लिहिलं असं नुसतं ऐकलं तरी मुंडकं तुटलेल्या मेंढ्यासारखे सगळे नाचायला लागलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

अप्पा

शानबा५१२
Sat, 07/10/2010 - 21:01 नवीन
अप्पा व्यनी भेटला.व उत्तर पाठवले आहे. मी फक्त महाराष्ट्राबद्दल बोलतोय. महाराष्ट्रात महाराज नसते तर मुसलमानांना कुणी विरोध केला असता?महाराज गेल्यानंतर त्यांनी केलेल्या कामामुळेच 'त्यांना' मान वर काढायला मिळाली नाही हे सत्य आहे. दुसरा कुणी जन्माला आला असताच हो,आणि आम्ही त्याच्याही उदोउदो केला असता.आता तो दुसरा कुणी आमचे महाराज निघाले म्हणून त्यांचा उदोउदो करत आलो व करत राहणार. आम्ही त्यांना देवाप्रमाणेच मानतो म्हणून काही 'देव' ह्या संकल्पनेशी त्यांची तुलना करणार नाही. _________________________________________________ 'मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

महाराष्ट्

अप्पा जोगळेकर
Sun, 07/11/2010 - 08:58 नवीन
महाराष्ट्रातसुद्धा शिवाजी राजांच्या आधी आणि नंतर देखील अनेक कर्तृत्ववान पुरुष निपजलेच होते याची नोंद घेतली पाहिजे. अर्थात सबंध महाराष्ट्र जेंव्हा पाच शाह्यांची गुलामी करत होता आणि तेंव्हा स्वातंत्र्याची स्वप्ने दाखवून ती प्रत्यक्षात उतरवणारे शिवाजी राजे हेच होत. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात पायोनिअरला जो मान असतो तो त्यांना आणि त्यांनाच मिळालाच पाहिजे. अधिक लिहित नाही. शिवाजी राजे जन्माला आले असते तर...... किंवा नसते तर ...... ही चर्चा अधिक लांबवली तर ते धाग्याच्या मूळ विषयाला सोडून होईल. आता तो दुसरा कुणी आमचे महाराज निघाले म्हणून त्यांचा उदोउदो करत आलो व करत राहणार. +१. 'आमचे' ऐवजी 'आपले' जास्त ठीक वाटलं असतं. उदोउदो जरूर करावा. तोडफोड करु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

हे पहा....

प्रशु
Sat, 07/10/2010 - 14:37 नवीन
हे पहा काय अकलेचे तारे तोडले आहेत... http://dannyreviews.com/h/Shivaji.html Shivaji: Hindu King in Islamic India James W. Laine Oxford University Press 2003 A book review by Danny Yee © 2004 http://dannyreviews.com/ In the second half of the 17th century, Shivaji rose from a minor chieftain to an independent king, founding the Maratha kingdom. In this study Laine looks not at Shivaji directly, but at the stories that have been told about him and their development over the last three and a half centuries. These have become entwined with the construction of Maharahstrian, Hindu, and Indian identities, and Laine begins with these, and with the risks of attributing anachronistic self-identifications to Shivaji. The earliest stories of Shivaji's life, from the 17th century, present him as an epic hero. Along with stories of his birth and boyhood, key episodes include the killing of Afzal Khan, the encounter with Shaista Khan, the escape from Agra, and his coronation. "when [Shivaji] could, he attempted to rule as an independent Hindu monarch, to be a patron of his religious traditions, and to challenge the hegemony of the Islamicate world around him. His predecessors and successors were more accommodationist, less heroic, and less well remembered. Moreover, the stories of their bravery were nowhere near as good." In the 18th century Shivaji became linked with the saints Ramdas and Tukaram, though "stories of the saints' role in Shivaji's life have more to do with eighteenth-century concerns than with actual events from a century before". The complex intertwining of the religious and political in the present encouraged the construction of a simpler past, as "part of a general tendency to oppose a single universalistic Hinduism to a single monolithic Islam". In the last hundred and fifty years, biographies of Shivaji have expressed "a host of different political and cultural interests". Jatirao Phule used Shivaji's story as "a way of advancing an antibrahmin reading of Maratha history", emphasising his low-caste status, but "virtually every Maharashtrian writer after Phule saw Shivaji as the father of a nation, a liberationist". K.A. Keluskar downplayed his connection with the saints and emphasized his appeal to followers of every caste, Lokmanya Tilak used him to support opposition to British rule, and M.G. Ranade wedded his story to bhakti ("devotion"). Laine also looks at the presentation of Shivaji in school texts, in the fictional works of Babasaheb Purandare, and on web sites. Looking at "cracks in the narrative", Laine explores the things left out of traditional stories — and what these absences show about the concerns of those who produced them. Shivaji came from a "broken family", with separated parents, he probably had a harem, he showed no interest in the bhakti saints, his ambition was to build a kingdom, not liberate a nation, and he did little to change the "cosmopolitan Islamicate world" he lived in. The Shivaji stories have played a key role in the construction of "Islam" and "Hinduism" in Maharashtra. "The narrative of Shivaji's life, already reshaped by bhakti writers by 1800, was thoroughly overtaken by the nationalist narrative in 1900 and has been sustained as a grand narrative of Hindu nationalist identity, despite all the inner inconsistencies, anachronisms, and communalism that imaginative enterprise has entailed." It is hard to approach Shivaji without being influenced by the political furor the book has inspired. It has been withdrawn from the Indian market and banned in Maharashtra, while a scholar was assaulted and the Bhandarkar Oriental Research Institute in Pune ransacked just because of mentions in Laine's acknowledgements. This thuggery is a depressing illustration of the extent of communalism in Indian politics, but also demonstrates the continuing significance of the Shivaji stories — and the need to understand their evolution and history. Laine's openness may explain some of the animosity: his introduction, for example, explicitly states his hope to "rescue [Shivaji's] biography from the grasp of those who see India as a Hindu nation at war with its Muslim neighbors". Shivaji is undeniably a scholarly work, however, and few of Laine's critics have engaged with its actual content. Though too slender to be entirely self-contained, it includes enough background to be accessible to anyone with a basic knowledge of modern Indian history. March 2004 आणी मुख्य म्हणजे सुप्रिम कोर्टत जाऊन बंदि उठवणारा कोणी एक रुपवते नामक मराठी महाभाग आहे म्हणे.... रामदासांच्या चरित्र्यचे हनन करणार्या पुस्तकांचे काय करायचं???
  • Log in or register to post comments

हे सर्व

शानबा५१२
Sat, 07/10/2010 - 14:53 नवीन
हे सर्व प्रतिक्रीया म्हणुन लिहलेल आहे.पुस्तक वाचायला भेटण आता खुप क्ठीण कींवा अशक्य आहे.जो मजकुर सर्वात धक्कादायक आहे ते पान दीसतच नाही.
आणी मुख्य म्हणजे सुप्रिम कोर्टत जाऊन बंदि उठवणारा कोणी एक रुपवते नामक मराठी महाभाग आहे म्हणे....
अरे काय करत अहेत मराठी नेते?? मला हे ठाउक नाही,पण खुप धक्कादायक आहे!
रामदासांच्या चरित्र्यचे हनन करणार्या पुस्तकांचे काय करायचं???
क्रुपया सविस्तर सागांवे. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु

TIMES NEWS NETWORK[ FRIDAY,

शानबा५१२
Sat, 07/10/2010 - 14:58 नवीन
TIMES NEWS NETWORK[ FRIDAY, JULY 09, 2004 11:08:09 PM ] MUMBAI: The Bombay high court on Wednesday admitted a public interest litigation (PIL) filed by city-based advocate S D Rupwate, filmmaker Anant Patwardhan and activist Kunda Pramila against the state government's ban on US author James Laine's book Shivaji :Hindu King In Islamic India.
The matter has been listed for final hearing in August. The petitioners said that it would be wrong to say that the author had any intention to provoke the people of India to wanton and malignant rioting.
अरे तुमचे हेतु ढीग असतील,पण लिखानाचा अर्थ काय होतो ते नाही कळत तुम्हाला? _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

बंदी घालून काय होणार ?त्याचा खप वाढेल. त्याला फटके कसे मिळणार?

जयंत कुलकर्णी
Sat, 07/10/2010 - 17:11 नवीन
श्री बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या Riddles of Hinduism या पुस्तकात सीता ही रामाची बहीण होती अशासारखी अनेक विधाने केली आहेत, त्या पुस्तकावर बंदी घालणार का ? आहे का तशी हिंम्मत ? ज्या वारकर्‍यांनी यादवांना घालवले ते तर राम/कृष्णांचे नाव प्रत्येक पावलाला घेतात, त्यांच्यात आहे का हिंम्मत बाबासाहेबांच्या पुस्तकावर बंदी घाला ही मागणी करण्याची ? दुर्गा भागवतांनी कुठलिही मारामारी केली नाही तर त्याला पुस्तकातूनच सडेतोड उत्तर दिलेले मला आठवतंय. शिवधर्म असा सर्च देऊन ती साईट बघा, त्यावर काय अकलेचे तारे तोडलेत ते वाचा. कोणाच्या कानफटात मारणार ? ती हिम्मत कोणाच्यातही नाही कारण ही सगळी हवा तापवायचे खेळ आहेत आणि राजकारण्यांचे खेळ आहेत. संभाजी ब्रिगेडच्या कुठल्याही कार्यक्रमाच्या बाहेर जी पुस्तके विकायला ठेवतात, घालणार का त्यांच्यावर बंदी ? (त्या पुस्तकांमुळे तर दोन समाजामधे तेढ याशिवाय काहीही होऊ शकत नाही) . आपण सगळे double Std. चे लोक आहोत हे मान्य करूया आणि गप्प बसुयात ! जेम्स लेनला या लिखाणाबद्दल कोर्टात खेचायला पाहिजे होते व त्याच्या कडून दंड वसूल करायला पाहिजे होता व शिक्षा सुनवायला हवी होती. त्याच्या पुस्तकाचा आपल्या येथील तज्ञांनी प्रतिवाद करायला पाहिजे होता म्हणजे कोर्टात त्याचा उपयोग झाला असता. असो. गंमत म्हणजे काल IBN लोकमतवर या विषयावर चर्चा चालली होती त्यात एक महाराव का असेच काहितरी नाव होते, त्यांनी तर असे म्हटले होते की पान क्र. ९३ सोडले तर हे पुस्तक एक उत्कृष्ट पुस्तक आहे. ते james lane च्या लिखाणाचेही कौतुक करत होते. याचे मला मात्र आश्चर्य वाटले. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

आपण दीलेले

शानबा५१२
Sat, 07/10/2010 - 18:05 नवीन
आपण दीलेले उदाहरण माहाती आहे. Rama's birth is thus accompanied by general debauchery if not in his case certainly in the case of his associates. His marriage to Sita is not above comment. According to Buddha Ramayana, Sita was the sister of Rama, both were the children of Dasharatha. The Ramayana of Valmiki does not agree with the relationship mentioned in Buddha Ramayana. According to Valmiki, Sita was the daughter of the king Janaka of Videha and therefore not a sister of Rama. This is not convincing for even according to Valmiki she is not the natural born daughter of Janaka but a child found by a farmer in his field while ploughing it and was presented by him to king Janaka and brought up by Janaka. It was therefore in a superficial sense that Sita could be said to be daughter of Janaka. नास्तिकतेची भावना मनात रुजवणे,लोकांना रुढी पंरपरेतुन बाहेर काढणे हे 'त्या' रामायणाचे उद्दीष्ट आहे.आम्ही कधी त्याची दखल हेतली नाही व घेणार नाही. (आज मला २-३ केमीस्ट्रीच्या व्याख्यांचा विसर पडणार वाटत!) _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

इतरांच्या

जयंत कुलकर्णी
Sat, 07/10/2010 - 18:37 नवीन
इतरांच्या (बहूसंख्यांच्या) भावना पायदळी तुडवून //नास्तिकतेची भावना मनात रुजवणे,लोकांना रुढी पंरपरेतुन बाहेर काढणे हे 'त्या' रामायणाचे उद्दीष्ट आहे.आम्ही कधी त्याची दखल हेतली नाही व घेणार नाह//// हे कसे जमते बुवा ? जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

तशीच लेन

पुष्करिणी
Sat, 07/10/2010 - 18:57 नवीन
तशीच लेन च्या पुस्तकाचीही अजिबात दखल घेउ नका, आपोआप प्रश्न सुटेल... *हा प्रतिसाद चुकून जयंत कुलकर्णींना लिहिला गेलाय, हा शानबा५१२ ना आहे पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

अप्पा व

शानबा५१२
Sat, 07/10/2010 - 21:49 नवीन
अप्पा व पुष्करणी, आपली काहीतरी गफलत(?) होतेय. आंबेडकरांनी लिहलेल्या लि़खाणात According to Buddha Ramayana, Sita was the sister of Rama, both were the children of Dasharatha. The Ramayana of Valmiki does not agree with the relationship mentioned in Buddha Ramayana. म्हणजे 'ते' रामायण तस म्हणत.मुळ रामायणाचा त्यात उल्लेख नाही.'ते' रामायण 'बुद्धां'नी लिहलय व नंतर ते आंबेडकरांनी 'पटवुन' सांगितल.आंबेडकरांनी 'लिहल' अस तुम्ही नाही म्हणु शकत.'ते' रामायण मुळ रामायणाच वेगळ स्वरुप(वेगळा अनुवाद ह्या अर्थाने) नसुन रामायणाचा आधार घेउन आपली शिकवण सांगितली गेली आहे. आंबेडकरांनी 'बुद्ध' हा विचार कसा वेगळा आहे ते प्राचिन महात्म्यांनी लिहलेल्या साहीत्याचा वापर करुन सांगितल आहे. मी ह्यात काही तडजोड करतोय अस तुम्हाला वाटेल.तर त्यावर एवढच म्हणे न की मला जेवढ कळत ते लिहल आहे.आंबेडकरांनी लिहल त्याला विरोध नाही करु शकत आपण....हो नाही.....का ते सांगतो........ रामानुज ह्यांनी 'तयार' केलेल्या एका 'रामयणाच्या व्हर्जन'मधे (ह्याला भाषांतर म्हणन चुकीच आहे) त्यांनी 'सीता रावणाची मुलगी होती' अस लिहलय.ते कीती योग्य आहे? मग जर 'त्या' धर्मात(?) 'बुध्द रामायण' नावाखाली 'काही बदल' झाले तर आपण का बोंबा मारायच्या?आपलीच चुक नाही का निघणार?एकावरच आक्षेप घेतोय अस नाही का होणार? अजुन काही राज्यात अस्तित्वात असलेल्या दंतकथा काही 'अज्ञान' गोष्टी सांगतात. हे अस खुप वाचल आहे म्हणुन 'दखल नाही घेणार' अस लिहल आहे. आता ह्याला तुम्ही 'माझी पळवाट' वगैरे नाव द्या,पण एक लक्षात घ्या की 'ज्यांचा अस्तित्वाबद्दल कोणी ठोस बोलु शकत नाही' तिथे हे असे लिखाण येणारच.शिवाजी महाराजांच तस नाहीये. फरक आपल्या लक्षात येत असेल.दोन लेखांची तुलना होउच शकत नाही. व अशा देवाबाबतीत लिहल्या गेलेल्या लिखाणाबद्दल भाष्य करायला माझा पुरेसा आभ्यासही नाही.मधे एका स्वर्गीय मराठी लेखकाने एका हींदु देवताबद्दल लिहलेल्या आक्षेपार्ह लि़खाणाचा उल्लेख करणारा लेख आला होता तेव्हा हे सर्व वाचण्यात आल वेगवेगळ्या माध्यमातुन म्हणुन आता इथे तिथे बघुन लिहु शकलो. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

साहेब,

जयंत कुलकर्णी
Sat, 07/10/2010 - 22:49 नवीन
साहेब, चर्चा माणसांनी लिहीलेल्या पुस्तकावर चालली आहे आणि त्याच्या बंदी वरची. माणसे अस्तित्वात नसली तरी ती पुस्तके अस्तित्वात आहेतच. थोडक्यात त्यांनी जे लिहीले आहे त्या राम कष्णांच्या अस्तित्वाबद्द्ल तुम्हाला शंका असेल पण कोट्यावधीना नाही. मुद्दा असा आहे की पुस्तकाला उत्तर पुस्तकांनीच द्यायला पाहिजे. मी उल्लेख केलेल्या बाकी पुस्तकांबद्दल काय ? त्याची ही उत्तरे पुस्तकानीच दिले पाहिजे. कारण तुम्ही एक दोघांच्या कानाखाली काढाल, पण हे पुस्तक जगभर पसरले आहे. त्या सर्व जगाभरात हे उत्तर पण पसरले पाहिजे हे महत्वाचे आहे. आपण मराठी लोक फार localized विचार करतो. प्रश्न जर जगभर पसरला आहे तर त्याचे उत्तर पण तेथेच पोहोचायला पाहिजे आणि ते फ्क्त पुस्तक याच मध्यामातून्च श्क्य आहे. म्हणून पुस्तकावर बंदी घालून काही फायदा होत नाही. आणि हा नियम सर्व जगात खरा आहे. मला वाटतं की तुम्हाला माझे म्हणणे जर विचार केलात तर पटेल. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

साहेब, नको

शानबा५१२
Sat, 07/10/2010 - 23:03 नवीन
साहेब,
नको त्या बाबतीत खिल्ली उडवु नका! ;)
माणसे अस्तित्वात नसली तरी ती पुस्तके अस्तित्वात आहेतच.
माझ उत्तर हेच की आपण ठोसपणे ह्याचा विरोध नाही करु शकत.'रामसेतु'च्या वेळची परीस्थीती आठवते ना सर........सर्वांनी सोयीस्करपणे मत मांडली.....भाजप- राम होता.............कॉ. - राम अस्तित्वातच नव्हता... म्हणुन 'नात्यां'च्या बाबतीत तरी मला 'करोडों'मधे नाही यायच.महाराजांचा प्रश्न आहे तर एकटाही बोलेन.....तशी वेळ नाही येणार ही वेगळी गोष्ट! पुस्तकाच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलाल तर आपल्याला शक्य आहे तेवढ तरी नियत्रण ठेउ या........ह्या वदामुळे पुस्तकाची दुप्पट विक्री झाली आहे,जी वाद नसता तर नसती झाली.
आपण मराठी लोक फार localized विचार करतो.
ह्याबाबतीत तर होच..........कारण जगात बंदी आणु नाही शकणार आपण.इथे राज्य संभाळल तरी खुप आहे. आपल्या म्हणण्याशी पटायच बोलाल तर ह्या विषयांत मी आपल्यासमोर तोकडा आहे. पण रामायणाच बोलल तर आपल्याकडे(माझ्याकडे म्हणा!) ठोस कारण नाही(कधीच नव्हत) विरोध करायला _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

अरेच्या

जयंत कुलकर्णी
Sat, 07/10/2010 - 23:11 नवीन
अरेच्या एवढा संकुचित विचार करून कसा चालेल ? आपल्याला शिवाजी महाराजांनीच हेच शिकवले का ? आख्या जगाशी लढायची आपली हिम्मत आहे. सगळ्या जगालाच उत्तर ठणकावून दिले पाहिजे. मराठ्यांच्या शौर्याविषयी मी एक Maratha Light Infantry वर एक मोठा लेख लिहीणार आहे. त्यात लढाईचे शौर्य वाचायला मिळेल. इथे लोखणीचे शौर्य गाजवायला लागेल. दुसरा मार्ग नाही. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

सहमत.. साप

पुष्करिणी
Sat, 07/10/2010 - 23:17 नवीन
सहमत.. साप सोडून भूईला कशाला मारायचं. पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

संकुचित

शानबा५१२
Sat, 07/10/2010 - 23:26 नवीन
संकुचित विचार नाही 'प्रॅक्टीकल' विचार करतोय हे तुम्हालाही मान्य करावच लागेल सर............मराठा शुर होते,तसे प्राचिन काळात लोक उडायचीसुध्दा म्हणुन काय काहीही अपेक्षा करायच्या :) इथे राज्यात बंदी आणताना नाकी नउ येतात त्यात जगाचा विचार कसा करणार?
सगळ्या जगालाच उत्तर ठणकावून दिले पाहिजे.
हे कधी केंद्र सरकार मनावर घेइल का?.........नाही.
साप सोडून भूईला कशाला मारायचं.
'लेन' साप व 'पुस्तक' भुइ असेल तर आज आपण भुइलाच बदडु शकतो. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

माझ्यामते

कानडाऊ योगेशु
Sat, 07/10/2010 - 17:14 नवीन
माझ्यामते आक्षेपार्ह मजकुर वगळुन पुस्तक प्रकाशित करण्याची परवानगी दिली गेली आहे त्यामुळे पुस्तकाच्या नव्या आवृत्तीत तो मजकुर असण्याची शक्यता नाही. पण हे पुस्तक तसेही मी वाचले नसतेच.शिवाजी महाराजांवर मराठीतच इतके साहीत्य उपलब्ध असताना उगाच एखादे इंग्लिश पुस्तक घेऊन घरातील रद्दी का वाढवावी? --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

देशासमोरील मूलभुत प्रश्न

प्रकाश घाटपांडे
Sun, 07/11/2010 - 09:42 नवीन
गरीब, बेराजगार, अल्पशिक्षित, अपरिपक्व जनतेला हाताशी धरुन त्यांच्यात द्वेषाच्या आधारावर एखादी अस्मितेची नशा निर्माण करायची त्याला 'स्वाभिमान` हे नाव द्यायचं व त्याचा झुंडशाहीसाठी कुशलतेने वापर करायचा. या नशेत ती जनता आपले मूलभूत प्रश्न विसरते. एखाद्या दारुडयाला भूक लागली की त्याला अन्नाऐवजी दारुच द्यायची. हळूहळू त्याचे शरीर भूक लागल्यानंतर अन्नाऐवजी दारुचीच मागणी करु लागते. जो ती मागणी पूर्ण करतो तो त्याला आपला हितचिंतक वाटतो. जो त्याला अन्न द्यायचा प्रयत्न करतो तो त्याला शत्रू वाटतो. आज देशासमोरील प्रश्न काय आहेत याचे संकलन केले तर प्राधान्यकमावर असलेले अन्न वस्त्र निवारा हे प्रत्येक भारतीयाला मिळणे हा मुलभुत हक्क आहे त्या बद्दल कोणी बोलत नाही. आरोग्य, स्वच्छ पिण्याचे पाणी,स्वच्छतागृहे,वाहतुकीसाठी रस्ते, इतर दळण वळणाच्या सुविधा,शिक्षण,रोजगार असे कितीतरी एकमेकांशी गुंतलेले प्रश्न समस्या सोडवायला, त्याचा पाठपुरावा करायला, त्यासाठी जनआंदोलने उभारायला काय इतिहासातल्या वा पुराणातल्या व्यक्ति येणार आहेत का? मान्य आहे कि ती स्फुर्ती स्थाने आहेत. पण त्याच नशेत किती काळ अडकून पडायचे आता? प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

मी ह्या

शानबा५१२
Sun, 07/11/2010 - 10:27 नवीन
मी ह्या लेखावरच्या प्रतिक्रीयांवर माझ म्हणन सांगण जरुरी समजतो,मी काही सदस्यांशी सहमतही आहे नी काहींशी असहमतसुध्दा.
प्राधान्यकमावर असलेले अन्न वस्त्र निवारा हे प्रत्येक भारतीयाला मिळणे हा मुलभुत हक्क आहे त्या बद्दल कोणी बोलत नाही.
प्रॅक्टीकली विचार केला तर,हे मला तरी वाटत माझ्या हाताबाहेर आहे.बोलायला काय मी ढीग बोलीन पण त्याचा कीतीसा परीणाम होणार आहे? हा लेख लिहला कारण तळमळ आहे,पुस्तकाबद्दलचा सर्वांचा आकस वाढवायचा आहे आणि तो वाढला असेल अस वाटत.(आणि निर्णयाचा निषेधही करायचा होता) आणि एक सरळ बोलु तर 'ह्या' समस्या ज्यांना नाहीत ते 'ह्या समस्याबद्दलचा' विषय चव गेलेल्या च्विंगमप्रमाणे तोंड वाकड करुन चगळणार.आपला/माझा स्वार्थ पुर्ण होतोय ना मग कशाला पचपचीत विषय हाताळायचा,असा विचार करणारी डोकी वाढत आहेत. तेव्हा बेरोजगार,गरीबी वगैरे बद्दल भाष्य करणे,तेपण इथे,आणि त्यातुन काही निष्पण्ण(?) होइल अशी अपेक्षा ठेवण म्हणजे मला तर अतिशयोक्ती वाटते. (प्रकाश सर तुमच लिखाण खुप दीवसांपासुन वाचतोय्,पण उपक्रमवर 'चालु' व्हायला एखादा मस्त विषय नाही भेटताय.विज्ञान(मानवपयोगी,ठोस) व रसायनांवर काही बोलायच असेल तर नक्की आवडेल.) _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

उत्तम प्रतिसाद

बट्ट्याबोळ
Sun, 07/11/2010 - 11:49 नवीन
एक विचार मनात डोकावून गेला- शिवाजी जेव्हा तयार झाले तेव्हा त्यांना कोणाचा इतिहास होता? तरी त्यांनी इतिहास घडवलाच!! आम्हाला शिवाजी, संभाजी, बाजीराव, भाऊ, शिंदे, होळकर, टिळक, फुले, सावरकर आहेत, पण आमच आयुष्य झंड आहे ... इतिहासाचा उपयोग मर्यादित आहे ... आणि दुधारी तलवारिप्रमाणे त्याचा उपयोग लोकांना चांगल्या / वाइट गोष्टींसाठी भडकवण्यासाठी होउ शकतो ... आपण भारतातील स्वतःच्या डॉमिनेशन चा विचार करावा ... खूप पल्ला गाठायचा आअहे ... जेम्स लेन प्रकरणात आपण वापरले जातोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

बरोबर

जयंत कुलकर्णी
Mon, 07/12/2010 - 16:53 नवीन
बरोबर आहे. मुद्दा हा आहे की तरूणांना या नालायकांपासून वाचवायचे कसे? म्हणजे जे तरुणांना चुकीच्या मार्गावर नेऊन सोडतात आणि गायब होतात त्यांच्यापासून. मी उल्लेख केलेल्या IBM लोकमतच्या चर्चेमधे संभाजी ब्रिगेड्चे पुढारी प्रविण गायकवाड यांनी कबूली दिली की रा. रा. पाटीलांनी व पवारांनी त्याना वापरले. खरे तर संभाजी ब्रिगेड्चा पण त्यात स्वार्थ होताच हे नाकारण्यात अर्थ नाही. कुठला होता ह स्वार्थ ? हे जे नवीन पुढारी आहेत, त्यांना झटपट पुढारी व्हायचे आहे. जुनी धेंड दूर झाल्याशिवाय हे कसे साध्य होणार. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

नेते

तिमा
Sun, 07/11/2010 - 10:14 नवीन
सर्व राजकीय नेते मनांतून 'जेम्स लेन'ला धन्यवाद देत असतील. प्रत्येकाला फक्त पेटवून द्यायचे आहे. 'कानाखाली आवाज' काढणार्‍यांना मानसिक परिपक्वता यायला अजून १०० वर्षे लागतील. तोपर्यंत चालू देत. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

मी ह्या

शानबा५१२
Sun, 07/11/2010 - 10:24 नवीन
चालु द्या.....सर्वांचच चालु द्या.........मी अगदी मनापासुन बोलतो ह्यातल राजकरण न समजणारे अपरीपक्व असतील तर मी १००% अपरीपक्व आहे/राहीन. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments

पान क्र.९३

शानबा५१२
Sun, 07/11/2010 - 10:43 नवीन
पान क्र.९३ वरचा मजकुर कोणाला वाचायचा असल्यास तो व्यनी केला जाईल. उद्देशाबद्दल शाशंक लोकांनी त्रास घेउ नये ही विनंती. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments

मला पाठवा...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/12/2010 - 18:40 नवीन
>>>पान क्र.९३ वरचा मजकुर कोणाला वाचायचा असल्यास तो व्यनी केला जाईल. पान क्र.अ ९३ वरील मजकूर मला वाचायचा आहे. कृपया व्य.नी करा. आणि जो काय मजकूर असेल तो मराठीत अनुवाद करुन इथे टाकायला हरकत नसावी असे वाटते. अर्थात आपल्याला तो मजकूर इथे टाकायचा नसेल तर टाकू नका, माझा आग्रह नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा