मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निळ्या टिक दाखवा हो।।

उपयोजक · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काही लोक WhatsApp वर मेसेज वाचल्याचे कळू नये म्हणून निळ्या टिक ऑफ करतात.त्यांना विनंती मूळ गीत : निजरुप दाखवा हो गीतकार: ग.दि.माडगूळकर निळ्या टिक दाखवा हो।मॅसेज वाचल्याचे कळू द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।। अपेक्षेने लिहितो मी; प्रतिसाद त्यास द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।। कोणी इथे तळमळतो; त्याची चिंता सरु द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।। दखल घेतलीसे माझी; हे मजला कळू द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।।

वाचने 4210 वाचनखूण प्रतिक्रिया 7

Jayant Naik Mon, 01/04/2021 - 18:06
मस्त जमली आहे कविता. येईल तो मेसेज पुढे ढकलणारे किती हवालदील होतात हे बरोबर टिपले आहे.

सरिता बांदेकर Sat, 01/09/2021 - 00:05
मस्त. पण माझ्या फोनमध्ये नोटीफिकेशन ॲाफ आहे त्यामुळे नीळ्या टीक नाही दिसणार हो.