✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उगवला...चंद्र सुगीचा

न
नंदन यांनी
गुरुवार, 09/27/2007 - 15:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24620 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर गुरुवार, 09/27/2007 - 15:08 नवीन

'वन्स इन द ब्ल्यू मून'! :)

त्याआधी जूनमध्ये ब्ल्यू मून होता (एकाच महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात, तेव्हा त्या दुसऱ्या पूर्णचंद्राला 'ब्ल्यू मून' म्हणतात. 'वन्स इन द ब्ल्यू मून' या वाक्प्रचाराचा स्रोत.) क्या बात है नंदनशेठ! तुझ्यासारख्या बहुश्रुत आणि चोखंदळ व्यक्तिने इथे स्वतःहून एक लेख लिहिला याचा खूप आनंद वाटला! लेख छान आहे, चांदोबाचं चित्रही छान आहे. आणि हो, इथे नेहमी लिहीत जा रे! नाहीतर च्यामारी तुझे लेखही 'वन्स इन द ब्ल्यू मून' यायचे! :) आपला, (भास्करप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 09/27/2007 - 15:18 नवीन

सुंदर लेख

सुरेख सचित्र माहिती. असे काहीतरी वरचेवर तुमच्याकडून वाचायला मिळो. मस्त! ----------------------------------------------------------------------------------------------- कळल का प्रमोदराव आज ते तुमच्याशी तावातावान कसे वाजत होते. निसर्गनियम हो, चंद्राचा प्रभाव जास्त होता! दोष ना कुणाचा
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 09/27/2007 - 15:36 नवीन

सुंदर लेख आणि छायाचित्रही!

नंदन खूपच छान लेख लिहिला आहेस! पण फार वाट पाहायला लावतोस! कळल का प्रमोदराव आज ते तुमच्याशी तावातावान कसे वाजत होते. निसर्गनियम हो, चंद्राचा प्रभाव जास्त होता! दोष ना कुणाचा हा!हा!हा! असू द्या हो सहजराव! मित्रांना परवानगी आहे!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 09/27/2007 - 15:54 नवीन

फुलमून फेस्ट

चायनीज लोकांचा हा उत्सव आहे, असे कालच कळले. म्हणजे चायनीज क्यालेन्डरप्रमाणे वर्षात जितके वेळा पूर्ण चंद्र दिसतो, त्यातला सगळ्यात मोठा (म्हणजे नक्की काय ते नीटसे कळले नाही :))) कालच्या/आजच्या दिवशी दिसतो, अशी माहिती हापिसातील चिनी सहकार्‍याकडून कळली. त्याचबरोबर सन्त्रे, खोबरे, अन्डी वगैरे घालून केलेला डिट्टो आपल्या 'खान्डवी' च्या चवीचा 'मूनकेक' हादडायला मिळाला. (चविष्ट)बेसनलाडू लेख छान, आटोपशीर आणि सहज. छायाचित्रही सुंदर. आणखी लिहा, दमाने वेळ काढून लिहा. म्हणजे गुंडाळल्यासारखे वाटायचे नाही. चित्र बघून खाली वाचायलाघेतले तोच संपले, अशी अतृप्त भावना येऊ नये, असे एक वाचक म्हणून वाटले. (सविस्तर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 09/27/2007 - 16:06 नवीन

हो

ह्याला मीड्-ऑट्म फेस्टिवल असे म्हणतात. मोठा सण असतो. ह्याच्या अगोदर त्यांचा महीनाभर सेवन्थ मन्थ (पितृ पंधरवड्यासारखा महीना) असतो. तेव्हा म्हणे गेलेली मंडळी पृथ्वीवर येतात तर त्यांची शांत करायला काय काय करत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ध
धम्मकलाडू Fri, 09/28/2007 - 13:43 नवीन

असह्मत

लेख आटोपशीर. वाचतान कंटाळा येत नाही. तिर्पा बेसनलाडूसिंग मि असह्मत हाये. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ध
धनंजय गुरुवार, 09/27/2007 - 16:49 नवीन

चंद्रोदयांतला बदलता फरक

खूपच माहितीपूर्ण लेख हा भाग नीट समजला नाही : > जानेवारीतील पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी ६ वाजता झाला, > तर दुसऱ्या दिवशीचा चंद्र ७० मिनिटे उशीरा म्हणजे ७ वाजून > १० मिनिटांनी उगवेल. हार्वेस्ट मूनचे वैशिष्ट्य हे की, या > सुमाराला हा फरक किमान म्हणजे फक्त ३० मिनिटांचा असतो. कुठल्याही महिन्यात पूर्णिमेचा चंद्र संध्याकाळी ६ वाजता उगवेल, आणि अमावास्येला सकाळी ६ वाजता उगवेल. म्हणजे १४ दिवसांत १२ तास उशीरा = दररोज साधारण ५० मिनिटे उशीरा (लेखात सांगितलेली सरासरी). पण जानेवारीतली सरासरी ७० मिनिटे अशी असेल तर जानेवारीत अमावास्या पूर्णिमेनंतर ८-९ दिवसांतच येईल... ही गोष्ट कदाचीत यावर अवलंबून असेल की चंद्राचे "ऑर्बिटल प्लेन" हे पृथ्वीच्या "ऍक्सिस"शी ९० अंशाच्या कोनात नाही. म्हणजे चंद्राची आकाश-मध्य वेळ कुठल्याही महिन्यात ~५० मिनिटे इतकीच लांबणार (दोन मध्यान्हवेळा वर्षभर २४ तासच असतात, त्याप्रमाणे), पण चंद्रोदय-काळ कमी जास्त होऊ शकेल... हंऽऽऽ (हम्म चा प्रतिशब्द) ... नंदन, आणखी थोडे समजावून द्या. सूर्यास्त वर्षातून मागेपुढे होत असल्यामुळे सूर्यास्त-पूर्णचंद्रोदय मधील काळ कमीजास्त होतो हे कळले. पण तो सर्वात कमी २४ जूनच्या जवळच्या पूर्णिमेला होणार, कारण तेव्हा सूर्यास्त उत्तर गोलार्धात सर्वात उशीरा होणार...
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 09/28/2007 - 01:37 नवीन

उत्तर

शोधतो आहे. दरम्यान, कुठल्याही शहरातून वर्षभरात सूर्योदय/सूर्यास्त किंवा चंद्रोदय/चंद्रास्त कधी होतो, हे या दुव्यावरुन (http://aa.usno.navy.mil/data/docs/RS_OneYear.ph) पाहता येईल. चंद्रोदयाचा तक्ता पाहिला तर वरील विधानांचा पडताळा येतो खरा, पण त्यामागची कारणीमीमांसा आणि तक्त्यात मोकळ्या असणार्‍या जागांबद्दल खुलासा याची कारणे शोधायला हवीत. धोंडोपंत/घाटपांडे साहेब, याबद्दल अधिक माहिती देऊ शकाल का? नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ध
धनंजय Fri, 09/28/2007 - 03:29 नवीन

तक्त्यात मोकळ्या असणार्‍या जागा

चंद्राचे स्थिर-पृथ्वीभोवती भ्रमण २४ तास आणि ~५० मिनिटांचे असते. त्यामुळे काही २४ तासांच्या सौर दिवसात कधीकधी त्याचे उगवणे आणि मावळणे असे दोन्ही होत नाही. ज्या सौर तारखेला तसे आहे तिथे तक्त्यात मोकळ्या जागा आहेत. आता हा तक्ता बघा. अक्षांश ०, रेखांश ०, चंद्रोदय/चंद्रास्त निवडा. बटणावर टिचकी मारल्यासरशी २००७ सालचा तक्ता दिसेल. उदाहरणार्थ सप्टेंबर १८ ही शुक्ल सप्तमी-अष्टमीची रात्र घेऊ या. १८ सप्टे २३:१३ ला समजा चंद्र मावळला, तो १९ सप्टेच्या ~११:४० ला उगवला. आता तो पुन्हा मावळायला मागच्या मावळण्यापासून ~२४ तास आणि ५२ मिनिटे लागतील, पण तोवर सौर तारीख २० सप्टे चे ००:०६ झाले! म्हणजे १९ सप्टे ही सौर तारीख असताना चंद्र एकदाही मावळला नाही. मग १९ सप्टे तारखेला तक्त्यात चंद्र मावळण्याच्या ठिकाणी मोकळी जागा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ज
जुना अभिजित गुरुवार, 09/27/2007 - 16:50 नवीन

छान लेख

मागच्या वर्षी कोजागिरीला क्षितिजाजवळ मोठा दिसणार्‍या चंद्राचे फोटो काढले होते. पण उगवल्यानंतर मात्र झपाट्याने वर येतो बुवा. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 09/27/2007 - 18:09 नवीन

सुंदर..

लेख आवडला,छान लिहिला आहे. जानेवारीत येणारा 'वूल्फ मून' ते डिसेंबरमध्ये येणारा 'कोल्ड मून' अशी प्रत्येक 'मुनाला' वेगवेगळी नावे आहेत. थोडे विषयांतर : असेच आपल्या क्यालेंडरातही प्रत्येक पौर्णिमेचे काही वैशिष्ट्य आहे ना! चैत्र- हनुमान जयंती, वैशाख-बुध्दपौर्णिमा,जेष्ठ- वट्पौर्णिमा,आषाढ- गुरुपौर्णिमा,श्रावण- नारळीपौर्णिमा/राखीपौर्णिमा भाद्रपद-? , अश्विन-कोजागरी पौर्णिमा,कार्तिक-त्रिपुरी पौर्णिमा,मार्गशीर्ष- दत्तजयंती,पौष- शाकंभरी पौर्णिमा,माघ- ? फाल्गुन-होळीपौर्णिमा. भाद्रपद व माघ पौर्णिमेचे वैशिष्ट्य कोणाला माहित असल्यास सांगावे ही विनंती. स्वाती
  • Log in or register to post comments
S
srahul गुरुवार, 01/20/2022 - 12:54 नवीन

भाद्रपद- प्रौष्ठपदी पौर्णिमा

भाद्रपद- प्रौष्ठपदी पौर्णिमा , माघ-नव्याची पुनव ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/27/2007 - 18:23 नवीन

माहिती आवडली !

उगवला...चंद्र सुगीचा, माहिती आवडली ! सूर्यास्त आणि चंद्रोदय यांच्यातला कालावधी या महिन्याभरात सर्वात कमी असतो. त्यामुळे उत्तर गोलार्धात जेव्हा या सुमाराला सुगी जवळ येते, तेव्हा शेतकऱ्यांना काम करायला सूर्यास्तानंतरही थोडा अधिक वेळ मिळतो. क्या बात है ! चित्र आणि दुव्यासहीतची माहिती आवडली ! येऊ दे आणखी असेच लेख. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 09/27/2007 - 20:18 नवीन

वा

वेगवेगळी चांद्र नावे वाचून मजा आली. नव्यानेच हे समजले. आपल्याकडे सुद्ध असे काही आहे हे स्वातीताईंच्या प्रतिसादाने आताच जाणवले. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 09/27/2007 - 22:32 नवीन

छान !

मिसळपावावर माहितीपूर्ण लेखनालाही परवानगी आहे तर ! नंदन छोटेखानी लेख आवडला. पौर्णिमेची रात्र असतेच सुंदर. वरती स्वाती ताईंनी हिंदुंच्या पौर्णिमा दिल्या आहेतच. पूर्ण चंद्राचा डोक्यावर परिणाम होतो, हे सहजरावांच्या प्रतिसादातही दिसतेच. आणखी अशीच माहिती येऊ देत. - (चांद्रसेनी) सर्किट
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 09/28/2007 - 01:38 नवीन

धन्यवाद

आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 09/28/2007 - 08:40 नवीन

चंद्राची काही वैशिष्ट्ये

ज्योतिर्वैभव - ले त्र्यं. गो. ढवळे यांच्या (दुर्मिळ) पुस्तकातील काही माहीती इथे१ आणि इथे२ बघा. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
S
srahul गुरुवार, 01/20/2022 - 12:56 नवीन

धन्यवाद

धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
च
चित्रा Fri, 09/28/2007 - 08:56 नवीन

छान!

चांगला आहे छोटेखानी लेख. आवडला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा