Skip to main content

व्यक्तिचित्र

सामान्यांमधले असामान्य: कर्नल समीर गुजर

लेखक मार्गी यांनी शनिवार, 04/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. भारतीय सेनेमध्ये महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल नावाजले गेलेले मूळचे परभणीचे असलेले कर्नल समीर गुजर हे माझे मित्र! हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो! नुकताच त्यांच्या सहवासाचा योग आला. सेनेमध्ये इतक्या उच्च पदावर व दायित्वावर असूनही जनतेसोबतचं त्यांचं आत्मीयतेचं वागणं- बोलणं, गावच्या लोकांसोबत व समाजासोबत असलेली त्यांची बांधिलकी, इतक्या उंचीवर पोहचूनही त्यांचं डाउन टू अर्थ वागणं हे खूप जवळून बघता आलं. त्यांच्याकडून त्यांच्या वाटचालीतले काही किस्से ऐकायला मिळाले. माझे गावचे मित्र म्हणून हे लिहावसं वाटलं.

तात्या ......... !

लेखक चौथा कोनाडा यांनी सोमवार, 20/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या वारला ! चंद्रशेखर अभ्यंकर असं भारदस्त नाव धारण केलेला हा आडमाप माणूस - वयाने आणि आकाराने माझ्यापेक्षा बराच मोठा होता. मोठा असूनही त्याला कधी अहोजाहो केलं नाही. तो वारला हे भिडेखातर लिहितोय - तात्या मेला अस लिहिलं पाहिजे. काही वर्षापूर्वी भारतात होतो तेव्हा तात्याच्या अनेक भेटी व्हायच्या. सोशल मीडियातून मला भरगच्च मित्र मिळाले. पुढे वेगवेगळ्या कारणांनी सगळेच दुरावले - त्यातला तात्या प्रमुख ! फेसबुक आणि ऑर्कुट लोकप्रिय व्हायच्या आधी - मिसळ पाव हा नव्या मराठी लेखकांचा अड्डा होता. तात्या त्यातला मुख्य माणूस.

हिमालयातून सुरू झालेली माझी गोष्ट. . .

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 03/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
माझा जन्म झाला हिमालयाच्या पर्वतीय परिसरामध्ये. उत्तराखंडच्या पिथौरागढ़ जिल्ह्यात सद्गड नावाच्या अतिशय सुंदर गावाजवळ. हिमालयाच्या पर्वत रांगांच्या मधोमध! सगळीकडे डोंगर, झाडं, पशु- पक्षी अशा वातावरणात मी जन्मलो. अतिशय थंड वातावरण होतं ते. मी आणि माझे भाऊ- बहीण डोंगरात खेळायचो. खूप सुंदर परिसर आणि हीss शांतता होती तिथे. सगळीकडे हिरवंगार वातावरण, माती, शेतं आणि भरपूर थंडी. शिवाय आम्ही जिथे राहायचो तिथे खूप बकर्‍या सोबत असायच्या. मी बकर्‍या आणि गायी- बैलांसोबत खेळायचो. माझे दिवस खूप मजेत जात होते. आजूबाजूला असलेले डोंगर- झाडं मला ओळखीचे वाटायला लागले होते.

अत्तराच्या कुपीतून दरवळणारा सुगंध. . .

लेखक मार्गी यांनी रविवार, 28/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्या जगण्याच्या धावपळीमध्ये आपण अनेकदा गोष्टी विसरून जातो. वर्तमानाच्या धामधुमीमध्ये जुन्या सुगंधी आठवणींचा दरवळ विसरून पुढे जातो. आणि मानवी स्वभावच असा आहे की, ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या आपल्याला कमी लक्षात राहतात आणि जे खटकत असतं, जे त्रासदायक असतं तिकडेच जास्त लक्ष जातं. जे चांगलं आणि उत्तम होतं ते आपण लक्षात ठेवत नाही. आणि पुढे जाताना मागची वाटसुद्धा आपल्या नजरेसमोरून दिसेनाशी होती. आपली मुळं आणि आपला आरंभ आपल्या डोळ्यांसमोर नसतो.

९८ धावांची दमदार खेळी: नांदेडचे आजोबा

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 27/07/2023 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार. कधी कधी एखाद्या कार्यक्रमाला वक्ता म्हणून एखाद्याला बोलावलं जातं. त्याचं भाषण झाल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो की तो माणूस कोण ज्याने ह्या वक्त्याला बोलावलं! काहीसं तसंच पण वेगळ्या अर्थाने. माझे नांदेडचे आजोबा- श्री. गजानन महादेव फाटक ह्यांचं जगणं बघताना हाच प्रश्न मनात येतो आणि आश्चर्य वाटत राहतं की- बनानेवाले ने क्या खूब बनाया है! अतिशय वेगळं आणि काहीसं दुर्मिळ जगणं ते जगले. कधी कधी ९८ धावांवर एखादी इनिंग थांबते कारण वेळच संपून जातो. फलंदाज नाबादच राहतो. तसं त्यांचं जगणं आहे असं मनात येतं.

आत्या नावाची जिव्हाळ्याची स्पेस

लेखक मार्गी यांनी बुधवार, 15/02/2023 या दिवशी प्रकाशित केले.
✪ प्रखरता नव्हे शीतलता ✪ पूर्वाश्रमीची वासंती वेलणकर अर्थात् सौ. सुमित्रा भांडारी ✪ परभणी ते देवगड व्हाया बस्तर ✪ "छांदसी आणि सुमित्रा" ✪ पतझड़ है कुछ, है ना? ✪ मृत्युसाठी आपण काय करू शकतो? ✪ मै अहम हूँ यही वहम था सर्वांना नमस्कार. मनामध्ये आलेल्या अनेक भावना आणि विचारांना व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. आत्या... आणि त्याबरोबरच मामा, काका अशा जागा अतिशय जिव्हाळ्याच्या असतात. सतत जवळ असल्यामुळे आणि उग्र अशा प्रखरतेमुळे आई- बाबा ही नाती काहीशी दुरावलेली असतात. किंवा निकटता आणि प्रखरता असल्यामुळे डोळ्यांवर काहीशी अंधारी आलेली असते. सतत समोर असलेली गोष्ट आपले डोळे हळु हळु बघणं कमी करतात.

त्यागी गजानना तुझ्या शौर्याला शतशः नमन

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 02/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
चैतत्न्याने प्रफुल्लित करणार्‍या सृष्टी आणि प्रकृतीच्या रक्षाबंधनाच्या कर्तव्याला पाळण्यासाठी साक्षात रुद्राच्या रौद्ररुपाला झेलणार्‍या त्यागी गजानना तुझ्या शौर्याला आमचे शतशः नमन असो.

ज्वाईनिंग लेटर....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 11/06/2022 या दिवशी प्रकाशित केले.
स्टेशनात धडधडत गाडी आली,घाईघाईत तो गाडीत चढला आणी गाडीने वेग पकडला. सराईत नजरने सावज हेरले,"उचला रे याला" म्हणत काळ्या कोटातला यमदूत पुढे सरकला. गाडी थांबली,स्टेशन मास्टरच्या कार्यालयात फुकट्यांची वरात दाखल झाली. करंगळी दाखवत विचारलं, जाऊ का? होकारार्थी मान डुलली. रुमाल काढत बाहेर जाताना आणखीन एक काळा कोटधारी दानव येत होता. वाटले बाहेरच्या बाहेर पळून जावे. त्याला परत आलेला पाहून पोलीस म्हणाला, "साहेब हा पण". नाव काय तुझे? काको दानवाने विचारले. हवालदार बाकीच्यांना टाका आतमधे,याला इथेच सोडा.