केव्हढ हे लिखाण आणि केव्हढा हा बौद्धिक कीस...
कोण हा जेम्स लेन? त्याची लायकी काय? त्याचा अभ्यास काय? त्याच्या पुस्तकाला का इतकी प्रसिद्धी देताय ?
कोणीतरी परदेशी शेंगदाणा काहीतरी फालतू लिखाण काय करतो त्याला इतके महत्त्व काय द्यायचे?
इतकी बोंबाबोंब करून तुम्ही त्याचीच प्रसिद्धी करीत आहात हे काही कळत नाही का तुम्हाला?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
पुस्तकावर बंदी असायला हवी पण त्याचा राजकीय फायदा / जातींमध्ये फूट पाडणे, भांडारकरसारख्या प्राच्यविद्या म्हणजे अतिप्राचीन इतिहासा संबंधित संस्थेची नासधूस करणे हे आग रामेश्वरी चाच प्रकार आहे. विरोध करताना उलट घडलं तर स्वागतार्ह आहे. मला वाटतं बोरी वर हल्ला हा मूळ उद्देशापेक्षा ब्रिगेडला आपलं अस्तित्व आणि nuisance value दाखवून देण्याची एक मोठी संधी आणि brain washing करून एका परदेशीय मूर्खाची ढाल करुन इथल्या लोकांमध्ये फूट पाडण्याचा कट होता.
काही काळापूर्वी इतर खूप जुन्या इतिहासाबद्दल वाचताना काही ठिकाणी संस्थेबद्दल उत्तम आणि आदराने लिहिलेलं वाचण्यात आलं. अभिमान वाटला की आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राचीन इतिहासाच्या क्षेत्रात इतकं नाव असलेली संस्था पुण्यात आहे.
पुस्तकात एका पानात त्या बिनडोक माणसाने काही विधाने केली आहेत. बाकी पुस्तक ठीक ठाक आहे आणि बहुधा शिवभारत काव्यावर आधारित संदर्भ आहेत. एकदा अचानक पणे पाहण्यात आले होते एका टिपिकल इंग्रजी पुस्तकांच्या दुकानात.
असो. याचा लाभ उठवण्यासाठी का होईना सगळ्या जाती आणि नेते एकत्र आले तर महाराजांनाच आनंद होईल. ज्यांनी महाराष्ट्राला एकत्र आणण्याचे इतके प्रयत्न केले त्यांच्याच नावावर इथे दुफळी माजवली गेली आहे आणि पुढे होत राहील याचं महाराजांना काय वाटेल याचा विचारच नाही. गुरुचा अपमान झाला तर तिथल्या तिथे बदला घ्या. पण गुरूच्या विचारांचाच पूर्ण अपमान झाला आपण स्वतः केला तर काही फरक पडत नाही. रयतेच्या एका कणसाला हात लावू नका सांगणारे महाराज आणि भवानीची पूजा करणारा महाराष्ट्र खरा का नाव पण माहीत नाही खरं खोटं माहीत नाही आणि शेकडो वर्ष जूने महाराजांशी कसलाही संबंध नसलेली हस्तलिखितं, वस्तू आणि एक सरस्वतीची मूर्ती फोडणारे आपलेच भाईबंद खरे...
जेव्हा जेव्हा अमुक आणि तमुक जातींनी एकत्र राहून महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा विचार केला तेव्हा तेव्हा काहीतरी विशेष घडवून दाखवलं आणि इतिहासात महाराष्ट्राचं नाव मोठं झालं - उदा. शिवाजी महाराज, संभाजींच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी जबरदस्त चिवटपणे दिलेला लढा, थोरल्या बाजीरावाने आणि माधवरावाने शाहूंच्या आणि गादीच्या आदरात आणि निष्ठेत वाढवलेली सत्ता. नाना, बापू आणि महादजी या निष्ठावंत कारभार्यांनी काही वर्ष सांभाळलेली गादी.
जसे म्हणतात की इतिहास साक्षी आहे. पण इतिहासापासून न शिकणे हा माणसाचा आणि मराठी माणसाचा गुणधर्म आहे.
मराठी म्हटलं की मग भय्ये आणी मद्रासी दिड दमडीचे. एक जात म्हटलं की दुसरे सगळे ह खो .. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ, मराठवाडा. एतद्देशीय आणि कायमस्वरुपी वा तात्पुरते परदेश निवासी. आपल्या खुज्या संकुचित (confined is the right word) मनोवृत्ती गोंजारत सांभाळत राहायच्या.
हे पुस्तक फक्त हजारो घटनांपैकी एक.
अवांतर : कादंबरी लिहिणार्या आणि तुकारामांना संतसूर्य म्हणणार्या आनंद यादवांचा आणि महाबळेश्वर संमेलनाचा पुरता धुव्वा करणार्या वारकर्यांच्या नेत्यांना अजून विठ्ठल आणि त्याहून जास्त ज्ञानेश्वर, रामदासांबद्दलच्या अति उघड उग्र आणि गलिच्छ लिखाणाचं पुढे वावडं नाही. ज्या पालख्या शेकडो वर्ष एकत्र आहेत आणि ग्यानबा तुकाराम हा महाराष्ट्राची संस्कृती आहे तिथे त्यातल्या एका गटाला दुसर्याबद्दलचे हीन लिखाण जोवर स्वतःला बोचत नाही तोवर सोयरसुतक वाटत नाही तिथे एकीची भाषा काय करायची. आळंदीची पालखी पंढरपुरात जाणार नाही अशी भूमिका घेतल्यावर कायदा करू, शिक्षा करू, बंदी घालू म्हणणारे सरकार अजून काहीही करत नाही. उलट देहूकरांनी आमची पालखी जाईल, वारकर्यांना त्रास नको अशी भूमिका घेतली. इथे काय महत्त्वाचे?
असो नुकत्याच पालख्या मार्गस्थ झाल्या आणि दोन्ही मुद्द्यांमधल्या समान धाग्यामुळे आठवण झाली.
जेम्स लेनच्या लिखाणावरची शानबा यांची प्रतिक्रिया फार तीव्र व प्रामाणीक आहे.
त्याचे मी मनापासून कौतूक करतो.
ते लिखाणच तसे आहे. मी वाचलेले आहे. पण सगळ्यात धोकादायक आहे ते त्याचा उपयोग करून समाजात फूट पाडणे. ते सुध्दा जातीच्या आधारावर. याने नुकसानच होणार. माझी एकच शानबांसारख्यांना एकच कळकळीची विनंती आहे की याच्या मागे लपून राजकारणी (त्यात संभाजी ब्रिगेडवाले पण आले) जो त्यांचा फायदा करून घेत आहेत यात सुळावर चढणार फक्त सामान्य माणसे. हा धोका ओळखून पुढची पावले टाकावीत.
या धाग्यावर माझा हा शेवटचा प्रतिसाद !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
जयंत सर आपल्यासारखा दर्जेदार लेखकाने,विचारवंताने(विशेषण अगदी योग्य विचार करुन दीलीत) असल लिहाव ही माझ्यासाठी उत्साहवर्धक गोष्ट आहे.
'शिवाजी महाराज' हा विषय माझ्यासाठी व घरातल्या काही सदस्यांसाठी खुप सेन्सीटीव विषय आहे.
जेव्हा ही बातमी आली तेव्हा एका सदस्याने चमफ ची भाषा वापरली त्यावरुन ह्यांना माहीती आहे 'जेम्स लेन' ह्याचे मलाच आश्चर्य वाटले......असो.
जयंत सर,
आपल्याकडे खुप काही आहे,आम्हाला शिकवायला.
आपण शिकवत रहा,आम्ही शिकत राहु.
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
प्रतिक्रिया
केव्हढ हे
हा
परदेशी
आग रामेश्वरी...
१ लेख
शानबांची प्रतिक्रीया
जयंत सर
अजुन
अजुन एक