एका मुलाखतीतील मुक्ताफळे
स्थळ : हापिसातील बॉस क्र. १ ची प्रशस्त वातानुकूलित केबिन.
वेळ : हापिस सुरु होऊन १ तासानंतर.
काळ : लवकर पुढे सरकत नसलेला कंटाळवाणा .
प्रसंग : अकौंटस क्लार्कच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी (तब्बल) ६५ उमेदवारांच्या मुलाखतीचा.
पात्रे : मुलाखतकार : १. बॉस क्र. १
२. सदस्य , लेखा विभाग
३. सदस्य , प्रशासन विभाग
४. मी , महिला सदस्य
उमेदवार : ५८ मुली व ७ मुले १७ ते २० वयोगटातील.
बॉस क्र. १ समोरच्या फायलीतली उमेदवारांची माहिती चाळून पाहत आहेत.
बॉस प्रशासन सदस्यांकडे पाहून विचारतात.
‘अहो मोहिते, ही सगळी कॉलेजची पोरे अन पोरी दिसताहेत ?’
‘साहेब, महिना २२०० पगारात अन १२ वी पास या शिक्षणात आणखी कोण मिळणार ?’ प्रशासन सदस्य अदबीने.
‘अन या पोरी बऱ्याच दूरदूरच्या खेड्यापाड्यातल्या दिसताहेत ?’
‘साहेब, त्यांना जवळच्या तालुक्यातल्या डिविजनमध्ये पोस्टिंग देता येईल...’
‘या पंधरामध्ये रिझर्वेशनच्या किती जागा आहेत ?’
‘पाच, साहेब.’
‘मार्किंग स्कीम ?’
‘अॅकॅडमिक १० मार्क, सामान्य ज्ञान १० आणि विषय ज्ञान १०.’
‘एकूण ६५ म्हणजे २ -२ मिनिटात एकेकाला आटपायला पाहिजे..?’
‘ होय, साहेब.’
‘ ठीक आहे. करा चालू. ‘
बॉस बेल दाबतात. शिपाई डोकावतो. त्याच्याकडे पाहून म्हणतात,
‘एकाएकाला पाठवा आत.’
उमेदवार क्र. १ ही १८ वर्षीय कन्यका आहे. (१८ वर्षे हे मला फायलीतल्या कागदावर वाचून समजलं. )
‘मे आय कमिन सर ?’
‘या.’ बॉस
उ. क्र. १ आत येते. टेबलाशी भांबावल्यासारखी उभी राहते.
लेखा सदस्य ‘त्या खुर्चीत बस.’
ती बसते.
‘नाव काय ?’
‘अस्मिता नारायण बेलेकर.’
‘शिक्षण ?’ लेखा सदस्य
‘एस. वाय. बी. कॉम. मधे शिकतेय.’
‘बी. कॉम. चा फुल फॉर्म ?’ बॉस
‘अं...?’
‘बी. कॉम. शिकता ना ? तो कशाचा शॉर्टफॉर्म आहे ?’
‘अं.. म्हणजे ते आपलं......’
एक मिनिट शांतता.
‘स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ?’ मी.
‘.......ते ... कोणतरी राजेन्द्रकुमार...?’
‘ऑ... राजेन्द्रकुमार ??’ प्रशासन सदस्य दचकतात.
‘नाही.. नाही..राजेन्द्रप्रसाद..!’
‘हां..हां..’
‘सध्या कोण आहे राष्ट्रपती ?’ प्र. सदस्य.
‘त्याच की आपल्या.. प्रतिभाताई पाटील !’
‘स..ध्या...???’
‘हो..!’
‘बरं , अकौंटचे प्रकार किती ?’ आता लेखा सदस्य सूत्रे हातात घेतात.
‘किती..?’
‘किती ?’
पुन्हा १ मिनिट शांतता.
‘बारावीला किती मार्क ?’ पुन्हा लेखा सदस्य.
’६६.३५ टक्के.’
‘कितीपैकी किती ?’
‘६०० पैकी ३९८’
‘हा घ्या कागद . काढून दाखवा ६६.३५ ‘
उमेदवार कागदावर आकडे लिहिते __ ६०० भागिले ३९८. पेन पुढे सरकत नाही.
‘आले का ६६.३५ टक्के ?’
‘ना..हि..’
‘अहो मग अकौंट कसा ठेवणार तुम्ही ?’
१ मिनिट शांतता.
‘अस्मिताबाई, तुमच्या कॉलेजचं टायमिंग काय ?’ बॉस.
‘सात ते अकरा.’
‘मग आमचं ऑफिस तर दहाला सुरु ? कसं काय करणार ?’
‘करणार की दोनी...’
‘कसं ?’
‘शेवटचा तास बंक मारणार ..’
‘रोज ?’
‘होय. सरांना तसं सांगूनच आलेय मुलाखतीला !’
‘ठीक आहे . या तुम्ही.’
‘आत यु का सायेब ?’ आणखी एक उमेदवार.. १९ वर्षीय कॉलेजकुमार.
‘या. बसा तिथं.’
उमेदवार बसतो.
‘नाव ?’
‘मल्ल्याप्पा दरग्याप्पा हिट्टीनहळ्ळी ‘ प्रत्येक जोडाक्षराबरोबर लेखा सदस्यांचा चेहेरा बिर्याणीत खडे आल्यागत.
‘गाव ?’
‘चिक्कोडी ‘
‘डिस्ट्रिक्ट कोणता चिक्कोडीचा ?’ मी.
‘डिस्ट्रिक्ट ? ...नाय म्हायती... आता हितं महाराष्ट्रातच आसतो आमी. निमशिरगावला.’
‘काय शिकता ?’
‘ते काय, आता यफ. वाय. बी. काम. करतोय की !’
‘बी. कॉम. चा फुल फॉर्म ?’ बॉस
‘ब्याचलर हॉफ कम्युनिकेशन !’
‘कम्युनिकेशन ...?’ मी.
‘व्हय.’
‘बरं, कर्नाटकात जिल्हे किती ?’ प्र. सदस्य.
‘जिल्हे व्हय ? आसतील की पंचवीसभर ! ‘
‘नक्की पंचवीसचं का ?’
‘दोनचार कमी-जास्तपन आसतील.’
‘नॅशनल अँथेम कोणती ?’ मी.
‘भारत मेरा देश है...’
‘अहो, ती प्रतिज्ञा..! राष्ट्रगीत सांगा....’
‘हां, ते व्हय, वंदे मातरम.’
मी हैराण होऊन बॉसकडे पाहते.
‘बारावीला मार्क किती ?’ लेखा सदस्य.
‘यकोणपन्नास...’
‘....पूर्णांक किती ?’
‘....’
‘ही घ्या तुमच्या मार्कलिस्टची प्रत. अन टक्केवारी काढा बरं..’
‘क्याल्क्युलेटर पायजे सायेब.’
‘तसंच नाही का काढता येणार ?’
‘कशाला टायम फुकट घालवायचा ?’
१ मिनिट शांतता.
‘इथं कोणत्या ऑफिसात मुलाखतीला आलाय ?’
‘.......?’
‘कोणी बोलावलीय मुलाखत ?’
‘....?....?’
‘नाव काय आमच्या कार्यालयाचं ? मुलाखतीचं पत्र वाचलंय ना ?’
‘…….’
पुन्हा एक मिनिट शांतता.
‘बरं, अकौंट कशासाठी ठेवतात ?’ लेखा सदस्य.
‘कंपनीला फायदा हुतो..’
‘नुसता अकौंट ठेवल्यामुळे ?’
‘बरं आसतं ठेवल्यालं...’
‘तुमच्या कॉलेजचं टायमिंग काय ?’ बॉस
‘साडेसात ते बारा साहेब.’
‘मग नोकरी अन कॉलेज दोन्ही कसं करणार ? आमचं टायमिंग दहा ते पाच.’
‘म्यानेज करणार साहेब.’
‘कुणाला म्यानेज करणार ? कॉलेजला का आम्हाला ?’
‘दोघान्लाबी !’
‘.....!!! वा..छान ! या तुम्ही.’
तिसरी उमेदवार. १७ वर्षीय स्मार्ट बालिका.
‘मे आय कमिन सर ?’
‘या बसा त्या खुर्चीवर.’
‘नाव ?’
‘राधिका रमेश तिवारी.’
‘शिक्षण ?’
‘ बी. कॉम. फर्स्ट यर..’
‘बी. कॉम. चा फुल फॉर्म ?’ बॉस
‘ब्याचलर ऑफ कॉमर्स’
‘छान. बारावीला मार्क किती ?’
’७८.५६ टक्के.’
‘म्हणजे कितीपैकी किती ?’ लेखा सदस्य.
‘अं, ६०० पैकी.... किती ते आठवत नाही.’
‘आं ? तुमचेच मार्क ना ? का दुसरं कोण बसलं होतं परिक्षेला ?’ बॉस.
उमेदवार खुदकन हसते. ‘नाही हो, मीच..’
‘हं, इथं लिहिलेत बघा तुमचे मार्क. कागद घ्या..काढून दाखवा बघू टक्केवारी.’
उमेदवार टक्केवारी बरोबर काढते.
‘गुड ! अकौंटचे प्रकार किती ?’ लेखा सदस्य.
‘तीन.’
‘कोणते ?’
उमेदवार नावे बरोबर सांगते.
‘व्हेरी गुड. याआधी कुठं काम केलंय का ?’
‘हो सर .बँकेत सहा महिने काम केलंय एन्ट्री करायचं.’
‘कॉम्प्यूटरवर ?’
‘हो’
‘बँकेत किती प्रकारची खाती असतात ?’
‘अं, बचत खाते, चालू खाते... आणि.....आणि...’
‘ठीक आहे. आता कोणत्या ऑफिसात मुलाखतीला आलात सांगा.’ बॉस
‘महाराष्ट्र राज्य .......कंपनी मर्यादित.’
‘कोणाचे ऑफीस ?’
‘सरकारचे..’
‘तसं नव्हे, ह्या ऑफिसचा इनचार्ज कोण ?’
‘अं..अधिक्षक अभियंता.’
‘कुठं आहेत ते ?’
‘खिक... अय्या, तुम्हीच की !’
सौम्य हशा पिकतो.
‘तुम्ही कॉलेजात कधी जाता ?’
‘सात ते अकरा.’
‘अन मग ऑफिसात दहाला कसं येणार ?’
‘अं, थोडा वेळ होईल यायला, पण मी दुपारच्या सुट्टीत काम करीन सर.’
‘अहो, पण तुम्हाला आम्ही ह्या ऑफिसात नाही देणार काम ! आटपाडीला देणारेय ...!’
‘आटपाडी..? सर इथच द्या ना.’
‘इथं जागा नाही हो.’
‘बाहेर भरपूर जागा आहे साहेब.’
‘च.. म्हणजे व्हेकन्सी हो..!’
‘हां हां .. मग राहूदे बै..’
‘इथं जागा मिळाली तर करणार का ?’
‘हो...!’
‘ठीक आहे..या आता.’
------------------*******************------------------------
अन अशाच मुलखती पुढे चालल्या...
वर्गीकरण
"मुक्ताफळे" आवडली !
खूपच छान आहे सारे !
अनुभव सदरात लिहिलंय त्यामुळे
In reply to अनुभव सदरात लिहिलंय त्यामुळे by शिल्पा ब
होय शिल्पा. खरोखरीचीच
उत्तम!
लय भारी!
खरच मजा आला
लई भारी, आमच्या क्षेत्रात
मजा आली.
In reply to मजा आली. by पाषाणभेद
+१
In reply to +१ by सोत्रि
+२
In reply to +२ by रमताराम
स ह मत !
रोचक प्रश्नोत्तरे
यावरून काही आठवले
In reply to यावरून काही आठवले by चौकटराजा
किस्से झकास..
महात्मा आणि फुलनदेवी.
In reply to महात्मा आणि फुलनदेवी. by प्रभाकर पेठकर
(No subject)
In reply to महात्मा आणि फुलनदेवी. by प्रभाकर पेठकर
फुलनदेवी?
पुढच्या मुलाखतीही द्या ..
‘खिक... अय्या, तुम्हीच की !’
‘बरं आसतं ठेवल्यालं...’
‘ही घ्या तुमच्या मार्कलिस्टची
हाहाहाहा...
छान.
छानच
मुलाखात घेण्याचा प्रदीर्घ आणि
आमचीही काही मुक्ताफळे
In reply to आमचीही काही मुक्ताफळे by क्लिंटन
तुम्ही चांगले विंजीनेर असाल
मस्त मुलाखती.
In reply to मस्त मुलाखती. by खुशि
खुशीताई, फक्त आपल्या महान
सॉलिड..
भारी आहेत किस्से लेखातले आणि
मस्त किस्से! अजुन दोन चार सहज
छान लेख
In reply to छान लेख by कपिलमुनी
मला वाटते, मी लेखनात कुठेही
पटक्न वाचून संपलं कि हो, और
In reply to पटक्न वाचून संपलं कि हो, और by रेवती
धन्स रेवती आणि इतर. आणखीही
आयला एकसे एक खतरा आणभव!!!
आवडले
एकदम हलकं फुलकं मस्त वाटल
>>
आणखी काही तारे
In reply to आणखी काही तारे by चौकटराजा
किस्से आवडले.
In reply to आणखी काही तारे by चौकटराजा
बापरे ..कसले भारी इंगीनीअर
माझा अनुभव
मस्त खुसखुशीत किस्से
मस्त किस्से!
भारी किस्से आहेत, लेखातले आणि
मायला आट्पाडी जणू गडचिरोली
किस्से भारी आहेत एकदम