सारेच सुटलेत, हे पाहिल्यावर दिवसभराचा कंटाळा काढून टाकताना हे काही तरी होत गेलं... नंतर कळलं, कविता झाली.
नात्यातील प्रश्नांचे कंगोरे
एकेक करून उकलून घेताना,
काही सिद्धांत ती मांडायची, अन्
नेमकी विरुद्ध मूल्ये माझी
समीकरणाची मांडणी करून,
प्रमेयांची भूल विरून जाताना,
सारीच गणिते सोडवायची, असे
एकमेकांना हलकेच बजावून सांगायचो
उभयान्वयी अर्थांचे सूत्र चालवत
आपले गणित सोडवून ती गेली,
मी मात्र झोके खात राहिलो
शब्दांच्या जाती आणि संख्यांच्या किंमतीत
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3594
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त हो.....
मागच्या
In reply to मस्त हो..... by प्रभो
गणितावर
In reply to मागच्या by मस्त कलंदर
विडंबन नाही...
+१
In reply to विडंबन नाही... by राजेश घासकडवी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
श्रावण,
एकाकी झोके
हे काही तरी होत गेलं
>>प्रवासाच्
In reply to हे काही तरी होत गेलं by सहज
४
मस्त! सवतचि