श्री सुहास, वेगळ्या विदर्भाबाबत वेगळ्या अंगाने चर्चाप्रस्ताव मांडल्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रात वीजनिर्मीतीबाबत मोठाच गोंधळ आहे.
महाजेन्कोच्या आकडेवारीत खाजगी (बीएसइएस, टाटा पॉवर वगैरे) तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार्या तारापूर अनुप्रकल्पातील वीजनिर्मीतीची क्षमता अंतर्भूत नाही. ती क्षमता विचारात घेतल्यास एकूण स्थापित क्षमता २०४१५ मेगावॅट इतकी आहे. (दुवा) म्हणजेच विदर्भात जवळ जवळ महाराष्ट्रातील एकूण स्थापित क्षमतेच्या २४% स्थापित क्षमता आहे. विदर्भातील वीजेच्या आकडेवारीची माहिती मला मिळू शकली नाही. पण क्षमतेच्या प्रमाणात विदर्भात मागणी कमी असावी असे वाटते.
केवळ उर्वरीत महाराष्ट्रास नुकसान होते म्हणून विदर्भास वेगळे राज्य मिळू नये या मागणीस नाकारणे योग्य नाही. विकासाच्या दृष्टीकोनातून वेगळा विदर्भ अधिक विकसीत होणार आहे का, हे तपासून पहायला हवे. वीज वितरणात होणारे नुकसान अशा प्रकारच्या अडचणी वेगळ्या विदर्भात कमी होणार आहेत का? लहान राज्यांचा आतापर्यंतचा अनुभव पाहील्यास काय चित्र समोर येते या बाबींवर वेगळ्या विदर्भाचा विचार व्हायला हवा. याबाबत मिपावर आधी काही चर्चा झाल्याचे आठवते. विदर्भ वेगळे राज्य झाल्यास अधिक प्रगतीशील होणार नाही, असे माझे व्यक्तिगत मत आहे. हे मत केवळ आर्थिक कारणांसाठी नाही तर सांस्कृतिक कारणांसाठीही आहे. (पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योगास लागणार्या प्रचंड वीजेचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसने या मागणीस पाठींबा दर्शवावा हे आश्चर्यकारक आहे.)
एका चांगल्या चर्चाप्रस्तावाबद्दल पुन्हा एकदा आभार.
>>पण क्षमतेच्या प्रमाणात विदर्भात मागणी कमी असावी असे वाटते.
दिवसातुन कमीत कमी ५-६ तास लोडशेडिंग आहे ..
विदर्भ वेगळा होउन काही उपयोग होइल असे वाटत नाही .. फक्त राजकीय पक्षांना नविन कुरण मिळेल चरायला ..
स्वप्निल
या आधीची वेगळी झालेली राज्ये काही स्वत:च्या पायावर उभी नाहीत. तशी आकडेवारी उपलब्ध आहे. वेगळी राज्ये करून प्रश्न सुटणारे नाहीत. राजकारणी म्हणजे देशाला लागलेली किड आहे.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या इंजन मेक्यॅनीक (ITI-डिझल)
@ अक्षय,
आपल्या विचारांशी सहमत...फक्त एक बाब खटकली...साखर कारखाने स्वतःला लागणारी वीज स्वताच तयार करतात...साखर कारखान्यासाठी पॉवर प्लांट असण बंधनकारक आहे. (निदान ४ वर्षापूर्वी मी एका साखर कारखान्याचं ऑडीट केलं तेव्हा तरी होतं)
@ अक्षय,
आपल्या विचारांशी सहमत...फक्त एक बाब खटकली...साखर कारखाने स्वतःला लागणारी वीज स्वताच तयार करतात...साखर कारखान्यासाठी पॉवर प्लांट असण बंधनकारक आहे. (निदान ४ वर्षापूर्वी मी एका साखर कारखान्याचं ऑडीट केलं तेव्हा तरी होतं)
श्री पटवर्धन, आपले म्हणणे बरोबर आहे. धन्यवाद. ऊसाच्या सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. मला साखर उद्योग म्हणजे ऊस संवर्धनापासून साखरनिर्मीतीपर्यंत असे म्हणायचे होते पण ते पुरेसे स्पष्ट करायला हवे होते.
प्रतिक्रिया
चांगला प्रस्ताव
....
या आधीची
@
@
बरोबर