Skip to main content

विनोद

गावाकडच्या गोष्टी : २

लेखक साहना यांनी शनिवार, 13/02/2021 या दिवशी प्रकाशित केले.
गावांत देवळे खूप पण चांगले चारित्र्य असलेले आणि शुचिर्भूतपणा सांभाळून असणारे भटजी कमी अशी स्थिती झाली आणि दुष्काळांत तेरावा महिना प्रमाणे गावांतील अत्यंत आदरणीय आणि गुरुतुल्य भटजी श्री जोशी बुवा ह्यांचे निधन झाले. जोशीबुआंचे सुपुत्र अतिशय धार्मिक असले तरी विश्व हिंदू परिषदेची मोठी जबाबदारी घेऊन ते उत्तर भारतांत फिरत असत त्यामुळे देवळांतील पुढचा भटजी कोण असा प्रसंग निर्माण झाला. देवळाच्या कमिटीने भरपूर विचार करून शेवटी काही नावे शॉर्टलिस्ट केली आणि मग एका भटजीला नियुक्त केले. ह्या भटजींचे नाव वामन भटजी आणि नावाप्रमाणेच मूर्ती खूपच लहान होती. ह्यांची पत्नी आणि दोन मुली गावांत आल्या.

गावाच्या गोष्टी : १

लेखक साहना यांनी शनिवार, 13/02/2021 या दिवशी प्रकाशित केले.
थिएटर हा प्रकार लहानपणी खूप पॉप्युलर होता. कष्टकरी समाज आठवड्याला एक तरी चित्रपट पाहायचा. आमच्या घरी टीव्ही असल्याने आम्हाला मनोरंजनाची साधने होती पण थेटर मध्ये जाऊन चित्रपट मी लहानपणी असा पहिलाच नव्हता. पहिले कारण म्हणजे थेटर दूर होते आणि तिथे जाण्यासाठी वाहन वगैरे करून जावे लागत असे. त्याशिवाय तो भाग शहराचा एकट्या दुकटीने किंवा इतर मुलांबरोबर जावा असाही नव्हता. आणि चित्रपटासाठी गर्दी असायची आणि हि गर्दी बहुतेक करून कष्टकरी लोकांची असायची. आठवडाभर कुठेतरी शारीरिक कष्टाची कामे करून आता मनोरंजनासाठी आलेली हि मंडळी. त्यांच्या घोळक्यांत मिक्स होणे आमच्या घराच्या लोकांना विशेष प्रिय नव्हते.

गुलमोहर सोसायटी, हत्ती आणि 'शेर'

लेखक कुमार जावडेकर यांनी रविवार, 10/01/2021 या दिवशी प्रकाशित केले.
"या वर्ष-अखेरीच्या पार्टीसाठी एक नवीन कल्पना सुचली आहे, " परुळेकर मामा बाल्कनीत येत मला म्हणाले, "नाही तरी 'व्हर्च्युअल गेट-टुगेदर' आहे, तर फक्त गप्पा मारुया. प्रत्येकानं २०२० मध्ये घडलेली एक तरी सकारात्मक किंवा आनंददायी घटना सांगायची." "विचार करून सांगतो, " मी म्हणालो. वास्तविक, गप्प बसून राहणे, गप्पा मारत बसणे किंवा अगदी गप्पी मासे पाळणे या 'गप्प' च्या बाराखडीत येणाऱ्या कुठल्याही क्रियेला माझा कधीच विरोध नसतो. मामांनाही हे माहिती आहे. आम्ही आपापल्या बाल्कन्यांमधून अशी चर्चा गेली वीस-बावीस वर्षं करत आलो आहोत.

निळ्या टिक दाखवा हो।।

लेखक उपयोजक यांनी रविवार, 03/01/2021 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोक WhatsApp वर मेसेज वाचल्याचे कळू नये म्हणून निळ्या टिक ऑफ करतात.त्यांना विनंती मूळ गीत : निजरुप दाखवा हो गीतकार: ग.दि.माडगूळकर निळ्या टिक दाखवा हो।मॅसेज वाचल्याचे कळू द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।। अपेक्षेने लिहितो मी; प्रतिसाद त्यास द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।। कोणी इथे तळमळतो; त्याची चिंता सरु द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।। दखल घेतलीसे माझी; हे मजला कळू द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।।

अज़ीज़ मलिक - एक रसग्रहण

लेखक कुमार जावडेकर यांनी मंगळवार, 22/12/2020 या दिवशी प्रकाशित केले.
काल-परवाच टीव्ही. वर एक तलत महमूदचं गाणं कुठल्यातरी गलत महमूदच्या आवाजात पुनर्मिसळ केलेलं माझ्या बघण्यात आलं. तो गायक तलत नव्हता हे ऐकताना (नव्हे, ऐकता क्षणीच) कळलं आणि महमूद तरी होता की नव्हता हे कळण्याआधीच मी चॅनेल बदललं. पण तरी ते गाणं ओठांत येत राहिलं आणि त्यामुळे अनेक गोष्टी आठवल्या. आपल्या आवाजाला जरासा रफ्फू केला की आपणही महंमद रफीसारखे गाऊ शकतो असा समज असलेले अनेक शेख महंमद आमच्या बालपणी होऊन गेले होते. अन्वर, शब्बीर कुमार, महंमद अजीज अशी अनेक नावं त्यांनी धारण केली होती. (पुढे त्यातूनच 'सोनू निगम'ची स्थापना झाली आणि बाकीच्या या छोट्या-मोठ्या गायकांची सुट्टी झाली.) असं अनेकदा होतं.

काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......

लेखक गड्डा झब्बू यांनी मंगळवार, 08/12/2020 या दिवशी प्रकाशित केले.
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय..... वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन..... ###### जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती.

दंतकथा

लेखक नीलकंठ देशमुख यांनी बुधवार, 18/11/2020 या दिवशी प्रकाशित केले.
परवाची गोष्ट ,अगदी परवाची.दातांच्या डॉक्टरांकडे गेलो होतो.अर्थात दाताची तक्रार होती म्हणून.एरवी डॉक्टरांकडे कोण कशाला जाईल. तसे दाताचे डॉक्टर माझे मित्र आहेत. पण मी रिकामा असलो तरीकामाच्या वेळेला उगीच गप्पा मारायला गेलो तरी ते बिझी असल्याने मला तिथे दात करोत (स्वतः चे)बसावे लागेल. संध्याकाळी सात साडेसात ची वेळ.दवाखान्यात बर्यापैकी गर्दी होती . प्रतिक्षालयात अंदाजे पंधरा,वीस लोक ।रुग्ण (दंताळू) व सोबतचे( सांभाळू ) धरुन .दोन तीन चिमुरडे पण होते . चेहऱ्यावर च्या करुण भावा वरून रुग्ण कोण ते सहज ओळखू येतं.

करोनात्रस्त त्रागा

लेखक आनन्दा यांनी मंगळवार, 13/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप खरे यांची क्षमा मागून, चाल - मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो करोनामुळे काही लोक पूर्ण घरात बसून आहेत, सगळी काळजी घेत, आणि काही लोक सगळे नियम धाब्यावर बसवून फिरतायत, त्यावरून झालेला वैताग आता कवितेतून व्यक्त होत आहे मी नाकावरती दहा मुखवटे आवळतो तो उघड्या नाकपुड्यानी गावातून फिरतो मी दाव्याच्या बैलापरी झालो बंदी तो उनाड रेड्यापरि धावे स्वच्छंदी मी दाव्यावरती पाय गंजवित बसतो तो उघड्या नाकपुड्यानी गल्लीत फिरतो डोळ्यात माझिया पोलीसांची भीती असते डोक्यावर हेल्मेटही चिलखती तो त्याच पोलिसांनाही खुन्नस देतो तो उघड्या नाकपुड्या आम्हाला हसतो मी शिंकेच्या आवाजाला घाबरतो अन दारे खिडक्या लावून घरा

पद्मावत: खिलजी वि. उसूल

लेखक फारएन्ड यांनी मंगळवार, 13/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहासातील राजे वा राण्या यांच्यावरचे सगळे चित्रपट एकत्र केले तर हे सिद्ध होते की पुढच्या २००-३०० वर्षांत भारतावर जी परकीय आक्रमणे झाली त्याबद्दल त्या त्या चरित्रनायकाला सगळी कल्पना होती. मुघलांची रणनीती, ब्रिटिशांचे कारस्थान, भारतातील सगळे राजे एक झाले तर वगैरे वगैरे. पण प्रत्येक वेळेस "इतर" राजांना ते समजले नाही. म्हणून देश पारतंत्र्यात गेला. या चित्रपटाने उसूलांची सर्व रेकॉर्ड्स मोडली आहेत. पूर्वी ७० च्या दशकात एका चित्रपटात फार फार तर २-३ उसूल असत. इथे उसूलांमधून इतर संवाद शोधावे लागतात. यातले बरेचसे उसूल दिग्दर्शकाने शाहिदच्या कॅरेक्टरला वेळोवेळी वापरायला दिले आहेत.

प्रेमाचा कोव्हीड!!

लेखक चलत मुसाफिर यांनी शुक्रवार, 18/09/2020 या दिवशी प्रकाशित केले.
(नम्र विनंती: कविता हलके वाचावी. न आवडल्यास विसरून जावी. भावना दुखवून वगैरे घेऊ नयेत. तितकी तिची लायकी नाही. दिवस हे असे आहेत. त्यात आपला जरा विरंगुळा, इतकेच!) -------- आठवतं तुला? तुझ्या अंगाला सेंटचा वास येत होता, सॕनिटायझरचा नाही.